Wednesday 22 May 2019

मतमोजणीच्या तक्रार निवारणासाठी निवडणूक आयोगाकडून नियंत्रण कक्ष

 011303052123 हेल्पलाईन नंबरवर मतमोजणी तक्रारी निवारण होणार


गेल्या तीन महिन्यांपासून उत्सुकता लागलेल्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी करण्यात येणार असून, निकालाकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. मतमोजणी आणि ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक मतदान मशीन) संबंधित तक्रारी हाताळण्यासाठी निवडणूक आयोगाने एक नियंत्रण कक्ष तयार केले आहे. निवडणुकीच्या निकालापर्यंत नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत असेल. यासाठी हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे. मतमोजणी आधीच विरोधकांनी ईव्हीएम मशिनच्या सुरक्षेबाबत प्रश्न चिन्हे उपस्थित केल्याने निवडणूक आयोगाने त्यादृष्टीने तक्रारी हाताळण्यासाठी एक नियंत्रण कक्ष तयार केले आहे. यात, ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रांगरूमची सुरक्षा, उमेदवाराच्या प्रतिनिधीला स्ट्रांगरूमच्या आतमध्ये सोडण्याची परवानगी, सीसीटीव्ही सुरक्षा, ईव्हीएम मशीनमधील तांत्रिक अडचण याबाबतीत मदतीसाठी या नियंत्रण कक्षातून मदत केली जाईल. यासाठी, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 011303052123 हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे.या हेल्पलाइनमुळे मतमोजणी पूर्ण होईपर्यंत उमेदवारांना कधीही माहिती सहज मिळण्यास मदत होणार आहे. 24 तास सुरु असणारी ही हेल्पलाइन देशातील सर्व लोकसभा मतदार संघासाठी सुरु करण्यात आली आहे. याद्वारे उमेदवारांच्या विविध तक्रारींचे निवारण केले जाणार आहे.विरोधी पक्षांनी ईव्हीएमच्या सुरक्षाव्यवस्था विषयी केलेल्या आरोपांनंतर मंगळवारी मोठा वाद पहायला मिळाला. त्याबरोबर, सोशल मीडियावर सुद्धा काही व्हिडिओ व्हायरल झाले होते. ज्यामध्ये ईव्हीएम उघड्या ट्रकमधून नेताना दिसत आहे. परंतु निवडणूक आयोगाने सर्व आरोप निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे.
Election Commission of India: A 24-hour EVM Control Room has been made functional at Nirvachan Sadan to monitor complaints relating to polled EVMs. Any complaints during counting related to EVMs can be informed at control room number is 011-23052123.
==============================================

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीची मतमोजणी खालीलप्रमाणे ४८ ठिकाणी होणार

लोकसभा निवडणूक सर्व ठिकाणी पार पडली असून आता सर्वांची नजर २३ मे रोजी लागणाऱ्या निकालाकडे लागली आहे. एक्झिट पोलच्या अंदाजामुळे निवडणूक निकालात चुरस निर्माण झाली आहे. मतमोजणी खालीलप्रमाणे ४८ ठिकाणी होणार आहे.

