Thursday 27 September 2018

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांचा प्रस्थापितांना धक्का

ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांचा प्रस्थापितांना धक्का

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी प्रस्थापितांना धक्का देत, नवख्यांना संधी देणे पसंत केले. ५९ पैकी सुमारे ४० ग्रामपंचायतींमध्ये सत्ताधाऱ्यांना नाकारण्यात आले. सर्वाधिक ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात बाजी मारली. इंदापुरातील १४ पैकी नऊ, दौंड व आंबेगाव तालुक्‍यातील प्रत्येकी पाचपैकी चार आणि शिरूर तालुक्‍यातील सहापैकी तीन ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्याचा दावा पक्षाच्या वतीने करण्यात आला. दरम्यान, काँग्रेसने इंदापूर तालुक्‍यातील पाच आणि पुरंदर तालुक्‍यातील एक ग्रामपंचायत ताब्यात घेतली आहे. भाजपने मावळ तालुक्‍यातील तीन आणि शिरूर तालुक्‍यातील तीन; तर शिवसेनेने पुरंदर तालुक्‍यातील दोन ग्रामपंचायतींवर निर्विवाद वर्चस्व स्थापित केले आहे. खेडमधील नऊ ग्रामपंचायतींमध्ये मतदारांनी संमिश्र कौल दिला आहे. जिल्ह्यातील ५९ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशीच १२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ४७ ग्रामपंचायतींसाठी २६ सप्टेंबर रोजी मतदान झाले होते. 

श्री मंगलमूर्ती पॅनेलने १७ पैकी १६ जागा; सरपंचपदापदी सर्जेराव खेडकर


रांजणगाव गणपती (ता.शिरूर) येथील पाचुंदकर कुटुंबियांची गेली १० वर्षाची ग्रांमपंचायतीची सत्ता असलेली मक्तेदारी मतदारांनी संपुष्टात आणली असून ग्रांमपंचायतीमध्ये श्री मंगलमूर्ती पॅनेलने १७ पैकी १६ जागा निवडून आले आहेत.श्री मंगलमूर्ती पॅनेलचे उमेदवार सर्जेराव बबन खेडकर यांनी महागणपती पॅनेलचे उमेदवार दत्तात्रय आनंदराव पाचुंदकर यांचा पराभव करून सरपंचपदी विराजमान होण्याचा मान मिळविला आहे. सहा प्रभागात १७ जागांसाठी झालेल्या सदस्यांच्या निडणुकीत सत्ताधारी महागणपती पॅनेलला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले. ग्रांमपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत दोन्ही पॅनेलमध्ये चुरशीची निवडणूक झाली. ५५८६ मतदानापैकी ४८९२ इतके एकूण मतदान झाले. सरपंचपदासाठी सर्जेराव खेडकर यांना २४४१ मते आणि दत्तात्रय पाचुंदकर यांना २४२५ मते मिळाली. १७ मतांनी श्री खेडकर विजयी झाले आहेत.रांजणगाव गणपती येथील जिल्हा परिषदेच्या सदस्या स्वाती पाचुंदकर यांचे पती दत्तात्रेय पाचुंदकर यांना सरपंचपदावर पराभव स्वीकारावा लागला आहे.तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पाचुंदकर यांची मातोश्री लक्ष्मीबाई पाचुंदकर यांनाही या निवडणुकीत सदस्य पदासाठी हार पत्करावी लागली आहे.जिल्हा राष्ट्रवादी युवक काॅग्रेसचे माजी अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांच्या पॅनेलला मोठी हार पत्करावी लागली.यामध्ये फक्त अर्चना पाचुंदकर यांना विजय मिळाला आहे. येथील सरपंचपदाची जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) असल्याने कुणबी फॅक्टरला मतदारांनी साफ नाकारल्याची चर्चा गावात आहे. तसेच गेली १० वर्षे सत्ता उपभोगलेल्या सत्ताधाऱयांनी गावाचा विकास केलेला मतदारांना महत्वाचा वाटला नसून परिवर्तन करण्याच्या उद्देशाने सत्ताधाऱयांना धक्का दिला आहे.येथील ग्रांमपंचायत निवडणुकीत दोन्ही पॅनेलकडून मोठी आर्थिक उलाढाल झाली असली तरी सत्ताधाऱयांच्या विरोधी मतदारांनी अनपेक्षित लाट निर्माण करून विरोधकांच्या हाती निर्विवाद सत्ता दिली आहे. मंगलमूर्ती पॅनेलचे नेतृत्व पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रभाकर पाचुंदकर, माजी आदर्श सरपंच भिमाजीराव खेडकर, माजी जिल्हा परिषद सदस्या कविता खेडकर आदींनी केले.

