तारीक अन्वर यांच्या पाठोपाठ महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस मुनाफ हकीम यांनीही दिला सर्व पदांचा राजीनामा
राफेल करारावरील वादामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बाजू घेतल्याने नाराज झालेले पक्षाचे खासदार तारीक अन्वर यांनी आज (शुक्रवार) तडकाफडकी राजीनामा दिला. तारीक अन्वर यांच्या पाठोपाठ महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस मुनाफ हकीम यांनीही दिला सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदाचाही राजीनामा दिला आहे. तारिक अन्वर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. तारीक अन्वर हे बिहारमधील कटिहार येथून लोकसभेवर निवडून गेले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून अन्वर पवार यांच्यासोबत होते. शरद पवारांसह ज्या तिघांची काँग्रेसमधून हकालपट्टी झाली होती, त्यापैकी एक असलेले तारीक अन्वर स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत. अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनरल सेक्रेटरी पदासह लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये जाण्याची तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का आहे.शरद पवार यांनी राफेल लढाऊ विमान खरेदी करारात पंतप्रधान मोदींवर शंका घेता येणार नसल्याचे एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. पवारांच्या या भूमिकेवर नाराज होऊन तारीक अन्वर यांनी राजीनामा दिल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेस राफेलवरुन आक्रमक झाली असून, पक्षाध्यक्ष राहुल गांधी प्रत्येक ठिकाणी मोदी आणि सरकारले घेरत आहे. तारीक अन्वर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरील नेते होते. १९९९ मध्ये सोनिया गांधी विदेशी असल्याच्या मुद्यावरुन शरद पवार, पी.ए. संगमा आणि तारीक अन्वर यांनी त्यांना विरोध केला होता. त्यावेळी या तिन्ही नेत्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. या तिघांनी एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. संगमा यांनी काही वर्षातच राष्ट्रवादीतून काढता पाय घेतला होता आणि स्वतःचा पक्ष स्थापन केला होता. मात्र बिहारमधील कटिहार लोकसभा मतदार संघातून अनेकवेळा संसदेते गेलेले तारीक अन्वर हे शरद पवारांसोबत राहिले होते.राफेल विमानांच्या खरेदीवरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'चोर' असं म्हटलं असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मोदींच्या मदतीसाठी धावून गेले. पंतप्रधानांच्या हेतूबाबत लोकांच्या मनात अजूनही शंका नाही अशी पाठराखण शरद पवारांनी मोदींची केली. विमानाची तांत्रिक माहिती जाहीर करण्याची विरोधकांची मागणीही योग्य नाही असं मतही त्यांनी 'न्यूज18 लोकमत'ला दिलेल्या Exclusive मुलाखतीत व्यक्त केले होते. शरद पवार यांच्या राफेल संदर्भातील विधानावरून राष्ट्रवादीत भूकंप झालेला पाहायला मिळतोय. राफेल प्रकरणावर शरद पवार यांनी व्यक्त केलेलं मत हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. त्यांच्या वक्तव्यावर जास्त बोलणार नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केली होती. तर शरद पवार काय म्हणतात तो त्यांचा प्रश्न आहे. काँग्रेसची भूमिका स्पष्ट असून पक्ष त्यावर ठाम आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही व्यक्त केली. शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची पाठराखण केल्यामुळे राजकीय क्षेत्रातून चर्चेला उधाण आले होते. विरोधक म्हणून शरद पवार यांच्या विधानामुळे काँग्रेस बॅकफूटवर पडली. त्यात भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शरद पवार यांचे आभार मानत राहुल गांधी यांनी शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे असा टोला लगावला होता.शरद पवार यांनी राफेल मुद्यावर केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं मत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गुरूवारी स्पष्ट केले होते. त्यामुळे एकंदरीत चहुबाजूने शरद पवार यांच्या वक्तव्यावर नाराजीचा सूर आळवताना दिसत आहे. याचे आता राजकारणात आणखी पडसाद उमटणार हे निश्चित आहे.
