लोकसभा, विधानसभेच्या पोटनिवडणुका जाहीर
19 नोव्हेंबरला मतदान; 22 ला मतमोजणी
देशभरात रिक्त असलेल्या लोकसभेच्या चार व विधानसभेच्या आठ जागांसाठीची पोटनिवडणूक 19 नोव्हेंबरला पार पडेल, अशी घोषणा आज निवडणूक आयोगाने केली आहे. 26 ऑक्टोबरला याबाबतची अधिसूचना जारी करण्यात येणार असून, मतमोजणी 22 नोव्हेंबरला होईल, अशी माहिती आयोगाने दिली आहे.
लाखिमपूर (आसाम), शहडोल (मध्य प्रदेश), कुचबिहार आणि तामलूक (प. बंगाल) या चार लोकसभा मतदारसंघांसह आसाम, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश, प. बंगाल, तमिळनाडू, त्रिपुरा आणि पुद्दुचेरीतील रिक्त असलेल्या विधानसभेच्या आठ जागांसाठी 19 नोव्हेंबर या एकाच दिवशी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. भाजपने मे महिन्यात आसाम विधानसभा काबीज केल्यानंतर लाखिमपूर मतदारसंघाचे खासदार सर्वांनंद सोनेवाल यांनी खासदारकीचा राजीनामा देत मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली होती. विधानसभेच्या बैठालांगसो मतदारसंघातून कॉंग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आलेल्या मानसिंग रॉंग्पी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आमदारकीचा राजीनामा दिला होता.
शहडोह लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजपनेते दलपत सिंह, तसेच कूचबिहारमधून निवडून आलेल्या तृणमूल कॉंग्रेसच्या रेणुका सिन्हा यांचे निधन झाल्याने या जागा रिक्त झाल्या आहेत. तामलूक लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले तृणमूलचे सुवेंदु अधिकारी यांनी नंदीग्राममधून विधानसभा लढविली. विजयी अधिकारी यांची नंतर मंत्रिपदावर वर्णी लागल्याने त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता.
तमिळनाडूत विधानसभेच्या अरावाकुरीची आणि तंजावर या दोन मतदारसंघांतील रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. मे महिन्यात मतदारांना पैसे वाटल्याचे पुरावे आढळून आल्यानंतर ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. अरुणाचल प्रदेशमधील हायुलियांग, नेपानगर (मध्य प्रदेश), मॉन्टेस्टवर (प. बंगाल), तिरुपर्णकुंद्रम (तमिळनाडू), बर्जाला व खोवाई (त्रिपुरा) आणि पुद्दुचेरीतील नेल्लीथोप या विधानसभा मतदारसंघांतील रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक पार पडणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.

राज्य लोकसभा विधानसभा
आसाम 1 1
मध्य प्रदेश 1 1
प. बंगाल 2 1
तमिळनाडू - 3
अरुणाचल प्रदेश - 1
त्रिपुरा - 2
पुद्दुचेरी - 1
आसाम 1 1
मध्य प्रदेश 1 1
प. बंगाल 2 1
तमिळनाडू - 3
अरुणाचल प्रदेश - 1
त्रिपुरा - 2
पुद्दुचेरी - 1
-------पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.