नगरपरिषदेसाठी विविध ठिकाणच्या 23 रिक्तपदांसह जि.प. 9, पंचायत समित्यांमधील 16 रिक्तपदांसाठी मतदान
राज्यातील नगरपरिषद व जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमधील रिक्तपदांसाठी 23 जूनला पोटनिवडणुक घेण्यात येणार असून बारामतीसह विविध ठिकाणच्या 23 रिक्तपदांसाठीही तसेच बुटीबोरी नगरपरिषदेसाठी 23 जून रोजी मतदान होणार आहे. तसेच राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमधील रिक्तपदांसाठी देखील मतदान 23 जूनला होणार असून यामध्य पुणे जिल्हा परिषदेच्या हवेली मधील वाडेबोल्लाई आणि इंदापूर तालुक्यातील बावडा-लाखेवाडी या गट/गणात निवडणूक होणार आहे. याबरोबरच रायगड, पुणे, अहमदनगर, हिंगोली, वर्धा, भंडारा व गोंदिया या सात जिल्हा परिषदांमधील नऊ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी आणि विविध 16 पंचायत समित्यांमधील 16 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांकरिता 23 जून 2019 मतदान होणार आहे. रायगड, पुणे, अहमदनगर, हिंगोली, वर्धा, भंडारा व गोंदिया या सात जिल्हा परिषदांमधील नऊ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी आणि विविध 16 पंचायत समित्यांमधील 16 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांकरिता 23 जून 2019 मतदान; तर 24 जून 2019 रोजी मतमोजणी होईल. या पोटनिवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे 3 ते 8 जून 2019 या कालावधीत स्वीकारली जातील. 5 जून 2019 रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. मतदान 23 जून 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल.
पोटनिवडणूक होणाऱ्या जिल्हा परिषदनिहाय निवडणूक विभाग असे: रायगड- कळंब (ता. कर्जत), पुणे- बावडा-लाखेवाडी (इंदापूर), अहमदनगर- बारागाव नांदूर (राहुरी), हिंगोली- येहळेगाव तु. (कळमनुरी), वर्धा- झडशी (सेलू) व मांडगाव (समुद्रपूर), भंडारा- ब्रम्ही (पवनी) व पालांदपूर (लाखनी) आणि गोंदिया- आसोली (गोंदिया).
पोटनिवडणूक होणाऱ्या पंचायत समितीनिहाय निर्वाचक गण असे: पेण (जि. रायगड)- वडखळ, पालघर (पालघर)- खैरापाडा, हवेली (पुणे)- वाडेबोल्लाई, कागल (कोल्हापूर)- माद्याळ, देवळा (नाशिक)- महालपाटणे, चाळीसगाव (जळगाव)- मेहुणबारे, नेवासा (अहमदनगर)- सोनई, कर्जत (अहमदनगर)- कोरेगाव, केज (बीड)- आडस, बिलोली (नांदेड)- अटकळी, माहूर (नांदेड)- वाई बा, मुखेड (नांदेड)- जांब बु., औंढा ना. (हिंगोली)- असोला तर्फे लाख, गोरेगाव (गोंदिया)- घोटी, अर्जुनी मोरगाव (गोंदिया)- माहुरकुडा आणि हिंगणघाट (वर्धा)- वडनेर.
निवडणूक कार्यक्रमाचा तपशील
* नामनिर्देशनपत्रे सादर करणे- 3 ते 8 जून 2019* नामनिर्देशनपत्रांची छाननी- 10 जून 2019
* अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे- 15 जून 2019
* अपील असल्यास उमेदवारी मागे घेणे- 19 जून 2019
* मतदानाचा दिनांक- 23 जून 2019
* मतमोजणीचा दिनांक- 24 जून 2019
========================================
बारामतीसह विविध ठिकाणच्या 23 रिक्तपदांसाठीही मतदान
नवनिर्मित बुटीबोरी (जि. नागपूर) या नगरपरिषदेची सार्वत्रिक; तसेच विविध नगरपरिषदा/ नगरपंचायतींमधील 23 रिक्तपदाच्या; तर मानवत (जि. परभणी) या नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीसाठी 23 जून 2019 रोजी मतदान व 24 जून 2019 रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली. नामनिर्देशनपत्रे 30 मे 2019 ते 6 जून 2019 या कालावधीत दाखल करता येतील. 2 व 5 जून 2019 रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. 7 जून 2019 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. अपील नसलेल्या ठिकाणी 13 जून 2019 ही नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. अपील असलेल्या ठिकाणी न्यायालयाच्या निकालाच्या तिसऱ्या दिवसापर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे मागे घेता येतील. 23 जून 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 24 जून 2019 रोजी होईल.
नगरपरिषदा/ नगरपंचायतनिहाय पोटनिवडणूक होणाऱ्या रिक्त जागांचा तपशील: बारामती (जि. पुणे)- 5 ब, दुधनी (सोलापूर)- 2 अ, नांदगाव (नाशिक)- 7 ब, देवळा (नाशिक)- 11, श्रीरामपूर (अहमदनगर)- 9 ब, संगमनेर (अहमदनगर)- 10 अ, जामखेड (अहमदनगर)- 14, दोंडाईचा-वरवाडे (धुळे)- 8 अ, सोयगाव (औरंगाबाद)- 16, अंबाजोगाई (बीड)- 4 अ, सोनपेठ (परभणी)- 1 ब, मानवत (परभणी)- अध्यक्ष, हिंगोली (हिंगोली)- 11 ब, जळगाव-जामोद (बुलढाणा)- 8 अ, दारव्हा (यवतमाळ)- 2 अ, मोहाडी (भंडारा)- 4, 9 व 12, लाखांदूर (भंडारा)- 16, देवरी (गोंदिया)- 11, कोरपना (चंद्रपूर)- 15, मूल (चंद्रपूर)- 6 अ, भामरागड (गडचिरोली)- 5 आणि भामरागड (गडचिरोली)- 16.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
================================================पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE -
https://imojo.in/1gdby2============================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/coopebook============================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/prabindiaEBook================================================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.