Wednesday, 26 July 2017

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील कर्जमाफीचा अर्ज ऑनलाइन भरावा

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील कर्जमाफीचा अर्ज ऑनलाइन भरावा


कर्जमाफीचा अर्ज ऑनलाइन भरावा लागणार
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील कर्जमाफीचा अर्ज ऑनलाइन भरावा लागणार आहे. राज्य शासनाने कर्जमाफी, प्रोत्साहनपर इतर लाभ मिळवण्यासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना प्रसिद्ध केला आहे. हे अर्ज भरताना आधारकार्ड अत्यावश्यक आहे. तसेच अर्जदाराला वैयक्तीक माहितीसह बँक खाती, त्याचा खाते क्रमांक,कर्जाचा प्रकार व कर्जाची रक्कम ही माहिती सादर करावी लागणार आहे.

https://aaplesarkar.maharashtra.gov.in/



अर्ज भरण्यासाठी ‘आधार’ आवश्यक
ही भरावी लागणार माहिती
संपूर्ण नाव, आधार क्रमांक, पत्ता, लिंग, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, पॅन क्रमांक (असल्यास), पेन्शन पीपीओ क्रमांक (असल्यास), पीक / मध्यम मुदत कर्जाचा तपशील, कर्ज खाते क्रमांक- १, २, ३ (बॅँक, विकास संस्थेचे नाव, शाखा, बचत खाते क्रमांक).

-एका कुटुंबातून एक अर्ज भरता येणार

या ठिकाणांहून अर्ज करावेत
जिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हा उपनिबंधक, उपनिबंधक, साहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, ग्रामपंचायत कार्यालय, बॅँका, विकास संस्था, महा-ई सेवा केंद्रे.

बोगसगिरी आढळल्यास फौजदारी!
कर्जमाफीबाबत सरकारने ठरविलेल्या निकषांत मी पात्र ठरत आहे. त्याचबरोबर अर्ज ‘अ’, ‘ब’ व ‘क’मधील सर्व माहिती सत्य असून, खोटी किंवा दिशाभूल करणारी असल्याचे निदर्शनास आल्यास कर्जमाफीची/प्रोत्साहनपर इतर लाभाची रक्कम व्याज व दंडासह परतफेड करण्यास बांधील आहे. याबाबत होणाऱ्या फौजदारी व इतर कायदेशीर कारवाईस मी पात्र राहीन. असे घोषणापत्रही भरून द्यावे लागणार आहे.


आॅनलाईन 
सहकार विभागाने कर्जमाफीची मागणी थेट शेतकऱ्यांकडूनच आॅनलाईन मागविली आहे. शासकीय कार्यालयासह विकास संस्था, बॅँकांमधून अथवा राज्य सरकारच्या संकेतस्थळावर किंवा वेब पोर्टलच्या माध्यमातून अर्ज भरता येणार आहे. पात्र थकबाकीदार पती-पत्नीची माहिती देणे बंधनकारक राहणार असून अपत्य कर्जदार असेल तरच माहिती द्यावी लागणार आहे. परिपूर्ण माहिती भरताना शेतकऱ्यांना आपल्या अंगठ्याचा ठसा द्यावा लागणार आहे. ही सगळी माहिती ‘आधार’शी लिंक केल्यावर संबंधित शेतकरी तोच आहे का? याची शहानिशा होणार आहे. त्याचबरोबर कर्जमाफीची रक्कम थेट त्याच्या बॅँकेतील खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.


छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील 
कर्जमाफीचा आदेश----




राज्यातील सुमारे 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारी ही कर्जमाफी ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना’ म्हणून ओळखली जाणार आहे. या योजनेचा लाभ पीक कर्जासह मध्यम मुदतीच्या कर्जधारकांनाही होणार आहे.
1 एप्रिल 2012  ते 30 जून 2016 या कालावधीत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपयेपर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. दीड लाखांहून अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता योजना (One Time Settlement) राबवण्यात येणार आहे. त्यामध्ये पात्र थकबाकी रकमेच्या 25 टक्के किंवा दीड लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल त्या रकमेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
तसंच 2012 – 2013 ते 2015 – 2016 या चार वर्षांत ज्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन झाले आहे, परंतु 30 जून 2016 रोजी ते थकबाकीदार असतील अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र, ज्यांनी कर्ज मुदतीत फेडले आहे त्यांना प्रोत्साहन म्हणून पीक कर्जाच्या 25 टक्के अथवा 25 हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती देण्यात येईल.
राज्यातील विद्यमान आणि माजी मंत्री, राज्यमंत्री, विद्यमान आणि माजी संसद सदस्य, विद्यमान आणि माजी विधिमंडळ सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिका सदस्य, केंद्र आणि राज्य शासनाचे तसंच निमशासकीय संस्था आणि अनुदानित संस्थांचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी या कर्जमाफीसाठी पात्र असणार नाहीत. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात आले आहे.
अशी आहे छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना
-कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांची संख्या - ८९ लाख
-  ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार शेतकरी
- १.५० लाख रुपये च्या आतील थकबाकीदार शेतकरी - ३६ लाख.
(थकीत कर्जाची रक्कम रुपये १८,१७२ कोटी रुपये)
- १.५० लाख रुपये च्या वरील  थकबाकीदार शेतकरी - ८ लाख.
(थकीत कर्जाची रक्कम रुपये ४,६०० कोटी रुपये)
- नियमित कर्ज परतफेड केलेले शेतकरी - ३५ लाख.
(थकीत कर्जाची रक्कम ८,७५० कोटी)
- कर्जाचे पुनर्गठन झालेले शेतकरी - १० लाख.
 (त्या कर्जाची रक्कम रुपये २,५०० कोटी.)

 -अशा प्रकारे राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना ३४,०२२ कोटी रुपये इतकी  कर्जमाफी

Political Research and Analysis Bureau (PRAB)


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 


https://imojo.in/prabindiaEBook
================================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.