४८ ठिकाणे पुढीलप्रमाणे :-

१) नंदुरबार महाराष्ट्र स्टेट वेअर हाऊस कॉर्पोरेशन गोडाऊन, जीटीपी कॉलेज रोड, नंदुरबार
२) धुळे गर्व्हमेंट फूड ग्रेड गोडाऊन, धुळे
३) जळगाव महाराष्ट्र स्टेट वेअर हाऊस कॉर्पोरेशन गोडाऊन, जळगाव
४) रावेर महाराष्ट्र स्टेट वेअर हाऊस कॉर्पोरेशन गोडाऊन, जळगाव
५) बुलढाणा गव्हमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्ट्यिूट्यूट, मलकापूर रोड, बुलढाणा
६) अकोला गर्व्हमेंट ग्रेड गोडाऊन, खांदान, अकोला
७) अमरावती नेमानी गोडाऊन, अमरावती
८) वर्धा एफसीआय गोडाऊन, बरबादी रोड, वर्धा
९) रामटेक पंडित जवाहलाल नेहरु मार्कट यार्ड, नागपूर
१०) नागपूर -पंडित जवाहलाल नेहरु मार्कट यार्ड, नागपूर
११) दक्षिण मुंबई न्यू शिवडी वेअर हाऊस, बीपीटी कॉलनी, शिवडी
१२) रायगड जिल्हा क्रीडा भवन, अलिबाग, रायगड
१३) मावळ शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे
१४) पुणे एफसीआय गोडाऊन, कोरेगाव पार्क
१५) बारामती एफसीआय गोडाऊन, कोरेगाव पार्क
१६) शिरुर -शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे
१७) अहमदनगर महाराष्ट्र स्टेट वेअरहाऊसिंग कार्पोरेशन गोडाऊन, नागपूर
१८) शिर्डी महाराष्ट्र स्टेट वेअरहाऊसिंग कार्पोरेशन गोडाऊन, नागपूर
१९) बीड अग्रीकल्चरल प्रोड्यूस मार्केट कमिटी, बीड
२०) उस्मानाबाद गर्व्हमेंट पॉलिटेक्निल बिल्डिंग, उस्मानाबाद
२१) भंडारा गोदिंया लाल बहादूर शास्त्री हायस्कूल, भंडारा
२२) गडचिरोली चिमुर अग्रीकल्चर कॉलेज, गडचिरोली
२३) चंद्रपूर महाराष्ट्र स्टेट वेअर हाऊस कॉर्पोरेशन गोडाऊन, पडोळी, चंद्रपूर
२४) यवतमाळ वाशिंद गर्व्हमेंट ग्रेड गोडाऊन, दरवा रोड, यवतमाळ
२५) हिंगोली गर्व्हमेंट पॉलिटेक्निक कॉलेज, एमआयडीसी, हिंगोली
२६) नांदेड इन्फॉरमेंशन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी बिल्डिंग, गर्व्हमेंट पॉलिटेक्निकल नांदेड
२७) परभणी वंसतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
२८) जालना संकेत इंडस्ट्री लिमिटेड, दावलावाडी, जालना
२९) औरंगाबाद सेंट्रल इनस्टीट्यूट ऑफ प्लॉस्टिक इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, जालना रोड, औरंगाबाद
३०) दिंडोरी सेंट्रल वेअर हाऊस गोडाऊन, नाशिक
३१) लातूर गव्हमेंट रेसिडेटंल विमेन पॉलिटेक्निकल, बारशी रोड, लातूर
३२)सोलापूर गव्हमेंट ग्रेन गोडाऊन, रामवाडी गोडाऊन, सोलापूर
३३) माढा -गव्हमेंट ग्रेन गोडाऊन, रामवाडी गोडाऊन, सोलापूर
३४) सांगली सेंट्रल वेअरहाऊस कार्पोरेशन गोडाऊन, मिरज
३५) सातारा -डीएमओ गोडाऊन, एमआयडीसी, सातारा

३६) रत्नागिरी सिंधुदुर्ग एफसीआय गोडाऊन क्रंमाक १

महाराष्ट्रातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीतील वैशिष्ट्य/दृष्टिक्षेप 


महाराष्ट्रातील 2019 मधील लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीतील वैशिष्ट्य आणि दृष्टिक्षेप खालीलप्रमाणे देत आहोत. 

[?]  महाराष्ट्रात प्रथमच एकूण 4 टप्प्यात मतदान घेण्यात आले.

[?]  लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत प्रथमच सर्व केंद्रांवर VOTER-VERIFIED PAPER AUDIT TRAIL (VVPAT) व्हीव्हीपीएटी यंत्राचा वापर करण्यात आला.

[?]  इव्हिएम यंत्रावर पहिल्यांदा उमेदवारांचे छायाचित्रे देण्यात आलेली होती.

[?]  आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी निवडणूक आयोगाने सिटीजन व्हिजिलन्स अंतर्गत ‘सी-व्हिजिल’ हे नवे मोबाईल अॅपद्वारे मतदारांना तक्रारीची तत्काळ दखल व सुविधा उपलब्ध केली.

