Saturday, 21 July 2018

भद्रावती नगरपरिषदेसाठी 19 ऑगस्ट रोजी मतदान

भद्रावती नगरपरिषदेसाठी 19 ऑगस्ट रोजी मतदान


भद्रावती (जि. चंद्रपूर) नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 19 ऑगस्ट 2018 रोजी मतदान; तर 20 ऑगस्ट 2018 रोजी मतमोजणी होणार आहे. या नगरपरिषदेच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.भद्रावती नगरपरिषदेची मुदत 1 सप्टेंबर 2018 रोजी संपत आहे. त्यामुळे सदस्यपदांसह अध्यक्षपदासाठीदेखील थेट निवडणूक होईल. नामनिर्देशनपत्रे 26 जुलै ते 1 ऑगस्ट 2018 या कालावधीत स्वीकारली जातील. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 2 ऑगस्ट 2018 रोजी होईल. अपील नसलेल्या ठिकाणी 8 ऑगस्ट 2018 रोजी नामनिर्देशनपत्रे मागे घेता येईल. अपील असलेल्या ठिकाणी अपीलाच्या निर्णयानंतर तिसऱ्या दिवसापर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. मतदान 19 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या कालावधीत होईल. मतमोजणी 20 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 10.00 वाजता सुरू होईल, असे आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

भद्रावती नगर परिषदेची निवडणूक २०१३ मध्ये झाली होती. गेल्या निवडणुकीत एकूण 27 सदस्यांच्या परिषदेत शिवसेनेने 14 जागा पटकावून काठावरचे बहुमत मिळवले होते. त्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध इतर असेच चित्र होते. शिवसेनेला शह देण्यासाठी काँग्रेसने राष्ट्रवादीशी आघाडी केली होती. काँग्रेसने 16, तर राष्ट्रवादीने 11 जागा लढवल्या होत्या. मात्र, या दोन्ही पक्षांना केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. भारिपने 3, बसपाने 2, भाकप 2, तर अपक्ष आणि शेतकरी संघटनेने प्रत्येकी एक जागा पटकावली होती.


भद्रावती पालिकेतील सध्याचे (२०१३) पक्षीय बलाबल

भारिप 03
काँग्रेस 02
राष्ट्रवादी 02
शिवसेना 14
शेतकरी संघटना 01
अपक्ष 01
भाकप 02
बसपा 02


Bhadravati is a Municipal Council city in district of Chandrapur, Maharashtra. The Bhadravati city is divided into 26 wards for which elections are held every 5 years. The Bhadravati Municipal Council has population of 60,565 of which 31,451 are males while 29,114 are females as per report released by Census India 2011. Population of Children with age of 0-6 is 6211 which is 10.26 % of total population of Bhadravati (M Cl). In Bhadravati Municipal Council, Female Sex Ratio is of 926 against state average of 929. Moreover Child Sex Ratio in Bhadravati is around 954 compared to Maharashtra state average of 894. Literacy rate of Bhadravati city is 89.26 % higher than state average of 82.34 %. In Bhadravati, Male literacy is around 93.02 % while female literacy rate is 85.19 %. Bhadravati Municipal Council has total administration over 14,617 houses to which it supplies basic amenities like water and sewerage. It is also authorize to build roads within Bhadravati Municipal Council limits and impose taxes on properties coming under its jurisdiction. Currently our website doesn't have information on schools and hospital located within Bhadravati.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.