Friday, 3 May 2019

पुणे जिल्ह्यातील चार मतदारसंघातच अजित पवार अडकले इतरत्र प्रचारसभा नाही; मनसेच्या ‘लाव रे तो व्हिडिओ’ सभा गाजल्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक प्रचार सभा


उमेदवार नसतानाही मनसेच्या ‘लाव रे तो व्हिडिओ’ सभा गाजल्या

लोकसभा निवडणूक २०१९ करीता सर्वच राजकीय पक्षांनी स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध केली होती यामध्ये तब्बल ८७ स्टार प्रचारक होते. मात्र इतर स्टार प्रचारकांच्या तुलनेत राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सर्वाधिक कमी प्रचार सभा झाल्या असून या निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील चार मतदारसंघातच अजित पवार अडकले असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक प्रचार सभा घेणाऱ्यांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अव्वलस्थानी राहिले असून त्याखालोखाल राष्ट्रवादीचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे तर वयाच्या ७९ व्या वर्षीही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वाधिक सभा घेऊन तिसरा क्रमांक मिळवला आहे. त्यांनी राज्यात तब्बल ७८ सभा घेतल्या असून सरासरी रोज ३ सभा प्रमाणे प्रचारात सहभाग घेऊन तरुण नेत्यांची बरोबरी साधली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वाधिक ८७ सभा घेऊन सर्व 48 लोकसभा मतदारसंघ कव्हर केले. तर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ८० सभा घेऊन सरकारच्या योजनांचे वाभाडे काढून प्रचार केला. राज्यातील प्रमुख राजकीय नेत्यांनी विविध मतदारसंघात घेतलेल्या सभा, मेळावे, रॅलीज, रोड शो यांची चर्चा सुरू आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपसह शिवसेनेच्या सर्व उमेदवारांसाठी जवळपास सर्वच मतदारसंघात सभा घेतल्या. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राज्यातील प्रत्येक सभेला त्यांनी हजेरी लावली होती. राज्यातील प्रत्येक मतदारसंघात सभा घेणारे मुख्यमंत्री फडणवीस हे एकमेव स्टार प्रचारक नेते ठरले आहेत. त्यापाठोपाठ धनंजय मुंडे यांनी २१ मतदारसंघ ढवळून काढले. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी एकूण ३० सभा घेतल्या. तर  भाजपच्या बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी ३५ सभा घेतल्या. पंतप्रधान मोदी यांच्या राज्यात नऊ सभा झाल्या. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याही सभा चांगल्याच गाजल्या आहेत. काँग्रेसचे राहुल गांधी यांनी राज्यात ७ सभा घेतल्या इतर तर ‘लाव रे तो व्हिडिओ’ असे वाक्य प्रचलित करणाऱ्या मनसेचे नेते राज ठाकरे यांनी आठ सभा घेऊन सरकार विरोधी प्रचारात रंगत आणण्याचा प्रयत्न केला. भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या चार सभा झाल्या. या तुलनेत काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या सभा अगदी कमी झाल्या आहेत. नांदेडमध्ये ते स्वत: उमेदवार असल्याने तेथील निवडणूक झाल्यानंतर चव्हाण यांनी औरंगाबादेत काही सभा घेतल्या. त्यानंतर मुंबईतही त्यांनी दरदिवशी तीन सभा घेतल्याचे दिसून आले. राज्यभरात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी वयाच्या ७९ व्या वर्षी तब्बल ७८ सभा घेतल्या. नगर, माढा, सोलापूर, बारामती, मावळ येथे त्यांनी अधिक लक्ष घातले होते. रोज किमान तीन प्रचार सभा घेतल्या. याशिवाय कार्यकर्त्यांच्या चर्चा, बैठकांचे सत्र हे सुरूच होते. आगामी काळातही राज्यात फिरणार असल्याचे सांगण्यात येत असून लोकसभा निवडणूक प्रचार सांगता होऊन मतदान संपले अजून निकाल बाकी असतानाही आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये राज्यातील सर्व जिल्हा प्रमुखांची व वरिष्ट नेत्यांची बैठक उद्या 4 मे २०१९ रोजी बोलावण्यात आलेली आहे. या बैठकीत लोकसभा निकाल अंदाज घेऊन आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीबाबत चर्चा करणार असल्याचे वृत्त आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================





No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.