Tuesday 19 November 2019

हवेली पंचायत समितीच्या धायरी गणात पोटनिवडणूक जाहीर; 12 डिसेंबरला मतदान

महापालिका हद्दीत समावेश होऊनही धायरी गणात पोटनिवडणूक 


राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणूका राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या असून 12 डिसेंबरला मतदान घेण्यात येणार आहे. राज्यातील जिल्हा परिषदेच्या 15 निवडणूक गट विभाग व पंचायत समित्यांमधील 13 निर्वाचक गणांतील रिक्त पदांच्या पोटनिवडणूका होणार आहेत. दरम्यान हवेली पंचायत समितीच्या धायरी गणात देखील पोटनिवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे. महापालिका हद्दीत समावेश होऊनही धायरी गणात निवडणूकीसाठी 12 डिसेंबरला मतदान होणार असल्याने स्थानिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या धायरी-नांदेड गटामध्ये धायरी गण व नांदेड गण असे दोन गण येतात. पुणे जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये झालेल्या निवडणुकीत धायरी-नांदेड या जि.प. गटातून - जयश्री बाबासाहेब पोकळे यांनी तर धायरी गणातून अश्‍विनी किशोर पोकळे आणि नांदेड गणातून फुलाबाई अशोक कदम यांनी यश मिळवले होते. मात्र पुणे महापालिकेच्या हद्दीत शहरालगतची काही भागांचा समावेश पालिकेत झालेला असून काही भाग व गावे प्रस्तावित आहेत. धायरी गावचा राहिलेला उर्वरित संपूर्णपणे भागाचा समावेश पालिका हद्दीत करण्यात आलेला आहे. महापालिकेने नवनिर्वाचित प्रभाग क्र.42 मध्ये निवडणूक देखील घेतली आहे असे असताना धायरी गणाचे अस्तित्व आपोआपच संपुष्टात येणे अपेक्षित असताना प्रशासनाच्या कारभारामुळे ते अबाधित राहिले असल्याने धायरी गण या रिक्त जागेवर पोटनिवडणूक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेली आहे. धायरी गणातून निवडणून आलेल्या भाजपच्या अश्‍विनी किशोर पोकळे यांच्याकडे हवेली पंचायत समितीचे सभापती पद देखील होते. महापालिकेत समाविष्ट भागातील नवनिर्वाचित प्रभाग क्र.42 मध्ये निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्यांनी या प्रभागातून निवडणूक लढवली व यश संपादन केल्याने धायरी गणाच्या सदस्यपदाचा त्याग केला होता. पालिका हद्दीत समावेश झालेल्या धायरी गणाची पोटनिवडणूक जाहीर झाल्याने स्थानिक पातळीवर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. धायरीकरांनी या निवडणुकीत भाग घेण्याचे ठरवून 2 वर्षासाठी पद मिळवण्याची तयारी सुरु केली आहे.   

हवेली तालुक्यातील १३ गट व २६ पंचायत समिती गण आहेत ते खालीलप्रमाणे- 

    35 - देहू-लोहगाव (लोहगाव भाग पालिकेत)
    36 - वाघोली - आव्हाळवाडी (सध्या बदल नाही)
    37 - पेरणे-वाडेबोल्हाई (सध्या बदल नाही)
    38 - उरुळीकांचन-सोरतापवाडी (सध्या बदल नाही)
    39 - थेऊर-लोणीकाळभोर (सध्या बदल नाही)
    40 - फुरसुंगी-कदमवाकवस्ती (फुरसुंगी भाग पालिकेत)
    41 - मांजरी बु.-शेवाळवाडी (सध्या बदल नाही)
    42 - केशवनगर-साडेसतरानळी (केशवनगर व साडेसतरानळी भाग पालिकेत)
    43 - उरुळीदेवाची-वडकी (उरुळीदेवाची भाग पालिकेत)
    44 - आंबेगाव बु.-न-हे  (आंबेगाव बु.भाग पालिकेत)
    45 - धायरी - नांदेड (धायरी भाग पालिकेत)
    46 - शिवणे-कोंढवे धावडे (शिवणे भाग पालिकेत)
    47 - मांगडेवाडी - डोणजे (सध्या बदल नाही)

