Thursday, 23 May 2019

महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ निहाय निकाल

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचा मोठा पराभव झाला. महाराष्ट्रात राष्ट्रवादीला चार तर काँग्रेसला अवघ्या एका जागेवर विजय मिळवता आला.दुसरीकडे विजयी युतीपैकी भाजपने 25 जागा लढवून 23 जिंकल्या तर सेनेने 23 लढवून 18 जिंकल्या. अमरावतीमध्ये नवनीत कौर राणा (युवा स्वाभिमान पक्ष) तर औरंगाबादमध्ये MIMचे इम्तियाज जलील विजयी झाले.राज्यातील 48 जागांपैकी 23 जागांवर भाजप, 18 जागांवर शिवसेना, राष्ट्रवादी- 5, काँग्रेस- 1 आणि एमआयएमने एका जागेवर विजय मिळवला आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ पैकी तब्बल ४१ जागा जिंकून भाजप-शिवसेना युतीने घवघवीत यश मिळविले. आजवरच्या इतिहासात काँग्रेसचा सर्वात दारूण पराभव झाला असून पक्षाच्या वाट्याला केवळ एक जागा आली. तर राष्ट्रवादी काँग्रेस ४, युवा स्वाभिमानी पक्षाने १ आणि एमआयएमने १ जागा जिंकली. माजी मुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांनी ५० हजारावर मतांनी पराभूत केले. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी यांच्याकडून सोलापुरात दारुण पराभव पत्करावा लागला. काँग्रेसच्या दिग्गज पराभुतांमध्ये माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांचा समावेश आहे. मात्र शिवसेनेतून ऐनवेळी काँग्रेसमध्ये गेलेले सुरेश (बाळू) धानोरकर यांनी चंद्रपूरमध्ये केंद्रीय राज्यमंत्री भाजपचे हंसराज अहीर यांना पराजित करून काँग्रेसचे खाते उघडले.शिवसेनेने १८ जागा जिंकल्या तरी पाच ठिकाणी पराभवाचे मोठे धक्के बसले. त्यात चार विद्यमान खासदारांचा समावेश आहे. रायगडमध्ये केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सुनील तटकरे यांनी पराभव करीत गेल्यावेळच्या पराभवाचे उट्टे काढले. औरंगाबादमध्ये अत्यंत चुरशीच्या लढतीत चंद्रकांत खैरे यांचा एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी पराभव केला. अमरावतीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ यांचा राष्ट्रवादी समर्थित युवा स्वाभिमानी पक्षाच्या नवनीत राणा यांनी दारुण पराभव केला. तर शिरुरमध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे (अभिनेते) यांना पराभव करून अनेकांचा आश्चर्याचा धक्का दिला. राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले यांच्यामुळे गाजलेल्या सातारा मतदारसंघात शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांचा पराभव झाला.

