Monday, 23 December 2019

स्वयंपूर्तीने ओला कचरा विघटन प्रकल्प राबविणारी 'आदित्यनगर गृहनिर्माण संस्था' एकमेव आदर्श सोसायटी- सहआयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक

ओला कचरा विघटन प्रकल्पाचे उदघाटन

पुणे- स्वयंपूर्तीने ओला कचरा विघटन प्रकल्प राबविणारी 'आदित्यनगर सहकारी गृहनिर्माण संस्था' एकमेव आदर्श सोसायटी असून इतर सहकारी गृहनिर्माण संस्थांनी विविध प्रकल्प राबविण्यासाठी आदर्श घ्यावा असे आवाहन पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक यांनी केले. ते आदित्यनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने राबविलेल्या ओला कचरा विघटन प्रकल्पाचे उदघाटन सहआयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक यांच्या हस्ते झाले या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुणे महापालिकेचे नगरसेवक योगेशबापू ससाणे, नगरसेवका उज्वलाताई जंगले, नगरसेवक मारुतीआबा तुपे, माजी नगरसेवक सुनील बनकर, आदित्यनगर गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष सुहास शहा, सचिव एस. व्ही. बारवकर, सोसायटीचे व्यवस्थापन समिती सदस्य व सर्वसाधारण सभासद, पुणे पालिकेतील हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. 

