Thursday, 27 September 2018

पुण्यातील दोन पत्रकारांची राजकारणात उडी !

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक लढविणार



महात्मा गांधी पासून देशाच्या सर्वोच्च पंतप्रधान/राष्ट्रपती या पदांवर पत्रकारितेतून अनेक मान्यवरांनी कार्य-कर्तृत्व सिद्ध केले आहे. पत्रकारितेची पार्श्वभूमी असलेले बहुसंख्य राजकारणात यशस्वीपणे कार्यरत आहेत. पत्रकारीता आणि जनसंपर्क माध्यम सल्लागार म्हणून अनेक वर्ष कार्यरत असलेल्या पुण्यातील दोन पत्रकारांनी राजकारणात उडी घेतली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक लढविणाचा त्यांचा निर्धार आहे.  मार्ग रिलेशन्स या माध्यम सल्लागार कंपनीचे अनेक वर्ष संचालक म्हणून कार्य केले त्यानंतर सदरील कंपनीचे कामकाज बंद करून त्यांनी आंतरराष्ट्रीय कंपनी कायदा सल्लागार व सहकार क्षेत्रातील कायदे तज्ञ म्हणून अल्पावधीत नावारूपास आलेले अॅड. महेश गजेंद्रगडकर यांनी वकीली व्यवसायात पूर्ण वेळ लक्ष केंद्रित केले होते. सहकाऱ्यांच्या आग्रहामुळे नुकताच अॅड. महेश गजेंद्रगडकर यांनी नवनिर्वाचित राजकीय पक्ष स्वर्ण भारत पार्टी मध्ये प्रवेश केला आहे. पक्ष स्वर्ण भारत पार्टी प्रथमच देशभरातील १० लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविणार आहे. १० मतदारसंघात पुणे लोकसभा मतदारसंघाचा समावेश असून स्वर्ण भारत पार्टीने अॅड. महेश गजेंद्रगडकर यांना पुणे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर झालेली आहे. तर श्री रवींद्र तळपे यांनी पुण्यात इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रात काही वर्ष काम करून स्वतंत्रपणे जनसंपर्क माध्यम सल्लागार म्हणून मायक्रोवल्ड या माध्यम सल्लागार कंपनीची स्थापना करून संचालक पदावर अनेक वर्ष कार्यरत आहेत. प्रसिद्ध माध्यम सल्लागार नीरा राडिया यांच्या वैष्णवी ग्रुप या कंपनी बरोबर देखील कार्य केले आहे. अल्पावधीत त्यांनी सामाजिक क्षेत्रातील केलेल्या कामगिरीबद्दल अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे. आदिवासींच्या हक्कांसाठी लढा देऊन राज्यातील आदिवासींच्या न्याय्य हक्कासाठी सर्वोच्च आणि उच्च न्यायालयात तब्बल 26 जनहित याचिका दाखल केल्या आहेत. त्या मधील अनेक याचिका यशस्वीपणे निकाली निघाल्या आहेत. भाजपाच्या राष्ट्रीय अनुसुचित जमाती मोर्चाचे उपाध्यक्ष खा. अशोक नेते यांच्या उपस्थितीत रवींद्र तळपे यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील असलेले श्री रवींद्र तळपे आगामी विधानसभा निवडणूक लढविणाचा त्यांचा संकल्प आहे. दोघेही आपले राजकीय क्षेत्रातून नशीब आजमावण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीस पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे वतीने शुभेच्छा व्यक्त करीत आहोत.

पुणे लोकसभा मतदारसंघातील स्वर्ण भारत पार्टीचे उमेदवार अॅड. महेश गजेंद्रगडकर यांचा प्रचार सुरु 




