सरपंचपदांच्या 62 रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर
राज्यातील विविध 20 जिल्ह्यांमधील 146 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तसेच 62 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदांच्या आणि विविध ग्रामपंचायतींमधील 6 हजार 719 सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 23 जून 2019 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली. जुलै 2019 ते सप्टेंबर 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. सार्वत्रिकसह सर्व निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे 31 मे 2019 ते 6 जून 2019 या कालावधीत स्वीकारले जातील. 2 व 5 जून 2019 या दोन सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाही. नामनिर्देशनपत्रांची छाननी 7 जून 2019 रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे 10 जून 2019 पर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान 23 जून 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30 पासून दुपारी केवळ 3.00 पर्यंतच मतदानाची वेळ असेल. सर्व ठिकाणी मतमोजणी 24 जून 2019 रोजी होईल.
सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: पालघर- 7, रायगड- 8, रत्नागिरी- 1, नाशिक- 74, धुळे- 1, जळगाव- 1, अहमदनगर- 10, पुणे- 3, सातारा- 3, सांगली- 1, कोल्हापूर- 1, उस्मानाबाद- 1, लातूर- 2, नांदेड- 1, अकोला- 1, यवतमाळ- 3, वाशीम- 1, बुलडाणा- 1, वर्धा- 4 आणि चंद्रपूर- 22. एकूण- 146.
पोटनिवडणूक होणाऱ्या सरपंचपदांच्या जिल्हानिहाय रिक्त जागा: ठाणे- 1, पालघर- 2, रायगड- 10, रत्नागिरी- 5, सिंधुदुर्ग- 1, नाशिक- 3, अहमदनगर- 1, नंदुरबार- 2, पुणे- 3, सोलापूर- 1, सातारा- 6, औरंगाबाद- 4, नांदेड- 8, उस्मानाबाद- 2, परभणी- 1, वाशीम- 5, बुलडाणा- 1, चंद्रपूर- 1 आणि भंडारा- 5. एकूण- 62.
======================================
खालील नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी देखील लवकरच निवडणुका; प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध
सार्वत्रिक निवडणूक होणाऱ्या नगरपरिषदा/ नगरपंचायती: चंदगड (जि. कोल्हापूर) आणि बुटीबोरी (जि. नागपूर).
नगरपरिषदा/ नगरपंचायतनिहाय पोटनिवडणूक होणाऱ्या सदस्यपदांच्या रिक्त जागांचा तपशील: बारामती (जि. पुणे)- 5 ब, दुधनी (सोलापूर)- 2 अ, नांदगाव (नाशिक)- 7 ब, देवळा (नाशिक)- 11, श्रीरामपूर (अहमदनगर)- 9 ब, संगमनेर (अहमदनगर)- 10 अ, नेवासा (अहमदनगर)- 13, जामखेड (अहमदनगर)- 14, दोंडाईचा-वरवाडे (धुळे)- 8 अ, सोयगाव (औरंगाबाद)- 16, अंबाजोगाई (बीड)- 4 अ, सोनपेठ (परभणी)- 1 ब, मानवत (परभणी)- अध्यक्ष, हिंगोली (हिंगोली)- 11 ब, जळगाव-जामोद (बुलढाणा)- 8 अ, दारव्हा (यवतमाळ)- 2 अ, मोहाडी (भंडारा)- 4, मोहाडी (भंडारा)- 9, मोहाडी (भंडारा)- 12, लाखांदूर (भंडारा)- 16, देवरी (गोंदिया)- 11, कोपरना (चंद्रपूर)- 15, मूल (चंद्रपूर)- 6 अ, भामरागड (गडचिरोली)- 5 आणि भामरागड (गडचिरोली)- 16,
खालील महानगरपालिकांच्या पोटनिवडणुकांसाठी देखील लवकरच निवडणुका; प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध
महानगरपालिकानिहाय पोटनिवडणूक होणारे प्रभाग: पुणे- 42अ, 42ब (हद्दवाढ क्षेत्रासाठी), 24ब आणि 1अ, उल्हासनगर- 1ब आणि 5अ, नाशिक- 10 ड, परभणी- 11अ आणि 3ड, मालेगाव- 6क, चंद्रपूर- 6ब आणि 13ब, कोल्हापूर- 28 आणि 55, कल्याण-डोंबिवली- 26, नवी मुंबई- 29, बृहन्मुंबई- 32, 28, 76 आणि 81.
खालील जि.प. आणि पं.स.च्या पोटनिवडणुकांसाठी देखील लवकरच निवडणुका; प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध
पोटनिवडणूक होणाऱ्या जिल्हा परिषदनिहाय निवडणूक विभाग असे: रायगड- कळंब (ता. कर्जत), पुणे- बावडा-लाखेवाडी (इंदापूर), अहमदनगर- बारागाव नांदूर (राहुरी), हिंगोली- येहळेगाव तु. (कळमनुरी), वर्धा- झडशी (सेलू) व मांडगाव (समुद्रपूर), भंडारा- ब्रम्ही (पवनी) व पालांदपूर (लाखनी) आणि गोंदिया- आसोली (गोंदिया).
पोटनिवडणूक होणाऱ्या पंचायत समितीनिहाय निर्वाचक गण असे: पेण (जि. रायगड)- वडखळ, पालघर (पालघर)- खैरापाडा, हवेली (पुणे)- वाडेबोल्लाई, कागल (कोल्हापूर)- माद्याळ, देवळा (नाशिक)- महालपाटणे, चाळीसगाव (जळगाव)- मेहुणबारे, नेवासा (अहमदनगर)- सोनई, कर्जत (अहमदनगर)- कोरेगाव, केज (बीड)- आडस, बिलोली (नांदेड)- अटकळी, माहूर (नांदेड)- वाई बा, मुखेड (नांदेड)- जांब बु., औंढा ना. (हिंगोली)- असोला तर्फे लाख, गोरेगाव (गोंदिया)- घोटी, अर्जुनी मोरगाव (गोंदिया)- माहुरकुडा आणि हिंगणघाट (वर्धा)- वडनेर.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
================================================पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE -
https://imojo.in/1gdby2================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/coopebook============================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/prabindiaEBook================================================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.