Wednesday, 13 November 2019

राज्यातील 5 महानगरपालिकांमध्ये महाशिवआघाडी झाल्यास सत्तांतर शक्य

22 महानगरपालिकांमध्ये नव्या राजकीय गणितांचा परिणाम अशक्य

राज्यातील विधानसभा निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने आणि महायुतीत फुट पाडल्याने राजकीय पेचात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली असून नव्या राजकीय समीकरणांची नांदी पहावयास मिळत आहे. सत्तेसाठी भाजपेत्तर प्रमुख राजकीय पक्ष एकत्र येण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे या पार्श्वभूमीवर बदलत्या राजकीय परिस्थितीत राज्यातील महानगरपालिकांच्या महापौरपदाच्या प्रवर्गाची सोडत काढण्यात आली. युतीतील बेबनाव निर्माण झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्याचा विपरीत परिणाम शक्य आहे. राज्यातील 27 महानगरपालिकांच्या महापौर पदाची आरक्षणाची सोडत आज नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर-पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आल्या आहेत. नव्या सोडतीनुसार महापौर पदाची निवड 21 तारखेपर्यंत केली जाणार आहे. याच वर्षात लोकसभा, विधानसभा आणि त्या पाठोपाठ अनेक शहरांमध्ये महापौर बदल होणार आहे. महापौर पदानंतर बहुतेक पक्ष इतर पक्षनेते आणि समित्यांच्याही नेतृत्वात बदल करतात. त्यामुळे ही सोडत स्थानिक पातळीवर महत्वाची मानली जाते. त्यातच लोकसभा आणि विधानसभेत उमेदवारी न दिलेल्यांचीही नाराजी दूर करण्याचा प्रयत्नही यातून केला जाऊ शकतो. मात्र युतीतील बेबनाव निर्माण झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्याचा विपरीत परिणाम शक्य आहे. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसला शिवसेनेने साथ दिली तर राज्यातील 27 महानगरपालिकांपैकी 5 ठिकाणी (नाशिक, अहमदनगर, सांगली, लातूर, ठाणे) सत्तांतर शक्य आहे. मात्र उर्वरित 22 महानगरपालिकांमध्ये नव्या राजकीय गणितांचा परिणाम होण्याची शक्यता नाही व या महानगरपालिकांमध्ये देखील सत्तांतर अशक्य आहे. 
सत्तांतर शक्य- नाशिक, अहमदनगर, सांगली, लातूर, ठाणे
सत्तांतर अशक्य- औरंगाबाद, परभणी, नांदेड, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, सोलापूर, पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, जळगाव, धुळे, मालेगाव, बृहन्मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर

22 महानगरपालिकांमध्ये नव्या राजकीय गणितांचा परिणाम व सत्तांतर अशक्य

मराठवाडा (3)-औरंगाबाद, परभणी, नांदेड
विदर्भ (4)-अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर
पश्चिम महाराष्ट्र (5)-सोलापूर, पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर
उत्तर महाराष्ट्र (3)-जळगाव, धुळे, मालेगाव
मुंबई विभाग (7)-बृहन्मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर

5 महानगरपालिकांमध्ये नव्या राजकीय गणितांचा परिणाम व सत्तांतर शक्य

नाशिक, अहमदनगर, सांगली, लातूर, ठाणे

सत्तांतर शक्य-

1. नाशिक महानगरपालिका :- सध्या संख्याबळ १२० इतके अाहे. भाजपाकडे ६५ नगरसेवकांसह बहुमत आहे. मात्र सानप फॅक्टरमुळे जर ८ ते १० नगरसेवक फुटून शिवसेनेेकडे गेले तर मात्र सेनेचे सध्याचे ३४ व भाजपाचे बंडखाेर १० असे ४४ संख्याबळ हाेईल. राष्ट्रवादी, काॅंग्रेस व मनसे यांच्यासह नाेंदणीकृत अपक्ष मिळून २० नगरसेवकांनी सेनेला साथ दिली तर संख्याबळ ६४ हाेऊन महापाैरपद मिळू शकते.
2. अहमदनगर महानगरपालिका :- महापालिकेत एकूण संख्याबळ ६८ आहे. येथे अवघ्या १४ जागांसह तिसऱ्या क्रमांकावरील भाजप सत्तेत आहे. १८ जागा असलेल्या राष्ट्रवादीने भाजपला बाहेरून पाठिंबा दिल्यामुळे २४ जागांसह प्रथम क्रमांकावरील शिवसेनेला विरोधी बाकावर बसावे लागले आहे. महापौर व उपमहापौरपदे भाजपकडेच आहेत. मात्र भाजपविरुद्ध विरोधक एकत्र आल्यास बहुमत सहज शक्य आहे. महानगरपालिकेतील विद्यमान महापौरपदाचा कार्यकाळ ३० जून २०२१ पर्यंत आहे.
3. सांगली महानगरपालिका :- ७८ सदस्य संख्येच्या मनपात भाजप ४१ सदस्यांसह सत्तेत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची बेरीज ३५ असून त्यांना केवळ ४ सदस्यांची गरज आहे. भाजपच्या सदस्यांत किमान २० ते २२ जण हे राष्ट्रवादी वा काँग्रेसमधून आयात आहेत. त्यांची फोडाफोड आणि भाजपअंतर्गत नाराजीनाट्य झाल्यास येथे महाआघाडीसाठी आशेचे किरण दिसू शकतात.
4. लातूर महानगरपालिका :- एकूण ७० जागांपैकी भाजपला ३६, काँग्रेसला ३३ तर १ जागा राष्ट्रवादीला मिळाली होती. काठावर बहुमत असलेल्या भाजपने महापौरपद मिळवले होते.भाजपचे १३ नगरसेवक मूळचे काँग्रेसचे आहेत. मात्र गेल्या अडीच वर्षात भाजपत अंतर्गत कलह वाढला आहे. भाजपच्या एका नगरसेवकाचे निधन झालेले आहे. भाजपला बहुमतापेक्षा एक जागा कमी आहे. त्यामुळे येथे आघाडीला सत्ता स्थापनेची संधी मिळू शकते.
5. ठाणे महानगरपालिका :- १३१ सदस्यांच्या मनपात शिवसेना ६७ आणि भाजपचे २३ सदस्य मिळून युतीची सत्ता आहे. येथे काँग्रेसचे ३, तर राष्ट्रवादीचे ३४ सदस्य आहेत. येथे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाली तर निर्विवादपणे नव्या आघाडीचीच सत्ता येथे शकते.

