पालघर जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांच्या 114 जागांसाठी निवडणूक
पालघर जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या 8 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 7 जानेवारीला मतदान; तर 8 जानेवारी 2020 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली. संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 18 ते 23 डिसेंबर 2019 या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील. 22 डिसेंबर 2019 रोजी सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. छाननी 24 डिसेंबर 2019 रोजी होईल. अपील नसल्यास 30 डिसेंबर 2019 रोजी उमेदवारी मागे घेता येईल. अपील असलेल्या ठिकाणी 1 जानेवारी 2020 रोजी नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील. मतदान 7 जानेवारी 2020 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पार पडेल. मतमोजणी संबंधित ठिकाणी 8 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल. पालघर जिल्हा परिषदेंतर्गत तलासरी, डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा, पालघर आणि वसई या आठ पंचायत समित्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण 57 जागांसाठी ही निवडणूक होत असून 29 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. आठ पंचायत समित्यांच्या 114 जागांसाठी निवडणूक होईल. त्यातील 57 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. पालघर जिल्हा परिषदेअंतर्गत तलासरी, डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, वाडा, पालघर आणि वसई या आठ पंचायत समित्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण ५७ जागांसाठी ही निवडणूक होत असून २९ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. आठ पंचायत समित्यांच्या ११४ जागांसाठी निवडणूक होईल. त्यातील ५७ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. अशी असेल सदस्य संख्यातलासरी व विक्रमगड तालुक्यात प्रत्येकी जिल्हा परिषद सदस्य ५ तर पंचायत समिती सदस्य १०, जव्हार आणि वसई तालुक्यात प्रत्येकी जिल्हा परिषद सदस्य ४ तर ८ पंचायत समिती सदस्य, डहाणू तालुक्यात जिल्हा परिषद सदस्य १३ तर पंचायत समिती सदस्य २६, वाडा तालुक्यात ६ जिल्हा परिषद सदस्य तर १२ पंचायत समिती सदस्य, पालघरमध्ये सर्वाधिक १७ जिल्हा परिषद सदस्य तर ३४ पंचायत समिती सदस्य तर मोखाडा ३ जिल्हा परिषद सदस्य तर ६ पंचायत समिती सदस्य असणार आहेत.
निवडणूक कार्यक्रम
· नामनिर्देशनपत्र सादर करणे- 18 ते 23 डिसेंबर 2019
· नामनिर्देशनपत्रांची छाननी- 24 डिसेंबर 2019
· अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे- 30 डिसेंबर 2019
· अपील असल्यास उमेदवारी मागे घेणे- 1 जानेवारी 2020
· मतदानाचा दिनांक- 7 जानेवारी 2020
· मतमोजणीचा दिनांक- 8 जानेवारी 2020
======================
१,३१२ मतदान केंद्रांवर मतदान; ७,२२१ कर्मचाऱ्यांची नियुक्ती
पालघर जिल्हा परिषदेच्या ५४ आणि आठ पंचायत समित्यांमधील ११२ जागांसाठी मंगळवार, ७ जानेवारी रोजी मतदान होणार असून मतदान व मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. राज्य निवडणूक आयोगाने ७ डिसेंबर २०१९ रोजी पालघर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या आठ पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार ७ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत एकूण १,३१२ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून बुधवार, ८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या निवडणुकीच्या तयारीचा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी आढावा घेतला असून निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. मतदार आणि कर्मचारी : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदारांची संख्या १० लाख ४४ हजार ८८८ आहे. त्यात ५,३०,६२१ पुरुष, ५,१४,२२८ महिला आणि ३९ इतर आहेत. मतदानासाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व इतर कर्मचारी अशा एकूण ७,२२१ अधिकारी- कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून २६ डिसेंबर २०१९ पासून निवडणूक प्रशिक्षणाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली आहे. मतदानासाठी एकूण २,२८४ बॅलेट युनिट तर १,८५३ कंट्रोल युनिट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मतदार पावतीचे वितरण- या निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारांपर्यंत मतदार पावती पोहोचवण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन करत असून येत्या रविवापर्यंत (५ जानेवारी) मतदारांना त्यांचे मतदान केंद्र आणि यादीतील अनुक्रमांक मिळणार आहे. या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम यंत्रांचा वापर होणार असून त्यासोबत व्हीव्हीपॅट यंत्र नसेल. ईसीआयएल कंपनीचे हे यंत्र असून ते अत्याधुनिक आहे. १,३१२ मतदान केंद्रासाठी १८५० ईव्हीएम यंत्र वितरित करण्यात येणार आहेत. मतमोजणीची तालुकानिहाय ठिकाणे- तलासरी-तहसील कार्यालय, डहाणू- सेंट मेरीज हायस्कूल, मसोली, विक्रमगड- पंचायत समिती सभागृह, जव्हार- आदिवासी भवन, मोखाडा- क्रांतिवीर राघोजी भांगरे सभागृह, पंचायत समिती, मोखाडा, वाडा- पी.जे. हायस्कूल, पालघर- टिमा हॉल, बोईसर, वसई- तहसील कार्यालय सभागृह.
