Friday, 15 November 2019

तिवसा, चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे पंचायत समितीसाठी 8 डिसेंबरला मतदान; राज्यातील जि.प. अध्यक्षपदाच्या आरक्षणाची 19 नोव्हेंबरला सोडत

अमरावती जिल्ह्यातील तीन पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 8 डिसेंबरला मतदान

अमरावती जिल्ह्यातील तिवसा, चांदूर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे या तीन पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 8 डिसेंबर 2019 रोजी मतदान; तर 9 डिसेंबर 2019 रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली. या पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2019 या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील. त्यांची छाननी 25 नोव्हेंबर 2019 रोजी होईल. छाननीनंतर त्याच दिवशी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरूद्ध जिल्हा न्यायाधिशांकडे 28 नोव्हेंबर 2019 पर्यंत अपील दाखल करता येईल. अपील नसलेल्या ठिकाणी 30 नोव्हेंबर 2019 रोजी; तर अपील असलेल्या ठिकाणी 4 डिसेंबर 2019 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. 8 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 9 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.
================================================

राज्यातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या आरक्षणाची 19 नोव्हेंबरला सोडत

राज्यातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या आरक्षणाची येत्या मंगळवारी 19 नोव्हेंबरला सोडत मंत्रालय मुंबई येथे सकाळी 11.30 वाजता काढण्यात येणार असल्याचे ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र शासनाने परिपत्रकाद्वारे कळवले आहे. राज्यातील महापालिकांच्या महापौरांच्या आरक्षणाची सोडत बुधवारी झाली असली, तरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या आरक्षणाची अधिकृत तारीख जाहीर झालेली नव्हती त्यामुळे केव्हा सोडत निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.राज्यातील जिल्हा परिषदेच्या अध्यपदासाठीच्या नव्या आरक्षणाची उत्सुकता सदस्यांना होती. विधानसभेच्या निवडणुकीमुळे ग्रामविकास विभागाकडून विद्यमान अध्यक्ष, विविध विषय समित्यांच्या सभापतींना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. या मुदतवाढीविरोधात काही सदस्यांनी कोर्टात धाव घेतली होती मात्र काहीही झाले नाही. पुणे जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्षपद हे नागरिकांचा इतर मागासवर्ग (ओबीसी) आरक्षित आहे. या आधी खुल्या गटासाठी ते आरक्षित होते. त्यामुळे आगामी अडीच वर्षांसाठीचे आरक्षण हे चक्राकार पद्धतीमुळे दोन संवर्ग वगळून, अन्य संवर्गासाठी आरक्षित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
====================================







No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.