प्रभागानुसार प्रथम विजयी व पराभूत उमेदवार व त्यांना मिळालेली मते :

प्रभाग एक - (दोन जागा) हिराबाई पंढरीनाथ खेडकर (३९३,विजयी), निता नितीन खेडकर (३४५ पराभूत)/आनंदा तुकाराम खेडकर (४२५ विजयी),निलेश सुरेश खेडकर (३१८ पराभूत).
प्रभाग दोन -(तीन जागा) विलास बाळासाहेब अडसूळ (५५२ विजयी),हिराबाई नारायण शेलार (४४३ पराभूत)/अजय तुकाराम गलांडे ( ६०२ विजयी), मोहन आत्माराम शेळके (४२६ पराभूत), निलम श्रीकांत पाचुंदकर (६६२ विजयी),लक्ष्मीबाई राजाराम पाचुंदकर (३६१ पराभूत).
प्रभाग तीन- (तीन जागा) धनंजय विठ्ठल पवार (५१२ विजयी ),गणेश भगवंत लांडे (३०३ पराभूत)/ मिनाक्षी दिलीप लांडे (३४० विजयी),सुजाता पंडीत लांडे (४१८ पराभूत), सरेखा प्रकाश लांडे (४७९ विजयी),शोभा रमेश शेळके (३९४ पराभूत).
प्रभाग चार - (तीन जागा) स्वाती भानुदास शेळके ( २७४ विजयी),वैशाली प्रकाश शेळके (२३९ पराभूत)/ बाबासो धोंडिबा लांडे (२५८ विजयी),नवनाथ विलास लांडे (२५४ पराभूत).सुप्रीया योगेश लांडे (२६९ विजयी),शोभा सूर्यकांत लांडे (२४४ पराभूत).
प्रभाग क्रमांक पाच - (तीन जागा) रंभा माणिक फंड (४३८ विजयी),रंजना महादू फंड (४२९ पराभूत)/ राहूल अनिल पवार ( ४७२ विजयी), अनिल बाळासो दुंडे (४०२ पराभूत), अनिता सुदाम कुटे (४९० विजयी),शुभांगी योगेश पाचुंदकर (३७६ पराभूत).
प्रभाग क्रमांक सहा- (जागा तीन) संपत गणपत खेडकर (५१२ विजयी),रामदास परशुराम खेडकर (३७७ पराभूत)/आकाश संजय बत्ते (५५१ विजयी),बबन आनंदराव बत्ते (३३३ पराभूत), अर्चना संदिप पाचुंदकर (४४९ विजयी),अलका संभाजी गदादे (४४० पराभूत).


