मुंबई महानगरपालिका निवडणूक : वॉर्डांची आरक्षणे जाहीर
मुंबईतील १५ वॉर्ड अनुसुचित जमातींसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.
मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठीच्या वॉर्डांची आरक्षण सोडत सोमवारी जाहीर करण्यात आली. आरक्षण सोडतीच्या पहिल्या फेरीत मुंबईतील १५ वॉर्ड अनुसुचित जमातींसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी प्रभागांची फेररचना करण्यात आली होती. आजच्या आरक्षण सोडतीमुळे पालिकेतील सर्वच वॉर्डांची उलथापालथ झाली आहे. मुंबई शहरातील ७ वॉर्ड कमी झाले असून उपनगरातील वॉर्डांची संख्या वाढली आहे. यामध्ये जवळपास ८० टक्के नगरसेवकांचे वॉर्ड फुटले आहेत. सर्वच राजकीय पक्षातील दिग्गजांना याचा फटका बसला आहे. यामध्ये काँग्रेसचे प्रवीण छेडा, देवेंद्र आंबेरकर, शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर, शीतल म्हात्रे, मनसेचे संतोष धुरी, उपमहापौर अलका केरकर, भाजपच्या रितू तावडे यांचा समावेश आहे. यामुळे आता या नगरसेवकांना राजकीय गणिते नव्याने मांडावी लागणार आहेत.
मागील म्हणजे २०१२ मध्ये झालेल्या पालिकेच्या निवडणुकीमध्ये अनुसूचित जातीसाठी ११ आणि अनुसूचित जमातीसाठी दोन प्रभाग राखून ठेवण्यात आले होते. यावेळी या आरक्षणासाठी प्रभाग संख्या १७ करण्यात आली आहे. अनुसूचित जातींसाठी प्रभाग क्रमांक २६, ५३, ९३, १२१, १४२, १४६, १५२, १५५, १६९, १७३, १९५, १९८, २००, २१० आणि २५५, तर अनुसूचित जमातींसाठी प्रभाग क्रमांक ५९ व ९९ आरक्षित करण्यात आले आहेत. यापैकी ५३,१२१,१४२,२००,२१० व २२५ हे वॉर्ड महिला ‘एससी’ आणि ५९ हा वॉर्ड महिला ‘एसटी’ उमेदवारांसाठी राखीव असेल.

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) चंद्रकांत भुजबळ
आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी आज प्रभाग आरक्षणाची सोडत जारी झाली आहे. महापालिकेच्या 227 पैकी 15 वॉर्ड अनुसूचित जाती (एससी)साठी, 61 वॉर्ड ओबीसींसाठी, तर 114 वॉर्ड महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत.
वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात ही सोडत जारी झाली.
26, 53, 93, 121, 142, 146,152, 155, 169, 173, 195, 198, 200, 210 आणि 225 हे 15 प्रभाग अनुसूचित जातींसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. यापैकी 53,121, 142, 200, 210 आणि 225 हे प्रभाग अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित असतील.
याशिवाय अनुसूचित जमातींसाठी 59,99 या वॉर्डमध्ये आरक्षण असेल. यापैकी 59 क्रमांकाचा वॉर्ड अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी आरक्षित आहे.
15 राखीव प्रभागांना निवडणूक आयोगाची मान्यता
2017 च्या निवडणुकीसाठी महापालिकेने 227 पैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या जास्त असलेल्या 60 वॉर्डांची यादी निवडणूक आयोगाला सादर केली होती. त्यापैकी 15 वॉर्ड राखीव ठेवण्यात आले आहेत. त्याला 30 सप्टेंबरला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. त्याची सोडत आज जाहीर झाली आहे.
पुनर्रचनेमुळे अनेकांचे वॉर्ड गायब
सर्वच राजकीय पक्षातील नगरसेवकांच्या प्रभागावर पुनर्रचनेची कुऱ्हाड कोसळली आहे. मुंबई शहरातील सात नगरसेवकांचे वॉर्ड गायब झाले असून उपनगरात सात प्रभाग वाढले आहेत.
काँग्रेसचे प्रविण छेडा, देवेंद्र आंबेरकर, शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर,शितल म्हात्रे, मनसेच्या संतोष धुरी यांना नवे प्रभाग शोधावे लागणार आहेत. तर अनेक नगरसेवकांचे प्रभाग फुटले.
मुंबईतील लोकसंख्या घटली, वॉर्डरचनेत बदल
मुंबई शहराची लोकसंख्या कमी झाली असली तरी उपनगरांमधली लोकसंख्या वाढली आहे. म्हणून वॉर्डरचनेतही बदल होणार आहेत. उपनगरात अनुसूचित जातीची लोकसंख्या वाढली आहे.
साधारणपणे 54 ते 55 हजार लोकांमागे एक नगरसेवक असेल, अशी माहिती आहे. सध्या बहुतांशी वॉर्ड रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूला पूर्व आणि पश्चिम असे विस्तारलेले आहेत. त्यामुळे नव्या रचनेत रेल्वेमार्गांमुळे प्रभाग छेदले जाणार नाहीत, याची काळजी घेतली आहे.
हे वॉर्ड कमी होणार
ए (फोर्ट), बी (पायधुनी), सी (चंदनवाडी), डी (ग्रँट रोड) ई (भायखळा) या विभागातील प्रत्येकी एक, तर जी दक्षिण (प्रभादेवी) विभागातील दोन वॉर्ड कमी होणार आहेत.
पूर्व उपनगरात एम पूर्व (चेंबूर), एन (घाटकोपर) या दोन विभागातील प्रत्येकी एक वॉर्ड कमी झाला असून एल (कुर्ला) आणि एस (भांडुप) विभागात एक वॉर्ड वाढला आहे. याशिवाय एम पूर्व (मानखुर्द) विभागात दोन वॉर्ड वाढले आहेत.
पश्चिम उपनगरातील एच पूर्व (सांताक्रूझ) विभागातील एक वॉर्ड कमी झाला आहे. तर पी दक्षिण (गोरेगाव) आणि आर उत्तर (दहिसर) या विभागातील वॉर्डची संख्या एकने वाढली आहे. तसंच पी उत्तर (मालाड), आर दक्षिण (कांदिवली) विभागात प्रत्येकी दोन वॉर्ड वाढणार आहेत.
ओबीसींसाठी राखीव प्रभाग –
१७५, १९३,८१,४८,६,७६,९१,९,१५३,१६३,१८६,१०४,३१,२८
४८,६,१५३,२११,७६,८१,९,१६३,१८६,३१,२८,१७५,९१,१०४,७२,१६१,४०,१२९,१०,५५,
१६२,२०६,३३,५,३८,४५,८९, २१६,६२,१९३

No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.