देशातील १७ राज्य काँग्रेसमुक्त, ६ राज्यात एकच जागा

अनेक राज्यात स्वबळावर लढून केंद्रातील भाजप सरकारला रोखणाऱ्या काँग्रेसचा देशभरात प्रचंड पराभव झाला आहे. या निवडणुकीत देशातील २३ राज्यांतून काँग्रेसजवळपास हद्दपार झाली आहे. या २३ पैकी १७ राज्य काँग्रेसमुक्त झाले आहेत, तर ६ राज्यांत काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) ३५० जागांवर विजय मिळवला असून काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीला (यूपीए) फक्त ८६ मते मिळाली आहेत. तर अन्य पक्षांना १०६ जागा मिळाल्या आहेत. सलग दुसऱ्या निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे.गेल्या निवडणुकीत काँग्रेसने ४४ जागा जिंकल्या होत्या.  यंदा हा पक्ष ५२ जागांवर जिंकला असला असून त्यांची स्थिती किंचित सुधारली आहे. पण काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीत तब्बल १७ राज्यांमध्ये भोपळाही फोडता आलेला नाही. यात आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, दिल्ली, गुजरात, हरयाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू- काश्मीर, मणिपूर, मिझोराम, ओदिशा, राजस्थान, सिक्कीम, त्रिपुरा, उत्तराखंड, अंदमान आणि निकोबार, चंदीगड, दादरा नगर हवेली, दमण दिव आणि लक्षद्वीप या ठिकाणी काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही.भाजपाने देशभरात विजयी घौडदौड कायम ठेवली असली तरी आंध्र प्रदेशमध्ये भाजपाला एक टक्काही मते मिळालेली नाहीत. केरळ, आंध्र प्रदेश, तामिळ नाडू आणि पुद्दूचेरीत या चार राज्यांमध्ये भाजपाला एकही जागा जिंकता आलेली नाही. भाजपाला उत्तर प्रदेशात ५० टक्क्यांच्या आसपास मते मिळाली आहेत, तर हरयाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, उत्तराखंड, गुजरात, झारखंड, हिमाचल प्रदेश, गोवा, कर्नाटक, दिल्ली, चंडीगड व अरुणाचलमध्ये भाजपाने पन्नास टक्क्यांहून अधिक मते प्राप्त केली आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपला ४० टक्क्यांच्या जवळपास मते मिळाली आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये ४६ टक्के मते मिळाली आहेत, तेलंगणमध्ये २० टक्के तर केरळमध्ये १३ टक्के तर ओडिशात ३८ टक्के मिळाली आहेत. फक्त आंध्रमध्ये भाजपाला एक टक्काही मते मिळवता आली नाहीत. महाराष्ट्रात युती निवडणूक लढविलेल्या भाजपाला २७ टक्के तर पंजाबमध्ये १० टक्के, ३५ टक्के आसाममध्ये, २४ टक्के मते बिहारमध्ये मिळाली आहेत. काँग्रेसला उत्तर प्रदेशात केवळ सहा टक्के मते मिळाली आहेत. बिहारमध्ये सात टक्के मते प्राप्त झाली. पंजाबमध्ये ४० टक्के मते मिळवता आली.

वंचित आघाडीमुळे काँग्रेसचा नऊ जागांवर पराभव

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एकच जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीमुळे जोरदार फटका बसला आहे. वंचित आघाडीमुळे काँग्रेस आघाडीच्या ९ जागा पडल्या असून त्यात अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे या दोन माजी मुख्यमंत्र्याचा समावेश आहे. काँग्रेससोबत जागा वाटपाची चर्चा पुढे जाऊ शकली नसल्याने वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ४८ लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. त्यामुळे काँग्रेसला बीड, बुलडाणा, गडचिरोली-चिमूर, नांदेड, परभणी, सोलापूर आणि यवतमाळमध्ये पराभव पत्करावा लागला. तर हातकणंगले आणि सांगलीत स्वाभिमानी शेतकरी पक्षाला पराभव पत्करावा लागला आहे. या आठही जागांवर वंचित आघाडीच्या उमेदवारांनी १ लाखांपेक्षाही अधिक मतं घेतल्यानं काँग्रेस-स्वाभिमानी आघाडीचा पराभव झाला आहे. यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आदींना पराभव पत्करावा लागला आहे. 

महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ निहाय निकाल


Constituency
No
Leading Candidate
 Party
Trailing Candidate
T Party
Margin
Nandurbar
1
Dr. Heena Vijaykumar Gavit
BJP
Adv. K. C. Padavi
Cong
95629
Dhule
2
Bhamre Subhash Ramrao
BJP
Kunalbaba Rohidas Patil
Cong
229243
Jalgaon
3
Unmesh Bhaiyyasaheb Patil
BJP
Gulabrao Baburao Deokar
NCP
411617
Raver
4
Khadse Raksha Nikhil
BJP
Dr.Ulhas Vasudeo Patil
Cong
335882
Buldhana
5
Jadhav Prataprao Ganpatrao
sena
Dr. Rajendra Bhaskarrav Shingne
NCP
133287
Akola
6
Dhotre Sanjay Shamrao
BJP
Ambedkar (Adv) Prakash Yashwant
VBA
275596
Amravati
7
Navnit Ravi Rana
Ind
Adsul Anandrao Vithoba
sena
36951
Wardha
8
Ramdas Chandrabhanji Tadas
BJP
Charulata Rao Tokas
Cong
187191
Ramtek
9
Krupal Balaji Tumane
sena
Kishore Uttamrao Gajbhiye
Cong
126783
Nagpur
10
NITIN JAIRAM GADKARI
BJP
NANA PATOLE
Cong
216009
Bhandara - gondiya
11
Sunil Baburao Mendhe
BJP
Panchabudhe Nana Jairam
NCP
197394
Gadchiroli-Chimur
12
ASHOK MAHADEORAO NETE
BJP
Dr. NAMDEO DALLUJI USENDI
Cong
77526
Chandrapur
13
Balubhau alias Suresh Narayan Dhanorkar
Cong
Ahir Hansraj Gangaram
BJP
44763
Yavatmal-Washim
14
Bhavana Pundlikrao Gawali
sena
Thakre Manikrao Govindrao
Cong
117939
Hingoli
15
Hemant Patil
sena
Wankhede Subhashrao Bapurao
Cong
277856
Nanded
16
Prataprao Patil Chikhalikar
BJP
Ashok Shankarrao Chavan
Cong
40148
Parbhani
17
JADHAV SANJAY (BANDU) HARIBHAU
sena
RAJESH UTTAMRAO VITEKAR
NCP
42199
Jalna
18
Danve Raosaheb Dadarao
BJP
Autade Vilas Keshavrao
Cong
332815
Aurangabad
19
Imtiaz Jaleel Syed
MIM
Chandrakant Khaire
sena
4492
Dindori
20
Dr. Bharati Pravin Pawar
BJP
Dhanraj Haribhau Mahale
NCP
198779
Nashik
21
Godse Hemant Tukaram
sena
Sameer Magan Bhujbal
NCP
292204
Palghar
22
Rajendra Dhedya Gavit
sena
Baliram Sukur Jadhav
BVA
88883
Bhiwandi
23
KAPIL MORESHWAR PATIL
BJP
TAWARE SURESH KASHINATH
Cong
156329
Kalyan
24
Dr. SHRIKANT EKNATH SHINDE
sena
BABAJI BALARAM PATIL
NCP
344343
Thane
25
RAJAN BABURAO VICHARE
sena
ANAND PRAKASH PARANJPE
NCP
412145
Mumbai North
26
Gopal Shetty
BJP
Urmila Matondkar
Cong
465247
Mumbai North West
27
Gajanan Kirtikar
sena
Sanjay Nirupam
Cong
260328
Mumbai North East
28
Manoj Kotak
BJP
Patil Sanjay Dina
NCP
226486
Mumbai North central
29
POONAM MAHAJAN
BJP
DUTT PRIYA SUNIL
Cong
130005
Mumbai South central
30
Rahul Ramesh Shewale
sena
Eknath M. Gaikwad
Cong
152139
Mumbai South
31
Arvind Ganpat Sawant
sena
Deora Milind Murli
Cong
100067
Raigad
32
Tatkare Sunil Dattatray
NCP
Anant Geete
sena
31438
Maval
33
SHRIRANG APPA CHANDU BARNE
sena
PARTH AJIT PAWAR
NCP
215913
Pune
34
Girish Bhalchandra Bapat
BJP
Mohan Joshi
Cong
324628
Baramati
35
Supriya Sule
NCP
Kanchan Rahul Kool
BJP
155774
Shirur
36
Dr. Amol Ramsing Kolhe
NCP
Adhalrao Shivaji Dattatrey
sena
58483
Ahmadnagar
37
Dr. SUJAY RADHAKRISHNA VIKHEPATIL
BJP
SANGRAM ARUNKAKA JAGTAP
NCP
281474
Shirdi
38
SADASHIV KISAN LOKHANDE
sena
KAMBLE BHAUSAHEB MALHARI
Cong
120195
Beed
39
Pritam Gopinathrao Munde
BJP
Bajrang Manohar Sonwane
NCP
168368
Osmanabad
40
Omprakash Bhupalsinh Alias Pawan Rajenimbalkar
sena
Ranajagjitsinha Padmasinha Patil
NCP
127566
Latur
41
Sudhakar Tukaram Shrangare
BJP
Kamant Machhindra Gunwantrao
Cong
289111
Solapur
42
SHRI. SHA. BRA. DR. JAI SIDHESHWAR SHIVACHARY MAHASWAMIJI
BJP
SHINDE SUSHILKUMAR SAMBHAJIRAO
Cong
158608
Madha
43
Ranjeetsinha Hindurao Naik- Nimbalkar
BJP
Sanjaymama Vitthalrao Shinde
NCP
85764
Sangli
44
Sanjaykaka Patil
BJP
Vishal Prakashbapu Patil
SWP
164352
Satara
45
SHRIMANT CHH. UDAYANRAJE PRATAPSINHMAHARAJ BHONSLE
NCP
NARENDRA ANNASAHEB PATIL
sena
126528
Ratnagiri - sindhudurg
46
Vinayak Raut
sena
Nilesh Narayan Rane
MWP
178322
Kolhapur
47
Sanjay Sadashivrao Mandlik
sena
Dhananjay Mahadik
NCP
270568
Hatkanangle
48
Dhairyasheel Sambhajirao Mane
sena
Raju Anna Shetti
SWP
96039

महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांची यादी

मतदारसंघ            विजयी उमेदवार

नंदुरबार                    हिना गावित (भाजप)
धुळे                           सुभाष भामरे (भाजप)
जळगाव                    उन्मेष पाटील (भाजप)
रावेर                          रक्षा खडसे (भाजप)
बुलडाणा                   प्रतापराव जाधव (शिवसेना)
अकोला                      संजय धोत्रे (भाजप)
अमरावती                  नवनीत कौर राणा (राष्ट्रवादी)
वर्धा                           रामदास तडस (भाजप)
रामटेक                      कृपाल तुमाणे (शिवसेना)
नागपूर                       नितीन गडकरी (भाजप)
भंडारा-गोंदिया             सुनील मेंढे (भाजप)
गडचिरोली-चिमूर        अशोक नेते (भाजप)
चंद्रपूर                        बाळू धानोरकर (काँग्रेस)
यवतमाळ – वाशिम      भावना गवळी (शिवसेना)
हिंगोली                      हेमंत पाटील (शिवसेना)
नांदेड                 प्रताप चिखलीकर (भाजप)
परभणी                     संजय जाधव (शिवसेना)
जालना                     रावसाहेब दानवे (भाजप)
औरंगाबाद             इम्तियाज जलिल (mim)
दिंडोरी                       डॉ. भारती पवार (भाजप)
नाशिक                      हेमंत गोडसे (शिवसेना)
पालघर                       राजेंद्र गावित (शिवसेना)
भिवंडी                       कपिल पाटील (भाजप)
कल्याण                      श्रीकांत शिंदे (शिवसेना)
ठाणे                          राजन विचारे (शिवसेना)
मुंबई-उत्तर                  गोपाळ शेट्टी (भाजप)
मुंबई – उत्तर पश्चिम      गजानन कीर्तिकर (शिवसेना)
मुंबई ईशान्य (उत्तर पूर्व)मनोज कोटक (भाजप)
मुंबई उत्तर मध्य           पूनम महाजन (भाजप)
मुंबई दक्षिण मध्य        राहुल शेवाळे (शिवसेना)
दक्षिण मुंबई              अरविंद सावंत (शिवसेना)
रायगड                       सुनिल तटकरे (राष्ट्रवादी)
मावळ                        श्रीरंग बारणे (शिवसेना)
पुणे                            गिरीश बापट (भाजप)
बारामती                     सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)
शिरुर                         अमोल कोल्हे (राष्ट्रवादी)
अहमदनगर                 सुजय विखे (भाजप)
शिर्डी                         सदाशिव लोखंडे (शिवसेना)
बीड                         डॉ. प्रीतम मुंडे (भाजप)
उस्मानाबाद            ओमराजे निंबाळकर (शिवसेना)
लातूर                      सुधाकरराव श्रंगारे (भाजप)
सोलापूर                    जयसिद्धेश्वर स्वामी (भाजप)
माढा                        रणजित निंबाळकर (भाजप)
सांगली                      संजयकाका पाटील (भाजप)
सातारा                      उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी)
रत्नागिरी-सिंधुदुर्ग       विनायक राऊत (शिवसेना)
कोल्हापूर                   संजय मंडलिक (शिवसेना)
हातकणंगले               धैर्यशील माने (शिवसेना)
मतदारसंघ