आंबळे येथे सोमनाथ बेंद्रे सरपंच

आंबळे ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रणीत जनसेवा ग्रामविकास पॅनेलने बहुमत मिळविले. सरपंचपदी याच पॅनेलचे सोमनाथ बेंद्रे हे 105 मतांनी निवडून आले. महेश बेंद्रे यांना पराभवाचा धक्का बसला.राष्ट्रवादी प्रणीत जनसेवा व भाजप पुरस्कृत भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलमध्ये चुरशीची लढत झाली. यात जनसेवा पॅनेलने सरपंचपदासह सहा; तर भैरवनाथ पॅनेलने तीन जागा मिळविल्या. महेश बेंद्रे व सोमनाथ बेंद्रे यांच्यात सरपंचपदासाठी चुरस होती. यात 994 मते मिळवून सोमनाथ बेंद्रे विजयी झाले. महेश बेंद्रे यांना 889 मते मिळाली. प्रभाग एक मध्ये राजेंद्र झेंडे (380 मते), सुनीता जाधव (377 मते) व जयश्री बेंद्रे (423 मते) हे जनसेवा पॅनेलचे उमेदवार विजयी झाले. भैरवनाथ पॅनेलच्या मारूती झेंडे (287 मते), शीतल जाधव (290 मते) व अश्‍विनी बेंद्रे (238 मते) यांचा त्यांनी पराभव केला. प्रभाग दोन मध्ये भैरवनाथ पॅनेलचे शरद निंबाळकर (352 मते), रंजना बेंद्रे (314 मते) व प्रज्ञा श्रीकृष्ण सिन्नरकर (322 मते) यांनी जनसेवा पॅनेलच्या पवन बेंद्रे (255 मते), उषा बेंद्रे (292 मते) व मालन सिन्नरकर (277 मते) यांचा पराभव केला. प्रभाग तीनमध्ये भैरवनाथ पॅनेलच्या मयुर बेंद्रे (304 मते), राहुल धुमाळ (312 मते) व माया बेंद्रे (263 मते) यांना पराभव पत्करावा लागला. तेथे जनसेवा पॅनेलचे प्रदीप ठोंबरे (319 मते), अनिल नरवडे (314 मते) व पूनम बेंद्रे (360 मते) हे विजयी झाले.

शिरूर तालुक्यामध्ये ४ ग्रामपंचायतींत सत्ताबदल

शिरूर तालुक्यातील ६ ग्रामपंचायतींच्या लागलेल्या निकालात ४ ग्रामपंचायतींमध्ये सत्ताबदल झाला आहे. शिरूरसह आंबेगाव तालुक्याचे लक्ष लागलेल्या रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीमध्ये गेल्या १० वर्षांची शेखर पाचुंदकर व मानसिंग पाचुंदकर यांच्या नेतृत्वाखालील सत्ता उलथवून टाकण्यात विरोधकांना यश मिळाले.तालुक्यातील रांजणगावसह करडे, आंबळे, चव्हाणवाडी, ढोक सांगवी तसेच कळवंतवाडी या ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतमोजणी झाली. यात रांजणगाव, करडे, आंबळे व कळवंतवाडी या ग्रामपंचायतींमध्ये सत्ताबदल झाला. यामध्ये रांजणगाव ग्रामपंचायतीकडे सर्वांचेच विशेष लक्ष लागले होते. या ग्रामपंचायतीवर माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर व शिरूर आंबेगाव मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांच्या नेतृत्वाखाली सत्ता होती.पाचुंदकर यांच्या पॅनलच्या सरपंचपदाचे उमेदवार दत्तात्रय पाचुंदकर यांचा विरोधी पॅनलचे उमेदवार सर्जेराव खेडकर यांनी अवघ्या १६ मतांनी पराभव केला. सतरा सदस्यांपैकी विरोधकांना १६, तर पाचुंदकरांच्या पॅनलला एकमेव जागेवर समाधान मानावे लागले. ढोक सांगवी ग्रामपंचायतीमध्ये मल्हारी मलगुंडे यांनी आपल्या नेतृत्वाखालील सत्ता अबाधित राखण्यात यश मिळविले. त्यांच्या पॅनलच्या सरपंचपदाच्या उमेदवार शोभा शेलार यांनी विरोधी पॅनलच्या प्रियांका जगताप यांचा पराभव केला. तीन जागांसाठी झालेल्या मतदानात तिन्ही जागा मलगुंडेंच्या पॅनलला मिळाल्या.

