भाजपाच्या सहाव्या उमेदवारामुळे विधानपरिषेच्या निवडणूकीत रंगत
येत्या १६ जुलै रोजी विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी होणा-या निवडणूकीसाठी आज भाजपाचे पृथ्वीराज देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या निवडणूकीतील रंगत वाढली आहे.येत्या १६ जुलै रोजी विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होत आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपाकडून पृथ्वीराज देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भाजपाच्या सहाव्या उमेदवारामुळे निवडणूकीची रंगत वाढली आहे. आज भाजपाकडून पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर, विजय गिरकर, राम पाटील रातोळीकर,रमेश पाटील आणि निलय नाईक यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेनेचे उमेदवार अॅड. अनिल परब आणि मनिषा कायंदे यांच्यासह, शेकापचे जयंत पाटील,काॅग्रेसचे शरद रणपिसे, वजाहत मिर्झा आणि राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्राणी यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. ११ जागांसाठी १२ अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली नाही. उद्या ६ जुलैला अर्जांची छाननी करण्यात येईल.९ जुलै उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे या दिवशी एका उमेदवाराने उमेदवारी मागे घेतल्यास निवडणूक बिनविरोध होईल अन्यथा १६ जुलै रोजी सकाळी ९ ते ४ या वेळेत मतदान घेण्यात येवून त्याच दिवशी मतमोजणी करण्यात येईल.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे पाय धरतानाचा फोटो व्हायरल
नागपूरमध्ये आज विधानपरिषदेच्या जागेसाठी भाजपच्या कोट्यातून राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. गेल्यावेळी भाजपमधून उमेदवारी भरणाऱ्या जानकरांनी यावेळी स्वत:च्या पक्षातून म्हणजेच रासपमधून अर्ज दाखल केला होता.अर्ज दाखल करतेवेळी महादेव जानकरांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे पाय धरले. अर्ज दाखल करताना जानकरांनी रासपच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याचा हट्ट धरला होता. पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर हे आज नागपूर येथे विधानभवनाच्या परिसरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे पाय धरतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जानकर, आता आणखी किती लाचारी करणार, असा हल्ला बोल पत्रकारांशी बोलताना केला. जानकर यांना भाजपच्या कोट्यातून विधान परिषदेसाठी कालच उमेदवारी जाहीर झाली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे जानकर हे संस्थापक-अध्यक्ष आहेत. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी बिनविरोध निवडणूक होणार आहे. त्याचा अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस होता. दरम्यान ‘संपत्ती कमावणार नाही, मागच्या दाराने आमदार- खासदार होणार नाही आणि स्वतःचा पक्ष कधी सोडणार नाही,’ असे सांगून लोकांची मने जिंकणाऱ्या कॅबिनेट मंत्री महादेव जानकरांनी आपल्या सर्व प्रतिज्ञा मोडल्या आहेत.राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष महादेव जानकर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत बारामतीतून ‘राष्ट्रवादी’च्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात तब्बल ४ लाख ५१ हजार मते मिळवून राज्यभर चर्चेत आले हाते. या निवडणुकीत जानकरांचे प्रमुख प्रचारक राहिलेले व रासपचे राष्ट्रीय सचिव बारामतीच्याच दशरथ राऊत यांनी अाता मात्र जानकरांची साथ सोडली आहे. धनगर समाज आणि बारामतीच्या मतदारांची फसवणूक केल्याचा आरोप महादेव जानकर यांच्यावर करून राऊत यांनी ‘भारतीय प्रजा सुराज्य पक्ष’ नावाने स्वतंत्र चूल मांडली आहे.महादेव जानकरांचे दावे आणि कार्यकर्त्यांचे आक्षेप
जानकरांचा दावा : माझ्या नावावर संपत्ती असणार नाही.आक्षेप : जानकर यांनी २००९ मध्ये माढ्यातून शरद पवार यांच्याविरोधात लोकसभा लढली. प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली संपत्ती शून्य असल्याचे सांगितले. २०१४ मध्ये भाजपच्या पाठिंब्यावर बारामतीतून त्यांनी पुन्हा खासदार होण्याचा प्रयत्न केला. या वेळच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी फोर्ट (मुंबई) येथील फ्लॅटसह ६८ लाख ७४ हजारांची मालमत्ता जाहीर केली. २०१५ मध्ये विधान परिषदेच्या प्रतिज्ञापत्रात नऱ्हे (पुणे) येथे फ्लॅट, पनवेल, कुर्डू (माढा), इंदेवाडी (जालना) येथे बिगरशेती जमीन तसेच मंगळवेढे, टेमघर (जि. पुणे), करोडी (जि. औरंगाबाद) येथे शेतजमीन असल्याचे नमूद केले.
