Wednesday, 24 April 2019

पुणे लोकसभा मतदारसंघात 49.84 टक्के मतदान; तर बारामती लोकसभा मतदारसंघात 61.54 मतदान

भाजपच्या बालेकिल्यात कसबापेठ, कोथरूडमध्ये सर्वाधिक मतदान

बारामती लोकसभा मतदारसंघातील तुलनेत खडकवासला मध्ये सर्वाधिक कमी मतदान

पुणे लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा निवडणूक आयोगाने मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर केली. त्यामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघात यंदा 49.84 टक्के मतदान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर तर बारामती लोकसभा मतदारसंघात 61.54 मतदान झाल्याचे स्पष्ट केले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण 61.54 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. पुणे लोकसभा मतदारसंघात 49.84 टक्के मतदान झाले असून मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभानिहाय मतदान झाले यामध्ये वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात 46.41 टक्के तर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात 46.94 टक्के आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघात 50.26 टक्के व पर्वती विधानसभा मतदारसंघात 52.07 टक्के तसेच पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात 48.79 टक्के आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात 55.88 टक्के झाले आहे. सर्वाधिक मतदान कसबापेठ मतदारसंघात झाले असून वडगाव शेरी व शिवाजीनगर मतदारसंघात कमी मतदान झाले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात 20 लाख 75 हजार 39 मतदार त्यापैकी दहा लाख 34 हजार 154 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. पुणे लोकसभा मतदारसंघात मागील लोकसभा निवडणुकीत 54.14 टक्के मतदान झाले होते. या मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार गिरीश बापट आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्यात चुरशीची लढत झाली. पुणे लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी 23 एप्रिलला मतदान झाले. मतदानाच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत मतदानाची आकडेवारी एकत्रित करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू होते. जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी काल 52 टक्के जवळपास मतदान झाल्याची माहिती दिली होती. परंतु ही अंतिम आकडेवारी नसल्याचे स्पष्ट केले होते. मतदानाच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा प्रशासनाने मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर केली. त्यात वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात 46.41 टक्के, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात 46.94 टक्के,  कोथरूड विधानसभा मतदारसंघात 50.26 टक्के, पर्वती विधानसभा मतदारसंघात 52.07 टक्के, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात 48.79 टक्के आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात 55.88 टक्के मतदान झाले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात 20 लाख 75 हजार 39 मतदार आहेत. त्यापैकी दहा लाख 34 हजार 154 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. वडगाव शेरी आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी दोन लाखाहून अधिक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. भाजपचे बालेकिल्ला समजले जाणारे कसबापेठ आणि कोथरूड मतदारसंघात अनुक्रमे 55.88 टक्के आणि 50.26 मतदान इतर विधानसभा मतदारसंघाच्या तुलनेत सर्वाधिक झालेले आहे. 

खडकवासला मध्ये सर्वाधिक कमी मतदान

बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण 61.54 मतदान

दौंड विधानसभा मतदारसंघात एकूण 64.05 टक्के मतदान झालेले आहे तर बारामती विधानसभा मतदारसंघात तुलनेने सर्वाधिक एकूण 70.24 टक्के मतदान झाले असून सर्वाधिक कमी मतदान खडकवासला विधानसभा मतदारसंघात एकूण 53.20 टक्के मतदान झालेले आहे. तर  इंदापूर विधानसभा मतदारसंघात एकूण 64.39 टक्के मतदान झालेले आहे. तसेच पुरंदर विधानसभा मतदारसंघात एकूण 60.48 टक्के मतदान झालेले आहे.भोर विधानसभा मतदारसंघात एकूण 60.84 टक्के मतदान झालेले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण 61.54 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. 

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================



Friday, 19 April 2019

इव्हीएम मतदान यंत्रावरील बॅलेट पेपरवर हत्तीचा धुमाकूळ; कमळ आणि पंजाला फटका!

