Tuesday 19 November 2019

अहमदनगर, पुणे, औरंगाबादसह 8 जिल्हा परिषदांची अध्यक्षपदे खुल्या संवर्गातील महिलांसाठी राखीव

राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची आरक्षण सोडत जाहीर

राज्यातील सर्व 34 जिल्हा परिषद अध्यक्षपदाची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. यामध्ये अहमदनगर, पुणे, औरंगाबादसह 8 जिल्हा परिषदांची अध्यक्षपदे खुल्या संवर्गातील महिलांसाठी राखीव झाले आहे. राज्यातील सर्व 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाची आरक्षणाची सोडत आज गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आल्या. ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, विधी व न्याय विभागाचे सहसचिव द. सं. पाटील, ग्रामविकास विभागाचे उपसचिव आर. ए. नागरगोजे, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग कल्याण विभागाचे उपसचिव रविंद्र गुरव, औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर, चंद्रपूर जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षा दीपाली पाटोळे यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, जिल्हा परिषदांचे सदस्य उपस्थित होते. प्रारंभी आरक्षण सोडतीबाबतच्या तरतुदी सांगण्यात आल्या. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 मधील तरतुदीनुसार विविध प्रवर्गासाठीच्या आरक्षणासाठी सोडत काढण्यात आली. आरक्षण काढताना 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या गृहित धरण्यात आली. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आरक्षण काढताना संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने प्रवर्गनिहाय आरक्षण काढण्यात आले. प्रवर्गाचे आरक्षण निश्चित केल्यानंतर त्यातून महिलांचे आरक्षण चिठ्ठी टाकून काढण्यात आले.
विविध प्रवर्ग आणि त्यासाठी अध्यक्षपद आरक्षित झालेल्या जिल्हा परिषदा पुढीलप्रमाणे आहेत-
अनुसूचित जाती (सर्वसाधारण) -: सोलापूर, जालना
अनुसूचित जाती (महिला) -: नागपूर,  उस्मानाबाद
अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) -: नंदुरबार, हिंगोली
अनुसूचित जमाती (महिला) -: पालघर, रायगड, नांदेड
नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) -: लातूर, कोल्हापूर, वाशीम, अमरावती
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) -: ठाणे, सिंधुदुर्ग, सांगली, वर्धा, बीड
खुला (सर्वसाधारण) -: रत्नागिरी, नाशिक, धुळे, गडचिरोली, गोंदिया, सातारा, अकोला, भंडारा
खुला (महिला) -: जळगाव, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, परभणी, बुलडाणा, यवतमाळ

राज्यातील जिल्हा परिषदा आणि त्यांचे आरक्षण -

अहमदनगर -  सर्वसाधारण (महिला)
अकोला - सर्वसाधारण
अमरावती -  नागरीकांचा मागास प्रवर्ग
औरंगाबाद - सर्वसाधारण (महिला)
बीड - नागरीकांचा मागास (प्रवर्ग महिला)
भंडारा - सर्वसाधारण
बुलढाणा - सर्वसाधारण (महिला)
चंद्रपूर - सर्वसाधारण (महिला)
नागपूर -  अनुसूचित जाती (महिला)
गडचिरोली - सर्वसाधारण
गोंदिया -  सर्वसाधारण
हिंगोली - अनुसूचित जमाती (सर्वसाधारण)
जळगाव - सर्वसाधारण (महिला)
जालना - अनुसूचित जाती
कोल्हापूर -  नागरीकांचा मागास प्रवर्ग
लातूर - नागरीकांचा मागास  प्रवर्ग
नांदेड - अनुसूचित जमाती (महिला)
नंदुरबार - अनुसूचित जमाती (सर्वसाधारण)
नाशिक - सर्वसाधारण
उस्मानाबाद - अनुसूचित जाती (महिला)
परभणी - सर्वसाधारण ( महिला)
पुणे - सर्वसाधारण (महिला)
रायगड - अनुसूचित जमाती (महिला)
रत्‍नागिरी - सर्वसाधारण (ओपन)
सांगली - नागरीकांचा मागास  प्रवर्ग महिला
सातारा - सर्वसाधारण
सिंधुदुर्ग -  नागरीकांचा मागास  प्रवर्ग - महिला
सोलापूर - अनुसूचित जाती
ठाणे - नागरीकांचा मागास  प्रवर्ग महिला
वर्धा - नागरीकांचा मागास  प्रवर्ग  महिला
वाशीम - ओबीसी नागरीकांचा मागास  प्रवर्ग 
यवतमाळ - सर्वसाधारण महिला
पालघर - अनुसूचित जमाती महिला

पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी महिला सदस्यांमध्ये चुरस

पुणे जिल्हा परिषदेच्या आगामी अडीच वर्ष कालावधीच्या अध्यक्षपदासाठी जिल्ह्यातील सात तालुक्यात रस्सीखेच होणार आहे. या पदासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडे सात तालुक्यातील १६ महिला पात्र आहेत. शिवाय खुल्या महिला गटातून अन्य प्रवर्गातील 8 महिलाही पात्र आहेत. राष्ट्रवादी कांँग्रेसच्या ४२ जिल्हा परिषद सदस्यांपैकी २४ महिला सदस्या आहेत. यापैकी १६ खुल्या प्रवर्गातून तर, उर्वरित आठ जणी विविध प्रवर्गातून निवडून आलेल्या आहे. खुल्या गटातून निवडून आलेल्यांमध्ये बारामती, इंदापूर, दौंड, शिरुर, आंबेगाव, हवेली आणि मावळ या तालुक्यातील सदस्यांचा समावेश आहे. यापैकी मावळचा अपवाद अन्य सहा तालुक्यातील प्रत्येकी एक जण सध्या जिल्हा परिषदेचा पदाधिकारी आहे. आतापर्यंत विद्यमान पदाधिकारी असलेल्या तालुक्याला सलग दुसऱ्यांदा संधी न देण्याचा नियम राष्ट्रवादी काँग्रेसने पाळला आहे. त्यानुसार सध्या मावळ तालुक्याचे पारडे जड आहे. शिवाय जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून आतापर्यंत मावळ तालुक्याला अध्यक्षपद मिळालेले नाही. दरम्यान, आजच्या आरक्षण सोडतीने अनेक दिग्गज जिल्हा परिषद सदस्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. खुल्या गटातील महिला जिल्हा परिषद सदस्यांची नावे- तुळशी भोर, अरुणा थोरात (आंबेगाव), सुनीता गावडे, स्वाती पाचुंदकर, सविता बगाटे, सुजाता पवार (शिरूर), शोभा कदम (मावळ), कल्पना जगताप, अर्चना कामठे, अनिता इंगळे, पूजा पारगे (हवेली) राणी शेळके (दौंड), रोहिणी तावरे, मीनाक्षी तावरे (बारामती), वैशाली पाटील (इंदापूर).

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
====================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.