मावळमध्ये शिवसेनेचाच भगवा फडकणार!
राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांचे लोकसभा निवडणूक 2019 मधील सार्वत्रिक निवडणुकीतील महत्व-
* राज्यात युवा नेतृत्व म्हणून ओळख; आगामी विधानसभा निवडणूक लढवल्यास यश शक्य
* पार्थ पवार यांनी राजकारणातील धाडसी निर्णय घेऊन चांगली लढत दिल्याचा राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्यासह कार्यकर्त्यांना हेवा वाटणार
* या पुढील काळात राजकारणाची धुरा सांभाळण्याच्या कार्य, कर्तृत्वामुळे पवार कुटुंबीयांना दिलासा
* अपयश ही यशाची पहिली पायरी असते या म्हणीचा या निवडणुकीतून प्रत्येय
* लोकसभा निवडणुकीत यश-अपयश मिळाले तरी आगामी काळात सुकर राजकीय भवितव्य
शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचे लोकसभा निवडणूक 2019 मधील सार्वत्रिक निवडणुकीतील महत्व-
* पवार घराण्यातील प्रतिस्पर्धी उमेदवाराशी थेट लढत दिल्याने राज्यासह देशभरातून मतदारसंघाकडे लक्ष वेधण्यात आले.
* निवडणुकीत भाजपसह शिवसेनेतील प्रमुखांची मदत व प्रचार सभा
* पवार घराण्यातील उमेदवाराला दिलेल्या आव्हानात्मकतेने राजकारणातील महत्व अधोरेखित
* मित्र पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी राजकीय विरोधकांचे वैर संपुष्टात आणण्यात यश
* आगामी काळात राजकारणाबरोबरच शिवसेना व भाजपमध्ये राजकीय महत्व वाढणार
* संभाव्य यशाची केंद्र पातळीवर दखल घेतली जाणार असल्याने मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता
मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्यामुळे राष्ट्रवादी पक्षाच्या मतांमध्ये वाढ होण्याची शक्यता असून मतदारांच्या कल जाणून घेतला असता कर्जत, उरण व पिंपरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेवर मात करण्याची शक्यता आहे. मात्र सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या पनवेल व चिंचवड विधानसभा आणि मावळ विधानसभा क्षेत्रात शिवसेनेला मतदारांचा कौल असल्याचे पाहणीतून स्पष्ट होत आहे. त्यामुळे मावळमध्ये शिवसेनेचाच भगवा फडकणार आहे. नवख्या राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी दिलेली लढत राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण मानली जाणार असून त्याचा राजकीय फायदा निश्चितच पार्थ पवार यांना मिळू शकेल. मतदारांकडून जाणून घेतलेल्या पाहणीतील अंदाजानुसार मावळ लोकसभा मतदारसंघातील विश्लेषणात्मक माहितीचा घोषवारा पुढीलप्रमाणे आहे. लोकसभा निवडणूक २००९ मधील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेना व राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये सरळ लढत झालेली होती त्याप्रमाणेच आताच्या २०१९ लोकसभा निवडणूकीमध्ये पहावयास मिळाली आहे. २०१४ मधील लोकसभा निवडणूकीत शिवसेना व राष्ट्रवादीबरोबरच शेकाप पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. तत्कालीन राष्ट्रवादीचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी बंडखोरी करून शेकाप तर्फे शिवसेना व राष्ट्रवादीला आव्हान दिले होते यामुळे २०१४ च्या निवडणुकीत तिरंगी लढत झालेली होती. या तिरंगी लढतीचा थेट लाभ शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना झाला होता. कारण शिवसेनेपेक्षा शेकाप व राष्ट्रवादीच्या उमेदवाराने 46 टक्के मते प्राप्त केलेली होती. तर शिवसेनेला 43.62 टक्के मते मिळाली होती ती प्रतिस्पर्धी विरोधी पक्षांपेक्षा सरासरी ३ टक्के कमी होती. अर्थातच राष्ट्रवादी व शेकापच्या मतविभाजनाचा लाभ शिवसेनेला मिळाला होता यामुळे श्रीरंग बारणे यांचा सहज विजय झालेला होता. २०१४ च्या निवडणुकीत शेकाप उमेदवार जगताप यांना मिळालेली सर्व मते शेकाप म्हणून मिळालेली नव्हती तर बंडखोर राष्ट्रवादी म्हणून मिळालेली मते होती यामध्ये राष्ट्रवादी पक्षाची काही मते तर काही जगताप यांना मानणारे वैयक्तीक मतांचा समावेश होता. त्यामुळे शेकापने पाठींबा दिल्याने राष्ट्रवादीला यश मिळेलच असे नाही कारण सरळ दोन पक्षांमध्ये झालेली लढत आहे. मत विभाजनाचा लाभ कोणाला मिळण्याचा प्रश्न निर्माण या निवडणुकीत झालेला नाही. राष्ट्रवादीला अंतर्गत मदत मिळेल अशी आशा होती ती कितपत पूर्ण झालेली आहे ते 23 मे च्या निकालातून अधिकपणे स्पष्ट होईलच. मागील निवडणुकांमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी कोणत्या राजकीय पक्षाला कौल दिला आहे हे पाहूयात, लोकसभा निवडणूक २००९ मधील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेनेला 50.84 टक्के तर राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराला 39.61 टक्के मते प्राप्त झालेली होती. तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला 43.62 टक्के तर शेकापला 30.22 टक्के मते मिळाली होती तर राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराला केवळ 15.52 टक्के मते प्राप्त झालेली होती. