Wednesday 19 October 2016

विधान परिषद निवडणूक १९ नोव्हेंबरलाविद्यमान नगरसेवकांचीच ‘चांदी’; राष्ट्रवादीपुढे आव्हान



विद्यमान नगरसेवकांचीच ‘चांदी’; राष्ट्रवादीपुढे आव्हान

विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या सहा जागांसाठी १९ नोव्हेंबरला निवडणूक होणार असून, ही निवडणूक होत असलेल्या आठ जिल्ह्यांमध्ये आचारसंहितेची कठोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. नगरपालिका निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी विधान परिषदेची निवडणूक होत असल्याने विद्यमान नगरसेवकांना मतदार म्हणून ‘भाव’ मिळणार आहे. सहापैकी चार मतदारसंघांत आमदार असलेल्या राष्ट्रवादीपुढे सर्व जागा कायम राखण्याचे आव्हान राहणार आहे.
राज्यातील १६५ नगरपालिकांसाठी २७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तत्पूर्वी विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणूक होत असल्याने आठ जिल्ह्यांतील नगरसेवकांची चांदीच होणार आहे. कारण नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर विधान परिषदेची निवडणूक होत असल्याने नगरपालिका निवडणुकीचा बराचसा खर्च सुटेल, असे नगरसेवक मंडळींचे गणित असेल. परिणामी, मतांसाठी ‘भाव’ वधारण्याची शक्यता आहे. एरव्ही पाच ते दहा लाख रुपये मताला मोजावे लागतात. नगरपालिका निवडणूक तोंडावर असल्याने मतदारांकडून अधिक मागणी केली जाईल, अशी भीती एका विद्यमान आमदाराने व्यक्त केली. या वेळी १० लाखांवर भाव जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. नगरसेवकांमधून निवडून देण्याच्या या निवडणुकीत ‘ताकदवान’ उमेदवार रिंगणात उतरतात. उमेदवार आर्थिकदृष्टय़ा ताकदवान असल्याने मतदारांच्या अपेक्षा वाढतात. यंदा निवडणुका असल्याने नगरसेवक मंडळींना जास्तच भाव मिळेल, अशी शक्यता वर्तविली जाते.
निवडणूक असेल त्या दिवशी नगरसेवक असलेल्या मंडळींना मतदानाचा अधिकार प्राप्त होतो. नगरपालिका निवडणुकीच्या आधी निवडणूक असल्याने विद्यमान किंवा जुन्याच नगरसेवकांना मतदानाचा अधिकार व त्या आधारे ‘संधी’ मिळणार आहे. आठ जिल्ह्यांमधील नगरसेवक मंडळी चांगलीच हात धुऊन घेतील, असे चित्र आहे.
नगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आधीच सरकारमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. आचारसंहितेचा फास कमी करावा म्हणून मागणी करण्यात येत आहे. याच वेळी निवडणूक असलेल्या आठ जिल्ह्यांमध्ये आचारसंहितेची कडकपणे अंमलबजावणी करण्यात यावी, असा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे.
कोणाला लाभ?
सहापैकी चार मतदारसंघांमध्ये सध्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. काँग्रेस आणि भाजपचा प्रत्येक एका मतदारसंघात आमदार आहे. पुणे, सांगली-सातारा हे दोन गड कायम राखण्यात राष्ट्रवादीला फार काही अवघड जाणार नाही. भंडारा-गोंदिया या मतदारसंघात राष्ट्रवादीला काँग्रेसचे आव्हान आहे. गोंदियाचे आमदार गोपाळ अगरवाल हे माघार घेण्यास तयार नाहीत. त्यांनी मुलाला अपक्ष म्हणून रिंगणात उतरविण्याची तयारी केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची प्रतिष्ठा ही जागा कायम राखण्यासाठी लागली आहे. यवतमाळमध्ये राष्ट्रवादीचे संदीप बजोरिया हे आमदार असले तरी जिल्ह्यातील राष्ट्रवादीची मंडळी आमदाराच्या हेकट स्वभावामुळे संतप्त झाली आहेत. जळगावमध्ये एकनाथ खडसे कोणती भूमिका घेतात यावर भाजपचे यश अवलंबून आहे. नांदेडमध्ये अशोक चव्हाण आपला गड कायम राखतील, अशी शक्यता आहे.
गोव्यात आम्ही शिवसेनेबरोबर युती करण्यास सहमती दर्शवली आहे. त्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीत तशी चर्चा होईल. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाबरोबर युती करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्या पक्षाचे नेते सुदीन ढवळीकर यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्याची आमची इच्छा आहे. – सुभाष वेलिंगकर, गोवा सुरक्षा मंचचे नेते
कन्नूर जिल्ह्य़ात शांतता बिघडवण्याचा प्रयत्न भाजप-संघाकडून होत आहे. कन्नूरमध्ये सर्वपक्षीय शांतता बैठक घेण्याबाबत सरकार प्रयत्नशील आहे. सुरुवातीला जिल्हास्तरावर शांतता बैठक घेऊ नंतर गरज भासल्यास राज्यात बैठक ठेवू. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व पावले उचलली आहेत. – पीनराई विजयन, केरळचे मुख्यमंत्री निवडणूक होणारे मतदारसंघ
पुणे
सातारा-सांगली
यवतमाळ
नांदेड
भंडारा-गोंदिया
जळगाव


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.