जिल्हा परिषद-पंचायत समिती अनुषंगिक माहिती-

फेब्रुवारी 2017 मध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या होत्या, या निवडणुकीसाठी गट-गणांच्या फेररचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राबविण्यात आला होता त्यात हवेलीतील त्या 34 गावांनाही गृहीत धरले होते. शासनाने ही गावे महापालिकेत घेण्यासंदर्भात अधिसूचना काढली असताना व जिल्हा परिषदेने गावे वगळली असताना आमच्या गावात निवडणूक कशी? असा सवाल हवेली तालुका नागरी कृती समितीने केला त्यावेळी केला होता व  न्यायालयात पुनर्याचिका दाखल करण्यात आली होती. पुणे महापालिकेत हवेलीतील ही 34 गावे समाविष्ट करण्याची अधिसूचना शासनाने 30 मे -2014 रोजी काढली होती. त्यानंतर या 34 गावांनी शासनाकडे महापालिकेत समाविष्ट करून घ्यावे, याविषयी विनंती व मागणी केली मात्र त्याची दखल घेतली न गेल्याने उच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली होती. २०१७ मधील 9 सप्टेंबर रोजी प्रारूप गट-गण रचना जाहीर करण्यात आली यामध्ये या 34 गावांना गृहीत धरून हवेली तालुक्यात नव्याने गट निर्माण केले होते. त्यानंतरच्या काळात पालिकेच्या प्रभागात निवडणूक घेण्यात आलेली होती. पुणे जिल्हा परिषदेचे ७५ गट व पंचायत समितीचे १५० गण सध्या आहेत. २०११ प्रमाणे जिल्ह्याची लोकसंख्या ३८ लाख ४७ हजार इतकी आहे. या लोकसंख्येनुसार पन्नास ते साठ हजार लोकसंख्येचा एक गट करण्यात आलेला आहे. हवेली तालुक्यात जिल्हा परिषदेचे सर्वाधिक १३ गट आणि पंचायत समितीचे २६ गण आहेत. तसेच जुन्नरमध्ये सात गट (१४ गण), आंबेगाव तालुक्यात पाच गट (१० गण), शिरूरमध्ये सात गट (१४ गण), खेडमध्ये सात गट (१४ गण), मावळमध्ये पाच गट (१० गण), मुळशीत तीन गट (सहा गण), दौंडमध्ये सहा गट (१२ गण), पुरंदर तालुक्यात चार गट (८ गण), वेल्हा दोन गट (४ गण), भोर ३ गट (६ गण), बारामतीमध्ये सहा गट (१२ गण) व इंदापूर तालुक्यात सात गट आणि १४ गण सध्या आहेत.

महापालिकेत समावेश होऊनही का होत आहे निवडणूक तर......

1. पुणे महापालिका हद्दीत गावे समाविष्ट झाल्यामुळे हवेली पंचायत समितीमधील लोहगांव, केशवनगर, शिवणे आणि फुरसुंगी तसेच उरूळी देवाची पंचायत समिती सदस्यांची पदे रद्द झाली आहेत. 

2. उर्वरित पंचायत समिती गण क्षेत्रात काही अल्प भाग राहिला आहे त्यामुळे अशा पंचायत समिती सदस्यांची पदे रद्द केलेली नाहीत. त्यामुळे रिक्त झालेल्या पदांसाठी पोटनिवडणूक घेण्याच्या तरतुदीनुसार आदेश

3. धायरी या गणातील पंचायत समिती सदस्या अश्विनी पोकळे यांनी राजीनामा देऊन पुणे महापालिकेची निवडणूक लढवली. त्यामध्ये त्या विजयी झाल्या आहेत. यामुळे ही जागा रिक्त झाली होती.