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) या संस्थेने केलेल्या पाहणीमध्ये २०१९ लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला 51.16 टक्के तर राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराला 46 टक्के मते प्राप्त होतील असा अंदाज वर्तविला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी कर्जत विधानसभा मतदारसंघ, उरण विधानसभा मतदारसंघ आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांना शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यापेक्षा जास्त मताधिक्य मिळेल असा अंदाज आहे. मागील निवडणुकीमध्ये पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर शिवसेनेच्या विरोधी पक्षात होते यावेळी भाजप मित्र पक्षात आल्याने पनवेल विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेला मदत मिळाली असून उरण विधानसभा मतदारसंघात शेकापच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे काम शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांपेक्षा जास्त काम केले असून येथून देखील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांना चांगले मतदान होण्याचा अंदाज आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये देखील चांगला प्रतिसाद राष्ट्रवादीला मिळेल मात्र पनवेलमध्ये शिवसेनेला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. पुणे जिल्ह्यातील उर्वरित ३ विधानसभा मतदारसंघातील मावळ व चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान आमदारांनी शिवसेनेचे प्रामाणिकपणे काम करून मताधिक्य देण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून आले आहे मात्र शिवसेनेचे आमदार असूनही पिंपरी विधानसभा मतदारसंघातून जास्त मताधिक्य मिळेल असा आशावाद नाही कारण आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील स्थानिक राजकारणामुळे विरोधी मतदानात परिवर्तीत कौल प्राप्त करण्यात राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला काहीसे यश मिळणार असल्याचे पाहणीतून स्पष्ट होत आहे. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी पनवेल व चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 5 लाखांपेक्षा जास्त मतदारसंख्या असून या मतदारसंघातूनच शिवसेनेला मतांची सर्वाधिक आशा होती. या दोन्ही मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे मतदान मिळविण्यात शिवसेनेला यश मिळाले आहे तर मावळ विधानसभा मतदारसंघातूनही शिवसेनेला मताधिक्य प्राप्त होईल असा पाहणीतील कयास आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ पुणे जिल्ह्यासह राज्यभरातून कार्यकर्ते व प्रमुख पदाधिकारी मावळ मतदारसंघात निवडणूक पर्यटन करीत होते. या राजकीय पर्यटकांकडून पुणे जिल्ह्यातील बारामती व शिरूर मतदारसंघासह पुणे लोकसभा मतदारसंघाकडे मात्र दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीच्या राजकीय पर्यटकांकडून प्रत्यक्ष प्रचार कार्यातील सहभागापेक्षा निरीक्षणे नोंदवण्यात धन्यता मानली जात होती. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील निवडणूक विषयक आवश्यक यंत्रणांवर जबाबदारी सोपविण्याऐवजी ऐनवेळी आर्थिक लाभार्थींचे प्रमाण वाढविण्यातच भले असल्याचे मानून कार्य केले. आता 23 मे रोजी त्याचे फलित निकालातून स्पष्ट होईलच.
९६ मतदार केंद्रावर ५० टक्केवारीच्या आत मतदान
मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्व उमेदवार खालीलप्रमाणे-
SR NO
|
Candidate Name
|
Party Affilatiation
|
1
|
Adv. Kanade Sanjay Kisan
|
Bahujan Samaj Party
|
2
|
Parth Ajit Pawar
|
Nationalist Congress Party
|
3
|
Shrirang Appa Chandu Barne
|
Shiv Sena
|
4
|
Jagdish Alias Ayyappa Shamrao Sonawane
|
Kranti Kari Jai Hind Sena
|
5
|
Jaya Sanjay Patil
|
Ambedkarite Party Of India
|
6
|
Pandharinath Namdeo Patil
|
Bahujan Mukti Party
|
7
|
Prakash Bhivaji Mahadik
|
Bhartiya Navjawan Sena (Paksha)
|
8
|
Madan Shivaji Patil
|
Bharatiya Praja Surajya Paksha
|
9
|
Rajaram Narayan Patil
|
Vanchit Bahujan Aaghadi
|
10
|
Sunil Baban Gaikwad
|
Bahujan Republican Socialist Party
|
11
|
Ajay Hanumant Londhe
|
Independent
|
12
|
Amruta Abhijit Apte
|
Independent
|
13
|
Navnath Vishwanath Dudhal
|
Independent
|
14
|
Prashant Alias Babaraje Ganpat Deshmukh
|
Independent
|
15
|
Balkrushna Dhanaji Gharat
|
Independent
|
16
|
Rakesh Prabhakar Chavan
|
Independent
|
17
|
Rajendra Maruti Kate (Patil)
|
Independent
|
18
|
Vijay Hanumant Randil
|
Independent
|
19
|
Suraj Ashokrao Khandare
|
Independent
|
20
|
Suresh Shripati Taur
|
Independent
|
21
|
Dr. Somnath Alias Balashaheb
Arjun Pol
|
Independent
|
निकालानंतर मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार व राजकीय पक्षांचे विश्लेषण सविस्तरपणे पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) या संस्थेच्या वतीने ब्लॉगवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यामध्ये यश-अपयशाची कारणे, निकालाचा विधानसभा निवडणुकांवर होणारा परिणाम आदि.विश्लेषण सविस्तरपणे पहा prabindia.blogspot.com ब्लॉगवर .........
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
================================================पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE -
https://imojo.in/1gdby2================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/coopebook================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/prabindiaEBook================================================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.