Friday 13 December 2019

धायरी गणातून शिवसेनच्या सुवर्णा करंजावणे विजयी; पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण जाहीर

धायरी गणातून शिवसेनच्या सुवर्णा करंजावणे विजयी

हवेली पंचायत समितीमधील धायरी पंचायत समिती गणातील पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार सुवर्णा राजेंद्र करंजावणे या 359 मतांनी विजयी झाल्या आहेत. धायरी पंचायत समिती गणातील धायरी गावाचा पुणे महापालिकेत समावेश झाल्यामुळे येथील सदस्य भाजपच्या अश्विनी पोकळे या नगरसेविका झाल्या. त्यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे जागा रिक्त झाली होती. या रिक्त जागेसाठी 12 डिसेंबर रोजी पोटनिवडणुक झाली. त्याची आज सकाळी हवेली पंचायत समितीत मतमोजणीला सुरुवात झाली. या मतमोजणीत शिवसेनेच्या सुवर्णा राजेंद्र करंजावणे यांना 1096 मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या छाया नितीन हगवणे यांना 737 मते मिळाली. भाजपच्या नीलम दत्तात्रय सणस यांना 328 मते मिळाली. सोळा जणांनी नोटाला मतदान केले. एकूण 2177 मतदारांनी हक्क बजावला होता अशी माहिती संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदार व निवडणूक निर्णय अधिकारी राधिका हावळ यांनी दिली. हावळ यांनी त्यांना निवडणूकीत विजयी झाल्याचे प्रमाणपत्र दिले. यावेळी, प्रमाणपत्र स्वीकारताना सुवर्णा करंजावणे, किरकटवाडीचे सरपंच गोकुळ करंजावणे, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब मोकाशी, सीमा पढेर, शिवसेनेचे विभागप्रमुख श्याम मोरे, किरकटवाडीचे उपसरपंच हरीश मंडले, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख सचिन पासलकर यावेळी उपस्थित होते. सुवर्णा करंजावणे या शिवसेनेच्या उपजिल्हा संघटिका आहेत. किरकटवाडीच्या माजी उपसरपंच म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे. 

पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण जाहीर

पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांपैकी  भोर, वेल्हे आणि मुळशीचे सभापतीपद खुल्या गटासाठी सुटले आहे. उर्वरित दहापैकी शिरूर, मावळ, हवेली, दौंड, पुरंदर, बारामती आणि इंदापूर ही सात पदे विविध प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाली आहेत. त्यामुळे या पंचायत समित्यांवर महिलाराज येणार आहे. पुणे जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदांची आगामी अडीच वर्षासाठीची आरक्षण सोडत शुक्रवारी (ता.१३) सकाळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले आदी उपस्थित होते.

पंचायत समितीनिहाय सभापती आरक्षण खालीलप्रमाणे:-

 जुन्नर- नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी), आंबेगाव- अनुसूचित जमाती (एस.टी.), शिरूर- सर्वसाधारण महिला, खेड- नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी), मावळ- सर्वसाधारण महिला, मुळशी- सर्वसाधारण (खुले), हवेली- अनुसूचित जाती महिला (एस. सी. महिला), दौंड- सर्वसाधारण महिला, वेल्हे- खुले (ओपन), पुरंदर- सर्वसाधारण महिला, भोर- खुले (ओपन), बारामती- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि इंदापूर- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
====================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.