Monday, 23 December 2019

झारखंड विधानसभा निकाल; भाजपची पीछेहाट; काँग्रेस-जेएमएमचे सरकार येणार

झारखंड विधानसभेत राष्ट्रवादीचा प्रवेश


Party
Won
AJSU Party
2
Bharatiya Janata Party
25
Communist Party of India (M)
1
Independent
2
Indian National Congress
16
Jharkhand Mukti Morcha
30
Jharkhand Vikas Morcha (P)
3
Nationalist Congress Party
1
Rashtriya Janata Dal
1
Total
81
झारखंड विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल या तीन पक्षांच्या आघाडीने ४७ जागांसह स्पष्ट बहुमत मिळवले आहे. भाजपला या निकालांत मोठा धक्का बसला असून भाजपचे संख्याबळ २५ पर्यंत घसरले शिवाय राज्यातील सत्ताही भाजपच्या हातून निसटली आहे. दरम्यान, हेमंत सोरेन हे राज्याचे पुढचे मुख्यमंत्री असतील हे निश्चित झाले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल सोरेन यांचे अभिनंदन केले आहे. दुसरीकडे पराभवाची जबाबदारी स्वीकारत रघुवर दास यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे. झारखंडच्या जनतेने भाजपला नाकारत झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेस आघाडीला स्पष्ट कौल दिला आहे. या आघाडीने ४१ हा बहुमताचा जादुई आकडा पार करत ८१ पैकी ४७ जागा जिंकल्या आहेत. राज्यात ३० जागा जिंकून झारखंड मुक्ती मोर्चा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसने १६ जागा जिंकल्या आहेत तर राजदने १ जागा जिंकली आहे. भाजपला गेल्यावेळचे यश कायम राखता आले नाही. २०१४ मध्ये भाजपने ऑल झारखंड स्टुडेंट्स युनियनसोबत (आजसू) आघाडी केली होती. या आघाडीला ४२ जागांसह काठावरचे बहुमत मिळाले होते. यावेळी भाजप स्वबळावर निवडणुकांना सामोरा गेला. मात्र भाजपला २५ जागांपर्यंतच मजल मारता आली. झारखंड विधानसभा निवडणुकीत जेएमएम-काँग्रेस-राजद आघाडीने ४७ जागा जिंकल्या आहेत. यात जेएमएमने ३०, काँग्रेसने १६ आणि राजदने एका जागेवर विजय मिळविला आहे. तर सत्ताधारी भाजपला केवळ २५ जागा जिंकता आल्या आहेत. जेव्हीएम(पी)ला ३ आणि एजेएसयूपीला २ जागांवर विजय मिळाला आहे. झारखंडमध्ये अत्यंत धक्कादायक निकाल लागले आहेत. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मुख्यमंत्री रघुवर दास यांनाही विजय मिळवता आला नाही. या विधानसभा निवडणुकीत भाजपला ३३.५ टक्के मते मिळूनही सर्वात मोठा म्हणून भाजप स्वत:ला सिद्ध करू शकला नाही. जेएमएमला १९.२९ टक्के, काँग्रेसला १३.७८ टक्के आणि आरजेडीला २.८२ टक्के मते मिळाली. हे पाहता आघाडीला सुमारे ३६ टक्के इतकी मते मिळाली. जर भाजपने एजेएसयूबरोबर आघाडी केली असती, तर चित्र नक्कीच वेगळे असते. एजेएसयूला या निवडणुकीत ८.१४ टक्के मते मिळाली. मतांची विभागणी पाहता एजेएसयूशी आघाडी न करणे हा भाजपला मोठा धक्का असल्याचे सिद्ध झाले आहे. झारखंडमध्ये पाच टप्प्यांत निवडणुका झाल्या. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारासाठी पाच वेळा झारखंडच्या विविध भागांचा दौरा केला. पंतप्रधानांनी नऊ विधानसभा मतदारसंघांत सभा घेतल्या यापैकी सहा जागांवर भाजपला पराभव पत्करावा लागला तर चार ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले. झारखंडमध्ये भारतीय जनता पक्षाला आदिवासी मतदारांच्या नाराजीव्यतिरिक्त स्थानिक मुद्द्यांमुळे ही फटका बसला असला तरी राज्याची निवडणूक राष्ट्रीय मुद्द्यांवर लढण्याचा भारतीय जनता पक्षाचा प्रयत्न पूर्णपणे अपयशी ठरलेला दिसत आहे. राज्य आणि केंद्रामध्ये निरनिराळ्या पॅटर्ननुसार मते देण्याचा नवा कलही या निवडणूक निकालाबरोबर स्पष्ट झाल्याचे दिसून आला आहे. लोकसभा आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करताना झारखंडच्या जनतेने वेगवेगळा