पुणे लोकसभा मतदारसंघातील स्वर्ण भारत पार्टीचे उमेदवार अॅड. महेश गजेंद्रगडकर यांच्या प्रचारास प्रारंभ झाला आहे. गणेशोत्सवामध्ये त्यांच्या समर्थकांनी डीजीटल बोर्डाच्या माध्यमातून मतदान करण्याचे आवाहन मतदारांना केले आहे. एखाद्या राजकीय पक्षाची उमेदवारी सर्वप्रथम जाहीर होण्याची पहिली वेळ असून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार व मतदारांशी संवाद साधणारा पहिला उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. अॅड. महेश गजेंद्रगडकर यांनी नवनिर्वाचित राजकीय पक्ष स्वर्ण भारत पार्टी मध्ये प्रवेश केला आहे. स्वर्ण भारत पार्टी प्रथमच देशभरातील १० लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविणार आहे. १० मतदारसंघात पुणे लोकसभा मतदारसंघाचा समावेश असून स्वर्ण भारत पार्टीने अॅड. महेश गजेंद्रगडकर यांना पुणे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर झालेली आहे. जेष्ट जनसंपर्क व माध्यम सल्लागार अॅड. महेश गजेंद्रगडकर यांना आगामी लोकसभा निवडणुकीची पहिली उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या 20 वर्षांपासून जनसंपर्क क्षेत्रात सल्लागार म्हणून कार्यरत असलेले अॅड. महेश गजेंद्रगडकर यांनी काही वर्षांत त्यांनी वकील म्हणून आपल्या करिअरकडे लक्ष केंद्रीत केले आहे. उद्योजक क्लब, व्यवसाय अंतर्दृष्टी क्लब आणि स्टेशनरी कटलरी मर्चंट्स असोसिएशनच्या माध्यमातून नवोदित उद्योजक आणि संस्थापक उद्योजकांमध्ये उदारमतवादी विचारांचा प्रचार व व्यवसाय वृद्धिंगत करण्याबाबत मार्गदर्शन कार्य त्यांनी केले असून गेल्या 14 वर्षांपासून महाराष्ट्र जाहिरात एजन्सीजसाठी राज्यस्तरीय स्पर्धांचे यशस्वीपणे आयोजन करीत आहेत. जनसंपर्क व माध्यम सल्लागार पीआर व्यावसायिक म्हणून त्यांनी पुणे व इतर लोकसभा/विधानसभा मतदारसंघातील निवडणुकांसाठी देखील काम केले. पुणे लोकसभा मतदारसंघातील विविध सामाजिक व राजकीय स्थिती व समस्यांची त्यांना उत्तम जाण आहे. अॅड. महेश गजेंद्रगडकर सोलापूर जिल्ह्यातील एक मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत आणि त्यांनी पुणे जिल्ह्यातील वालचंदनगर येथे शिक्षण घेतले होते. त्यांनी सोलापूर येथून वाणिज्य पदवी मिळवली आणि पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. पीएआर एजन्सी सुरु करण्यापूर्वी त्यांनी विविध कंपन्यांमध्ये काम केले आणि प्रशासकीय, कर्मचा-यांचा, संपर्क आणि विपणन सेवा यासारख्या विविध प्रकारचे मार्गदर्शन कार्य केलेले आहे. राजकारणात सहभाग न दर्शवलेल्याकडून राजकीय लोकप्रतिनिधीवर केवळ टीका टिप्पणी करून काहीही साध्य होणार नाही सक्षम लोकशाही व कार्यक्षम सांसद होण्यासाठी चांगल्या व निस्वार्थी नागरीकांनी राजकारणामध्ये सक्रीय होणे ही काळाची गरज आहे. या उद्देशाने मी राजकीयदृष्ट्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे. असे अॅड.महेश गजेंद्रगडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
स्वर्ण भारत पार्टी- पक्षाच्या ध्येय/धोरणे आदी. अधिक माहितीसाठी संकेतस्थळ- https://swarnabharat.in