राजीनामा देण्याआधी अन्वर यांनी शरद पवार यांच्याशी बोलायला पाहिजे होतं - प्रफुल्ल पटेल
राष्ट्रवादीचे खासदार आणि ज्येष्ठ नेते तारिक अन्वर यांनी दिलेला राजीनामा हे दुदैवी आणि क्लेशदायक आहे. त्यांनी राजीनामा देण्याआधी शरद पवार यांच्याशी बोलले पाहिजे होतं अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. बातम्यांच्या आधारे त्यांनी राजीनामा द्यायला नको होता..तर शरद पवारांनी स्पष्टीकरण का दिलं नाही – तारिक अन्वरांचा प्रश्न
राफेल विमान व्यवहारप्रकरणी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास होत असेल, तर त्यांनी याबाबत अद्याप स्पष्टीकरण का दिलं नाही, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेले खासदार तारिक अन्वर यांनी केला आहे.राष्ट्रवादी निर्मिती मधील अकबर.. एन्थोनी यांचा पक्ष त्याग.... (Akbar Anthony)
सोनिया गांधी यांच्या विदेशीच्या मुद्यावरून शरद पवार यांनी १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. लोकसभेचे माजी अध्यक्ष पी ए संगमा आणि तारिक अन्वर हे राष्ट्रीय नेते त्यांच्यासोबत होते. १९९८ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून सर्वाधिक जागा मिळवून देऊनही आपल्याला डावलले गेल्याची भावना, हे त्या बंडामागचे तात्कालिक कारण मानले जाते. पण एवढे मोठे बंड करूनही १९९९ साली झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत शरद पवार यांना आणि त्यांच्या राष्ट्रवादीला काँग्रेसच्याच वळचणीला जावे लागले हा आतापर्यंतचा इतिहास आहे. १९९९, २००४ आणि २००९ या सार्वत्रिक झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकमेकांशी पाट लावला आणि निवडणुकाही जिंकल्या. राष्ट्रवादीने गुजरात, गोवा, केरळ आणखी काही राज्यात राष्ट्रवादीने निवडणूक लढवल्या पण एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतके उमेदवार सोडले तर राष्ट्रवादीच्या हाताशी फारसे काही लागले नाही. राष्ट्रवादीच्या संस्थापकांपैकी असलेले पी ए संगमा आणि तारिक अन्वर हे महाराष्ट्राबाहेरचे राष्ट्रवादीचे नेतृत्व होते. राष्ट्रवादीतून पहिले बाजूला झाले ते पी ए संगमा. त्यांनी नॅशनल पीपल्स पार्टीची स्थापना केली होती. त्यांच्या कन्या अगाथा संगमा काँग्रेसच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री होत्या. आज संस्थापकांपैकी एक असलेले तारिक अन्वरही पक्ष सोडून चालते झाले आहेत. त्यांच्या या बंडालाही कारणीभूत ठरली आहे ती शरद पवार यांची मोदींना दिलेली कथित “क्लीन चिट” आहे. २०१४ साली झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक बंडखोरी झाली ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात. सध्या राष्ट्रवादीचे अवघे चार खासदार आहेत. ते सगळे पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. त्यातही सातारचे खासदार उदयनराजे यांचे वारू कोणत्या दिशेला जाते हे त्यांचे त्यांनाही सांगता येणार नाही. कोल्हापूरचे खासदार मुन्ना महाडिक राष्ट्रवादीत असले तरी त्यांचे चुलत बंधू आमल महाडिक भाजपच्या तिकिटावर आमदार झाले आहेत. सुप्रियाताई सुळे आणि विजयसिंह मोहिते पाटील. हे दोघेही पुणे, सोलापूर आणि सातारा या खास राष्ट्रवादीच्या प्रभावित भागातील आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीला खिंडार पडण्याची जोरदार तयारी भाजपने चालवली आहे.
कोण आहेत तारिक अन्वर?