[?]  निवडणूक आयोगाकडून माध्यम प्रमाणीकरण व देखरेख (एमसीएमसी) समितीमार्फत जाहिरातीचे प्रमाणीकरण 

[?]  पहिल्या टप्प्यात ७ तर दुसऱ्या टप्प्यात १० आणि तिसऱ्या टप्प्यात १४ तसेच चौथ्या टप्प्यात १७ मतदारसंघांमध्ये मतदान झाले.

[?]  11 एप्रिल, 18 एप्रिल, 23 एप्रिल, 29 एप्रिल 2019 रोजी मतदान घेण्यात आले तर एकत्रित निकाल 23 मे 2019 रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

[?]  महाराष्ट्रातील 48 लोकसभा जागांसाठी 867 उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

[?]  लोकशाहीच्या उत्सवात विविध 97 राजकीय पक्षांसह 420 अपक्षांचा सहभाग घेतला. भाजप व शिवसेनेने युती करून उमेदवार दिले तर काँग्रेस व राष्ट्रवादी इतर मित्र पक्ष मिळून महाआघाडीने उमेदवार देण्यात आले होते.

[?]  महाआघाडीमध्ये काँग्रेस,राष्ट्रवादी,स्वाभिमानी पक्ष,स्थानिक आघाडी अपक्ष आणि बहुजन विकास आघाडीचे उमेदवार होते.

[?]  48 लोकसभा जागांसाठी महाआघाडीतील काँग्रेसने 25 उमेदवार दिले तर राष्ट्रवादीच्या 19 उमेदवारांनी निवडणूक लढवली तर मित्र पक्ष आघाडीला 4 जागा सोडण्यात आल्या होत्या. यामध्ये सांगली, हातकणंगले, अमरावती, पालघर या मतदारसंघांचा समावेश होता.

[?]  भाजप आणि शिवसेने युती करून निवडणुकीत उमेदवार दिले यामध्ये भाजपने 25 आणि शिवसेनेने 23 उमेदवारांनी निवडणूक लढवली.  

[?]  इतर राजकीय पक्षांमध्ये प्रामुख्याने वंचित बहुजन आघाडीने 48 मतदारसंघांत तर बहुजन समाज पार्टीने 47 ठिकाणी आणि बहुजन मुक्ती पार्टीने 35 मतदारसंघांत उमेदवारांनी निवडणूक लढवली. 

[?]  48 लोकसभा जागांसाठी महाआघाडीने 48 तर भाजप-सेना युतीने 48 मतदारसंघांत तसेच इतर प्रमुख पक्ष-154, इतर राजकीय पक्ष-197, आणि 420 अपक्ष उमेदवारांसह एकूण 867 उमेदवारांनी निवडणूक लढवली. 

[?]  गडचिरोली-चिमूर मतदारसंघात सर्वाधिक कमी 5 उमेदवार तर सर्वाधिक बीड मतदारसंघांमध्ये 36 उमेदवार संख्या होती. 

[?]  महाराष्ट्रात एकूण 8 कोटी 85 लाख 64 हजार 592 मतदारसंख्या आहे. यापैकी 5 कोटी 38 लाख 45 हजार 197 मतदारांनी मतदानात सहभाग घेतला. 

[?]  मावळ मतदारसंघात सर्वाधिक 13 लाख 65 हजार 861 मतदारांनी मतदान केले तर दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघांमध्ये सर्वाधिक कमी 7 लाख 95 हजार 399 मतदारांनी मतदान केले.

[?]  महाराष्ट्रात एकूण 2405 तृतीयपंथी यांची मतदारसंख्या आहे. यापैकी 603 तृतीयपंथी मतदारांनी मतदानात सहभाग घेतला.

[?]  राज्यात सरासरी 60.92 टक्के मतदानाचे प्रमाण असून गेल्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीत 60.61 टक्के प्रमाण होते.

[?]  गडचिरोली-चिमूर मतदारसंघात सर्वाधिक मतदान 71.98% टक्के झाले तर कल्याण मतदारसंघांमध्ये सर्वाधिक कमी 45.28% टक्के झाले.

[?]  48 लोकसभा मतदारसंघात 97640 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले.

[?]  मावळ मतदारसंघात सर्वाधिक 2504 मतदान केंद्र तर कमी दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात 1572 मतदान केंद्र होती.