भाजपला पुण्यासह १८ मतदारसंघात फटका

महाआघाडी व युतीला अनुक्रमे ३१ आणि ३२ मतदारसंघात फटका 

इव्हीएम मतदान यंत्रावरील बॅलेट पेपरवर हत्तीने प्रथमच सर्वाधिक जागांवर पहिले स्थान पटकावले आहे. राजकीयदृष्ट्या बॅलेट पेपरवर अग्रक्रमातील पसंतीला फार महत्व आहे. बसपच्या धूर्तपणाचा फटका भाजपला बसला असून त्याचे परिणाम येत्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून दिसून येतील. बॅलेट पेपरवर प्राधान्यक्रम असल्यावर मतदारांची क्षणिक विचार करून मत देण्याची मानसिकता असते तर इतरत्र पसंतीच्या उमेदवाराचा शोध घेण्यास मतदार त्या परिस्थितीत फारसा रस दर्शवित नसतात असे आज पर्यंतच्या बॅलेट पेपरवरील प्राधान्यक्रम वरून दिसून आलेले आहे. बसपच्या धूर्तपणाचा फटका भाजपला पुण्यासह १८ मतदारसंघात बसला आहे तर महाआघाडी व युतीला अनुक्रमे ३१ आणि ३२ मतदारसंघात फटका बसला आहे. प्रत्यक्षात बसपला किती मतदानात फायदा होणार हे निकालावरून स्पष्ट होईलच. पुणे मावळसह १९ लोकसभा मतदारसंघात इव्हीएम मतदान यंत्रावरील बॅलेट पेपरवर बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांना प्रथम क्रमांकावर स्थान मिळाले आहे. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघातील ५ मतदारसंघात बहुजन समाज पार्टीने उमेदवार दिलेले नाहीत तर उर्वरीत सर्व 43 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. 43 लोकसभा मतदारसंघापैकी १९ ठिकाणी पहिल्या तर ९ मतदारसंघात दुसरया स्थानावर इव्हीएम मतदान यंत्रावरील बॅलेट पेपरवर बसप उमेदवार आहेत तर १३ ठिकाणी तिसऱ्या व २ ठिकाणी 4 थ्या स्थानावर बसपने जागा मिळवली आहे. बसप राष्ट्रीय पक्ष असल्याने त्यांना निवडणूक चिन्ह वाटप व अग्रक्रमात इतर राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांबरोबर नावाप्रमाणे पहिले स्थान मिळाले आहे. बहुतांश ठिकाणी उमेदवारी देताना इतर राजकीय पक्षांचे संभाव्य उमेदवारांची नावे गृहीत धरून अग्रक्रम येईल अशा नावाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. यामागील निवडणुकांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात बॅलेट पेपरवर पहिल्या स्थानावर उमेदवार नव्हते. इतर पक्षांच्या चाणक्यांना देखील बसपाच्या युक्तीने दणका दिला असल्याचे दिसून येत आहे. इतर राजकीय पक्षांचा विचार केल्यास प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना पहिल्या ३ मध्ये समावेश आहे त्यांचा तपशील दर्शविणारा तक्ता खालीलप्रमाणे- 
पुणे मावळसह १९ लोकसभा मतदारसंघात इव्हीएम मतदान यंत्रावरील बॅलेट पेपरवर बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांना प्रथम क्रमांकावर स्थान मिळाले आहे. यामध्ये पुणे, मावळ, धुळे, बुलढाणा, अकोला, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, दिंडोरी (अ.ज.), नाशिक, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या १९ मतदारसंघांचा समावेश आहे. या १७ मतदारसंघात इतर प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना चांगला फटका बसला आहे. बसपाच्या उमेदवारांमुळे काँग्रेस उमेदवारांना ७ ठिकाणी फटका बसला असून २ मतदारसंघात ३ रया स्थानावर जावे लागले आहे तर राष्ट्रवादीला ३ मतदारसंघात दुसरे स्थान तर ५ मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर जावे लागले आहे. तर भाजपला ५ ठीकाणी फटका बसला असून ३ ठिकाणी तिसऱ्या आणि दिंडोरी मतदारसंघात 4 थ्या स्थानावर जावे लागले आहे. शिवसेनेला ३ मतदारसंघात दुसरे स्थान मिळाले असून ७ ठीकाणी ३ रया स्थानावर जावे लागले आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात तर विद्यमान खासदारांना बॅलेट पेपरवर ७ क्रमाकावर स्थान मिळाले आहे. बसप दुसरया स्थानावर असलेले मतदारसंघ - नंदुरबार (अ.ज.), अमरावती (अ.जा.), भंडारा-गोंदिया,औरंगाबाद, पालघर (अ.ज.), कल्याण, दक्षिण मुंबई, बारामती, लातूर (अ.जा.). तर इव्हीएम मतदान यंत्रावरील बॅलेट पेपरवर तिसऱ्या स्थानावर जळगाव, रावेर, रामटेक (अ.जा.), नागपूर, गडचिरोली-चिमूर (अ.ज.), चंद्रपूर, जालना, ठाणे, उत्तर मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, रायगड, शिरुर, उस्मानाबाद या मतदारसंघांचा समावेश आहे.  