उमेदवार/पक्ष
विजयी/पराभूत
नंदुरबार
हिना गावित (भाजपा)
विजय  639136 मते
के सी पाडवी (काँग्रेस)
पराभूत  543507 मते
सुशील अंत्रुलीकर (वंचित बहुजन आघाडी)
पराभूत – 25702 मते
धुळे
सुभाष भामरे (भाजपा)
विजयी  613533 मते
कुणाल पाटील (काँग्रेस)
पराभूत  384290 मते
नबी अहमद अहमद दुल्ला (वंचित बहुजन आघाडी)
पराभूत  39449 मते
जळगाव
उन्मेष पाटील (भाजपा)
विजयी  713874 मते
गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी)
पराभूत  302257 मते
अंजली रत्नाकर-बाविस्कर(वंचित बहुजन आघाडी)
पराभूत  37366 मते
रावेर
रक्षा खडसे (भाजपा)
विजयी  655386 मते
डॉ. उल्हास पाटील (काँग्रेस)
पराभूत  319504 मते
नितीन प्रल्हाद कंडेलकर (वंचित बहुजन आघाडी)
पराभूत – 88365 मते
बुलडाणा
प्रतापराव जाधव (शिवसेना)
विजयी  521977 मते
राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी)
पराभूत  388690 मते
बळीराम शिरस्कार
पराभूत  172627 मते
अकोला
संजय धोत्रे (भाजपा)
विजयी   554444  मते
प्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी)
पराभूत  278848 मते
बरकतुल्ला हिदयतुल्ला पटेल(कॉंग्रेस)
पराभूत  254370 मते
अमरावती
नवनीत कौर राणा (राष्ट्रवादी) 
विजयी  510947 मते
आनंदराव अडसूळ (शिवसेना)
पराभूत  473996 मते
गुणवंत देवपारे (वंचित बहुजन आघाडी)
पराभूत  65135 मते
वर्धा
रामदास तडस (भाजपा)
विजयी  578364 मते
चारुलता टोकस (काँग्रेस)
पराभूत  391173 मते
धनराज वंजारी (वंचित बहुजन आघाडी)
पराभूत  36452 मते
रामटेक
कृपाल तुमाने (शिवसेना)
विजयी  597126 मते
किशोर गजभिये (काँग्रेस)
पराभूत  470343 मते
सुभाष गजभिये (बहुजन समाज पार्टी)
पराभूत  44327  मते
नागपूर
नितीन गडकरी (भाजपा)
विजयी  660221  मते
नाना पटोले (काँग्रेस)
पराभूत  444212  मते
मोहम्मद जमाल(बहुजन समाज पार्टी)
पराभूत  31725 मते
भंडारा-गोंदिया
सुनील मेंढे (भाजपा)
विजयी  650243  मते
नाना पंचबुद्धे (राष्ट्रवादी)
पराभूत  452849  मते
डॉ. विजया राजेश नंदुरकर(बहुजन समाज पार्टी)
पराभूत  52659  मते
गडचिरोली-चिमूर
अशोक नेते (भाजपा)
विजयी  519968 मते
डॉ. नामदेव उसेंडी (काँग्रेस)
पराभूत  442442  मते
डॉ. रमेशकुमार गजबे(वंचित बहुजन आघाडी)
पराभूत  111468 मते
चंद्रपूर 
सुरेश धानोरकर (काँग्रेस)
विजयी  559507  मते
हंसराज अहीर (भाजपा)
पराभूत  514744  मते
राजेंद्र महाडोळे (वंचित बहुजन आघाडी)
पराभूत  112079 मते
यवतमाळ-वाशिम
भावना गवळी(शिवसेना)
विजयी  542098  मते
माणिकराव ठाकरे (काँग्रेस)
पराभूत  424159 मते
प्रवीण पवार (वंचित बहुजन आघाडी)
पराभूत  94228  मते
हिंगोली
हेमंत पाटील (शिवसेना)
विजयी  586312  मते
सुभाष वानखेडे (काँग्रेस)
पराभूत  308456 मते
मोहन राठोड (वंचित बहुजन आघाडी)
पराभूत  174051  मते
नांदेड
प्रतापराव पाटील चिखलीकर (भाजपा)
विजयी  486806  मते
अशोक चव्हाण (काँग्रेस)
पराभूत  446658  मते
यशपाल भिंगे (वंचित बहुजन आघाडी)
पराभूत  166196  मते
परभणी
संजय जाधव (शिवसेना)
विजयी  538941 मते