तारिक अन्वर हे राष्ट्रवादीतील दिग्गज नेत्यांपैकी एक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून ते शरद पवार यांचे सहकारी म्हणून कार्यरत होते. १९९९ मध्ये शरद पवार यांच्यासह तारिक अन्वर, पी.ए. संगमा यांनी सोनिया गांधी यांच्या विदेशी वंशाचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. सध्या बिहारमधील कटिहार लोकसभा मतदार संघातून ते खासदार आहेत.Detailed Profile: Shri Tariq Anwar
Name - Shri Tariq Anwar
Education- B.Sc. Educated at College of Commerce, Patna, Magadh University, Bodh Gaya (Bihar)
Positions Held
1980-84 Member, Seventh Lok Sabha 1985-89 Member, Eighth Lok Sabha Aug. 1987-April 1988 Member, Joint Parliamentary Committee to inquire into Bofors Contract 1996-98 Member, Eleventh Lok Sabha 1998-99 Member, Twelfth Lok Sabha July 2004 Elected to Rajya Sabha Aug. 2004 - May 2009 Member, Committee on Personnel, Public Grievances, Law and Justice Oct. 2004 - May 2009 Member, Consultative Committee for the Ministry of External Affairs Nov. 2004-Sept. 2009 Member, Committee on Rules April 2008 Nominated to the Panel of Vice-Chairmen, Rajya Sabha (re-nominated on 6 August 2010, 1 August 2011, 19 April 2012 and 17 April 2012 ) June 2008 onwards Member, General Purposes Committee Aug 2009 onwards Member, Committee on Home Affairs Member, Committee on Ethics Member, Consultative Committee for the Ministry of Finance Sept. 2009 - July 2010 Member, Business Advisory Committee July 2010 Re-elected to Rajya Sabha Aug. 2010 onwards Member, Anjuman (Court) of Jamia Millia Islamia University Member, Select Committee to the Wakf (Amendment) Bill, 2010 Sept. 2010 onwards Chairman, Committee on Papers Laid on the Table May 2011 - May 2012 Member, Committee on Public Accounts May 2012 onwards Member, Committee on Public Undertakings 28 Oct. 2012 onwards Minister of State in the Ministry of Agriculture and Minister of State in the Ministry of Food Processing Industries
Other Info
His family has been associated with the freedom struggle; started career as a journalist; Founder Editor, Chhatra, a weekly tabloid in Hindi published from Patna, 1972-74; Editor, (i) Yuvak Dhara, first a weekly tabloid and later a fortnightly magazine published from Patna from 1974 and later published from Delhi since 1982 and (ii) Tanzeem Times, a monthly magazine in English published from New Delhi since 1986; Chief Editor, Sadakat Vani, a monthly magazine in Hindi published from Patna since 1988; Editor-in-Chief, Rashtrawadi Sankalp, earlier a fortnightly and now a weekly newspaper in Hindi published earlier from New Delhi since 2001 and now from Mumbai; President, (i) Bihar State Youth Congress (I), 1976-81, (ii) All India Youth Congress (I), 19 September 1982 - 24 April 1985 and (iii) Bihar Pradesh Congress Committee (I), 5 March 1988 - 7 March 1989; Founder General Secretary, Nationalist Congress Party since 23 May 1999; General Secretary, (i) All India Youth Congress (I), 1981-82 and (ii) All India Congress Committee (I), 4 September 1997 and again from June 1998 - 3 February 1999; Joint Secretary, All India Congress Committee (I), 1982; Chairman, (i) Bihar State Small Scale Industries Corporation, 1982-85, (ii) All India Congress Seva Dal (I), 24 September 1985 -1987, (iii) A.I.C.C. (I) Minority Cell, 27 September 1993 -December 1996 and (iv) Dargah Committee Ajmer, 1993-96; Working Chairman, (i) Bihar State 20-Point Implementation Committee, 1 June 1988 - 19 June 1989 and (ii) Bihar State 15-Point Implementation Committee for Welfare of Minorities, 20 June 1989 - November 1990; Political Secretary to President, Indian National Congress, December 1996 - 4 September 1997; Member, (i) Indian Parliamentary Delegation headed by Honble Speaker in the Inter-Parliamentary Conference, Ottawa (Canada), 1985, (ii) Indian Parliamentary delegation in Inter-Parliamentarians Conference, Bulgaria, 1987, (iii) Indian Goodwill Haj delegation to Saudi Arabia, 1988, and (iv) Indian Parliamentary Delegation to participate in the Meeting of Standing Committee on Political Affairs and Ad-hoc Working Group on ICT of the Asian Parliametnary Assembly, Tehran, 2010
Election results
Party | Candidate | Votes | % | ± | |
---|---|---|---|---|---|