दावा : ‘रासप’ कधी सोडणार नाही
आक्षेप : ‘भाजपचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे,’ असे प्रतिज्ञापत्र सादर करून २०१५ मध्ये जानकर विधान परिषदेवर निवडून गेले. जानकर रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष असले तरी ते आमदार भाजपचे आहेत. २०१८ पुन्हा उमेदवारी
दावा : मागच्या दाराने सत्तापदे भूषवणार नाही
आक्षेप : भाजपकडून विधान परिषदेवर आमदार, त्यांनी दिलेले कॅबिनेट मंत्रिपद.
महादेव जानकरांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह
पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. जानकरांनी त्यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचं ठरवल्यानं त्यांच्या उमेदवारीबाबत केंद्रीय नेतृत्व निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. अकरा जागांसाठी १२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. १२ वा अर्ज भाजपचे सांगली जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी दाखल केला आहे. त्यामुळे पृथ्वीराज देशमुखांचा अर्ज मागे घेणार की जानकरांचा याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. 11 विधानपरिषदच्या जागेसाठी महादेव जानकर हे निवडणूक लढवत आहेत. ते आधी भाजपाच्या चिन्हावर परिषदवर निवडणून आले होते. मात्र काल विधानपरिषदचा निवडणुकीसाठी अर्ज भरतांना त्यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर अर्ज भरला. तेव्हा त्यांनी दुसऱ्या पक्षाद्वारे निवडणूक लढवली असा तांत्रिक मुद्दा निघत पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत निवडणूक लढवण्यास 6 वर्षांची बंदी येऊ शकते. म्हणून हा तांत्रिक मुद्दा लक्षात घेता त्यांनी काल अर्ज भरण्यापूर्वी सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला. तसंच जानकर हे त्यांच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत असल्याने केंद्रीय नेतृत्व त्यांच्याबाबत निर्णय घेईल. भाजपाच्या 6 उमेदवारांमध्ये कोण अर्ज मागे घेणार याबद्दल केंद्रीय संसदीय समिती निर्णय घेईल. मात्र विधानपरिषद निवडणूक ही बिनविरोध होईल हे निश्चित आहे.
भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीचे जातसमीकरण
आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विधान परिषदेसाठी उमेदवारी वाटप केले आहे. विधान परिषदेसाठी उमेदवारी देताना भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पुढील वर्षी होणारी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जातीची समीकरणे (सोशल इंजिनीअरिंग) साधली आहेत. भाजपने बहुजन समाजाला खूश करण्याचा प्रयत्न केला असून, काँग्रेसने दलित आणि मुस्लीम ही आपली मतपेढी सुरक्षित राहील याची खबरदारी घेतली आहे.भाजपचे पाच उमेदवार निवडून येणार असल्याने पक्षाने विविध समाजांना सामावून घेतले आहे. दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, भाई गिरकर, राम पाटील रातोळीकर, रमेश पाटील, निलय नाईक या विविध समाजांतील नेत्यांना भाजपने संधी दिली आहे. यवतमाळ तसेच मराठवाडय़ात काही जिल्ह्य़ांमध्ये लक्षणीय संख्या असलेल्या बंजारा समाजात आतापर्यंत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक घराण्याचे वर्चस्व राहिले आहे. सुधाकरराव नाईक यांनी मुख्यमंत्रिपदी तर त्यांचे चुलतबंधू मनोहर नाईक हे आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. विदर्भात अलीकडे शिवसेनेचे राज्यमंत्री संजय राठोड यांनी बंजारा समाजात नेतृत्व प्रस्थापित केले आहे. बंजारा समाजाला भाजपच्या दिशेने वळविण्यासाठीच राष्ट्रवादीतून दाखल