4. धायरी हे गाव आता पुणे महापालिकेत समाविष्ट झाले आहे. मात्र या गणात किरकिटवाडी आणि नांदोशी या आणखी दोन अल्प लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती आहेत. त्यामुळे येत्या पंचवार्षिक निवडणुकीपर्यंत या गणाचे नाव धायरी असेच राहणार आहे. 

5. जि.प. गट व गणांच्या नव्या पुर्नरचना पंचवार्षिक निवडणुक-२०२२ मध्ये होणार आहे. तोपर्यंत अशी स्थिती राहणार आहे.

6. पोटनिवडणूक होत असलेल्या धायरी गणात केवळ दोन हजार मतदार आहेत. 

7. नव्याने रचना न करता उर्वरित भागातील मतदारसंख्येनुसार धायरी गणात पोटनिवडणूक घेता येऊ शकत असून केवळ २७०० मतदार असल्याचे पुणे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे म्हणणे आहे.

8. महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे अन्वये ४०,००० लोकसंख्येमागे जिल्हा परिषद एक सदस्य असावा असा नियम आहे.

9. महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे अन्वये १७,५०० लोकसंख्येमागे एक पंचायत समिती सदस्य असावा असा नियम आहे.

10. महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम १० (५) अन्वये) स्थानिक स्वराज्य संस्थेचा दर्जा बदलल्यास, हद्दीमध्ये बदल झाल्यास, जनगणनेची नवी आकडेवारी जाहीर झाल्यास पुढील / लगतच्या निवडणुकीसाठी वॉर्डच्या / प्रभागाच्या हद्दींची पुन्हा आखणी करुन नवीन प्रभाग रचना करणे आवश्यक ठरते.

11. महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ९ (२) अन्वये ) निवडणुकीसाठी लगतच्‍या लोकसंख्‍येच्‍या आधारावर सदस्‍य संख्‍या व आरक्षण ठरविण्‍यात येते.

12. सक्षम प्राधिका-याने ठरवून दिलेल्‍या सदस्‍य संख्‍येनुसार वॉर्ड, प्रभाग रचना करणे व राज्य निवडणूक आयोगाचे विविध आदेश व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ व नगरपरिषदा, नगरपंचायती निवडणूक नियम, १९६६ च्या तरतुदीनुसार प्रभाग रचना करणे आवश्यक असते.

13. २०१७ मधील 9 सप्टेंबर रोजी प्रारूप गट-गण रचना जाहीर करण्यात आली यामध्ये या 34 गावांना गृहीत धरून हवेली तालुक्यात नव्याने गट निर्माण केले होते. २०११ प्रमाणे जिल्ह्याची लोकसंख्या ३८ लाख ४७ हजार इतकी आहे. या लोकसंख्येनुसार पन्नास ते साठ हजार लोकसंख्येचा एक गट करण्यात आलेला आहे. हवेली तालुक्यात जिल्हा परिषदेचे सर्वाधिक १३ गट आणि पंचायत समितीचे २६ गण आहेत.

राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणूका जाहीर

राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणूका राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या असून 12 डिसेंबरला मतदान घेण्यात येणार आहे. राज्यातील जिल्हा परिषदेच्या 15 निवडणूक गट विभाग व पंचायत समित्यांमधील 13 निर्वाचक गणांतील रिक्त पदांच्या पोटनिवडणूका होणार आहेत. निवडणुकांसाठी 22 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2019 या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील. त्यांची छाननी 28 नोव्हेंबर 2019 रोजी होईल. छाननीनंतर त्याच दिवशी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरूद्ध जिल्हा न्यायाधिशांकडे 2 डिसेंबर 2019 पर्यंत अपील दाखल करता येईल. अपील नसलेल्या ठिकाणी 4 डिसेंबर 2019 रोजी; तर अपील असलेल्या ठिकाणी 7 डिसेंबर 2019 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. 12 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 13 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.