       सोसायटीचे एक एकर क्षेत्र अथवा 100 सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्थांना नव्या कायद्यानुसार ओला कचरा विघटन प्रकल्प राबविणे बंधनकारक आहे मात्र बंधनकारक नसतानाही स्वयंपूर्तीने ओला कचरा विघटन प्रकल्प राबविणारी 'आदित्यनगर गृहनिर्माण संस्था' एकमेव आदर्श सोसायटी असल्याचे सांगितले. ओला कचरा विघटन प्रकल्प राबविल्याबद्दल आदित्यनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे कौतुक करून प्रकल्पाचे उदघाटन झाल्याचे सहआयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक यांनी जाहीर करून ते पुढे म्हणाले की, हडपसर भागात यापूर्वी 5 सोसायटीनी प्रकल्प राबविले आहेत, पुणे पालिकेच्या वतीने ओला कचरा विघटन प्रकल्प राबविण्यासाठी गृहनिर्माण संस्थांना प्रोत्साहित करीत आहोत पुणे शहरात आतापर्यंत ११४ सोसायटीना पालिकेने प्रकल्प सुरु करावेत म्हणून नोटीसा बजावल्या आहेत तर दंडात्मक कारवाई करून साडेचार लाख रुपये दंड वसूल केलेला आहे. बहुतांश सोसायटी अशा स्वरूपाचे प्रकल्प राबवीत आहेत ही आनंदाची बाब आहे. हडपसर भागात विशेषतः फुरसुंगी हद्दीत मोठ्याप्रमाणात कचरा टाकण्यात येतो या विरोधात ग्रामस्थांनी वेळोवेळी आंदोलन केली आहेत. लवादाच्या निर्देशानुसार शहराच्या त्या-त्या भागात ओला कचरा विघटन प्रकल्प राबवून कचरा निर्मूलनासाठीचे प्रयत्न सुरु आहेत. मी दीड वर्षापूर्वी या खात्याचा कारभार हाती घेतला तेव्हापासून अशा प्रकल्पांना गती देण्याचे काम करीत आहे असे सांगून सहआयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक पुढे म्हणाले की, पुणे शहरात 2100 मे. टन म्हणजेच 1 लाख किलो कचरा दररोज निर्माण होतो. कोर्टाचा दबाव व ग्रामस्थांचे आंदोलन यामुळे पुणे महापालिकेने 57 ठिकाणी विविध कचरा निर्मुलन प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. यामध्ये 26 प्रकल्प बायो. 5 मे. टनचे आहेत तर इतर ओला व सुका कचरा विघटन प्रकल्प आहेत. साधारण 1500 मे. टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते तर 500 मे. टन कचरा अद्याप डेपो मध्ये टाकला जात आहे. मार्च अखेर सर्व कचरा निर्मुलन प्रकल्प कार्यान्वित होऊन 100 टक्के विघटन प्रकल्प राबवून कचरा जिरविण्याचे उदिष्ट पूर्ण केले जाणार असल्याचे मोळक यांनी यावेळी सांगितले. नव्या कायद्यानुसार कचरा निर्मूलनासाठी सर्वांच्या जबाबदारी निश्चित केलेल्या आहेत यामध्ये दंडात्मक कारवाई करता येते. गेल्या एक ते दीड वर्षात आतापर्यंत 46 हजार 998 नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. 1 कोटी 36 लाख रुपयांचा दंड वसूल केलेला आहे. तसेच प्लास्टिक वापर करणाऱ्यांना 3 हजार 17 नागरिकांना देखील दंड केला आहे. दंड हा महत्वाचा नसून नागरिकांना चांगल्या सवयी लागल्या पाहिजेत हा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांचा सहभाग महत्वाचा असून आपल्या सारख्या सोसायटीचा आदर्श सर्व गृहनिर्माण संस्थांनी घेतला पाहिजे असे ते म्हणाले. यावेळी पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. 
     याप्रसंगी नगरसेवक योगेशबापू ससाणे यांनी आदित्यनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे कौतुक केले व पुणे शहराचा कचरा हडपसर भागात टाकण्याला केलेला विरोध व प्रयत्नांची माहिती विषद केली चुकीची बीआरटी रचना, वाहतूक कोंडी, चुकीचे कचरा प्रकल्प याबाबत भूमिका मांडली. तर नगरसेवक मारुतीआबा तुपे यांनी विविध प्रकल्प राबविल्यावर सोसायटीतील नागरिकांना पालिकेकडून मिळणाऱ्या सवलतींची माहिती देऊन आदित्यनगर सहकारी गृहनिर्माण संस्था सवलतीसाठी पात्र असल्याचे सांगून मी सवलत मिळवून देण्यास बांधील असल्याचे आश्वासन दिले तर माजी नगरसेवक सुनील बनकर यांनी नगरसेवक मारुतीआबा तुपे यांचे सवलतीबाबतचे म्हणणे दुरुस्त करून अधिक माहिती देऊन आदित्यनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या कार्याचे कौतुक करून नेहमी सहकार्य राहील याची ग्वाही दिली. यावेळी नगरसेवका उज्वलाताई जंगले यांनी ओला कचरा विघटन प्रकल्प कार्यान्वित केल्यामुळे सोसायटीचे आभार मानले, या प्रभागात अनेक सोसायटी आहेत मात्र स्वयंपूर्तीने ओला कचरा विघटन प्रकल्प राबविणारी ही सोसायटी आहे. इतर सोसायटीना अशा स्वरूपाचा प्रकल्प करावयाचा असल्यास मी आदित्यनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेचा प्रकल्प पहा असे सांगता येईल. स्वच्छतेचे महत्व, आदर्श उपक्रमांचे कौतुक त्यांनी या प्रसंगी केले. 
    पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक यांचे स्वागत आदित्यनगर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. हेमंत शहा यांच्या हस्ते केले तर नगरसेवक योगेशबापू ससाणे यांचे स्वागत प्रा. एम. एन. भुजबळ यांनी केले, नगरसेवका उज्वलाताई जंगले यांचे स्वागत हभप श्री. कुबेर महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. तर नगरसेवक मारुतीआबा तुपे यांचे स्वागत व्यवस्थापन समिती सदस्य श्री. पारखे यांच्या हस्ते करण्यात आले आणि माजी नगरसेवक सुनील बनकर यांचे व्यवस्थापन समिती पदाधिकारी श्री. प्रसाद माडीवाले यांच्या हस्ते श्रीफळ व गुलाबपुष्प देवुन स्वागत करण्यात आले. प्रारंभी आदित्यनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या वतीने राबविण्यात आलेल्या सर्व विविध प्रकल्पांची माहिती उपस्थित मान्यवरांना देण्यात आली. सौर उर्जा प्रकल्पाला देखील मान्यवरांनी भेट देऊन पाहणी केली. ओला कचरा विघटन प्रकल्पाचे उदघाटन पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक यांचे हस्ते व प्रभागातील सर्व नगरसेवक, सोसायटीचे पदाधिकारी, सभासद या मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. ओला कचरा विघटन प्रकल्पाची माहीती सर्वांना देण्यात आली. आदित्यनगर गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष सुहास शहा यांनी मान्यवरांचे व प्रकल्पाला सहकार्य लाभलेल्या मान्यवरांचे आभार मानून त्यांचा सन्मान करण्यात आला.