सत्तांतर अशक्य-

1. औरंगाबाद महानगरपालिका :- पुढील वर्षी एप्रिलमध्ये महापालिकेची निवडणूक असून २९ एप्रिलपूर्वी नवीन महापौर विराजमान होईल. ११५ सदस्यांच्या सभागृहात शिवसेनेचे २९, भाजप २३, एमआयएम २४, काँग्रेस ११ व १७ सदस्य अपक्ष आहेत.
2. परभणी महानगरपालिका :- महापालिकेत ६५ सदस्य आहेत. ३१ सदस्यांसह काँग्रेसचा महापौर असून राष्ट्रवादीकडे २०, व भाजपकडे ८ सदस्य आहेत. यामुळे सत्ताबदलाची शक्यता नाही.
3. नांदेड महानगरपालिका :- एकूण ८१ सदस्यांच्या महापालिकेत तब्बल ७३ नगरसेवकांसह काँग्रेसकडे प्रचंड बहुमत आहे. यामुळे येथे सत्तांतराची शक्यता नाही.
4. अकोला महानगरपालिका :- ८० सदस्यसंख्या असलेल्या महापािलकेत भाजपचे ४८ नगरसेवक अाहेत. त्यामुळे भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने येथे सत्तांतराची शक्यता नाही.
5. अमरावती महानगरपालिका :- येथे एकूण सदस्य संख्या ८७ आहे. येथे भाजपकडे ४५ नगरसेवकांसह स्पष्ट बहुमत आहे. येथे ९ िडसेंबरच्या आधी महापौरपद निवडणूक होईल.
6. चंद्रपूर महानगरपालिका :- येथे एकूण ६६ जागा आहेत. त्यापैकी ३६ सदस्यांसह भाजप बहुमतात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व अपक्ष मिळून बेरीज ३० येते. त्यामुळे भाजपला धोका नाही.
7. नागपूर महानगरपालिका :- १५१ सदस्यांच्या नागपूर महापालिकेत भाजपाचे १०८ सदस्य आहेत. येथे स्पष्ट बहुमत असल्याने सत्तांतर होणार नाही.
8. सोलापूर महानगरपालिका:- महापालिकेत सध्या एकूण १०१ सदस्य आहेत. ४९ सदस्यांसह भाजपची सत्ता आहे. येथे सत्तांतर होणार नाही. येथे डिसेंबरमध्ये महापाैरपदाची निवडणूक आहे.
9. पुणे महानगरपालिका :- एकूण १६४ सदस्य संख्येच्या मनपात ९९ सदस्यांसह भाजपची सत्ता आहे. येथे सत्तांतराची शक्यता नाही.
10. पिंपरी चिंचवड महानगरपालिका:- एकूण १२८ सदस्यांच्या मनपात ७७ जागांसह भाजपला बहुमत आहे. येथे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आले तरी महापौर भाजपचा राहणार.
11. कोल्हापूर महानगरपालिका :- महापालिकेत एकूण ८१ नगरसेवकांपैकी काँग्रेसकडे २३, तर राष्ट्रवादीकडे १९ नगरसेवक असे संख्याबळ आहे. यामुळे येथे तिसरा पर्याय येऊन सत्तांतराची शक्यता नाही.
12. जळगाव महानगरपालिका :- एकूण ७५ जागा असलेल्या मनपात भाजपकडे ५७ सदस्यांसह बहुमत आहे. यामुळे येथे सत्तांतराची शक्यता नाही.
13. धुळे महानगरपालिका :- ७५ जागा असलेल्या मनपात भाजप ५० सदस्यांच्या बहुमतासह सत्तेत आहे. यामुळे येथे सत्तांतराची शक्यता नाही.
14. मालेगाव महानगरपालिका:- सध्या ८३ सदस्यांच्या महापालिकेत २९ सदस्य असलेल्या काँग्रेस व १३ जागा असलेल्या शिवसेनेच्या आघाडीला बहुमत आहे. यामुळे २५ सदस्य असलेल्या महागठबंधनला संधी नाही.
15. बृहन्मुंबई महानगरपालिका :- २२७ सदस्यांच्या मनपात शिवसेना ९४ सदस्यांसह सत्तेत आहेत. ८२ सदस्य असलेल्या भाजपने त्यांना बाहेरून पाठिंबा दिलेला अाहे. येथे काँग्रेसकडे २८, राष्ट्रवादीकडे ९ सदस्य आहेत. भाजपने पाठिंबा काढला तरी येथे आघाडीशी सूत जुळवून शिवसेना सत्ता कायम टिकवेल.
16. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका :- महानगरपालिकेत शिवसेना ५१, भाजप ४३, काँग्रेस ४, राष्ट्रवादी २, मनसे ९, इतर ११ अशी परिस्थिती आहे. येथे महापौर शिवसेनेचा तर उपमहापौर भाजपचा आहे. मात्र येथे मनपाची सार्वत्रिक निवडणूक पुढील वर्षी होत असल्याने तोवर शिवसेनेची सत्ता कायम राहील.
17. वसई-विरार महानगरपालिका :- मनपात बहुजन विकास आघाडीला १०९ सदस्यांसह बहुमत आहे. इतर पक्षांना केवळ १० जागाच आहेत.
18. नवी मुंबई महानगरपालिका :- मनपात महापौर राष्ट्रवादीचा तर उपमहापौर काँग्रेसचा आहे. येथील संख्याबळ राष्ट्रवादी ५२, काँग्रेस १०, शिवसेना ३७, भाजप ७, अपक्ष ५ असे आहे. येथे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाली तरीही गणेश नाईक भाजपमध्ये गेले असल्याने भाजपचीच सत्ता येऊ शकते.
19 . मीरा-भाईंदर महानगरपालिका :- येथे ६१ सदस्यांसह भाजपला स्पष्ट बहुमत आहे. शिवसेनेला २२, तर काँग्रेसला १० जागा आहे. यामुळे येथे भाजपची सत्ता अबाधित असेल.
20. भिवंडी-निजामपूर महानगरपालिका :- येथे महापौर काँग्रेस, तर उपमहापौर शिवसेनेचा आहे. काँग्रेस ४७, भाजप १९, शिवसेना १२. सपा २, कोणार्क विकास आघाडी आणि रिपाईं प्रत्येकी ४ असे संख्याबळ आहे. येथे सत्तांतर होणार नाही.
21. पनवेल महानगरपालिका :- महापालिकेत भाजप ५१, तर शेकाप आघाडीच्या २७ जागा आहेत. येथे भाजपच्या सत्तेला कोणताही धोका नाही.
22. उल्हासनगर महानगरपालिका :- येथे भाजपचा तर महापौर, तर ‘साई’चा उपमहापौर आहे. भाजप ३३, शिवसेना २५, साई ११, राष्ट्रवादी काँग्रेस ४, आरपीआय २ आणि इतर ३ असे संख्याबळ आहे. यामुळे येथे सत्तांतर होणार नाही.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
==============================
======

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.