Tuesday, 10 December 2019

कन्हान-पिंपरी, गडचांदूर नगरपरिषद आणि लांजा नगरपंचायतसाठी सार्वत्रिक निवडणुक जाहीर

नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी 9 जानेवारी रोजी मतदान

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या 7ब रिक्त जागेवर पोटनिवडणूक

आमदार शेळके यांच्या नगरसेवकपदाच्या राजीनाम्यामुळे रिक्त जागेसाठी 9 जानेवारीला पोटनिवडणूक
आमदार सुनील शेळके यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या प्रभाग  क्र. सात ब या जागेसाठी नऊ जानेवारीला पोटनिवडणूक होणार आहे. सत्तारूढ भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेळके या दोघांसाठी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी केली. त्यानुसार १६ ते २० डिसेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. २१ डिसेंबरला उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. २७ डिसेंबरला दुपारी तीन पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. नऊ जानेवारीला मतदान होणार असून १० जानेवारीला मतमोजणी होणार आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकीत सुनील शेळके हे भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. विधानसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी स्वीकारली होती. त्यामुळे नगरपरिषदेतील त्यांची जागा रिक्त झाली होती. सुनील शेळके यांच्या पाठोपाठ त्यांचे चुलतबंधू संदीप शेळके यांनीही गेल्या महिन्यात नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्यामुळे सत्तारूढ भाजपचे सभागृहातील स्पष्ट बहुमत संपुष्टात आले आहे. संदीप शेळके यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे राजीनामा दिल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी राजीनामा मंजूर केला आहे. नगराध्यक्ष चित्रा जगनाडे भाजपच्या असल्याने त्यांच्या निर्णायक मताने भाजपकडे कामचुलाऊ बहुमत उरले आहे. या पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणूक सत्तारूढ भाजपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. पक्षांतर करून आमदार झाल्यानंतर नगरपरिषदेतील रिक्त जागी स्वतःच्या मर्जीतील उमेदवाराला निवडून आणण्यासाठी शेळके यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत भाजप बाजी मारणार की आमदार शेळके आपल्या प्रभागावरील वर्चस्व कायम ठेवण्यात यशस्वी होतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. 

कन्हान- पिंपरी (जि. नागपूर) व गडचांदूर (जि. चंद्रपूर) नगरपरिषद आणि लांजा (जि. रत्नागिरी) नगरपंचायतीच्या सार्वत्रिक; तर इतर विविध नगरपरिषदा/ नगरपंचायतींमधील सहा रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 9 जानेवारी 2020 रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी 10 जानेवारी 2020 रोजी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली. मुदत संपणाऱ्या कन्हान-पिपरी व गडचांदूर या 2 नगर परिषदा व लांजा नगर पंचायतीच्या अध्यक्ष व सदस्य पदांच्या सार्वत्रिक व कळमेश्वर नगर परिषदेच्या हद्दवाढ क्षेत्राची तसेच अन्य नगर परिषदा / नगरपंचायतींमधील रिक्त सदस्य पदांच्या पोट निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे.  या सर्व संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. नामनिर्देशनपत्रे 16 ते 20 डिसेंबर 2019 या कालावधीत सादर करता येतील. त्यांची छाननी 21 डिसेंबर 2019 रोजी होईल. अपील नसलेल्या ठिकाणी 27 डिसेंबर 2019 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. अपील असलेल्या ठिकाणी अपिलाच्या निर्णयानंतर तिसऱ्या दिवसापर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील. मतदान 9 जानेवारी 2020 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 10 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.

रिक्तपदांसाठी पोटनिवडणुका होणाऱ्या जागांचा नगरपरिषद/ नगरपंचायतनिहाय तपशील: तळेगाव दाभाडे (जि. पुणे)- 7ब, देवळा (नाशिक)- 11, भुसावळ (जळगाव)- 24अ, नेवासा (अहमदनगर)- 13, नांदुरा (बुलढाणा)- 7ब आणि कळमेश्वर ब्राम्हणी (नागपूर)- हद्दवाढ क्षेत्रासाठी.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
====================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.