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================




राजकीय पक्षांना एक सारखीच निवडणूक चिन्ह कशी?










निवडणुका लढणाऱ्या प्रत्येक पक्षाला भारतीय निवडणूक आयोगामार्फत चिन्हांच वाटप केलं जाते. सामान्यत: प्रत्येक पक्षाचं निवडणूक चिन्ह वेगवेगळं असते. पण जेव्हा आपण समाजवादी पार्टी आणि तेलगु देसम पार्टीचं चिन्ह पाहतो तेव्हा मात्र आपण बुचकळ्यात पडतो. कारण दोहोंच निवडणूक चिन्ह एकच आहे ते म्हणजे ‘सायकल’! सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की दोन्ही पक्ष हे देशातील जरी दोन मातब्बर पक्ष असले तरी ते वेगवेगळ्या राज्यांमध्ये सक्रीय आहेत. समाजवादी पार्टीचे उत्तर भारत आणि कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये अस्तित्व आहे. तर तेलगु देसम पार्टीचे आंध्रप्रदेश आणि तेलंगणा मध्ये अस्तित्व आहे. हे दोन्ही पक्ष ज्या ज्या प्रदेशांमध्ये त्यांचे अस्तित्व आहे तेथेच निवडणुका लढवतात. त्यामुळे हे दोन्ही पक्ष कधीही एकमेकांसमोर उभे ठाकलेले नाहीत. याच कारणामुळे दोन्ही पक्षांना एकाच निवडणूक चिन्हाचा त्रास कधीच सहन करावा लागत नाही. तेलगु देसम पार्टीने आंध्रप्रदेशामधील एखाद्या मतदारसंघात निवडणूक लढण्यासाठी आपला उमेदवार उभा केला असेल आणि त्याच मतदारसंघात समाजवादी पार्टीने देखील आपला उमेदवार उभा केला तर मात्र निवडणूक आयोग समाजवादी पार्टीला सायकल हे निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी देणार नाही, कारण तेलगु देसम पार्टी हा आंध्रप्रदेशातील प्रादेशिक पक्ष आहे आणि म्हणून बाहेरून आलेल्या समजवादी पार्टीपेक्षा त्यांचे बलस्थान त्या प्रदेशामध्ये वरचढ आहे. त्याचप्रकारे जर तेलगु देसम पार्टीला जर समाजवादी पार्टीचे ज्या प्रदेशामध्ये बलस्थान वरचढ आहे त्या प्रदेशातील मतदारसंघात आपला उमेदवार उभा करायचा झाल्यास त्यांना सायकल चिन्ह वापरण्याची परवानगी निवडणूक आयोगामार्फत मिळणार नाही. जम्मू आणि काश्मीर मधील नॅशनल पँथर्स पार्टी आणि मणिपूर मधील मणिपूर पीपल्स पार्टी आणि केरळमधील केरळ कॉंग्रेस या दोन्ही पक्षांचे निवडणूक चिन्ह देखील ‘सायकल’ होते. परंतु आता दोन्ही पक्ष स्वतंत्ररित्या सक्रीय नाहीत.एवढेच नाही तर भारतातील अजून ६ राजकीय पक्ष विविध राज्यात ३ समान निवडणूक चिन्हांसह अस्तित्वात आहेत. महाराष्ट्रातील उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि झारखंड मधील शिबू सोरेन यांचा झारखंड मुक्ती मोर्चा या दोन्ही पक्षांचे चिन्ह ‘धनुष्यबाण’ आहे. मायावतींची बहुजन समाज पार्टी आणि आसाम मधील असोम गाना परिषद या दोन्ही पक्षांचे चिन्ह ‘हत्ती’ आहे. केरळ मधील केरळ कॉंग्रेस एम (प्रादेशिक पक्ष) आणि दिवंगत नेत्या जयललिता यांचा ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्रा काझागम (एआयएडीएमके) या दोन्ही पक्षांचे चिन्ह ‘झाडाची दोन पाने’ आहेत. 
=========================================

