पृथ्वीराज देशमुख यांच्या बिनविरोध निवडीची शक्यता
महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. ७ जून रोजी होणार मतदान असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. काँग्रेसचे विधानपरिषदेतील आमदार शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक घेण्यात येणार असून ही जागा विधानसभेच्या आमदारांमधून निवडून देण्यात येते. त्यामुळे या जागेसाठी विधानसभेतील आमदार मतदान करणार आहेत. दरम्यान या जागेसाठी 7 जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. विधानसभेतील संख्याबळ पाहता या निवडणुकीसाठी भाजपचे पारडे जड आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याच्या विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या आमदारपदाच्या पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी सांगली भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख भाजपकडून अर्ज भरणार आहेत. पृथ्वीराज देशमुख यांच्या गळ्यात विधानपरिषदेच्या आमदारकीची माळ बिनविरोध पडण्याची शक्यता आहे. सात जून रोजी या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. विधानसभेच्या 288 जागांपैकी भाजपचे 122, तर शिवसेनेचे 63 आमदार आहेत. काँग्रेसचे 42, तर राष्ट्रवादीचे 41 आमदार आहेत. सात अपक्ष, तर छोट्या पक्षांचे 13 आमदार आहेत. पृथ्वीराज देशमुख हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. सांगली जिल्हात जिल्हाध्यक्षाच्या नात्याने भाजपचा विस्तार करण्यामध्ये देशमुखांचा मोलाचा वाटा राहिला आहे. काँग्रेस नेते पतंगराव कदम यांच्या निधनानंतर कडेगाव पलुस तालुक्यात लागलेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या आदेशानुसार उतरण्याचा पृथ्वीराज देशमुख यांनी पुरेपूर प्रयत्न केला होता. यासाठी पृथ्वीराज देशमुख याचे बंधू आणि सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी पूर्ण ताकदीनिशी अर्जही भरला होता. मात्र नंतर मुख्यमंत्र्यांनी या पोटनिवडणुकीत आपला उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय मान्य करत देशमुख कुटुंबाने पोटनिवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. त्याच वेळी देशमुख कुटुंबाला विधानपरिषदेवर संधी देण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. विधानपरिषदेच्या पोट निवडणुकीसाठी भाजपने आता भाजपशी एकनिष्ठ राहिलेले आणि पक्षाचा आदेश मानणाऱ्या पृथ्वीराज देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. निवडून येणा-या सदस्याची मुदत 24 एप्रिल 2020 पर्यंत असणार आहे. विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली असून नामनिर्देशनपत्र 21 ते 28 मे 2019 या दरम्यान दाखल करण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत भद्रावतीचे शिवसेनेचे आमदार सुरेश धानोरकर यांनी शिवसेनेचा आणि आमदारकीचा राजीनामा देवून कॅांग्रेसकडून निवडणूक लढवली आहे. तर कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेचा आणि आमदारकीचा राजीनामा देत अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवली आहे. शिवसेनेचे नांदेडचे आमदार प्रताप पाटील यांनी शिवसेनेचा राजीनामा देत भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवली. धुळ्याचे भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी भाजपाचा राजीनामा देत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे. या चौघांचे आमदारकीचे राजीनामे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मंजूर केल्याने शिवसेना भाजपाची सदस्य संख्या घटली आहे. काटोलचे भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी यापूर्वीच भाजपाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. माळशिरसचे राष्ट्रवादीचे आमदार हणुमंत डोळस यांचे निधन झाल्याने विधानसभेत एकूण सहा जागा रिक्त आहेत.निवडणूकीदरम्यान मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांनी मनसेचा त्याग करीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.सिल्लोडचे कॅांग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांना पक्षातून काढण्यात आले आहे. सध्या विधानसभेत भाजप १२१,( अनिल गोटे यांचा राजीनामा) शिवसेना ६० ( सुरेश धानोरकर, हर्षवर्धन जाधव, प्रताप पाटील यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला आहे. सेनेला शरद सोनवणे यांचा पाठिंबा मिळू शकतो ), कॅांग्रेस ४२ , राष्ट्रवादी ४० ( हणमंत डोळस यांचे निधन ), बहुजन विकास आघाडी ३, शेकाप ३, एम आय एम २, भारीपा बहुजन महासंघ १, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीया १, रासपा १, समाजवादी पार्टी १, अपक्ष ७ असे संख्याबळ आहे. माजी सभापती शिनाजीराव देशमुख यांची मुदत २४ एप्रिल २०२० पर्यंत असल्याने निवडून येणा-या सदस्याला केवळ ११ महिन्याचा कार्यकाळ मिळणार असल्याने आणि युतीचे संख्याबळ जास्त असल्याने विरोधक या पोटनिवडणूकीत उमेदवार देण्याची शक्यता कमी असल्याने ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
================================================पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE -
https://imojo.in/1gdby2================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/coopebook================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/prabindiaEBook================================================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.