[?]   इव्हीएम मतदान यंत्रावरील बॅलेट पेपरवर 43 लोकसभा मतदारसंघापैकी १९ ठिकाणी पहिल्या तर ९ मतदारसंघात दुसरया स्थानावर बसप उमेदवार होते तर १३ ठिकाणी तिसऱ्या व २ ठिकाणी 4 थ्या स्थानावर बसपने जागा मिळवली आहे. बसप राष्ट्रीय पक्ष असल्याने त्यांना निवडणूक चिन्ह वाटप व अग्रक्रमात इतर राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांबरोबर नावाप्रमाणे पहिले स्थान मिळाले आहे. 

[?]  इव्हीएम मतदान यंत्रावरील बॅलेट पेपरवर पहिल्या स्थानावर बसप 19, काँग्रेस 9, राष्ट्रवादी 4, भाजप 7, शिवसेना 9 मतदारसंघामध्ये होती.

[?]   शिवसेनेच्या 23 उमेदवारांच्या विरोधात महाआघाडीच्या राष्ट्रवादीचे 11 तर काँग्रेसचे 9 आणि मित्रपक्ष 3 ठिकाणी लढत दिली आहे.

[?]  भाजपच्या 25 उमेदवारांच्या विरोधात महाआघाडीच्या राष्ट्रवादीचे 8 तर काँग्रेसचे 16 आणि मित्रपक्षाने एका ठिकाणी लढत दिली आहे.

लोकसभा निवडणूक-2019 दृष्टिक्षेप
महाआघाडीतील पक्ष
उमेदवार संख्या
काँग्रेस
25
राष्ट्रवादी
19
स्वाभिमानी पक्ष सांगली/हातकणंगले
2
आघाडी अपक्ष अमरावती
1
बहुजन विकास आघाडी पालघर
1
एकूण मतदारसंघ/उमेदवार संख्या
48
लोकसभा निवडणूक-2019 दृष्टिक्षेप
भाजप-सेना युती पक्ष
उमेदवार संख्या
शिवसेना
23
भाजप
25
एकूण मतदारसंघ/उमेदवार संख्या
48
इतर प्रमुख पक्ष
उमेदवार संख्या
वंचित बहुजन आघाडी
48
बहुजन समाज पार्टी
47
बहुजन मुक्ती पार्टी
35
बहुजन रिपब्लिकन सो. पार्टी
24
इतर राजकीय पक्ष
197
अपक्ष
420
एकूण 
771

लोकसभा निवडणूक-2019 दृष्टिक्षेप
राजकीय पक्ष युती/आघाडी
उमेदवार संख्या
महाआघाडीतील पक्ष
48
भाजप-सेना युती पक्ष
48
इतर प्रमुख पक्ष
154
इतर राजकीय पक्ष
197
अपक्ष
420
एकूण उमेदवार संख्या
867

मतदार संघ निहाय उमेदवारांची संख्या खालीलप्रमाणे- 

अ.क्र
संघ.क्र.
मतदारसंघ
उमेदवार संख्या
1
12
गडचिरोली-चिमूर अ.जा.
5
2
20
दिंडोरी (अ.ज.)
8
3
45
सातारा
9
4
41
लातूर (अ.जा.)
10
5
1
नंदुरबार (अ.ज.)
11
6
6
अकोला
11
7
4
रावेर
12
8
5
बुलढाणा
12
9
22
पालघर (अ.ज.)
12
10
44
सांगली
12
11
46
रत्नागिरी-सिंधुदुर्ग
12
12
13
चंद्रपूर
13
13
31
दक्षिण मुंबई
13
14
42
सोलापूर (अ.जा.)
13
15
3
जळगाव
14
16
8
वर्धा
14
17
11
भंडारा-गोंदिया
14
18
16
नांदेड
14
19
40
उस्मानाबाद
14
20
23
भिवंडी
15
21
47
कोल्हापूर
15
22
9
रामटेक (अ.जा.)
16
23
32
रायगड
16
24
17
परभणी
17
25
30
दक्षिण मध्य मुंबई
17
26
48
हातकणंगले
17
27
21
नाशिक
18
28
26
उत्तर मुंबई
18
29
35
बारामती
18
30
37
अहमदनगर
19
31
18
जालना
20
32
29
उत्तर मध्य मुंबई
20
33
38
शिर्डी (अ.जा.)
20
34
27
उत्तर पश्चिम मुंबई
21
35
33
मावळ
21
36
19
औरंगाबाद
23
37
25
ठाणे
23
38
36
शिरुर
23
39
7
अमरावती (अ.जा.)
24
40
14
यवतमाळ-वाशिम
24
41
28
उत्तर पूर्व मुंबई
27
42
2
धुळे
28
43
15
हिंगोली
28
44
24
कल्याण
28
45
10
नागपूर
30
46
34
पुणे
31
47
43
माढा
31
48
39
बीड
36
867