loksabha 2019 BSP LIST

अ.क्र.
मतदारसंघ नाव
बॅलेट पेपर स्थान
लोकसभा निवडणूक उमेदवाराचे नाव
1
1- NANDURBAR
2
Rekha Suresh Desai
2
2- Dhule
1
Aparanti Sanjay Yashwant
3
3-Jalgaon (GEN)
3
Rahul Narayan Bansode
4
4-Raver (GEN)
3
Dr. Yogendra Vitthal Kolte
5
5 - Bhuldhana
1
Abdul Hafeez Abdul Ajij
6
6 - Akola
1
Bhai B.C.Kamble
7
7 - Amravati (SC)
2
Arun Motiramji Wankhede
8
8- SHIRDI
4
Suresh Eknath Jagdhane
9
9 - Ramtek (SC)
3
Subhash Dharmdas Gajbhiye
10
10 - Nagpur
3
Mohammad Jamal
11
11 - Bhandara-Gondiya
2
Dr. Vijaya Rajesh Nandurkar
12
11 - Bhandara-Gondiya
3
Harichandra Nagoji Mangam
13
11 - Bhandara-Gondiya
3
Shushil Segoji Wasnik
14
14 - Yavatmal-Washim
1
Arun Sakharam Kinwatkar
15
15 - Hingoli
1
Dr. Dhanve Datta Maroti
16
17 - Parbhani
4
Dr. Vaijnath Sitaram Phad
17
18-Jalna (GEN)
3
Mahendra Kachru Sonavane
18
19-Aurangabad (GEN)
2
Jaya Balu Rajkundal
19
20-DINDORI
1
Ashok Tryambak Jadhav [SirD
20
21-Nashik
1
Adv. Ahire Vaibhav Shantaram
21
22-PALGHAR
2
Sanjay Laxman Tambda
22
24-KALYAN
2
Ravindra [PintuDKene
23
25-THANE
3
Rajeshchanna Baijnath Jaiswar
24
26-MUMBAI NORTH
3
Manojkumar Jayprakash Singh
25
28- MUMBAI NORTH EAST
3
Sanjay Chandrabahadur Singh (Kunwar)
26
29- MUMBAI NORTH CENTRAL
1
Imran Mustafa Khan
27
30- MUMBAI SOUTH CENTRAL
1
Ahmed Shakil Sagir Ahmed Shaikh
28
32-Raigad (GEN)
3
Milind B. Salvi
29
33- MAVAL
1
Adv. Kanade Sanjay Kisan
30
34-Pune (GEN)
1
Uttam Pandurang Shinde
31
35-Baramati (GEN)
2
Adv.Mangesh Nilkanth Vanshiv
32
37-Ahmednagar (GEN)
1
Wakale Namdeo Arjun
33
36-SHIRUR
3
Kagadi Jamirkhan Afjal
34
40-Osmanabad
3
Dr. Shivaji Pandharinath Oman
35
41. Latur (SC)
2
Dr. Siddharthkumar Digamberrao Suryawanshi
36
43-Madha
1
Aappa Aaba Lokare
37
44-Sangli
1
Shankar (dada) Mane
38
45-Satara
1
Ananda Ramesh Thorawade
39
46-Ratnagiri-Sindhudurg
1
Kishor Sidu Varak
40
47-Kolhapur
1
Dundappa Kundappa Shrikant Sir
41
48-Hatkanangle
1
Ajay Prakash Kurane