=====================
आदित्यनगर सहकारी सोसायटीच्या स्थापनेपासून (सन १९९६) केलेल्या विविध उपक्रमांची माहिती-
1. सोसायटीचे बिल्डर मे.आदित्य बिल्डर यांचे सहकार्याने सोसायटीचे कन्व्हेयन्स डिड २ वर्षाच्या आत करुन घेतले.
2. सोसायटीत असणा-या सहा विंगच्या खाली व छतावर असणा-या पाण्याच्या टाक्यांना सेन्सर बसवून टाक्या ओव्हरफ्लो होण्याचे थांबवून पाणी व वीज, लाईटची बचत केली. 
3. सोसायटीच्या स्थापनेपासूनच उत्स्फुर्त पणे ओला व सुका कचरा वेगळा करण्याची-मोहिम राबवून मनपाच्या कर्मचा-यांना सुपूर्त केला. 
4. सोसायटीचे टेरेस छताची लेवल घेवून ए विंग ते जी विंग पर्यंत सर्व टाक्या एकमेकांना जोडल्या व संपवेल मधुन एकच मोटार सुरू ठेवून कमीत कमी वीज वापर केला व पाणी पुरवठा सुरळित ठेवला.
5. सोसायटीच्या सर्व वार्षिक सर्वसाधारण सभा वेळेत घेवून त्याचा अहवाल सहकार खात्याला वेळेवर कळविला. तसेच कार्यकारणीच्या मासिक सभा दर महिन्याला घेण्यात येतात. 
6. सोसायटीच्या सर्व फायनान्शिअल अकौंटींग तज्ञ व्यक्तीकडून करुन घेवून सर्व फायनान्शिअल रिटर्न्स कॉम्प्युटराईज्ड केले व त्यासाठी सर्टिफाईड ऑडिटरकडून आत्तापर्यत दरवर्षी 'अ' ग्रेड मिळविण्यात यश आले आहे, सर्व इन्कमटॅक्स रिटर्न्स वेळेवर भरली.
7. सोसायटीच्या उत्पन्नात भर पडावी व सभासदांना सोसायटीची मासिक वर्गणी देण्यासाठी सोपे जावे म्हणून एक वर्षाची वर्गणी एक रकमी भरणा-या सभासदांना एक महिन्याचे वर्गणीत सुट देण्यात आल्याने भरणा वाढला. तसेच मासिक वर्गणी थकबाकीची रक्कम नाममात्र राहिली.
8. गतवर्षी सरकारी धोरणास अनुसरुन सोसायटीच्या 'अ' विंगच्या छतावर सोलर पॅनल बसवून कार्यान्वित केले. त्यापासून मिळणा-या विजेवर सोसायटीच्या पाण्याच्या मोटार चालवुन विज बिलाची रक्कम शुन्यावर आणली. तसेच जादा जनरेटेड युनिट्स वीज मंडळाकडे जमा केली आहेत.
9. सोसायटीच्या सर्व प्रकारच्या बिगरशेती मनपा कर इत्यादी सर्व प्रकारचे सरकारी भरणा वेळच्या वेळी केला. 
10. सोसायटीतील वातावरण एकमेकांना सामंजस्याचे असावे म्हणून आदित्यनगर सांस्कृतिक मंडळ, महिला मंडळ, महिला भजनी मंडळ स्थापन करून त्यामार्फत सहली, एकत्रित स्नेहभोजन इत्यादी कार्यक्रम यशस्वीरित्या घडवून आणले. 
श्री. सुहास शहा सेक्रेटरी (चेअरमन) 
श्री. एस. व्ही. बारवकर (सचिव) 
आदित्यनगर सहकारी सोसायटी मर्या., सर्व सभासद.
=====================
पुणे महापालिकेने कचर्‍याच्या स्त्रोतांवर प्रक्रिया करण्यासाठी पर्याय उपलब्ध करणार्‍या एजन्सींची यादी कोणत्याही विशिष्ट फर्मला मान्यता न देता केवळ नागरिकांच्या माहितीसाठी संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे. या यादीतील (nisarg services vermicomposting project -9175944100) निसर्ग सर्व्हिसेस होम कंपोस्टिंग यंत्रणा राबविण्यास मदत व देखभाल करणाऱ्या एजन्सींच्या सुनीता विजय शिरसाट यांच्या माध्यमातून आदित्यनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेने वतीने राबविलेल्या ओला कचरा विघटन प्रकल्प राबविला आहे. त्यांचा देखील सन्मान यावेळी करण्यात आला.
=====================
Mr. Chandrakant Bhujbal
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================

