महानगरपालिकांमधील रिक्तपदांसाठी निवडणूक
बृहन्मुंबई, नाशिक, मालेगाव, नागपूर, लातूर व पनवेल या सहा महानगरपालिकांमधील सात रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी 9 जानेवारीला मतदान; तर 10 जानेवारी 2020 रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली. नामनिर्देशनपत्रे 16 ते 23 डिसेंबर 2019 या कालावधीत दाखल करता येतील. 22 डिसेंबर 2019 रोजी शासकीय सुट्टी असल्यामुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. 24 डिसेंबर 2019 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत 26 डिसेंबर 2019 पर्यंत असेल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना 27 जानेवारी 2019 रोजी निवडणूक चिन्हे नेमून देण्यात येतील. 9 जानेवारी 2020 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 10 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.पोटनिवडणुका होणारे महानगरपालिकानिहाय प्रभाग: नाशिक- 22अ आणि 26अ, मालेगाव- 12 ड, नागपूर- 12ड, लातूर- 11अ, पनवेल- 19ब आणि बृहन्मुंबई- 141.
अमरावती जिल्ह्यातील तीन पंचायत समित्यांचे निकाल
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE -
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
====================================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.