राजेश विटेकर (राष्ट्रवादी काँग्रेस)
पराभूत  496742 मते
आलमगीर खान (वंचित बहुजन आघाडी)
पराभूत  149946  मते
जालना
रावसाहेब दानवे (भाजपा)
विजयी  698019 मते
विलास औताडे (काँग्रेस)
पराभूत  365204  मते
डॉ. सुभाषचंद्र वानखडे (वंचित बहुजन आघाडी)
पराभूत  77158  मते
औरंगाबाद
इम्तियाज जलील(एमआयएम)
विजयी  389042 मते
चंद्रकांत खैरे (शिवसेना)
पराभूत  384550 मते
सुभाष झांबड (काँग्रेस)
पराभूत  91789 मते
हर्षवर्धन जाधव(अपक्ष)
पराभूत  283798 मते
दिंडोरी
भारती पवार (भाजपा)
विजयी  567470  मते
धनराज महाले (राष्ट्रवादी)
पराभूत  368691 मते
जीवा गावित(कम्युनिस्ठ पार्टी ऑफ इंडिया)
पराभूत  109570  मते
नाशिक
हेमंत गोडसे (शिवसेना)
विजयी  563599 मते
समीर भुजबळ (राष्ट्रवादी)
पराभूत  271395 मते
माणिकराव कोकाटे(अपक्ष)
पराभूत  134527  मते
पवन पवार(वंचित बहुजन आघाडी)
पराभूत  109981 मते
पालघर
राजेंद्र गावित (शिवसेना)
विजयी  580479  मते
बळीराम जाधव (बविआ)
पराभूत  491596  मते
भिवंडी
कपिल पाटील (भाजपा)
विजयी  523583  मते
सुरेश टावरे (काँग्रेस)
पराभूत  367254 मते
प्रा. अरूण सावंत(वंचित बहुजन आघाडी)
पराभूत  51455 मते
कल्याण 
श्रीकांत शिंदे (शिवसेना)
विजयी  559723  मते
बाबाजी पाटील (राष्ट्रवादी)
पराभूत  215380  मते
संजय हेडाऊ (वंचित बहुजन आघाडी)
पराभूत  65572 मते
ठाणे
राजन विचारे (शिवसेना)
विजयी  740969  मते
आनंद परांजपे (राष्ट्रवादी)
पराभूत  328824 मते
मल्लिकार्जून पुजारी (वंचित बहुजन आघाडी)
पराभूत  47432 मते
मुंबई उत्तर
गोपाळ शेट्टी (भाजपा)
विजयी – 7, 06, 678 मते 
ऊर्मिला मातोंडकर (काँग्रेस)
पराभूत – 2, 41, 431 मते
मुंबई उत्तर पश्चिम
गजानन कीर्तिकर (शिवसेना)
विजयी  570063  मते
संजय निरुपम (काँग्रेस)
पराभूत  309735  मते
सुरेश शेट्टी (वंचित बहुजन आघाडी)
पराभूत  23422   मते
मुंबई उत्तर पूर्व
मनोज कोटक (भाजपा)
विजयी  514599   मते
संजय दिना पाटील (राष्ट्रवादी)
पराभूत  288113 मते
निहारिका खोंदले
पराभूत  68239   मते
मुंबई उत्तर मध्य 
पूनम महाजन (भाजपा)
विजयी  486672   मते
प्रिया दत्त (काँग्रेस)
पराभूत  356667  मते
मुंबई दक्षिण मध्य 
राहुल शेवाळे (शिवसेना)
विजयी  424913  मते
एकनाथ गायकवाड (काँग्रेस)
पराभूत  272774 मते
संजय भोसले (वंचित बहुजन आघाडी)
पराभूत  63412   मते
मुंबई दक्षिण
अरविंद सावंत (शिवसेना)
विजयी  421937  मते
मिलिंद देवरा (काँग्रेस)
पराभूत  321870 मते
डॉ. अनिल कुमार (वंचित बहुजन आघाडी)
पराभूत  30348  मते
रायगड
सुनील तटकरे (राष्ट्रवादी)
विजयी – 486968  मते
अनंत गिते (शिवसेना)
पराभूत – 455530  मते
मावळ
श्रीरंग बारणे (शिवसेना)
विजयी  720663  मते 
पार्थ पवार (राष्ट्रवादी)
पराभूत  504750  मते
राजाराम पाटील (वंचित बहुजन आघाडी)
पराभूत  75904  मते
पुणे
गिरीश बापट (भाजपा)
विजयी  632835  मते
मोहन जोशी (काँग्रेस)
पराभूत  308207  मते
अनिल जाधव (वंचित बहुजन आघाडी)
पराभूत  64793   मते
बारामती
सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)
