Saturday 25 May 2019

मावळमध्ये शिवसेनेचाच भगवा फडकणार! ६ मे रोजीच्या अंदाजावर निकालाचे शिक्कामोर्तब

अचूक अंदाज आणि राजकीय सद्यस्थितीची सत्यता दर्शविणाऱ्या प्राब संस्थेवर शुभेच्छांचा वर्षाव 



देशातील १७ व्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात घेण्यात आलेल्या मतदानाचा अचूक अंदाज वर्तविण्यात आला आणि सर्वेक्षणातील अचूक अंदाजाच्या विश्वसनीयतेवर पुन्हा शिक्कामोर्तब झाल्याने पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेच्या नावलौकिकतेत भर पडली आहे. राज्यातील 48 मतदारसंघातील 23 मतदारसंघात मतदानोत्तर चांचणी प्राब संस्थेच्या वतीने घेण्यात आलेली होती त्याचा जनमत चाचणीचा मतदारांचा कौल/कल कशाप्रकारे असू शकेल याबाबत मतदारसंघनिहाय अंदाज वर्तविण्यात आलेला होता. ११ मतदारसंघातील अंदाजामध्ये स्थानिक राजकीय घडामोडींमुळे संभाव्य बदल देखील कारणांसह जाहीर केले होते. पुणे व रायगड जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ मिळून निर्माण झालेला मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा कल सविस्तरपणे दि. ६ मे २०१९ रोजी प्राब संस्थेच्या ब्लॉगवर (मावळमध्ये शिवसेनेचाच भगवा फडकणार!) असे वृत्त प्रसिद्ध केलेले होते. मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू व माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी महाआघाडीच्या वतीने उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष केंद्रित झाले होते. या मतदारसंघातील विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला प्रारंभी स्थानिक भाजपचा असलेला विरोध आणि आमदार जगताप यांची अस्पष्ट भूमिका, शेकापची साथ या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला यशाची अपेक्षा होती मात्र या मतदारसंघात वस्तूस्थिती वेगळीच होती ती जाणून घेण्यात राष्ट्रवादीतील पदाधिकार्यांना अपयश आल्यानेच दारूण प्रभावाचा सामना करावा लागला आहे. राष्ट्रवादी पक्ष नेतृत्व अजूनही निवडणुका लढविण्याची पारंपारिक पद्धत बदलण्यास धजावत नाही. पक्ष कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यावरील फाजील विश्वास, स्वतःच्या अंदाजावर आत्मविश्वास, निवडणूक विषयक कामे करणाऱ्या संस्थांवरील अविश्वास आणि बोगस संस्था/कंपनी व्यक्तींवर टाकलेला बेभारोसा यामुळे राजकीयदृष्ट्या झालेली मानहानी आणि आर्थिकदृष्ट्या नाहक झालेले नुकसान याचे परिणाम निकालातूनच समजणार हे चक्र अजून किती दिवस सुरु ठेवणार आहे यावरच यशाचे गणित अवलंबून राहणार आहे. कुशल मनुष्यबळ/कार्यकर्ते सोडून सक्तीची शिक्षकांना दिलेली प्रचाराची जबाबदारी, मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे फाजील लाड, उमेदवाराची अपरिपक्वता, प्रचारातील धोरणात्मक रणनीतीचा अभाव, बुथ निहाय मिळालेली सामाजिकदृष्ट्या चुकीची आकडेवारी आणि राजकीय पर्यटकांची उदंड गर्दी, उपद्रवीपणा, पक्षाचे धोरण, अविश्वसनीय राजकीय भूमिका दारूण पराभवास कारणीभूत ठरल्या आहेत. प्राब संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात या सर्व बाबी अधोरेखित करण्यात आलेल्या होत्या. मतदारांचा कल जाणून मावळमध्ये शिवसेनेचाच भगवा फडकणार! ६ मे रोजीच्या अंदाज व्यक्त केला होता यावेळी पार्थ पवार यांचा पराभव असे प्रसिद्ध करून धाडस कसे दाखवले असेही काही हितचिंतकांनी विचारणा केली होती मात्र अचूक अंदाज व्यक्त करण्याच्या दृढअनुभवामुळे आमच्या निर्णयावर ठाम राहिलो आणि निकालाने संस्थेच्या अंदाजावर शिक्कामोर्तब झाल्याने तथाकथित विद्वानांची देखील दातखिळ बसली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेला देखील आव्हानात्मक वातावरण निर्माण करण्याचा महाआघाडीचा प्रयत्न झाला. भाजपकडून अतिशय चोखपणे कार्य बजावल्याने सेनेचा विजय सुकर होऊन प्रचंड मताधिक्य मिळाले आहे. प्राबने अंदाज वर्तवल्याप्रमाणे कर्जत आणि उरण विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीला चांगला प्रतिसाद मिळेल आणि शिवसेनेला मताधिक्य मिळणार नाही असा अंदाज वर्तविण्यात आलेला होता तो अंदाज खरा ठरलेला आहे. या मतदारसंघातील निवडणूक विश्लेषण सविस्तरपणे या पूर्वीच ब्लॉगवर प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. मतदानाचा अचूक अंदाज वर्तविण्यात आल्याने हितचिंतकांनी शुभेच्छा व सकारात्मक भावना व्यक्त केलेल्या सर्वांचे आभारी आहोत. 