होम कंपोस्टिंग यंत्रणा राबविण्यास मदत व देखभाल करणाऱ्या एजन्सींची यादी- 
List of agencies providing options for at source processing of waste
Disclaimer - The list provided is only for knowledge purpose  and PMC does not endorse any particular firm. The agencies working in and around Pune in the similar areas and wish to enlist in the below knowledge inventory, please contact with the Solid Waste Management Department, Pune Municipal Corporation, Shivaji Nagar Pune.
Sr. No
Name of Vendor
Areas of work
Contact name
Mobile number
1
INORA (Know How Foundation), Institute of Natural Organic Agriculture
Composting mechanism and service provider
Nutan Bhajekar
9922970157
2
Janadhar Sevabhavi Sanstha
Composting mechanism and service provider
Jaiprakash Paradkar
9823040613
3
NILA POLYCAST
Composting mechanism and service provider
Nikhil Ganorkar
9421306306
4
Hrishikesh Enterprises
Composting mechanism and service provider
Navin Punawale
9823034392
5
Vivam Solid Waste
Management Pvt. Ltd.
Composting mechanism and service provider
Nirmala Kandalgaonkar
9423781304
6
Excel Garbage Compost
Composting mechanism and service provider
Yuvaraj Deshmukh
9860156695
7
Save Environment Engineers
Private Limited
Composting mechanism and service provider
Mr Kulkarni
9960488831
8
Myco Compost
Composting mechanism and service provider
Kaustub Yadre
020 – 67281065
9
Shakti Green Gold Bio Plant
Composting mechanism and service provider
Pankaj Badane
9226487574
10
Use the Culture for Natural
Composting mechanism and service provider
Mr. R. N. Pathan
9975305771
11
Sai Composting
Composting mechanism and service provider
Mr. Gulab Sutar
9890970698
12
Mailhem Engineers
Composting mechanism and service provider

