राष्ट्रपतींकडून चौघांची राज्यसभेवर नियुक्ती
शेतकरी नेते राम शकल, लेखक राकेश सिन्हा, शिल्पकार रघुनाथ महापात्रा, शास्त्रीय नृत्यांगणा सोनल मानसिंह यांचा समावेश
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यसभेवर चार प्रसिद्ध व्यक्तींची खासदार म्हणून नियुक्ती केली आहे. शेतकरी नेते राम शकल, लेखक राकेश सिन्हा, शिल्पकार रघुनाथ महापात्रा आणि क्लासिकल डान्सर सोनल मानसिंह या चौघांना राष्ट्रपतींनी राज्यसभेत खासदार म्हणून नियुक्त केले आहे. सिनेसृष्टी आणि खेळ जगतातून एकाही प्रसिद्ध चेहेऱ्याला संधी मिळालेली नाही ही बाब महत्त्वाची आहे. कारण अभिनेत्री रेखा आणि मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या राज्यसभेतील गैरहजेरीवरून बरीच टीका आणि चर्चा झाली होती. त्यामुळे सिनेसृष्टी आणि खेळ जगतातून कोणाचीही निवड करण्यात आलेली नाही असे समजते आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी निवड केलेले चारही लोक हे आपल्या क्षेत्रातील दिग्गज आहेत. २०१९ च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या चौघांची नियुक्ती अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जाते आहे. राम शकल हे उत्तर प्रदेशचे आहेत. त्यांनी समाजातील दलित आणि मागासवर्गीय घटकांसाठी महत्त्वाचे कार्य केले आहे. राकेश सिन्हा हे संघ विचारांचे आहेत, भाजपाची विचारसरणी काय आहे हे ते विविध कार्यक्रमांमध्ये मांडत असतात. तसेच दिल्ली विद्यापीठाच्या महाविद्यालयात ते प्राध्यापक म्हणूनही काम करतात. सोनल मानसिंग या क्लासिकल डान्सर म्हणून देशभरात प्रसिद्ध आहेत. रघुनाथ महापात्रा हे ओदिशाचे आहेत, जगन्नाथ मंदिरासंबंधी त्यांनी महत्त्वाचे कार्य केले आहे.
नियुक्त करण्यात आलेल्या खासदारांचा परिचय
1. राम शकल - सामाजिक कार्य (उत्तर प्रदेश)
* शिक्षण MA* दलित समुदायासाठी महत्त्वाचे योगदान. शेतकरी, श्रमिक यांच्यासाठी झटणारे म्हणून प्रसिद्ध.
* तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर चार वर्षांपासून काम करत आहेत.
* रॉबर्ट्सगंज (युपी) मधून तीनवेळा खासदार बनले आहेत.
2. राकेश सिन्हा, साहित्य (बिहार)
* शिक्षण - पीएचडी* प्रसिद्ध लेखक आणि दिल्लीतील एखा महाविद्यालयाचे प्राध्यापक आहेत.
* हिंदी सल्लागार समिती आणि फिल्म सर्टिफिकेशन अपिलेट ट्रिब्युनलचे सदस्यही राहिलेले आहेत.
* अनेक वृत्तपत्रांमध्ये ते नियमित लेख लिहितात आणि टिव्ही चॅनरवर भाजप तसेच संघाची बाजू मांडतात.
* यांनी अनेक पुस्तकांचे लिखाण केले आहेत, त्यात डॉ. हेडगेवार यांच्या चरित्राचाही समावेश आहे.
3. रघुनाथ महापात्रा, कला (ओडिशा)
* दगडांना आकार देण्याच्या कलेमुळे यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर शिल्पगुरू म्हणून ओळखले जाते.* प्राचीन मूर्ती आणि स्मारकांच्या संवर्धनाच्या क्षेत्रात यांनी मोलाचे कार्य केले आहे.
* पुरी येथील जगन्नाथ मंदिराच्या सौंदर्यातही यांची महत्त्वाची भूमिका आहे.
* ओडिशा ललित कला अकादमीचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत.
* त्यांना पद्म विभूषण (2013), पद्म भूषण (2001), पद्म श्री (1975) मिळालेला आहे.
* 22 वर्षे वय असताना त्यांना 1964 मध्ये शिल्पकलेच्या क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
सोनल मानसिंह- क्लासिकल डान्सर (महाराष्ट्र/दिल्ली)
* शिक्षण- डिलिट, डिएसी, बीए ऑनर्स )* भारतातील प्रमुख शास्त्रीय नृत्यांगनांपैकी एक
* ६ दशकांपासून भरतनाट्यम आणि ओडिसी नृत्य सादर करतात
* कोरियोग्राफर, शिक्षक, वक्त्या आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही ओळख
* पद्मविभूषण आणि पद्म भूषण या दोन्ही पुरस्काराने सन्मान
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.