Wednesday, 12 September 2018

नवनिर्वाचित शिरोळ नगरपरिषदेचा निवडणुक कार्यक्रम जाहीर;२१ ऑक्टोबरला मतदान

नवनिर्वाचित शिरोळ नगरपरिषदेसाठी २१ ऑक्टोबरला मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील नवनिर्मित शिरोळ नगरपरिषदेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबर 2018 रोजी मतदान; तर 22 ऑक्टोबर 2018 रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली. शिरोळ नगरपरिषदेच्या अध्यक्ष व 17 सदस्यपदांसाठी ही निवडणूक होत आहे. नामनिर्देनपत्रे 24 ते 29 सप्टेंबर 2018 या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देनपत्रांची छाननी 1 ऑक्टोबर 2018 रोजी होईल. नामनिर्देनपत्रे मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 21 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी 22 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी दहा वाजता सुरू होईल.

कोल्हापूर जिल्ह्यातील नवनिर्वाचित शिरोळ नगरपरिषदेचा निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून २१ ऑक्टोबरला मतदान घेण्यात येणार आहे. नामनिर्देशनपत्र २४ सप्टेंबर २०१८ ते २९ सप्टेंबर २०१८ दाखल करता येणार आहे. तर  नामनिर्देशनपत्र छाननी १ ऑक्टोबर २०१८ रोजी करण्यात येईल. ६ ऑक्टोबर २०१८ पर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. २१ ऑक्टोबरला मतदान घेण्यात येईल तर मतमोजणी २१ ऑक्टोबरला करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने नवनिर्वाचित शिरोळ नगरपरिषदेचा निवडणुक कार्यक्रम काल जाहीर करण्यात आला.
अनेक वर्षांच्या संघर्षानंतर शिरोळला नगरपालिका मंजूर झाली. जनतेतून नगराध्यक्ष आणि प्रभागातून सदस्य निवडी होणार आहेत. यापूर्वी ग्रामपंचायतीत १७ सदस्य होते. नगरपालिकेनंतर ८ प्रभाग असून, ७ प्रभागांत प्रत्येकी दोन, तर आठव्या प्रभागात ३ सदस्य निवडले जाणार आहेत. नगराध्यक्ष व २ स्वीकृत असे वीस सदस्य नगपरिषदेत असतील. २०११ च्या जनगणनेनुसार २७ हजार ६४९ इतकी लोकसंख्या आहे. ५० टक्के महिला सदस्यांना स्थान पालिकेत असेल. प्रभाग रचनेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर करून ३ एप्रिलला प्रारुप प्रभाग रचना त्यानंतर १३ एप्रिलला पालिकेकडील सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली आहे.ग्रामपंचायतीत यादव आघाडीची सत्ता होती, तर मागील निवडणुकीत यादव पॅनेल विरुद्ध राजर्षी शाहू आघाडी असा सामना झाला होता. यादव पॅनेलचे नेते अनिल यादव हे भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे भाजप विरुद्ध महाआघाडी अशी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिरोळ तालुक्यात पक्षापेक्षा गटा-तटाच्या राजकारणाला अधिक महत्त्व आहे. शिरोळमध्येही गटा-तटाचे राजकारण असले तरी काही प्रभागांत भाऊबंदकीच्या मतदारांवर निवडणूक होते. प्रथमच पालिकेच्या निमित्ताने थेट नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी निवडणूक होत असल्याने इच्छुकांची संख्येत वाढ होणार आहे. शिरोळ पालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाचे आरक्षण, प्रभाग रचना व आरक्षण निश्‍चित करण्यात आले आहे. निवडणुकीसाठी २१ हजार ७३१ मतदारांची नोंद झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी समीर शिंगटे यांची नियुक्ती केली आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नुकतीच अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. एकूण आठ प्रभाग असून, प्रभाग आठमध्ये सर्वाधिक ४७९४, तर प्रभाग पाचमध्ये सर्वांत कमी १५०० मतदार आहेत. एकूण २१ हजार ७३१ मतदारांपैकी ११२६८ पुरुष तर १०४६१ महिला मतदार आहेत. प्रभाग एकमध्ये २०२४, प्रभाग दोनमध्ये २२८९, प्रभाग तीनमध्ये २५३३, प्रभाग चारमध्ये २७०५, प्रभाग सहामध्ये २९४०, प्रभाग सातमध्ये २९४६ मतदार आहेत.निवडणुकीसाठी अद्याप पक्ष तसेच गटा-तटांच्या आघाड्या निश्‍चित झाल्या नसल्या तरी प्रभाग रचना, प्रभागांचे आरक्षण यापूर्वीच निश्‍चित झाल्याने इच्छुक उमेदवार प्रचाराला लागले आहेत. त्यांनी मतदारांच्या थेट गाठीभेटीवर भर दिला आहे. निवडणुकीच्या तारखेकडे इच्छुकांचे लक्ष लागले होते. काल निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. शिरोळ नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी राखीव कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ शिरोळ नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आहे. यापूर्वीच राज्यातील नवनिर्मित 2 नगरपरिषद व 3 नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदांच्या आरक्षणाची सोडत नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते काढण्यात आली होती.


POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे









POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) Pune

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.