    चिंचवड मतदारसंघात श्रीरंग बारणे यांना १ लाख ७६ हजार ४७५ मते मिळाली. पार्थ पवार यांना केवळ ७९ हजार ७१७ मते मिळविण्यात यश आले. पार्थ पवार यांना मिळालेल्या मतांपेक्षा बारणे यांची आघाडी ९६ हजार ७५८ इतकी मोठी होती. पिंपरीमध्ये श्रीरंग बारणे यांना १ लाख ३ हजार २३५ मते मिळाली तर पार्थ पवार यांना केवळ ६१ हजार ९४१ मते मिळाली. मावळमध्ये बारणे यांना १ लाख ५ हजार २७२ मते मिळाली तर पार्थ पवार यांना ८३ हजार ४४५ मते मिळाली. उरण मतदारसंघात पार्थ पवार यांना ८६ हजार ६९९ मते मिळाली तर, बारणे यांना ८९ हजार ५८७ मते मिळाली. कर्जत मतदारसंघात पार्थ पवार यांना ८५ हजार ८४६ मते मिळाली. तेथे बारणे यांना ८३ हजार ९९६ मते मिळाली. या मतदारसंघातच पार्थ पवार हे १ हजार ८५० मतांची आघाडी मिळवू शकले. मावळ मधील कर्जत, पनवेल आणि उरण हे तीन रायगड जिल्ह्यातील मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचा प्रभाव आहे. त्यांच्यावर अजितदादा पवार यांची मदार होती. मात्र, गेल्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या तिकीटावर निवडणुक लढविलेले लक्ष्मण जगताप यांना पनवेल आणि उरण मधून आघाडी मिळाली होती. तशी आघाडी पार्थ पवार यांना मिळू शकली नाही. भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप आणि श्रीरंग बारणे यांच्यातून निवडणुकीपूर्वी विस्तवही जात नव्हता. युती झाल्यानंतरही लक्ष्मण जगताप यांनी अनेक आढेवेढे घेतले होते. शेवटी महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कानमंत्र दिल्यावर ते प्रचारात सहभागी झाले. मनोमिलनाचा फायदा आप्पा बारणे यांना निश्चितच झाला असल्यामुळे त्यांना चिंचवडमधून सर्वाधिक मताधिक्य मिळू शकले आहे.राज्याचे लक्ष लागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना राज्यात तिस-या क्रमाकांची मते मिळविण्याचा मान मिळाला आहे. बारणे यांनी झालेल्या मतदानापैंकी तब्बल 52.65 टक्के मिळविली आहेत. तर, पहिल्या क्रमाकांची मते कोल्हापूरचे शिवसेनेचे विजयी उमेदवार संजय मंडलिक तर ठाण्याचे शिवसेना उमेदवार राजन विचारे यांनी राज्यात दुस-या क्रमाकांची मते मिळविली आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघातून  21 उमेदवारांनी आपले नशिब आजमाविले. मावळ लोकसभा मतदारसंघात एकूण 22 लाख 97 हजार 405 मतदार होते. त्यापैकी 13 लाख 66 हजार 818 मतदारांनी 2 हजार 504 केंद्रावर  मतदानाचा हक्क बजाविला होता. एकूण 59 टक्के मतदान झाले होते. शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना तब्बल  7 लाख 20 हजार 663 मतदान झाले. झालेल्या मतदानापैकी बारणे यांना 52.65 टक्के मतदारांनी पसंती दिली. तर, त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या पदरात 5 लाख 4 हजार 750 मते पडली. पवार कुटुंबाचा पहिल्यांदाच पराभव केल्याने श्रीरंग बारणे राज्यभरात चर्चेत आले आहेत. त्यातच राज्यातील 48 उमेदवारापैंकी तिस-या क्रमांकाची मते घेतल्याने आप्पा बारणे पुन्हा चर्चेत आले आहेत.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
============================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
============================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
=
===============================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.