Monday, 17 September 2018

सर्वाधिक उत्पन्न असलेल्या देशभरातील आमदारांत महाराष्ट्रातील चौघांचा समावेश

सर्वाधिक उत्पन्न असलेल्या देशभरातील आमदारांत महाराष्ट्रातील चौघांचा समावेश


सर्वाधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या देशभरातील वीस आमदारांमध्ये महाराष्ट्रातील चौघांचा समावेश आहे. भाजप आमदार मंगलप्रभात लोढा दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांचं वार्षिक उत्पन्न 34.66 कोटी रुपये आहे.देशभरातील एकूण तीन हजार 145 आमदारांची सर्वाधिक वार्षिक उत्पन्नानुसार क्रमवारी लावण्यात आली आहे. त्यापैकी टॉप 20 आमदारांमध्ये महाराष्ट्रातील चौघांनी स्थान मिळवलं आहे.प्रख्यात उद्योगपती आणि भाजप आमदार मंगलप्रभात लोढा देशात दुसऱ्या क्रमांकावर आहेत. लोढा यांचं वार्षिक उत्पन्न 34.66 कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे लोढांनी आपण नोकरी करत असल्याचा उल्लेख केला आहे.सोलापूर जिल्ह्यातील दिलीप सोपल सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांचं वार्षिक उत्पन्न 9.85 कोटी रुपये आहे. त्यांचा वकिली आणि शेतीचा व्यवसाय आहे. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर 17 व्या स्थानावर आहेत. त्यांचं वार्षिक उत्पन्न  5.61 कोटी रुपये आहे.विसाव्या क्रमांकावर काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आहेत. चव्हाणांचं वार्षिक उत्पन्न 4.56 कोटी रुपये असून त्यांनी व्यवसाय म्हणून शेतीचा उल्लेख केला आहे.
देशातील एकूण ४,०८६ आमदारांपैकी ३,१४५ आमदारांनी दिलेल्या शपथपत्रानुसार, ५ ते १२ वी पर्यंत शिकलेल्या ३३ टक्के आमदारांची सरासरी वार्षिक उत्पन्न ३१ लाख रुपये आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता' हे समीकरण तसं नवं नाही. पण राजकारणातील या कमाईला काही सीमा आहे की नाही, असा प्रश्न पाडणारे आकडे एका सर्वेक्षणातून समोर आलेत. भारतातील आमदारांचं सरासरी वार्षिक उत्पन्न २४ लाख ५९ हजार रुपये आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, आठवी पास नेत्यांचं सरासरी वार्षिक उत्पन्न सुमारे ९० लाख रुपये असल्याचं उघड झालं आहे. एडीआर आणि नॅशनल इलेक्शन वॉच या संस्थांनी आमदारांच्या कमाईबाबतचा एक अहवाल सोमवारी जाहीर केला. त्यात, सर्वात श्रीमंत आमदार कर्नाटकमध्ये असल्याचं नमूद करण्यात आलंय. देशातील एकूण ४,०८६ आमदारांपैकी ३,१४५ आमदारांनी दिलेल्या शपथपत्रानुसार, ५ ते १२ वी पर्यंत शिकलेल्या ३३ टक्के आमदारांची सरासरी वार्षिक उत्पन्न ३१ लाख रुपये आहे, तर पदवी किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षण घेतलेले ६३ टक्के आमदार वर्षाला सरासरी २०.८७ लाख रुपये कमावतात. म्हणजेच, कमी शिकलेल्या आमदारांची कमाई उच्चशिक्षितांपेक्षा जास्त आहे. अशिक्षित आमदारांचं सरासरी वार्षिक उत्पन्न ९.३ लाख रुपये दाखवण्यात आलंय. बहुतांशी कमी शिकलेल्या आमदारांनी शेती हा आपला मुख्य व्यवसाय दाखवला आहे आणि तेच त्यांच्या अधिक उत्पन्नाचं कारण असल्याची माहिती एडीआर संस्थेचे संस्थापक सदस्य जगदीप छोकर यांनी दिली. शेतीतून मिळणारं  उत्पन्न करमुक्त असतं आणि त्याचा हिशेब द्यावा लागत नाही. त्याचा फायदा बहुतांश अल्पशिक्षित आमदारांना होतो, असं त्यांनी सांगितलं. कर्नाटकातील २०३ आमदारांचं सरासरी वार्षिक उत्पन्न १ कोटी ११ लाख रुपये आहे. याउलट, पूर्व भारतातील आमदार गरीब आहेत. तिथल्या ६१४ आमदारांची सरासरी कमाई ८.५ लाख रुपये आहे. दक्षिणेकडच्या राज्यांमधील ७११ आमदारांचं वार्षिक उत्पन्न ५१.९९ रुपये आहे. बेंगळुरू ग्रामीण मतदारसंघाचे आमदार एन नागारजू यांनी आपलं वार्षिक उत्पन्न १५७ कोटी रुपये असल्याचं जाहीर केलंय. तर, आंध्र प्रदेशातील बी. यामिनी बाला यांचं उत्पन्न सगळ्यात कमी - १,३०१ रुपये आहे. भारतातील आमदारांचे सरासरी वार्षिक उत्पन्न २४.५९ लाख रुपये इतके असल्याचे म्हटले आहे. कर्नाटकातील आमदार सर्वात श्रीमंत असून तेथिल २०३ आमदारांचे सरासरी उत्पन्न १ कोटी ११ लाख इतके आहे. प्रदेशानुसार बघायचे झाले तर पुर्वेकडील राज्यांमध्ये ६१४ आमदारांचे उत्पन्न सर्वात कमी आहे. त्यांचे सरासरी उत्पन्न केवळ ८.५ लाख इतके आहे. याऊलट दक्षिणेकडील राज्यांत ७११ आमदारांचे सरासरी वार्षिक उत्पन्न ५१.९९ लाख इतके आहे. छत्तिसगडमधील ६३ आमदारांचे सरासरी वार्षिक उत्पन्न ५.४ लाख रुपये इतके आहे.एडीआर आणि नॅशनल इलेक्शन वॉच(एनईडब्ल्यू) ने देशभरातील आमदारांच्या उत्पन्नाचे विश्लेषण करुन एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. यातून एक धक्कादायक माहितीही मिळाली आहे. देशातील कमी शिकलेल्या आमदारांचे सरासरी उत्पन्न जास्त असल्याचे समोर आले आहे. आठवी शिकलेल्या नेत्यांचे वार्षिक उत्पन्न ९० लाख रुपये इतके आहे.