झालेल्या निलय नाईक यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. पालघरच्या पोटनिवडणुकीत कोळी समाजाची चांगली मते भाजपला मिळाली होती. ठाणे, कोकण व राज्याच्या अन्य भागांमध्ये पसरलेल्या कोळी समाजात स्थान पक्के करण्यासाठी कोळी महासंघाचे अध्यक्ष व नवी मुंबईतील रमेश पाटील यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या जागेसाठी विद्यमान आमदार शरद रणपिसे आणि यवतमाळ जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष मिर्झा आतार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. कॉंग्रेसकडे ४२ मते आहेत. त्यांचा एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. विजयी उमेदवारासाठी २६ मतांचा कोटा आवश्यक आहे. सध्या विधानसभेत कॉंग्रेसचे 42 आमदार आहेत. विजयी होण्यासाठी 26 मतांचा कोटा आवश्यक आहे. तर नारायण राणे समर्थक किमान दोन आमदार तरी कॉंग्रेसला मतदान करण्याची शक्यता नसल्याने कॉंग्रेसकडे 14 मते शिल्लक राहतील. तर राष्ट्रवादीचा एक उमेदवार विजयी होवून 15 मते शिल्लक राहणार आहेत. त्यामुळे कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या शिल्लक मतांच्या आधारे कॉंग्रेसचा दुसरा उमेदवार विजयी होवू शकतो अशी अटकळ बांधली जात आहे. रणपिसे हे या आधी १९८५ आणि १९९० मध्ये पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले होते. त्यांना २०१२ मध्ये पक्षाने पुन्हा विधान परिषदेवर संधी दिली. अल्पसंख्यांक आणि मागासवर्गीय या दोन्ही समाजघटकांना कॉंग्रेस प्रतिनिधित्व दिले आहे. शिवसेनेने त्यांच्या दोन जागांसाठी ऍड. अनिल परब आणि पक्षप्रवक्त्या प्रा. मनीषा कायंदे यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB)
पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे
या सदस्यांचा कार्यकाळ संपणार
काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, संजय दत्त, शरद रणपिसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदेव गायकवाड, शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेंद्र पाटील, शेकापचे जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित, रासपचे महादेव जानकर यांची मुदत संपत आहे.राजकीय पक्षाप्रमाणे निवृत्त संख्या-
राष्ट्रवादी - 3काँग्रेस - 4
भाजप - 2 (रासप -1)
शिवसेना - 1
शेकाप - 1
संख्याबळा नुसार राजकीय पक्षाप्रमाणे निवडून येणाऱ्या सदस्यांची संख्या -
(निवडून येण्यासाठी किमान 27 मतांची आवश्यकता)राष्ट्रवादी + काँग्रेस - 3
भाजप - 5 (रासप -1)
शिवसेना - 2
शेकाप - 1 (राष्ट्रवादी+काँग्रेस व इतरांनी पाठींबा दिला तर)
विधानपरिषद सध्याचे संख्याबळ-
राष्ट्रवादी काँग्रेस - 21काँग्रेस - 19
भाजप - 18
शिवसेना - 9
जेडीयू - 1
शेकाप - 1
अपक्ष - 6
पीपल्स रिपब्लिकन पक्ष - 1
विधानपरिषद निवडणूक कार्यक्रम-
28 जून रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. 5 जुलै उमेदवारी दाखल करण्याची अंतिम मुदत असून, 6 जुलैला छाननी करण्यात येईल. 9 जुलै उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. तर 16 जुलै रोजी सकाळी 9 ते 4 या वेळेत मतदान घेण्यात येऊन त्याच दिवशी मतमोजणी करण्यात येईल. विधानसभेचे आमदार यासाठी मतदान करणार आहेत.28 जूनला नॉटिफिकेशन
अर्ज भरण्याची अंतिम मुदत : 5 जुलै
अर्जाची पडताळणी : 6 जुलै
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : 9 जुलै
मतदान : 16 जुलै (स. 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत)
मतमोजणी : 16 जुलै (सायंकाळी 5 वाजेनंतर)
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.