इंदापुरात दोन्ही काँग्रेसचा वर्चस्वाचा दावा

इंदापूर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक लागली होती. त्यातील १ ग्रामपंचायती बिनविरोध झाली. उर्वरित १३ ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल आज स्पष्ट झाला. इंदापूर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक लागली होती. त्यातील १ ग्रामपंचायती बिनविरोध झाली. उर्वरित १३ ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल आज स्पष्ट झाला. निकाल स्पष्ट झाल्यानंतर कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने आमच्या पक्षाचे जास्त सरपंच विजयी झाल्याचे दावे केले आहेत. राष्ट्रवादी पक्षाने १० ग्रामपंचायतींध्ये तर काँग्रेसने ६ ग्रामपंचायतीवर दावा केला आहे.राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष महारूद्र पाटील यांनी निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘जनतेने राष्ट्रवादी कॉग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे. पक्षाच्या विचाराचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यात शेळगांव ,अगोती नंबर १ , अगोती नंबर २, वडापुरी ,तरटगाव ,बोराटवाडी, कालठण नंबर २ ,गोखळी, पंधारवाडी, खोरोची या गावात विजयी झाले आहेत. ’दुसरीकडे कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. कृष्णाजी यादव यांनीही इंदापूरात कॉग्रेसच्या ग्रामपंचायत संख्येत वाढ झाल्याचे सांगितले आहे. यादव यांनी सांगितले की,‘ काँग्रेस पक्षाने ५ ग्रामपंचायतींवर निर्विवादपणे विजय मिळविला आहे. तर तरटगाव ग्रामपंचायत बिनविरोध होऊन तेथे सर्वपक्षीय सत्ता आली आहे. निवडणूकीत काँग्रेस पक्षाकडील ग्रामपंचायतींच्या संख्येत वाढ झाली असून काँग्रेसकडील एकुण ग्रामपंचायत सदस्य संख्येतही सुमारे ३१ ने वाढ झाली आहे. कांदलगाव, कालठण नं.१, खोरोची, उद्धट , पवारवाडी या ग्रामपंचायती कॉग्रेस पक्षाने मोठ्या फरकाने निर्विवाद जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला एक ग्रामपंचायत गमवावी लागली आहे. तर काँग्रेसने एक जादा ग्रामपंचायत ताब्यात घेतली आहे. काँग्रेस पक्षाचा जनाधार वाढला असल्याचे दिसून येत आहे.निवडणूक झालेल्या १३ ग्रामपंचायतींपैंकी कांदलगाव, कालठण नं.१, कालठण नं.२, बोराटवाडी, खोरोची, गोखळी, शेळगाव, वडापुरी, पवारवाडी या ९ ग्रामपंचायती यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडे होत्या. तर अगोती नं.-१,अगोती नं.२ , पंधारवाडी, उध्दट या ४ ग्रामपंचायती काँग्रेस पक्षाकडे होत्या.
शेळगांव ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्र हे कर्मयोगी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आहे. कारखान्याचा कामगार, संचालक वर्ग मोठ्या प्रमाणात मतदार आहे. सरपंच पदासाठी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्यांना उमेदवारी देवूनही व अगोती नंबर २ या गावात चाळीस वर्षांपासून कॉग्रेस पक्षाची म्हणजेच कर्मयोगी शंकरराव पाटील कारखानाचे माजी संचालक बलभीम काळे व विद्यमान संचालक सुभाष काळे यांची सत्ता होती. तरीदेखील हर्षवर्धन पाटलांचा सरपंच विजयी होऊ शकला नाही हा कॉग्रेसला मोठा धक्का आहे. तर कांदलगाव ग्रामपंचायतीमध्ये गेली चाळीस वर्षे कॉग्रेसच्या माजी जिल्हा परिषद सदस्या ऋतुजा पाटील यांची सत्ता होती. मागील निवडणूकीत राष्ट्रवादीच्या युवकांनी सत्तांतर घडवले होते. यंदा पुन्हा ही ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यातून खेचून घेण्यात कांग्रेसला यश मिळाले आहे.

