जिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नव्याने प्राप्त एमथ्री-इव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रणेचे प्रात्यक्षित
मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने यशदा येथे निवडणूक विषयक इव्हीएम व व्हीव्हीपॅट याबाबत आज राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत सर्व जिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी सहभागी झाले होते. श्री.अश्विन कुमार, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत यावेळी सर्व अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी उपस्थित जिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांना नव्याने प्राप्त झालेल्या एमथ्री-इव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन संदर्भात “फर्स्ट लेव्हल चेकिंग” (एफएलसी) ची तांत्रिक माहिती देण्यात आली. भारत निवडणूक आयोगाकडील तज्ञ अधिकारी तसेच बीईएल, बेंगळूरु येथील तज्ञांनी जिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांना, ही यंत्रणा नेमकी कशी कार्य करते यांची माहिती दिली. तसेच तज्ञ अभियंत्यांमार्फत प्रात्याक्षिक दाखविण्यात आले आणि सखोल माहिती देण्यात आली. 4 व 5 सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व उपजिल्हा निवडणूक अधिकारी व निवडक मतदार नोंदणी अधिकारी यांना निवडणूक आयोगातर्फे यशदा येथे आयोजित कार्यशाळेत प्रशिक्षण देण्यात आले. नवतरुण मतदारांमध्ये निवडणूक विषयक जागरुकता निर्माण होण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने तयार केलेली माहिती पुस्तिका देऊन, इयत्ता नववी ते बारावीपर्यतच्या तरुण मतदारांना निवडणूक विषयक माहिती सहज व सोप्या पध्दतीने उपलब्ध व्हावी यासाठी विविध प्रकारच्या खेळांच्या माध्यमातून माहिती कशी देता येईल तसेच मतदार साक्षरता क्लब याबद्दल प्रशिक्षण देण्यात आले. अपंग कल्याण आयुक्त यांच्या सहकार्याने दिव्यांग व्यक्तींना निवडणूक प्रक्रियेमध्ये सामावून घेण्यासाठी निवडणक अधिकाऱ्यांना सविस्तर प्रशिक्षण यावेळी देण्यात आले असे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.