020 - 2553 2228
13
Samgra Nadi Pariwar
Composting mechanism and service provider
Mukund shinde
9975413534
14
Ecoman Services
Composting mechanism and service provider
Sandip Baban kadam
7720013158
15
Sanjeevini Bag for individual households composting
Composting mechanism and service provider
Mrs. Madhuri Ladkat
9607129129
16
Aruna Green venture – Households and Society level biogad and composting
Composting mechanism and service provider
Mr Shashi
7022965565
17
Redx group Vigyan Ashram
Pune
Composting mechanism and service provider
Mr Vartak
9604739867
18
Vaijayanti, Aparna Athavle,
Sahakarnagar
Home composting mechanism
Vaijayanti, Aparna Athavle
7057540487
19
Nisarg Services
Home composting mechanism
Sunita Vijay Sirsat
9175944100
20
Tahan NGO, sahakarnagar and
kothrud
Terrace garden , Home composting
Nilima More
8999915390
21
Greeny the great
Composting mechanism and service provider
Dr Mukesh Kulkarni
8669666748
22
Ecomate Solutions pvt. Ltd
Composting mechanism and service provider
Vijay Limaye
9881231506
Nitin Joshi
9892049770
23
S A enterprises
Composting mechanism and service provider
Dheeraj karavate
9518760563
24
Sumati Somayaji
home composting mechanism
Sumati Somayaji
9011177851
25
Manara Life Sciences LLP
Composting mechanism and service provider
Ram Chavan
9922997181
26
Biju john Proprietor
Composting mechanism and service provider
Naveen Sheenivasan
9112624211
27
The green thumb
Composting mechanism and service provider
Firdosh Roowala
9766403305
28
Medha Tengshe,
Home composting mechanism
Medha Tengshe
9284627574
29
Vigyan Ashram Pabal
Composting mechanism and service provider
Siddhesh Sakore
7709920155
30
K D Madne
Home composting mechanism
K D Madne
9922665372
31
Brown leaf group
Home composting mechanism
Shilpa Gore
9960686954
32
Appa Patwardhan safai va
paryawaran tantraniketan
Composting mechanism and service provider
Dr Sameer Shastri
9881390402
33
Swachh plus
Composting mechanism and service provider
Akshay Singh
9112250977
34
Lilforest
Composting mechanism and service provider
Mr Pankaj
9168703329
35
The synergy
Composting mechanism and service provider
Sachin Anarthe
9503069461
36
Daily Dump, Pune
Composting mechanism and service provider
Pradnya Alate
9766644735
37
Swaroop industries
Home composting mechanism
Prasad Ghalsasi
7276001430
38
ASC for Agro and
Environment
Composting mechanism and service provider
Mr Suhas
9823317112
39
Vitronics Pune
Home composting mechanism
Vivek Bapat
9371010017
40
Mrs Sheela Kochhar
Home composting mechanism
Mrs Sheela Kochhar
7722032400
41
One in all maintenance and
services
Composting mechanism and service provider
Pradnya Dharap
9225853079
42
Urja Biosystems
Composting mechanism and service provider
Natasha  Gangal
9822612316
43
Tej Urbantech
Composting mechanism and service provider
Santosh Patil
8180834806
44
Vayu Mitra Biogas
Composting mechanism and service provider
Sagar Mane
9096964438
45
Waste manager
Composting mechanism and service provider
Dr Ravindra Ranpise
9370451253
46
Mrs. Date
Composting mechanism and service provider
Mrs. Date
9890858832
47
BioMali
Composting mechanism and service provider
Mr. Shanbhag
9324714515
48
Green energy solutions
Composting mechanism and service provider
N. Janardan
9763666651
49
Waste manager
Composting mechanism and service provider
Dr.Ravindra Ranpise
9370451253
50
My green bin
Home composting mechanism
Roopesh Menon
9890038225
51
Shrushti Waste management
Home composting mechanism
Dinesh Joshi
7276099384
52
Green Panda
Composting mechanism and service provider

9158215646
53
Wintech square
Composting mechanism and service provider

8369803574
54
Mayur bhave
Composting mechanism and service provider

9881978412
केवळ माहितीसाठी 
===========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
====================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.