बोराटवाडीत काँग्रेसचा पराभव

बोराटवाडी (ता. इंदापूर) ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत जय भवानी ग्रामविकास पॅनलने निर्विवाद विजय मिळविला. सरपंचपदासह सर्वच्या सर्व म्हणजे नऊ जागांवर ग्रामविकास पॅनलने विजय मिळवला. पॅनलच्या दत्तू यशवंत सवासे यांची सरपंचपदी निवड झाली. त्यांनी तुकाराम अनंत इंगवले यांचा २०६ मतांनी पराभव केला. सरपंचपदासाठी एकूण तीन उमेदवार रिंगणात होते. दत्तू सवासे यांना एकूण ७२४ मते मिळाली, तर तुकाराम अनंता इंगवले यांना ५१८ मते मिळाली. तिसरे उमेदवार समीर धर्मराज बर्गे यांना तेरा मते मिळाली. जय भवानी ग्रामविकास पॅनलचे विजयी उमेदवार : प्रभाग १) हनुमंत पांडुरंग माने, रमेश शिवाजी बोराडे, पुष्पा शहाजी जाधव, प्रभाग २) अभिजित विठ्ठल फडतरे, मनीषा तुकाराम हेगडकर, शिवबा नवनाथ बोराडे, प्रभाग ३) धोंडीराम लक्ष्मण खाडे, वैशाली साहेबराव सवासे, पूनम धनाजी फडतरे.

देऊळगावराजे ग्रामपंचायतीवर थोरात गटाचे वर्चस्व

दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या देऊळगावराजे ग्रामपंचायत निवडणुकीत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात गटाचे वर्चस्व राहिले आहे.  दरम्यान सिद्धेश्वर ग्रामविकास पॅनलचे नेतृत्व माजी सरपंच अमित गिरमकर यांनी केले होते. सिद्धेश्वर पॅनलला ८ जागा तर भैरवनाथ पॅलन आणि शिवछत्रपती भैरवनाथ पॅनल यांना प्रत्येकी १ जागेवर समाधान मानावे लागले. ११ सदस्य संख्या असलेल्या या ठिकाणी वार्ड क्र. १ मध्ये एका जागेसाठी एकही उमेदवारी अर्ज न आल्याने एक जागा रिक्त राहिली तर १० जागांसाठी तीन पॅनल मधील व एक अपक्ष असे ३0 उमेदवार रिंगणात होते. यामधे सरपंच पदासाठी व सदस्य पदासाठी सर्वाधिक आठ जागांवर सिद्धेश्वर ग्रामविकास पनलचे उमेदवार विजयी झाले, सरपंचपदासाठी सर्वाधिक ९९६ मते स्वाती अमित गिरमकर यांना मिळाली.वार्डनिहाय विजयी उमेदवार व कंसात मिळालेली मते : वार्ड क्रमांक १ : जयश्री महादेव सूर्यवंशी (२५८), वार्ड क्रमांक २ : नारायण महादेव गिरमकर(२६१), शुभांगी दादासाहेब गिरमकर (३२०), पंकज देवीदास बुहार्डे (३४०), वार्ड क्रमांक ३ : दयाराम श्रावण पोळ (२५२), सुलोचना शिवाजी तावरे (१५९), चतुराबाई आप्पासाहेब खेडकर (२६३), वार्ड क्रमांक ४ : बाबू नारायण पासलकर(२८९), सोनाली दिपक पासलकर (२९५), वृषाली महादेव औताड़े (२८७), हे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे


1 comment:

Note: only a member of this blog may post a comment.