Saturday 19 November 2016

धूत यांच्या व्हिडीओकॉनची शिवसेनेला 85 कोटींची देणगी

धूत यांच्या व्हिडीओकॉनची शिवसेनेला 85 कोटींची देणगी, EC कडे माहिती सादर



गृहोपयोगी उपकरणे तयार करणाऱ्या व्हिडीओकॉन इंडस्ट्रीज ही कंपनी शिवसेनेची सर्वात मोठी देणगीदार असल्याचे समोर आले आहे. शिवसेनेने निवडणूक आयोगाला दिलेल्या देणगीदारांच्या यादीत व्हिडीओकॉननचा प्रामुख्याने समावेश असल्याचे समोर आले आहे. व्हिडीओकॉननने शिवसेनेला तब्बल 85 कोटींची देणगी व्हिडीओकॉनच्या वतीने देण्यात आली आहे.

व्हिडीओकॉनन ही कंपनी राज्यसभेत तीन वेळा शिवसेनेचे प्रतिनिधित्व केलेल्या माजी खासदार राजकुमार धूत यांच्या मालकीची आहे. विशेष म्हणजे शिवसेनेला एकूण 86.84 कोटींची देणगी मिळाल्याचे दाखवण्यात आले, त्यापैकी 85 कोटी एकट्या व्हिडीओकॉनच्या मालकीची आहे.

गेल्यावर्षीही व्हिडीओकॉननने शिवसेनेला देणगी दिली होती, पण त्यावेळी रक्कम ही म्हणावी तेवढी मोठी नव्हती. गेल्यावर्षी शिवसेनेला व्हिडीओकॉनकडून फक्त 2.83 कोटींची देणगी मिळाली होती. त्याचबरोबर शिवसेनेने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 25 लाखांची देणगी दिली आहे.

शिवसेनेच्या वतीने राज्यसभेचे सदस्य अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगासमोर पक्षाला मिळालेल्या देणगीचा लेखाजोखा सादर केला. 2015-16 या आर्थिक वर्षासाठी मिळालेल्या देणगीची माहिती सध्या निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरही उपलब्ध आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसह बहुतांश राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे ही माहिती सादर केल्याचे समोर आले आहे. भाजपेन मात्र अद्याप कोणतीही माहिती सादर केली नसल्याचे समोर आले आहे. काँग्रेसने 22 कोटींच्या देणगीची माहिती दिली तर राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 71.78 लाखांची देणगी मिळाल्याचे दाखवण्यात आले. राष्ट्रवादीला देणगी देण्याऱ्यांमध्ये व्हिडीओकॉनशिवाय पक्षातील नेत्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.



No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.