NCP | Shah Tariq Anwar | 4,31,292 | 44.11 | ||
BJP | Nikhil Kumar Choudhary | 3,16,552 | 32.37 | ||
JD(U) | Ram Prakash Mahto | 1,00,765 | 10.30 | ||
JMM | Baleshwar Marandi | 33,593 | 3.44 | ||
IND. | Ashok Kumar Bhagat | 15,547 | 1.59 | ||
NOTA | None of the Above | 3,287 | 0.34 | ||
Majority | 1,14,740 | 11.74 | |||
Turnout | 9,77,830 | 67.60 | |||
NCP gain from BJP | Swing |
Party | Candidate | Votes | % | ± | |
---|---|---|---|---|---|
BJP | Nikhil Kumar Choudhary | 2,69,834 | 37.23 | ||
NCP | Shah Tariq Anwar | 2,55,819 | 35.30 | ||
LJP | Ahmad Ashfaque Karim | 45,773 | 6.32 | ||
IND. | Himraj Singh | 42,026 | 5.80 | ||
CPI(ML) (L) | Mahboob Alam | 32,035 | 4.42 | ||
IND. | Mohammad Hamid Mubarak | 23,894 | 3.30 | ||
Majority | 14,015 | 1.93 | |||
Turnout | 7,24,802 | 56.95 | |||
BJP hold | Swing |
Katihar General Election 2014 Results
Candidate | Party | Votes |
---|---|---|
Tariq Anwar | Nationalist Congress Party | 431292 |
Nikhil Kumar Choudhary | Bharatiya Janata Party | 316552 |
Dr. Ram Prakash Mahto | Janata Dal (United) | 100765 |
Baleshwar Marandi | Jharkhand Mukti Morcha | 33593 |
Ashok Ku Bhagat | Independent | 15547 |
Kanhai Mandal | Independent | 10516 |
Mahbub Alam | Communist Party of India (Marxist-Leninist) (Liberation) | 9461 |
Ashok Kumar | Independent | 9000 |
Mahammad Hamid Mobarak | All India Trinamool Congress | 8392 |
Nalini Mandal | Independent | 7969 |
Md. Tariq Anwar | Independent | 4514 |
Suresh Ray | Rashtravadi Janata Party | 4450 |
Bibhaker Jha (@) Victor Jha | Aam Aadmi Party | 4323 |
Fulmani Hembram | Bharat Vikas Morcha | 3096 |
Shivendra Kumar | Bahujan Samaj Party | 2685 |
Satyanarayan Bhagat | Proutist Sarva Samaj | 2550 |
Abdur Rahman | Bharatiya Momin Front | 2489 |
Raj Kumar Mandal | Independent | 2141 |
Mahesh Mandal | Bahujan Mukti Party | 1980 |
Sanjay Singh | Independent | 1675 |
Md. Iqbal Ahmad | Samajwadi Janata Party (Rashtriya) | 1553 |
None of the Above | None of the Above | 3287 |
List of winner/current and runner up MPs Katihar Parliamentary Constituency.
The table below represents the names of all the winning and runner up MPs of Katihar parliamentary constituency of all the years from the starting until now .The current sitting member of parliament of the Katihar constituency is Shri Tariq Anwar of Nationalist Congress Party.Year | PC No. | PC Name | Category | Winner | Gender | Party | Vote | Runner Up | Gender | Party | Vote |
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
2014 | 11 | Katihar | Gen | Tariq Anwar | M | Nationalist Congress Party | 431292 | Nikhil Kumar Choudhary | M | BJP | 316552 |
2009 | 11 | Katihar | GEN | Choudhary,Shri Nikhil Kumar | M | BJP | 269834 | Harish Choudhar | M | NCP | 255819 |
2004 | 25 | Katihar | GEN | Nikhil Kumar Choudhary | M | BJP | 288922 | Shah Tariq Anwar | M | NCP | 286357 |
1999 | 25 | Katihar | GEN | Nikhil Kumar Choudhary | M | BJP | 280911 | Tariq Anwar | M | NCP | 144059 |
1998 | 25 | Katihar | GEN | Tariq Anawar | M | INC | 337360 | Nikhil Kumar Choudhary | M | BJP | 316923 |
1996 | 25 | Katihar | GEN | Tariq Anwar | M | INC | 267927 | Nikhil Kumar Choudhary | M | BJP | 179641 |
1991 | 24 | Katihar | GEN | Md. Yunus Salim | M | JD | 174430 | Tarique Anwer | M | INC | 150808 |
1989 | 25 | Katihar | GEN | Yuvarj | M | JD | 338782 | Tarique Anwar | M | INC | 235604 |
1984 | 25 | Katihar | GEN | Tariq Anwar | M | INC | 229883 | Juvraj | M | JNP | 183940 |
1980 | 25 | Katihar | GEN | Shah Tarique Anwar | M | INC(I) | 138099 | Yuvraj | M | JNP | 99943 |
1977 | 25 | Katihar | GEN | Yuvraj | M | BLD | 215074 | Shah Mohammad Tarique (Anwar) | M | INC | 85285 |
1971 | 23 | Katihar | GEN | Gyaneshwar Prasad Yadav | M | BJS | 96422 | Sita Ram Keshri | M | INC | 83533 |
1967 | 23 | Katihar | GEN | S. Keshari | M | INC | 58776 | P. Gupta | M | PSP | 57803 |
1962 | 23 | Katihar | GEN | Priya Gupta | F | PSP | 82531 | Bhola Nath Biswas | M | INC | 64994 |
1958 | By Polls | Katihar | GEN | B. Biswas | M | INC | 57290 | Juvraj | M | PSP | 32952 |
1957 | 19 | Katihar | GEN | Awadhesh Kumar Singh | M | INC | 78289 | Safiqul Haque | M | IND | 24283 |
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.