मतदारसंघ निहाय मतदानकेंद्र संख्या

अ.क्र
संघ.क्र.
मतदारसंघ
मतदान केंद्र
1
30
दक्षिण मध्य मुंबई
1572
2
31
दक्षिण मुंबई
1578
3
38
शिर्डी (अ.जा.)
1710
4
26
उत्तर मुंबई
1715
5
28
उत्तर पूर्व मुंबई
1721
6
29
उत्तर मध्य मुंबई
1721
7
27
उत्तर पश्चिम मुंबई
1766
8
44
सांगली
1848
9
48
हातकणंगले
1856
10
12
गडचिरोली-चिमूर अ.जा.
1881
11
20
दिंडोरी (अ.ज.)
1884
12
4
रावेर
1906
13
21
नाशिक
1907
14
42
सोलापूर (अ.जा.)
1926
15
2
धुळे
1940
16
46
रत्नागिरी-सिंधुदुर्ग
1942
17
5
बुलढाणा
1979
18
15
हिंगोली
1997
19
34
पुणे
1997
20
7
अमरावती (अ.जा.)
2000
21
3
जळगाव
2013
22
19
औरंगाबाद
2021
23
43
माढा
2025
24
8
वर्धा
2026
25
16
नांदेड
2028
26
37
अहमदनगर
2030
27
18
जालना
2058
28
24
कल्याण
2063
29
10
नागपूर
2065
30
41
लातूर (अ.जा.)
2075
31
6
अकोला
2085
32
1
नंदुरबार (अ.ज.)
2115
33
40
उस्मानाबाद
2127
34
47
कोल्हापूर
2148
35
22
पालघर (अ.ज.)
2170
36
17
परभणी
2174
37
32
रायगड
2179
38
11
भंडारा-गोंदिया
2184
39
13
चंद्रपूर
2193
40
23
भिवंडी
2200
41
14
यवतमाळ-वाशिम
2206
42
36
शिरुर
2296
43
45
सातारा
2296
44
39
बीड
2325
45
9
रामटेक (अ.जा.)
2364
46
35
बारामती
2372
47
25
ठाणे
2452
48
33
मावळ
2504
97640
लोकसभा निवडणूक-2019 दृष्टिक्षेप