कौल दिला. मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, ते राज्याचे नेतृत्व करणार नाहीत हा मुद्दा मतदारांनी लक्षात घेतला. त्यामुळेच लोकसभेला १४ पैकी ११ जागा जिंकणाऱ्या भाजपाला विधानसभेला सत्ता गमवावी लागली. शिबू सोरेन यांच्यासारख्या नेत्यांच्या आंदोलनानंतर २००० साली झारखंडची आदिवासी राज्य म्हणून स्थापना झाली. या राज्यात आदिवासी मते आता एक तृतीयांशपेक्षा कमी असली तरी, झारखंड आजही भावनिक दृष्टया आदिवासी राज्य आहे. रघुवर दास यांचे सरकार आदिवासी विरोधी असल्याची प्रतिमा निर्माण झाली होती .मुस्लिम आणि दलितांविरोधात मॉब लिचिंगच्या घटना घडल्या. गोरक्षकांकडून हे हल्ले करण्यात आले. मागच्या दोन वर्षात मॉब लिंचिंगमुळे झारखंडमध्ये २० जणांचा मृत्यू झाला. त्यात ११ मुस्लिम होते. सरकार गोरक्षकांकडून होणारे हल्ले रोखण्यासाठी फारसे गंभीर नाही हा संदेश यातून केला. झारखंडची स्थापना झाल्यानंतर भाजपाने स्वबळावर लढवलेली ही पहिली निवडणूक आहे. ऑल झारखंड स्टुडंट युनियन पार्टीबरोबरची आघाडी भाजपाने तोडली. सुदेश माहतो हे शेवटपर्यंत आघाडी करण्यासाठी प्रयत्न करत होते. महाराष्ट्रात निवडणूक निकालानंतर शिवसेनेकडून मिळालेला अनुभव लक्षात घेता भाजपाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. पण स्वबळावर लढण्याच्या निर्णयाचा भाजपाला फटका बसला. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने ३७ जागांवर तर मित्रपक्ष एजेएसयूपीने पाच जागांवर विजय मिळवला होता.
Constituency
Co. No.
Leading Candidate
Leading Party
Margin
Rajmahal
1
Anant Kumar Ojha
Bharatiya Janata Party
12372
Borio
2
Lobin Hembrom
Jharkhand Mukti Morcha
17924
Barhait
3
HEMANT SOREN
Jharkhand Mukti Morcha
25740
Littipara
4
Dinesh William Marandi
Jharkhand Mukti Morcha
13903
Pakur
5
ALAMGIR ALAM
Indian National Congress
65108
Maheshpur
6
STEPHEN MARANDI
Jharkhand Mukti Morcha
34106
Shikaripara
7
NALIN SOREN
Jharkhand Mukti Morcha
29471
Nala
8
RABINDRA NATH MAHATO
Jharkhand Mukti Morcha
3520
Jamtara
9
IRFAN ANSARI
Indian National Congress
38741
Dumka
10
HEMANT SOREN
Jharkhand Mukti Morcha
13188
Jama
11
SITA MURMU
Jharkhand Mukti Morcha
2426
Jarmundi
12
BADAL
Indian National Congress
3099
Madhupur
13
Haji Hussain Ansari
Jharkhand Mukti Morcha
23069
Sarath
14
Randhir Kumar Singh
Bharatiya Janata Party
28720
Deoghar
15
NARAYAN DAS
Bharatiya Janata Party
2624
Poreyahat
16
PRADEEP YADAV
Jharkhand Vikas Morcha (P)
13597
Godda
17
Amit Kumar Mandal
Bharatiya Janata Party
4512
Mahagama
18
Deepika Pandey Singh
Indian National Congress
12499
Kodarma
19
Dr. Neera Yadav
Bharatiya Janata Party
1797
Barkatha
20
AMIT KUMAR YADAV
Independent
24812
Barhi
21
Umashankar Akela
Indian National Congress
11371
Barkagaon
22
AMBA PRASAD
Indian National Congress
31514
Ramgarh
23
MAMTA DEVI
Indian National Congress
28718
Mandu
24
Jai Prakash Bhai Patel
Bharatiya Janata Party
2062
Hazaribagh
25
Manish Jaiswal
Bharatiya Janata Party
51812
Simaria
26
Kishun Kumar Das
Bharatiya Janata Party
10996
Chatra
27
SATYANAND BHOKTA
Rashtriya Janata Dal
24055
Dhanwar
28
BABULAL MARANDI
Jharkhand Vikas Morcha (P)
17550
Bagodar
29
VINOD KUMAR SINGH
Communist Party of India (M)
14545
Jamua
30
KEDAR HAZRA
Bharatiya Janata Party
18175
Gandey
31
DR SARFRAZ AHMAD
Jharkhand Mukti Morcha
8855
Giridih
32
SUDIVYA KUMAR
Jharkhand Mukti Morcha