कमी शिकलेल्या आमदारांचे उत्पन्न जास्त
जास्त शिकलेल्या आमदारांच्या तुलनेत कमी शिकलेल्या आमदारांचे उत्पन्न जास्त असल्याचे अहवालात म्हटले आहे. देशातील ४ हजार ८६ आमदारांपैकी ३ हजार १४५ आमदरांनी शपथपत्राद्वारे दिलेल्या माहितीनुसार ५ वी ते १२ पर्यंत शिकलेल्या आमदारांची संख्या ३३ टक्के आहे. या आमदारांचे वार्षिक उत्पन्न सरासरी ३१ लाख रुपये आहे. देशात पदवी किंवा त्यापेक्षा जास्त शिकलेल्या ६३ टक्के आमदारांचे वार्षिक उत्पन्न २० लाख ८७ हजार आहे. तर काहीच न शिकलेल्या आमदारांची वार्षिक कमाई ९ लाख ३० हजार आहे. 

शेती करणाऱ्या आमदारांची कमाई मोठी
शेती आणि व्यवसाय करणाऱ्या आमदारांचे सरासरी वार्षिक उत्पन्न ५७ लाख ८१ हजार इतके आहे. बांधकाम व्यवसाय, कला क्षेत्रात काम करणाऱ्या आमदारांचे उत्पन्न अनुक्रमे ३९ लाख आणि २८ लाख इतके आहे. सर्वात श्रीमंत आमदार एन नागराजु यांनी त्यांचे वार्षिक उत्पन्न १५७ कोटी इतके सांगितले आहे. ते बेंगळुरु ग्रामीण मतदार संघातील आमदार आहेत. तर सर्वात कमी कमाई आमदार बी. यामिनी बाला यांची आहे. त्यांची कमाई १ हजार ३०१ इतकी आहे.

तरुणांपेक्षा जेष्ठ आमदारांची कमाई चौपट
२५ ते ५० या वयातील आमदारांची संख्या १ हजार ४०२ आहे. त्यांचे सरासरी वार्षिक उत्पन्न १८ लाख २५ हजार आहे. तर ५१ ते ८० वयोगटातील १ हजार ७२७ आमदारांचे उत्पन्न २९  लाख ३२ हजार इतके आहे. यातही धक्कादायक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे ८० पेक्षा जास्त वय असलेल्या आमदारांचे सरासरी वार्षिक उत्पन्न ८७ लाख ७१ हजार इतके आहे. एडीआरचे संस्थापक सदस्य जगदीप छोकर यांनी सांगितले की, उच्च शिक्षण म्हणजे अधिक कमाई याची खात्री नाही. ज्या आमदारांचे उत्पन्न जास्त आहे त्यांनी आपला व्यवसाय शेती असल्याचे सांगितले आहे. या पाठिमागेही खास कारण आहे. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कोणताही कर लागत नाही तसेच त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाबद्दल स्पष्टीकरण द्यावे लागत नाही.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे




No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.