मतदारसंघनिहाय मतदानाची तुलनात्मक टक्केवारी 

अ.क्र
संघ.क्र.
मतदारसंघ
टक्केवारी 2019
टक्केवारी 2014
1
24
कल्याण
45.28%
42.94%
2
25
ठाणे
49.27%
50.87%
3
34
पुणे
49.84%
54.14%
4
31
दक्षिण मुंबई
51.46%
52.49%
5
23
भिवंडी
53.07%
51.62%
6
29
उत्तर मध्य मुंबई
53.67%
48.67%
7
27
उत्तर पश्चिम मुंबई
54.26%
50.57%
8
10
नागपूर
54.74%
57.12%
9
30
दक्षिण मध्य मुंबई
55.23%
53.09%
10
3
जळगाव
56.11%
58.00%
11
2
धुळे
56.68%
58.68%
12
28
उत्तर पूर्व मुंबई
57.15%
51.70%
13
42
सोलापूर (अ.जा.)
58.45%
55.88%
14
36
शिरुर
59.38%
59.73%
15
21
नाशिक
59.43%
58.83%
16
33
मावळ
59.45%
60.11%
17
6
अकोला
59.98%
58.51%
18
26
उत्तर मुंबई
60.00%
53.07%
19
45
सातारा
60.33%
56.79%
20
7
अमरावती (अ.जा.)
60.36%
62.29%
21
14
यवतमाळ-वाशिम
61.09%
58.87%
22
8
वर्धा
61.18%
64.79%
23
4
रावेर
61.40%
63.48%
24
35
बारामती
61.53%
58.83%
25
46
रत्नागिरी-सिंधुदुर्ग
61.69%
65.56%
26
32
रायगड
61.77%
64.47%
27
9
रामटेक (अ.जा.)
62.12%
62.64%
28
41
लातूर (अ.जा.)
62.19%
62.69%
29
17
परभणी
63.19%
64.44%
30
19
औरंगाबाद
63.41%
61.85%
31
40
उस्मानाबाद
63.42%
63.65%
32
5
बुलढाणा
63.53%
61.35%
33
43
माढा
63.57%
62.53%
34
22
पालघर (अ.ज.)
63.72%
62.91%
35
37
अहमदनगर
64.26%
62.33%
36
38
शिर्डी (अ.जा.)
64.54%
63.80%
37
18
जालना
64.55%
66.15%
38
13
चंद्रपूर
64.66%
63.29%
39
16
नांदेड
65.15%
60.11%
40
44
सांगली
65.41%
63.52%
41
20
दिंडोरी (अ.ज.)
65.64%
63.41%
42
39
बीड
66.06%
68.75%
43
15
हिंगोली
66.52%
66.29%
44
11
भंडारा-गोंदिया
68.27%
72.31%
45
1
नंदुरबार (अ.ज.)
68.33%
66.77%
46
48
हातकणंगले
70.28%
73.00%
47
47
कोल्हापूर
70.70%
71.72%
48
12
गडचिरोली-चिमूर अ.जा.
71.98%
70.04%
60.92
60.61
अनुक्रमांक कमीत-कमी ते जास्तीत-जास्त संख्येप्रमाणे आहेत.
लोकसभा निवडणूक-2019 दृष्टिक्षेप

मतदारसंघनिहाय मतदान केलेल्या एकूण मतदारांची संख्या

अ.क्र
संघ.क्र.
मतदारसंघ
एकूण
1
30
दक्षिण मध्य मुंबई
795399
2
31
दक्षिण मुंबई
799612
3
24
कल्याण
889809
4
46
रत्नागिरी-सिंधुदुर्ग
897249
5
29
उत्तर मध्य मुंबई
901477
6
28
उत्तर पूर्व मुंबई
907768
7
27
उत्तर पश्चिम मुंबई
939825
8
26
उत्तर मुंबई
988252
9
23
भिवंडी
1002888
10
32
रायगड
1020185
11
38
शिर्डी (अ.जा.)
1022461
12
34
पुणे
1034130
13
8
वर्धा
1065778
14
2
धुळे
1079748
15
3
जळगाव
1080293
16
42
सोलापूर (अ.जा.)
1081386
17
4
रावेर
1088685
18
7
अमरावती (अ.जा.)
1104936
19
45
सातारा
1109434
20
6
अकोला
1116763
21
5
बुलढाणा
1117486
22
21
नाशिक
1118520
23
16
नांदेड
1119116
24
20
दिंडोरी (अ.ज.)
1134719
25
12
गडचिरोली-चिमूर अ.जा.
1137296
26
15
हिंगोली
1152548
27
25
ठाणे
1167894
28
14
यवतमाळ-वाशिम
1169804
29
41
लातूर (अ.जा.)
1171344
30
44
सांगली
1179344
31
10
नागपूर
1182507
32
37
अहमदनगर
1191601
33
9
रामटेक (अ.जा.)
1193307
34
19
औरंगाबाद
1195242
35
40
उस्मानाबाद
1196166
36
22
पालघर (अ.ज.)
1201298
37
18
जालना
1203958
38
43
माढा
1210915
39
13
चंद्रपूर
1234101
40
11
भंडारा-गोंदिया
1234816
41
48
हातकणंगले
1245797
42
17
परभणी
1253612
43
1
नंदुरबार (अ.ज.)
1277796
44
36
शिरुर
1290575
45
35
बारामती
1299792
46
47
कोल्हापूर
1325231
47
39
बीड
1348473
48
33
मावळ
1365861
53845197
अनुक्रमांक कमीत-कमी ते जास्तीत-जास्त संख्येप्रमाणे आहेत.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

============================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

================================================


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.