कॉंग्रेसच्या निर्मला आवारे या जनतेमधून थेट निवड होणार्या भोर नगरपरिषदेच्या पहिल्या नगराध्यक्षा
====================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा
* मतदारसंघ निहाय प्राथमिक राजकीय/सामाजिक सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE PAY NOW-
=====================================================================
भोर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्र. 1 ते ८ मधील सर्व एकूण १७ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. तर कॉंग्रेसच्या निर्मला आवारे या जनतेमधून थेट निवड होणार्या पहिल्या नगराध्यक्षा आहेत. भोर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण ७९.९६ टक्के मतदान झाले. नगराध्यक्षांसह १७ नगरसेवकांसाठी रविवारी १५ जुलैला मतदान झाले होते. नगराध्यक्ष पदासाठी झालेला निवडणुकीत निर्मला रामचंद्र आवारे यां 3968 मतांनी विजयी झाल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत अनेक वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या काँग्रेससमोर राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेनेनेही मोठे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र नागरिकानी पुन्हा कॉंग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे.औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी करण्यात आली. भोर नगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्षासह 18 जागांवर कॉग्रेसचे मतदार विजयी झाले. भोर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्त्वावर नागरिकांनी पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले. या निवडणुकीत नगराध्यपदासह कॉंग्रेसचे नगरसेवक पदाचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले. भोर नगरपालिकेच्या आजपर्यंतच्या इतिहासात या विजयाची ऐतिहासिक नोंद झाली असून भोर नगरपालिकेकर पुन्हा एकदा कॉंग्रेसचाच झेंडा फडकला आहे.भोर नगरपालिकेच्या रविवारी (दि.15) झालेल्या नगराध्यक्ष आणि 17 नगरसेवक पदासाठी आठ प्रभागातील एकूण 15,251 मतदारांपैकी 12 हजार 64 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. आज, झालेल्या मतमोजणीत कॉंग्रेस पक्षाचे नगराध्यपदासह सर्वच्या सर्व 18 जागा कॉंग्रेस पक्षाने मोठ्या फरकाने जिंकल्या तर राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्ष व शिवसेना पक्षाच्या एकाही उमेदवाराला साधे खातेही उघडता आले नाही. निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान भाजपच्या मंत्र्यांपासून नेते मंडळींनी भोरमध्ये रणकंदन घातले होते. मात्र, त्यांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवारांचे डिपॉझिटही संभाळता आलेले नाही.या निवडणुकीत कॉंग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार निर्मला आवारे यांनी 6 हजार 964 मते मिळवून विरोधक राष्ट्रवादीच्या उमेदवार शारदा यशवंत डाळ यांचा पराभव केला. डाळ यांना 2 हजार 996 मते मिळाली तर भाजपच्या उमेदवार आणि माजी नगराध्यक्षा दिपाली शेटे यांना 1256 मतांवरच समाधान मानावे लागले. शिवसेनेच्या उमेदवार स्वप्ना देशपांडे यांना 734 मते मिळाली.निवडणुकीचे निकाल जाहीर होताच कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी भोर नगरपालिकेत आता विकासाचे वारे, नगराध्यक्षा निर्मला आवारे अशा घोषणा देत गुलाची उधळण आणि भर पावसात फटाक्यांची आतषबाजी करीत विजयाचा आनंदोत्सव साजरा केला. कॉंग्रेसचे विजयी उमेदवार (मते)
नगराध्यक्षपदी – निर्मला रामचंद्र आवारे (6964), नगरसेवक – पद्मिनी तानाजी तारु (626), चंद्रकांत अनंता मळेकर (629), समिर उत्तम सागळे (688), आशा विश्वनाथ रोमण (752), सचिन अशोक हर्णसकर (867), तृप्ती जगदिश किरवे (1150), रुपाली रविंद्र कांबळे (1057), अमित ज्ञानोबा सागळे(1090), अमृता प्रशांत बहिरट (1040), गणेश ज्ञानोबा पवार (986), वृषाली अंकुश घोरपडे (684), देविदास अरविंद गायकवाड (670), सोनम गणेश मोहिते (751), अनिल नारायण पवार (510), स्नेहा शांताराम पवार (938), आशा बजरंग शिंदे (770), सुमंत सुभाष शेटे (825).नगराध्यक्षपदी कॉग्रेसच्या निर्मला रामचंद्र आवारे या 3 हजार 968 मतांनी विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादीच्या शारदा डाळ यांचा पराभव केला. निर्मला आवारे यांनी 6 हजार 964 मते मिळाली. शारदा डाळ यांना 2 हजार 996 मते मिळाली. भाजपाच्या दिपाली शेटे यांना 1 हजार 256 तर शिवसेनेच्या स्वप्ना देशपांडे यांना 734 मते मिळाली. प्रभाग क्रमांक 3(ब) मधील कॉग्रेसच्या तृप्ती जगदीश किरवे या सर्वाधिक 793 मतांनी विजयी झाल्या तर प्रभाग क्रमांक 8(ब) मधील आशा शिंदे या सर्वात कमी 99 मतांनी विजयी झाल्या.
कॉग्रेसचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे.
नगराध्यक्षा - निर्मला रामचंद्र आवारे,
नगरसेवक - पद्मिनी तानाजी तारु,
चंद्रकांत आनंता मळेकर,
समीर उत्तम सागळे,
आशा विश्वनाथ रोमण,
सचिन अशोक हर्णसकर,
तृप्ती जगदीश किरवे,
रुपाली रवींद्रनाथ कांबळे,
अमित ज्ञानोबा सागळे,
अमृता प्रशांत बहीरट,
गणेश ज्ञानोबा पवार,
वृषाली अंकुश घोरपडे,
देवीदास अरविंद गायकवाड,
सोनम गणेश मोहिते,
अनिल नारायण पवार,
स्नेहा शांताराम पवार,
आशा बजरंग शिंदे,
सुमंत सुभाष शेटे.
सन १९५५ ते १९६७ या कालावधीत लाल निशान पक्षाचे दिवंगत आमदार जयसिंग माळी यांच्या विचारांचा आणि कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव भोर शहरावर १० ते १५ वर्षे राहिला. १९७०मध्ये काँगेसकडे सत्ता आली. तर, १९७४ ते १९९० पर्यंत दिवंगत अमृतलाल रावळ यांच्या गटाकडे भोर शहराची सत्ता होती. तालुक्यात माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची सत्ता होती. १९९०नंतर अनंतराव थोपटे यांनी नगरपालिकेची सत्ता मिळवली. २००८चा अडीच वर्षांचा कार्यकाळ पालिकेची सत्ता राष्ट्रवादीकडे गेली. मात्र, त्यांच्यातील अंतर्गत वादामुळे पुन्हा सत्ता काँग्रेसकडे गेली होती. २०१३च्या निवडणुकीत आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली १७ पैकी १४ नगरसेवक काँग्रेसचे निवडून आले होते. तर, राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.