Friday 24 May 2019

पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीचा बुरुज कोसळला

पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीचा बुरुज कोसळला


पश्चिम महाराष्ट्रातील १० लोकसभा मतदारसंघातील जागांचे निकाल गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजप व सेनेच्या जागेत प्रत्येकी एका संख्येने वाढ झालेली आहे. गेल्या 2014 च्या निवडणुकीत भाजप-3, शिवसेना-2, राष्ट्रवादी-4 आणि स्वाभिमानी संघटना-1 असे राजकीय पक्षांचे बलाबल होते. या निवडणुकीत भाजप व शिवसेनेच्या संख्येत वाढ झालेली असून राष्ट्रवादीने नव्याने 2 जागांवर विजय मिळवून या निवडणुकीत 3 जागा राखल्या आहेत गेल्या निवडणुकीच्या तुलनेत एका जागेची घट झालेली आहे. लोकसभा 2019 निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील १० लोकसभा मतदारसंघातील जागांमध्ये भाजप-4, शिवसेना-3, राष्ट्रवादी-3 असा निकाल आलेला आहे. लोकसभा 2019 निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील १० लोकसभा मतदारसंघातील निकाल आश्चर्यकारक लागले असून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या मतविभाजनाचा फटका महाआघाडीच्या उमेदवारांना बसला आहे. मनसे नेते राज ठाकरे यांच्या या क्षेत्रात झालेला 4 सभांचा परिणाम मतदानात दिसून आलेला नाही. १० लोकसभा मतदारसंघातील लढती मध्ये प्रामुख्याने मावळ मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव व राष्ट्रवादीचे अध्यक्ष व जेष्ठ नेते शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांचा दारूण पराभव झालेला आहे. हा पवार यांच्या घराण्यातील लोकसभेतील पहिला पराभव मनाला जात आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग आप्पा बारणे सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीने सामाजिकदृष्ट्या नवनिर्वाचित उमेदवार देऊन सलग ३ वेळा निवडून आलेले सेनेचे आढळराव पाटील यांना पराभवाची धूळ चारली आहे. शिवसेनेत काही काळ पदाधिकारी राहिलेल्या आणि छत्रपती संभाजीराजे यांची भूमिका चाहत्यांच्या मनात व घरात मालिकेच्या माध्यमातून पोहोवणारया अमोल कोल्हे यांची प्रचारार्थ जात काढून नाराजी ओढवून घेतल्याने आढळराव पाटील यांना फटका बसल्याचे मानले जाते तसेच नकली दाडी, मिशा लावून छत्रपती संभाजीराजे आणि छत्रपती शिवाजीराजे यांचा इतिहास आम्हाला नाही ऐकायचा असे भाष्य करून चाहत्यांची नाराजी देखील पराभवाचे एक कारण समजले जाते. मतदारांना गृहीत धरून ३ वेळा मिळालेल्या यशामुळे निर्माण झालेला अहंकार पराभवास कारणीभूत ठरला आहे. तर पुणे लोकसभा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे भाजपचे गिरीश बापट यांनी विजय प्राप्त केला आहे. काँग्रेसने ऐनवेळी उमेदवारी देऊन एकतर्फी निवडणूक करण्यात चालना दिल्याने चुरशीशिवाय निवडणूक पहावयास मिळाली तर बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना भाजपने आव्हान देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना अपयश आले. राष्ट्रवादी विरोधी वातावरण निर्माण करून बारामतीची निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली परंतु पुणे जिल्ह्यतील जागा वाटपात सामाजिकदृष्ट्या शिरूर मधून अमोल कोल्हे यांना उमेदवारी देऊन इतर मागासवर्ग समाजाची सहानभूती मतदानातून राष्ट्रवादीला फायदेशीर ठरली आहे तर धनगर समाज भाजपवर नाराज असल्याने त्यांचा देखील लाभ राष्ट्रवादीला बारामती मतदारसंघात मिळाला आहे. पार्थ पवार यांच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघातील मावळ मध्ये तळ ठोकून होते. माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे व काही पदाधिकाऱ्यांचे या मतदारसंघाकडे दुर्लक्ष होते असे मानण्यात येत होते मात्र त्याचा फारसा परिणाम निकालातून दिसून आलेला नाही. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीमुळे झाला असल्याचे निकालावरून दिसून येत आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे मतविभाजनाचा भाजपचे उमेदवार जयसिद्देश्वर महास्वामी यांना लाभ झाला. तर माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी निवडणुकीतून घेतलेली माघार आणि राष्ट्रवादी नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांची बंडखोरी यामुळे येथील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. भाजपकडून अनेक नावांचा विचार केला राष्ट्रवादीला उमेदवारी निवडण्यात झालेला विलंब आणि राजकीय डावपेच भाजपला अनुकूल ठरले. यामुळे भाजपचे उमेदवार राजेंद्रसिंह निंबाळकर-पाटील यांना लाभ झाला तर संजयमामा शिंदे यांना पराभवाची धूळ चाखावी लागली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघ कायम राखण्यासाठी राष्ट्रवादीने कसरत करून विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांना भाजपमध्ये जाण्यापासून रोखून खुद्द शरद पवार यांची शिष्टाई कमी आली. त्यांची उमेदवारी जाहीर करून दिलासा देण्याचा प्रयत्न करून त्यांना त्या कालावधीत सोबत ठेवले. त्यांच्या स्टाईल व लोकप्रियतेचा लाभ घेण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न सफल झाला असून भाजपने कामगारनेते नरेंद्र पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरवले होते मात्र तुल्यबळ लढत देण्यात त्यांना यश आले नाही. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांच्या कुटुंबातील सदस्यांचा भाजप घरोबा आणि त्यांची मतदारांमधील विश्वासाहार्यता नाहीशी करणारे "आमचेही तुमच्या आधी ठरले आहे, अभियान राबवून शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी बाजी मारली. कोल्हापुरातील राष्ट्रवादीचे वर्चस्व संपुष्टात आणले. तर सांगली लोकसभा मतदारसंघातील जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला महाआघाडीच्या जागावाटपात देऊन माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातुला निवडून आणण्याचा दिलासा देऊन पक्षत्याग करण्यास भाग पाडून कॉंग्रेसचे पानिपत करण्याचा प्रयत्न सफल झालेला आहे. राजू शेट्टी यांच्या नाकारात्मक्तेचा फटका त्यांना बसला असून पाटील यांना आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा पक्षांतर्गत विरोधाचा फटका देखील बसला आहे. येथून भाजपचे संजयकाका पाटील यांना अनुकूल वातावरण निर्माण करण्यात यश मिळाले आणि त्याचे मतात रुपांतर झाल्याने विजयाची मुहर्तमेढ रोवली. महाआघाडीतील सदस्याच्या पराभवापेक्षा स्वपक्षीय व्यक्तींना संपुष्टात आणल्याचा आनंद राष्ट्रवादी व काँग्रेस स्थानिक पदाधिकार्यांना जास्त झालेला असल्याचे दिसून आले. पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचा लोकसभा मतदारसंघ समाजाला जाणारा हातकणंगलेची निवडणूक यावेळी चुरशीची ठरली. प्रारंभापासून काँग्रेसचे वर्चस्व राहिलेल्या मतदारसंघात पुनर्रचना झाल्यानंतर २००९ मध्ये राष्ट्रवादीच्या निवेदिता माने यांचा पराभव करून या मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी प्रथमच यश मिळवले होते. त्यानंतर युतीबरोबर सलगी करून 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा यश मिळवले मात्र दरम्यानच्या काळात सहकारी सदाभाऊ खोत यांना राज्यमंत्रीपद मिळवून त्यांच्या बरोबर झालेला दुरावा आणि कार्यकर्त्यांची दुफळीमुळे साहजिकच त्यांच्या ताकदीचे खच्चीकरण झाले परिणाम विरोधी वातावरण निर्माण करण्यात रुपांतर होऊन युतीतून फारकत घेतली आणि ज्यांना शेतकरी हितासाठी शिव्यांची लाखोली वाहिली त्यांचा घेतलेला आश्रय जनतेला रुचला नाही. नकारात्मक वातावरण निर्माण होऊन त्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली आहे. नवोदित शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांनी शेट्टी विरोधकांची मोट बांधली आणि त्याचे यशात रुपांतर झाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राजकीय लाभासाठी आपल्या तत्वांशी प्रतारणा, मतांचे विभाजन, गेल्या निवडणुकीत युती बरोबर आणि या निवडणुकीत महाआघाडीत गेल्याचा निर्णय मतदारांना रुचला नाही त्याचा पराभवातून परिणाम झाल्याचे दिसून आले.
सदर लेख पुढारी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेला आहे. लिंकवर पहा-

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
============================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
============================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
=
===============================================


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.