Thursday 13 September 2018

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी पहिली उमेदवारी जाहीर

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी पहिली उमेदवारी जाहीर


जेष्ट जनसंपर्क व माध्यम सल्लागार अॅड. महेश गजेंद्रगडकर यांना आगामी लोकसभा निवडणुकीची पहिली उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नवनिर्वाचित राजकीय पक्ष स्वर्ण भारत पार्टीने अॅड.महेश गजेंद्रगडकर यांना पुणे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. तर पक्षाने आदेश दिल्यास पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे शिवसेनेच्या नेत्या नीलमताई गो-हे यांनी शर्यतीत असल्याचेच संकेत दिले आहेत. भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी देखील पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करून तयारी सुरु केली आहे. भाजपने डावलले तरी इतर पक्षांचा पर्याय त्यांच्याकडे आहे. कॉंग्रेसमधून माजी आमदार व शहराध्यक्ष मोहन जोशी यांनी देखील तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादीमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या नगण्य आहे. तर मनसे यावेळी नव्या चेहरा असलेल्यांना प्राधान्य देणार आहे. 


पक्षाने आदेश दिल्यास पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार – नीलमताई गो-हे 

देशात 2019 साली होणाऱ्या लोकसभा निवडणूकीचे वारे वाहण्यास सुरवात झाली आहे. विरोधी पक्षांनी भाजप विरोधी मोट बांधण्यास सुरवात केली आहे. तर राज्यात सत्तेत एकत्र असणाऱ्या भाजप शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. युती न झाल्यास लोकसभेसाठी भाजपचा पारंपरिक असलेल्या पुणे मतदार संघात शिवसेनेकडून उमेदवार देण्यात येणार आहे. परंतु शिवसेनेचा उमेदवार कोण याबाबत वेगवेगळ्या नावांचे अंदाज बांधले जात होते. मात्र पक्षाने आदेश दिल्यास आपण पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार असल्याचं स्पष्ट करून आमदार नीलमताई गो-हे यांनी मी देखील या शर्यतीत असल्याचेच संकेत दिले आहेत.


स्वर्ण भारत पार्टीने अॅड.महेश गजेंद्रगडकर यांना पुणे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर

जेष्ट जनसंपर्क व माध्यम सल्लागार अॅड. महेश गजेंद्रगडकर यांना आगामी लोकसभा निवडणुकीची पहिली उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.  नवनिर्वाचित राजकीय पक्ष स्वर्ण भारत पार्टीने अॅड.महेश गजेंद्रगडकर यांना पुणे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. गेल्या 20 वर्षांपासून जनसंपर्क क्षेत्रात सल्लागार म्हणून कार्यरत असलेले अॅड.महेश गजेंद्रगडकर यांनी काही वर्षांत त्यांनी वकील म्हणून आपल्या करिअरकडे लक्ष केंद्रीत केले आहे. उद्योजक क्लब, व्यवसाय अंतर्दृष्टी क्लब आणि स्टेशनरी कटलरी मर्चंट्स असोसिएशनच्या माध्यमातून नवोदित उद्योजक आणि संस्थापक उद्योजकांमध्ये उदारमतवादी विचारांचा प्रचार व व्यवसाय वृद्धिंगत करण्याबाबत मार्गदर्शन कार्य त्यांनी केले असून गेल्या 14 वर्षांपासून महाराष्ट्र जाहिरात एजन्सीजसाठी राज्यस्तरीय स्पर्धांचे यशस्वीपणे आयोजन करीत आहेत. जनसंपर्क व माध्यम सल्लागार पीआर व्यावसायिक म्हणून त्यांनी पुणे व इतर लोकसभा/विधानसभा मतदारसंघातील निवडणुकांसाठी देखील काम केले. पुणे लोकसभा मतदारसंघातील विविध सामाजिक व राजकीय स्थिती व समस्यांची त्यांना उत्तम जाण आहे. अॅड. महेश गजेंद्रगडकर सोलापूर जिल्ह्यातील एक मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत आणि त्यांनी पुणे जिल्ह्यातील वालचंदनगर येथे शिक्षण घेतले होते. त्यांनी सोलापूर येथून वाणिज्य पदवी मिळवली आणि पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. पीएआर एजन्सी सुरु करण्यापूर्वी त्यांनी विविध कंपन्यांमध्ये काम केले आणि प्रशासकीय, कर्मचा-यांचा, संपर्क आणि विपणन सेवा यासारख्या विविध प्रकारचे मार्गदर्शन कार्य केलेले आहे. राजकारणात सहभाग न दर्शवलेल्याकडून राजकीय लोकप्रतिनिधीवर केवळ टीका टिप्पणी करून काहीही साध्य होणार नाही सक्षम लोकशाही व कार्यक्षम सांसद होण्यासाठी चांगल्या व निस्वार्थी नागरीकांनी राजकारणामध्ये सक्रीय होणे ही काळाची गरज आहे. या उद्देशाने मी राजकीयदृष्ट्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे. असे अॅड.महेश गजेंद्रगडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
स्वर्ण भारत पार्टीपक्षाच्या ध्येय/धोरणे आदी. अधिक माहितीसाठी संकेतस्थळ- https://swarnabharat.in


लोकसभा निवडणूक २०१९ करिता
पुणे लोकसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार खालीलप्रमाणे- 


स्वर्ण भारत पार्टी- अॅड.महेश गजेंद्रगडकर (अधिकृतरीत्या उमेदवारी जाहीर)
भाजप- अनिल शिरोळे/गिरीश बापट/संजय काकडे/योगेश गोगावले
काँग्रेस- मोहन जोशी/अभय छाजेड/बाळासाहेब शिवरकर/रमेश बागवे/विनायक निम्हण(पक्ष प्रवेश केला तर)
शिवसेना- नीलमताई गो-हे/योगेश मोकाटे/आदी.इतर.
मनसे- रुपालीताई पाटील/रणजीत शिरोळे/दिपक पायगुडे/आदी.इतर.


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) pune

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================

महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.