==========================
सत्ता कायम राखण्याचे मोठे आव्हान
पाच वर्षांपूर्वी राज्यात भाजपची सत्ता असताना पालघर जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा जिंकून भाजपने सत्ता संपादन केली होती. पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्य़ात भोपळाही फोडता न आलेल्या भाजपपुढे सत्ता कायम राखण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. महाविकास आघाडीचा प्रयत्न यशस्वी झालेला नसला तरी राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी व कम्युनिस्ट पक्षाच्या एकत्रीकरणाचा फटका काही ठिकाणी भाजपला व शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे. पालघर जिल्हा परिषदेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होईल, अशी शक्यता होती. पण निवडणूक आय़ोगाने नववर्षांच्या सुरुवातीलाच निवडणूक जाहीर केल्याने राजकीय पक्षांची धावपळ उडाली. शिवाय आरक्षित जागांमध्ये मोठय़ा प्रमाणात फेरबदल झाल्याने उमेदवारांची नावे व पक्ष मतदारांना अवगत नाहीत अशी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत ज्या पक्षांकडे कार्यकर्त्यांंची फळी आहे व त्यांचा मतदारांशी लोकसंपर्क आहे त्यांना या निवडणुकीत लाभ होणार आहे, घरोघरी जाऊन भेटी घेण्यावर सर्वांचाच जोर असून या दरम्यान मोजक्या जाहीर सभांचे आयोजन झाले आहे. ५७ जिल्हा परिषद जागांपैकी तीन गटात तर ११४ गुणांपैकी दोन ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्या असून जिल्हा परिषडेच्या ५४ जागांसाठी २१३ उमेदवार रिंगणात आहेत. विशेष म्हणजे कोणताही राजकीय पक्ष या सर्व जागा लढवत नसून महा विकास आघाडी करण्याचा प्रय अयशस्वी ठरला आहे. बहुजन विकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष व काँग्रेस पक्षाने महाआघाडी करण्याचा प्रय केला. मात्र या प्रयत्नला पूर्णत: यश लाभले नाही. पालघर, जव्हार, मोखाडा व वाडा या तालुक्यात महाआघाडी चा घटक पक्षांमध्ये बरम्य़ापैकी समन्वय साधला गेल्याने याठिकाणी भाजपा व शिवसेनेला काहीप्रमाणात धक्का बसण्याची शक्यता आहे. तर विक्रमगड, तलासरी, डहाणू याठिकाणी कार्यकर्त्यांंच्या मागणीचा मान ठेऊन बहुतांश पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असलेल्या मतविभागणीचा फायदा कोणत्या पक्षाला मिळेल याकडे लक्ष लागले आहे. सुमारे ३५ ठिकाणी तिरंगी- चौरंगी लढती होत असून स्थानिक पातळीवर विविध पक्षांतील कार्यकर्त्यांंकडून दिल्या जाणारम्य़ा पाठिंबा वर राजकीय गणित अवलंबून आहेत. तसेच उमेदवाराची गट- गणामध्ये असेलेली ओळख महत्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे कागदावर महाआघाडी मजबूत दिसत असली तरी अनेक ठिकाणी होणारम्य़ा मैत्रीपूर्ण लढतीमध्ये गट व गणाला वेगवेगळ्या पक्षांच्या उमेदवारांना विजयी होण्याची संधी अधिक असल्याची शक्यता आहे. प्रचाराला मिळालेल्या कमी अवधी, सध्या पडत असलेल्या कडाक्याची थंडी तसेच वर्षांअखेर निमित्ताने असलेल्या सुट्टय़ांचा हंगाम याच्या देखील निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.या निवडणुकीच्या अनुशंघाने भाजपाने गेल्या एक- दीड महिन्यांपासून तयारी सुरू केली होती. तरीदेखील पक्षांतर्गत गटबाजीचा फटका भाजपला काही प्रमाणात बसला आहे. भाजपाला विक्रमगड, तलासरी व डहाणू भागातील आपले वर्चस्व टिकवून ठेवण्याचे आव्हान असून शिवसेनेला पालघर तालुक्यात आपला बालेकिल्ला राखण्यासाठी कसोशीने प्रय करावे लागतील. भाजप नेते विष्णू सावरा हे पावणे पाच वर्षे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री होते, पण ते राजकीयदृष्टय़ा प्रभाव पाडू शकले नाहीत. विधानसभा निवडणुकीत तर त्यांचा पुत्र पराभूत झाला. या निवडणुकी कम्युनिस्ट पक्ष, बहुजन विकास आघाडी पूर्वी इतकी आपली ताकद शाबूत ठेवेल अशी