========================================================================


आदिवासींच्या हक्कांसाठी लढा देणारे रवींद्र तळपे यांचा भाजपामध्ये प्रवेश







राज्यातील गोरगरीब दुर्बल आदिवासींच्या हक्कांसाठी अनेक वर्षांपासून लढा देणारे  कार्यकर्ते रवींद्र तळपे यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. भाजपाच्या राष्ट्रीय अनुसुचित जमाती मोर्चाचे उपाध्यक्ष खा. अशोक नेते यांच्या उपस्थितीत, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा. हरिश्चंद्र भोये  महामंत्री तुळशीराम गावित,प्रदेश अनुसूचित जमाती मोर्चाचे  संघटन मंत्री कृष्णराव चव्हाण यावेळी उपस्थित होते. श्री . तळपे यांची प्रदेश अनुसूचित जमाती मोर्चाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले . भाजपच्या प्रदेश कार्यालयात हा कार्यक्रम झाला .तळपे यांनी राज्यातील आदिवासींच्या न्याय्य हक्कासाठी सर्वोच्च आणि उच्च न्यायालयात तब्बल 26 जनहित याचिका दाखल केल्या आहेत. भारतीय जनता पार्टीची अनुसुचित जमातीच्या उन्नतीसाठी आखलेली धोरणे समाजाच्या हितासाठी उपयुक्त आहेत,त्यात आणखी काही ठिकाणी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी आपण सूचना करणार आहोत असे तळपे यांनी सांगितले. आदिवासी आश्रमशाळा व वसतीगृहसुधारणांसाठी तळपे हे  अनेक वर्षांपासून शासकीय दरबारी संघर्ष करीत आहेत . त्याचबरोबर जात पडताळणी प्रमाणपत्र कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठीही त्यांनी लढा दिला आहे .वैद्यकीय प्रवेशमध्ये आदिवासींच्या नावाने होणारी घुसखोरी ओळखुन त्याला आळा घालण्यासाठी  एकाच वेळी तीन-तीन याचिका त्यांनी दाखल केल्या आहेत.  आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे बळकटीकरण व सुसुत्रीकरण करुन समित्या बळकट करण्यात तसेच पेसाविरोधी आदिवासींच्या जमीन अधिग्रहणाच्या निर्णयांना कायदेशीर आव्हान देण्यात त्यांची भूमिका आदिवासी समाजाला सर्वश्रुत आहे. तळपे यांनी यवतमाळमधील कुमारीमातांच्या पुनर्वसन व इतर समस्यांबाबत विविध उपाययोजना सुचवून आपल्या गरीब भगिनिंना  न्याय मिळवून दिला.भाजपा हा इतर पक्षांपेक्षा वेगळा केडरबेस पक्ष आहे. भाजपा जगातला  पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला आहे. भाजपाची सभासद संख्या साडेअकरा कोटी आहे. येणाऱ्या काळात काँग्रेसमुक्त भारत होणारच आहे.  तळपे यांच्या प्रवेशाने भारतीय जनता पार्टी आदिवासी क्षेत्रात नक्कीच मजबूत होणार आहे, असे खा. नेते यांनी यावेळी सांगितले. सदरील वृत्त माहिती कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी कळवले आहे. 
रविंद्र उमाकांत तळपे
कार्यालयाचा पत्ता:
मु. पो. राजूर, ता. अकोले, जि. अहमदनगर.
मु. पो. बोटा, ता. संगमनेर, जि. अहमदनगर.

रवींद्र उमाकांत तळपे यांच्याविषयी

आदिवासी स्पर्धा परिक्षा केंद्रांचे शिल्पकार, आदिवासी आश्रमशाळा व वसतीगृह सुधारणांचे प्रणेते, यवतमाळ मधील आदिवासी कुमारीमाता प्रकरणी न्यायासाठी ८०० किमीवर जाऊन संघर्ष करणारे, बोगस आदिवासींविरुध्द अनेक न्यायिक लढाया लढणारे, जात पडताळणी प्रमाणपत्र कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आग्रही असलेले, धनगर आरक्षणाविरुध्द कायदेशीर-राजकीय-न्यायालयीन लढाईसाठी समाजाला सज्ज करणारे, मेडिकल अ‍ॅडमिशनमध्ये होणारी घुसखोरी ओळखुन एकाच वेळी तीन-तीन याचिका दाखल करणारे, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे बळकटीकरण व सुसुत्रीकरण करण्यासाठी शासनाविरुध्द शड्डू ठोकणारे आपले खरे आदिवासी मार्गदर्शक रवींद्र उमाकांत तळपे. 
अधिक माहितीसाठी-
http://www.ravindratalpe.com

==========================================
Mr.Chandrakant Bhujbal - 9422323533

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.