15884
Dumri
33
JAGARNATH MAHTO
Jharkhand Mukti Morcha
34288
Gomia
34
Lambodar Mahto
AJSU Party
10937
Bermo
35
Rajendra Pd. Singh
Indian National Congress
25172
Bokaro
36
Biranchi Narayan
Bharatiya Janata Party
13313
Chandankyari
37
AMAR KUMAR BAURI
Bharatiya Janata Party
9211
Sindri
38
INDRAJIT MAHATO
Bharatiya Janata Party
8253
Nirsa
39
APARNA SENGUPTA
Bharatiya Janata Party
25458
Dhanbad
40
RAJ SINHA
Bharatiya Janata Party
30629
Jharia
41
PURNIMA NIRAJ SINGH
Indian National Congress
12054
Tundi
42
MATHURA PRASAD MAHATO
Jharkhand Mukti Morcha
25659
Baghmara
43
DULU MAHATO
Bharatiya Janata Party
824
Baharagora
44
SAMIR Kr. MOHANTY
Jharkhand Mukti Morcha
60565
Ghatsila
45
Ramdas Soren
Jharkhand Mukti Morcha
6724
Potka
46
Sanjib Sardar
Jharkhand Mukti Morcha
43110
Jugsalai
47
MANGAL KALINDI
Jharkhand Mukti Morcha
21934
Jamshedpur East
48
Saryu Roy
Independent
15833
Jamshedpur West
49
Banna Gupta
Indian National Congress
22583
Ichagarh
50
SABITA MAHATO
Jharkhand Mukti Morcha
18710
Saraikella
51
CHAMPAI SOREN
Jharkhand Mukti Morcha
15667
Chaibasa
52
DEEPAK BIRUA
Jharkhand Mukti Morcha
26159
Majhganon
53
NIRAL PURTY
Jharkhand Mukti Morcha
47192
Jagannathpur
54
SONA RAM SINKU
Indian National Congress
11606
Manoharpur
55
JOBA MAJHI
Jharkhand Mukti Morcha
16019
Chakradharpur
56
SUKHRAM ORAON
Jharkhand Mukti Morcha
12234
Kharasawan
57
DASHRATH GAGRAI
Jharkhand Mukti Morcha
22795
Tamar
58
VIKAS KUMAR MUNDA
Jharkhand Mukti Morcha
30971
Torpa
59
KOCHE MUNDA
Bharatiya Janata Party
9630
Khunti
60
NILKANTH SINGH MUNDA
Bharatiya Janata Party
26327
Silli
61
SUDESH KUMAR MAHTO
AJSU Party
20195
Khijri
62
Rajesh Kachhap
Indian National Congress
5469
Ranchi
63
Chandreshwar Prasad Singh
Bharatiya Janata Party
5904
Hatia
64
NAVIN JAISWAL
Bharatiya Janata Party
16264
Kanke
65
SAMMARI LAL
Bharatiya Janata Party
22540
Mandar
66
BANDHU TIRKEY
Jharkhand Vikas Morcha (P)
23127
Sisai
67
JIGA SUSARAN HORO
Jharkhand Mukti Morcha
38418
Gumla
68
BHUSHAN TIRKEY
Jharkhand Mukti Morcha
7667
Bishunpur
69
CHAMRA LINDA
Jharkhand Mukti Morcha
17382
Simdega
70
BHUSHAN BARA
Indian National Congress
285
Kolebira
71
NAMAN BIXAL KONGARI
Indian National Congress
12338
Lohardaga
72
RAMESHWAR ORAON
Indian National Congress
30150
Manika
73
RAMCHANDRA SINGH
Indian National Congress
16240
Latehar
74
BAIDYANATH RAM
Jharkhand Mukti Morcha
16328
Panki
75
KUSHWAHA SHASHI BHUSHAN MEHTA
Bharatiya Janata Party
37190
Daltonganj
76
ALOK KUMAR CHAURASIYA
Bharatiya Janata Party
21517
Bishrampur
77
RAMCHANDRA CHANDRAVANSHI
Bharatiya Janata Party
8513
Chattarpur
78
PUSHPA DEVI
Bharatiya Janata Party
26792
Hussainabad
79
Kamlesh Kumar Singh
Nationalist Congress Party
9849
Garhwa
80
MITHILESH KUMAR THAKUR
Jharkhand Mukti Morcha
23522
Bhawanathpur
81
Bhanu Pratap Shahi
Bharatiya Janata Party
39904

 पक्षीय बलाबल:

झारखंड मुक्ती मोर्चा- ३०

भाजप- २५

काँग्रेस- १६

झारखंड विकास मोर्चा- ३

आजसू- २

राजद- १

भाकप- १

राष्ट्रवादी काँग्रेस- १

अपक्ष- २

एकूण जागा- ८१

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
====================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.