अपेक्षा असून राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत काही प्रमाणात लाभ होण्याची शक्यता आहे. जिल्ह्य़ातील सहापैकी तीन विधानसभेच्या जागा जिंकलेल्या हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाम्डीच्या अपेक्षा वाढल्या आहेत. जिल्हा परिषदेची सत्ता हस्तगत करण्याचा ठाकूर यांचा प्रयत्न आहे. एकूणच ही निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित. गतवेळच्या जिल्हा परिषदेमध्ये महाआघाडीच्या घटक पक्षांना २० जागा मिळाल्या होत्या. यावेळी जिजाऊ संस्थेचा मिळालेला पाठिंबा पाहता त्यांच्या विजयी उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यत सत्तेबाहेर राहिलेल्या भाजपला २१ सदस्य संख्या राखण्याचे आव्हान असून तलासरी, विक्रमगड, वाडा व बोईसर भागात असलेले आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतील. शिवसेनेला असलेल्या १६ सदस्य संख्या वाढवण्यासाठी प्रय सुरू असले तरी शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी व नाराजी फटका या निवडणुकीत काही प्रमाणात बसण्याची शक्यता आहे. जिल्ह्यत मनसेने व काँग्रेस पक्षाने प्रयतेकी दहा जागांवर आपले उमेदवार उभे केले असले तरी देखील या पक्षांच्या उमेदवारांना विजयी होण्यासाठी विशेष परिश्रम करावे लागतील अशी परिस्थिती आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या 57 जागांसाठी 229 उमेदवार आहेत. तर आठ तालुक्यांतील पंचायत समितीच्या 114 जागांसाठी 434 उमेदवार नशिब आजमावणार आहेत. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. एकूण 10 लाख 44 हजार 888 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पालघर जिल्ह्यात शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढत आहेत. तर काँग्रेस, राष्ट्रवादी, माकप आणि बहुजन विकास आघाडी हे ‘महाआघाडी’ करुन लढा देत आहेत. पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसाठी निश्चित केलेल्या सदस्यांची संख्या 57 असून पंचायत समितीसाठी सदस्य संख्या 114 इतकी आहे. तालुकानिहाय संख्या :- तलासरी- 5 गट आणि 10 गण, डहाणू- 13 गट आणि 26 गण, विक्रमगड- 5 गट आणि 10 गण, जव्हार- 4 गट आणि 8 गण, मोखाडा- 3 गट आणि 6 गण, वाडा- 6 गट आणि 12 गण, पालघर- 17 गट आणि 34 गण, वसई- 4 गट आणि 8 गण.
=====================================
विविध महानगरपालिकांच्या पोटनिवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्यांची २७ डिसेंबरला प्रसिद्धी
नांदेड - वाघाळा, जळगाव, परभणी आणि अहमदनगर या चार महानगरपालिकांमधील प्रत्येकी एका रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीकरिता 27 डिसेंबर 2019 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली. यासाठी 4 ऑक्टोबर 2019 रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात येतील. त्याआधारावर तयार करण्यात येणाऱ्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित ठिकाणी 27 डिसेंबर 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्या दिवसापासून त्यावर 3 जानेवारी 2020 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय मतदार याद्या व मतदान केंद्रांच्या याद्या अनुक्रमे 8 व 9 जानेवारी 2020 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. अंतिम मतदार याद्या 11 जानेवारी 2020 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात. पोटनिवडणूक होणारे महानगरपालिकानिहाय प्रभाग: नांदेड- वाघाळा- 13ड, जळगाव- 19अ, परभणी- 14अ, आणि अहमदनगर- 6अ.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये
CLICK HERE -
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
====================================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.