Saturday 7 December 2019

विधानसभा निवडणुकीत पराभूत उमेदवारांकडूनच सर्वाधिक निवडणूक खर्च

पुणे जिल्ह्यात पराभूत उमेदवारांकडूनच सर्वाधिक निवडणूक खर्च

पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांमध्ये पराभूत झालेल्या माजी मंत्री व आमदारांकडूनच सर्वाधिक निवडणूक खर्च झाल्याचे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे दिसून येत आहे. सर्वाधिक निवडणूक खर्च करणाऱ्या 3 उमेदवारांमध्ये 2 माजी मंत्री व 1 माजी आमदाराचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांमध्ये निवडणुकीत सर्वाधिक खर्च केला आहे त्यामध्ये मावळ विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार व माजी मंत्री संजय बाळा भेगडे आणि हडपसर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार व माजी आमदार योगेश टिळेकर तसेच पुरंदर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार व माजी मंत्री विजय बापु शिवतारे यांचा समावेश आहे. निवडणुकीत सर्वाधिक खर्च करणाऱ्या 3 उमेदवारांमध्ये पुणे जिल्हयात सर्वाधिक खर्च पुरंदर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार व माजी मंत्री विजय बापु शिवतारे यांनी 27 लाख 43 हजार 068 रुपये निवडणुकीत खर्च केला आहे. तर त्याखालोखाल हडपसर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार व माजी आमदार योगेश टिळेकर यांनी 27 लाख 01 हजार 790 रुपये तर मावळ विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार व माजी मंत्री संजय बाळा भेगडे यांनी 26 लाख 21 हजार 288 इतका केला आहे. दरम्यान पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांमध्ये कमी खर्च केलेल्यांमध्ये आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजाराम बानखेले (9 लाख 16 हजार 711) व पर्वती विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवार अश्विनी नितीन कदम (9 लाख 27 हजार 475) आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट (9 लाख 66 हजार 003) यांचा समावेश आहे.

निवडणूक खर्चाची लपवाछपवी!

पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघातील विद्यमान नवनिर्वाचित आमदारांनी विधानसभा निवडणुकीत खर्च किती केलेला आहे याचा हिशोब नुकताच निवडणूक आयोगाला सादर केला आहे. सादर केलेल्या मध्ये बहुतांश उमेदवारांनी खर्च लपविल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित निवडणूक खर्च तपासणी अधिकारी व निवडणूक निरीक्षक यांनी उमेदवाराने दैनंदिन खर्च नोंद वहीत नमूद केलेला खर्च व निवडणूक आयोगाकडून खर्च तपासणी अधिकारी यांनी ठेवलेल्या खर्चाच्या तपशिलात आलेली तफावती आढळून आलेली होती. अतिरिक्त झालेला खर्च सर्व उमेदवारांनी मान्य केला असून तो दैनंदिन खर्च नोंद वहीत नमूद केला आहे. यावरून उमेदवारांनी खर्च लपविल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र निर्धारित रक्कमेच्या आत सर्व विद्यमान नवनिर्वाचित आमदारांनी निवडणूक खर्च केला असल्याचे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्र व तपशिलावरून दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघातील विद्यमान नवनिर्वाचित आमदारांनी विधानसभा निवडणुकीत खर्च किती केलेला आहे ते पुढीलप्रमाणे- पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार व विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांनी निवडणूक खर्च 11,67,616 इतका केला असल्याचे दर्शवलेले आहे. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार व विद्यमान आमदार सिद्धार्थ अनिल शिरोळे यांनी निवडणूक खर्च 15,61,300 इतका केला असल्याचे दर्शवलेले आहे. आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार व विद्यमान आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी निवडणूक खर्च 16,25,915 इतका केला असल्याचे दर्शवलेले आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार व विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांनी निवडणूक खर्च 16,69,118 इतका केला असल्याचे दर्शवलेले आहे. पुणे कॅन्टोमेंट विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार व विद्यमान आमदार सुनील कांबळे यांनी निवडणूक खर्च 16,87,646 इतका केला असल्याचे दर्शवलेले आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार व विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांनी निवडणूक खर्च 17,18,382 इतका केला असल्याचे दर्शवलेले आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार व विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांनी निवडणूक खर्च 17,67,463 इतका केला असल्याचे दर्शवलेले आहे. शिरूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार व विद्यमान आमदार अशोक पवार यांनी निवडणूक खर्च 18,42,462 इतका केला असल्याचे दर्शवलेले आहे. वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार व विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनी निवडणूक खर्च 18,58,937 इतका केला असल्याचे दर्शवलेले आहे. कसबापेठ विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार व विद्यमान आमदार मुक्ता टिळक यांनी निवडणूक खर्च 19,36,829 इतका केला असल्याचे दर्शवलेले आहे. जुन्नर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार व विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी निवडणूक खर्च 20,15,485 इतका केला असल्याचे दर्शवलेले आहे. मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार व विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी निवडणूक खर्च 22,18,230 इतका केला असल्याचे दर्शवलेले आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार व विद्यमान आमदार चंद्रकांत पाटिल यांनी निवडणूक खर्च 22,76,287 इतका केला असल्याचे दर्शवलेले आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार व विद्यमान आमदार चेतन तुपे यांनी निवडणूक खर्च 23,30,427 इतका केला असल्याचे दर्शवलेले आहे. दौंड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार व विद्यमान आमदार राहुल कुल यांनी निवडणूक खर्च 2334016 इतका केला असल्याचे दर्शवलेले आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार व विद्यमान आमदार अजित पवार यांनी निवडणूक खर्च 23,41,916 इतका केला असल्याचे दर्शवलेले आहे. पुरंदर विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार व विद्यमान आमदार संजय जगताप यांनी निवडणूक खर्च 23,75,211 इतका केला असल्याचे दर्शवलेले आहे. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार व विद्यमान आमदार दिलिप मोहिते यांनी निवडणूक खर्च 24,63,998 इतका केला असल्याचे दर्शवलेले आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार व विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी निवडणूक खर्च 25,37,153 इतका केला असल्याचे दर्शवलेले आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार व विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी निवडणूक खर्च 25,40,006 इतका केला असल्याचे दर्शवलेले आहे. तर भोर विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार संग्राम थापटे यांची माहिती उपलब्ध झालेली नाही.  उमेदवारांना निवडणूक आयोगाने दिलेल्या नऊ तक्तांच्या फॉर्ममध्ये निवडणुकीत केलेल्या खर्चाची माहिती भरावी लागते त्यामध्ये मेळावे व सभेसाठी केलेला खर्च, स्टार प्रचारकांचा खर्च, प्रचार कार्यालय, फलक, जाहिरात, ब्लक एसएमएस व माध्यमांमध्ये केलेला खचार्ची माहिती द्यावी लागते. तसेच, प्रचारासाठी वाहन खर्च, कार्यालयाचा दैनदिन खर्च, पक्षाकडून प्रचारासाठी मिळालेला निधी, जनतेने दिलेली वर्गणी आदी खर्चाची माहिती द्यावी लागते. या माहितीचे सक्षिंप्त विवरण द्यावे लागते. सदर माहिती खरी असल्याचे शपथपत्र उमेदवारांना खर्च निरीक्षकांकडे सादर करणे अनिवार्य असते. त्यासाठी 23 नोव्हेंबरची अंतिम मुदत देण्यात आली होती. प्रत्येक मतदारसंघात कोटींच्या घरात खर्च होत असतो. मात्र उमेदवारांकडून खर्च दाखवताना निवडणूक आयोग आणि प्रशासनाच्या नियमातून पळवाट काढून प्रत्यक्ष केलेल्या खर्चापेक्षा कमी खर्च दाखवला जात असतो. निकाल लागल्यानंतर एक महिन्यांनी प्रचाराचा खर्च निवडणूक आयोगाकडे देणे बंधनकारक होते. विधानसभा निवडणुकांसाठी आयोगाच्या २८ लाख खर्चाची मर्यादा आहे. विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी निकाल घोषित झाल्यापासून ३० दिवसांच्या आत निवडणूक विषयक खर्च विहित नमुन्यात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करणे बंधनकारक आहे. संबंधित उमेदवारांनी अंतिम दिनांकापर्यंत खर्च दाखल न केल्यास त्यांच्यावर लोक प्रतिनिधित्व अधिनियम १९५१ अन्वये अपात्रतेबाबत कारवाई प्रस्तावित करण्यात येते. तर निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या खर्च मर्यादा ओलांडल्यास लोक प्रतिनिधित्व अधिनियम अंतर्गत अपात्रत ठरविण्यात येत असते.
Mr. Chandrakant Bhujbal 
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
====================================




No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.