विजयी  686714   मते
कांचन कूल (भाजपा)
पराभूत  530940 मते
नवनाथ पडाळकर(वंचित बहुजन आघाडी)
पराभूत  44134   मते
शिरूर
अमोल कोल्हे (राष्ट्रवादी)
विजयी  635830    मते
शिवाजीराव आढळराव पाटील (शिवसेना)
पराभूत  577347   मते
राहुल ओव्हाळ (वंचित बहुजन आघाडी)
पराभूत  38070    मते
अहमदनगर 
सुजय विखे (भाजपा)
विजयी  704660  मते
संग्राम जगताप (राष्ट्रवादी)
पराभूत  423186    मते
सुधाकर आव्हाड (वंचित बहुजन आघाडी)
पराभूत  31807  मते
शिर्डी
सदाशिव लोखंडे (शिवसेना)
विजयी  486820   मते
भाऊसाहेब मल्हारी कांबळे (काँग्रेस)
पराभूत  366625    मते
संजय सुखदन(वंचित बहुजन आघाडी)
पराभूत  63287   मते
बीड
डॉ. प्रीतम मुंडे (भाजपा)
विजयी  678175    मते
बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी)
पराभूत  509807 मते
विष्णु जाधव (वंचित बहुजन आघाडी)
पराभूत  92139    मते
उस्मानाबाद
ओमराजे निंबाळकर (शिवसेना)
विजयी  596640  मते
राणा जगजितसिंह पाटील (राष्ट्रवादी)
पराभूत  469074   मते
अरूण सलगर(वंचित बहुजन आघाडी)
पराभूत  98579 मते
लातूर
सुधाकर शृंगारे (भाजपा)
विजयी  661495 मते
मच्छिंद्र कामत (काँग्रेस)
पराभूत  372384  मते
राम गरकर (वंचित बहुजन आघाडी)
पराभूत – 112255  मते
सोलापूर
जय सिद्धेश्वर स्वामी (भाजपा) 
विजयी  524985  मते
सुशीलकुमार शिंदे (काँग्रेस)
पराभूत  366377 मते
प्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी)
पराभूत  170007  मते
माढा 
रणजितसिंह नाईक निंबाळकर (भाजपा)
विजयी  586314  मते
संजय शिंदे (राष्ट्रवादी)
पराभूत  500550  मते
विजयराव मोरे(वंचित बहुजन आघाडी)
पराभूत  51532  मते
सांगली
संजय पाटील (भाजपा)
विजयी  508995  मते
गोपीचंद पडळकर (वंचित बहुजन आघाडी)
पराभूत  300234  मते
विशाल पाटील (स्वाभिमान)
पराभूत  344643 मते
सातारा
उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी)
विजयी  579026 मते
नरेंद्र पाटील (शिवसेना)
पराभूत  452498    मते
सहदेव ऐवले (वंचित बहुजन आघाडी)
पराभूत  40673    मते
रत्नागिरी-सिंधुदुर्ग
विनायक राऊत (शिवसेना)
विजयी  458022    मते
निलेश राणे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष)
पराभूत  279700 मते
नवीनचंद्र बांदीवडेकर(कॉंग्रेस)
पराभूत  63299    मते
कोल्हापूर
संजय मंडलिक (शिवसेना)४५
विजयी  749085   मते
धनंजय महाडिक (राष्ट्रवादी)
पराभूत  478517 मते
डॉ. अरूणा माळी(वंचित बहुजन आघाडी)
पराभूत  63439    मते
हातकणंगले
धैर्यशील माने (शिवसेना)
विजयी  585776 मते
राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना)
पराभूत  489737 मते
अस्लम सय्यद (वंचित बहुजन आघाडी)
पराभूत  123419   मते



POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.


[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
============================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
=
===============================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.