जिल्हा परिषद रिक्त पदांच्या पोटनिवडणूका होणार आहेत ते गट खालीलप्रमाणे- 

राज्यातील विविध जिल्हा परिषदेच्या 15 निवडणूक गटामध्ये 
45-निजामपूर, 25-आंब्रड, धामापूर तर्फे संगमेश्वर, 19-मानूर, 29-खेडगाव, 59-गोवर्धन गट्टा, 22 सावळज, 34-कुडाळ, 48-कोकरूड, 28-दत्तवाड, 50-पेठवडज, 6-सावरगाव रोकडा, 25-वडवळ नागनाथ, 58-ढाणकी, 18-पेंढारी गट्टा यांचा समावेश आहे.  
रायगड- 45-निजामपूर (ता. माणगाव), सिंधुदुर्ग- 25-आंब्रड (कुडाळ), रत्नागिरी- 39-धामापूर तर्फे संगमेश्वर (संगमेश्वर), नाशिक- 19-मानूर (कळवण), 29- खेडगाव (दिंडोरी) व 59 गोवर्धन गट्टा (नाशिक), सांगली- 22 सावळज (तासगाव) व 48-कोकरूड (शिराळा), सातारा- 34-कुडाळ (जावली), कोल्हापूर- 28-दत्तवाड (शिरोळ), नांदेड- 50-पेठवडज (कंधार), लातूर- 6-सावरगाव रोकडा (अहमदपूर) व 25-वडवळ नागनाथ (चाकूर), यवतमाळ- 58-ढाणकी (उमरखेड) आणि गडचिरोली- 18-पेंढरी गट्टा (धानोरा).

पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणूका होणार आहेत ते गण खालीलप्रमाणे- 

राज्यातील विविध जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांमधील 13 निर्वाचक गणांमध्ये 80-आंबेवाडी, 89-धायरी, 76-न्यायडोंगरी, 94-नांदूर्डी, 121- पिंपळवाडी(पि), 94-माडज, 115-ढाणकी, ब्राह्मणगाव, 1-खंडाळी, 101-मोहरणा, 59- पांढराबोडी, 96- शिरूड, 48- आबामत्ता यांचा समावेश आहे. 
रोहा (जि. रायगड)- 80-आंबेवाडी, हवेली (पुणे)- 89-धायरी, नांदगाव (नाशिक)- 76-न्यायडोंगरी, निफाड (नाशिक)- 94-नांदुडी, पैठण (औरंगाबाद)- 121-पिंगळवाडी (पि.), उमरगा (उस्मानाबाद)- 94-माडज, उमरखेड (यवतमाळ)- 115-ढाणकी, उमरखेड (यवतमाळ)- 116-ब्राम्हणगाव, अहमदपूर (लातूर)- 01-खंडाळी, लाखांदूर (भंडारा)- 101-मोहरणा, भंडारा (भंडारा)- 59-पांढराबोडी, हिंगणघाट (वर्धा)- 96-शिरूड आणि वरोरा (चंद्रपूर)- 48-आबामक्ता.


·         नामनिर्देशनपत्रे सादर करणे- 22 ते 27 नोव्हेंबर 2019
·         नामनिर्देशनपत्रांची छाननी- 28 नोव्हेंबर 2019
·         अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे- 4 डिसेंबर 2019
·         अपील असल्यास उमेदवारी मागे घेणे- 7 डिसेंबर 2019
·         मतदानाचा दिनांक- 12 डिसेंबर 2019
·         मतमोजणीचा दिनांक- 13 डिसेंबर 2019

नगर परिषदा व नगरपंचातीसह 6 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार

नागपूर, धुळे, नंदुरबार, अकोला व वाशीम या पाच जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 36 पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. याबरोबरच पालघर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 8 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूका देखील प्रस्तावित आहेत.  कन्हान-पिपरी व गडचांदूर या 2 नगर परिषदा व लांजा नगरपंचातीच्या अध्यक्ष व सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुका 2019-20 - निवडणुकीची पूर्वतयारी कार्यक्रम जाहीर झालेला असून यांची देखील निवडणूक होणार आहे. तर  नवनिर्मित चंदगड, हातकणंगले व ढाणकी या 3 नगरपंचायतीमधील अध्यक्ष व सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादी कार्यक्रम राबविला जात असून याकरिता देखील लवकरच मतदान घेण्यात येणार आहे. तसेच गडहिंग्लज नगरपरिषदेच्या हद्दवाढ क्षेत्राची व अन्य नगर परिषदा/ नगरपंचायतीमधील रिक्त अध्यक्ष व सदस्य पदांच्या पोट निवडणुकांसाठी मतदार यादी कार्यक्रम पूर्ण झालेला असून मतदान घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमाची प्रतीक्षा स्थानिक प्रशासन करीत आहे.

आमदार झालेल्या जिप सदस्यांच्या रिक्त पदावर जानेवारी-फेब्रुवारीमध्ये निवडणुका

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज्यातील अनेक जिल्हा परिषद सदस्य निवडणूक आलेले आहेत अशा सर्व नवनिर्वाचित आमदारांचे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यत्व संपुष्टात आले आहे. त्यामुळे या जागा रिक्त झाल्या असून, त्यासाठी पुढील वर्षी जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात निवडणूक होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, पदे रिक्त झालेल्यांमध्ये पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, बीड जिल्हा परिषदेतील सदस्य संदीप क्षीरसागर, बाळासाहेब आजबे आदींसह अनेकांचा समावेश आहे. सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष असलेले संजय मामा शिंदे हे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत करमाळा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीत अकोले मतदारसंघात जिल्हा परिषद सदस्य डॉ. किरण लहामटे विजयी झाले आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडून आलेले रोहित पवार यांचे आमदार निवडीचे राजपत्र प्रसिद्ध झाल्यानंतर पुणे जिल्हा परिषदेतील त्यांचे सदस्यत्व संपुष्टात येणार आहे. त्यामुळे हे सदस्यपद रिक्त होणार असून, तेथे पोटनिवडणूक होईल. पंचायतराज सदस्यपदी (जिल्हा परिषद, पंचायत समिती) कार्यरत असताना विधानसभा किंवा विधान परिषदेवर निवडून गेल्यास संबंधित सदस्यांचे सदस्यत्व संपुष्टात येते. त्यासाठी आमदारपदी निवड झाल्याबाबतचे राजपत्र प्रसिद्ध होणे अनिवार्य असते. त्यानुसार जोपर्यंत हे राजपत्र प्रसिद्ध होत नाही तोपर्यंतच आमदार झालेले जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य हे त्या पंचायतराज संस्थेच्या सदस्यपदी कार्यरत राहतात. याबाबत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अॅक्‍ट-१९६१ मध्ये स्पष्ट तरतूद केली आहे. पंचायतराज संस्थांमधून विधानसभेवर निवडून गेलेल्या जिल्हा परिषद सदस्यांचे सदस्यत्व जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्यातील कलम ४१ नुसार, तर पंचायत समिती सदस्याचे सदस्यत्व याच कायद्यातील कलम ५८ (१ ई) नुसार आपोआप संपुष्टात येते. याबाबत राज्याच्या ग्रामविकास विभागानेही ३० मार्च १९९५ रोजी सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठविलेले आहे. यात सदस्यत्व संपुष्टत्वाबाबतचा उल्लेख केला आहे. ही पदे रिक्त झाल्याबाबतचे संबंधित जिल्हा परिषदांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळविले आहे. दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमदारपदी निवडून आलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध झाली आहेत. दरम्यान सन 1995 पूर्वी जिल्हा परिषद सदस्य आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर त्यांनी आठ दिवसांत जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देणे बंधनकारक करण्यात आले होते. परंतु त्या कालखंडात अनेक आमदार जिल्हा परिषद सदस्य राजीनामा न देता दोन्ही पदांवर एकाच वेळी कार्यरत राहिले. त्यानंतर दि.30 मार्च 1995 रोजी शासनाने आमदार म्हणून निवड झाल्यानंतर अधिसूचना प्रसिद्ध होताच संबंधित त्याचे सदस्यत्व आपोआप रद्द करण्याची तरतूद केली. पंचायती राज संस्थांसाठी हा निकष असताना दुसरीकडे महापालिका आणि नगरपालिकांमध्ये व्यक्ती आमदार झाले, तरी त्यांचे नगरसेवक पद कायम राहते अशी विसंगत तरतूद कायद्यामध्ये आहे.
Mr. Chandrakant Bhujbal
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================

pune mirror मध्ये प्रसिद्ध झालेले अनुषंगिक वृत्त / लिंक-


‘We are too few to warrant a by-election’
Residents of Kirkitwadi, Nandoshi point out constituency’s electorate size decreased after Dhayari merged with PMC
| Vijay.Chavan@timesgroup.com
TWEET @cvijayMIRROR
Residents of Sinhagad Road, who earlier came under Dhayari-Nandoshi-Kirkitwadi constituency, have called for a scrapping of the proposed by-election to pick a representative on the Haveli Panchayat Samiti. They say now that Dhayari is no longer part of the process, after merging into Pune Municipal Corporation (PMC) last December, the population of the remaining two villages is too miniscule for a constituency. The Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayat and Industrial Townships Act, 1965, sets down 17,500 as the minimum population to be represented by a panchayat samiti member.
Drawing attention to a fact that has escaped the notice of the authorities, which convened the election on December 12, residents said 2,708 voters between two villages do not add up to the mandated one-fourth of the constituency’s original electorate of 28,000. They said by-polls would waste money.
Instead, they have called for the two villages to be merged with some other constituency, as suggested in the Act. They also said the villages already had adequate representation in local governing bodies and there was no need to hold an elaborate election to post a member in the panchayat samiti. This has sent district election officials scurrying to their state authority, as polls have already been announced.
As per Bombay High Court (HC) directives, Dhayari was one of 11 villages to be merged into PMC last year. Its population made for the main volume of the constituency’s electorate. In fact, the constituency’s representative on the samiti, Bharatiya Janata Party’s (BJP) Ashwini Pokale, resigned to contest the PMC by-election in June and is now a corporator for the new ward 42, Phursungi-Lohegaon.
The by-election to the samiti has been proposed to fill in the seat she left vacant with her departure.
“But, we object to this, as we are only 2,708 voters, compared to the earlier 28,000. As per norms, small villages such as Kirkitwadi, Nandoshi and parts of Sanasnagar that remain in the constituency should have been merged with some other constituency of the panchayat samiti. Officials did not inform the election commission and set about conducting the by-election in violation of rules,” said Shrirang Chavan, president, Haveli Taluka Citizen Action Committee, adding, “The villages have enough representation through their sarpanch, Zilla Parishad members, legislator and Member of Parliament (MP), and so there is no need to conduct such an election for the remaining two years till samiti elections.”
Their stand has impressed political observers. “The local election authority failed to report the shrinking of the electorate to the EC and only updated on the seat rendered vacant. The villagers are right in contesting spending on polls for just 2,700 voters. This situation did not arise in the merger of other villages as there, the constituents of a full constituencywere brought into the urban fold,” said Chandrakant Bhujbal, director of Political Research and Analysis Bureau, a private entity.
Admitting to their oversight, a senior official of the district election authority said, “We did not consider the voter count after the merger and are in the process of writing to the state election commission for its opinion before going ahead with the polls. Our earlier report was based on the vacant seat in the samiti, but now, we will seek some clarity on the rule concerning the population size for a Gan.”

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
====================================


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.