खडकवासला विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ ; राजकीय लाभ कोणाला?
खडकवासला विधानसभा मतदारसंघातील १३ प्रमुख भागातील केंद्र संख्येत वाढ झाल्यचे दिसून येत आहे. या १३ भागामध्ये २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत २७० मतदान केंद्र होती मात्र नव्याने मतदारांची नोंद या भागामध्ये झाल्याने २७० मतदान केंद्र वरून ही ३३७ मतदान केंद्रांची संख्या झाली आहे. म्हणजेच ६७ केंद्रांची भर पडली आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघातील १३ प्रमुख भागामध्ये प्रामुख्याने वारजे, शिवणे, धायरी, बिबवेवाडी, कात्रज, बावधन खुर्द, नऱ्हे, धनकवडी, वडगाव बु., कोंढवे धावडे, नांदेड, किरकटवाडी, वडगाव खुर्द यांचा समावेश आहे. या भागात मतदार संख्या व केंद्र संख्येत वाढ झालेली आहे.
खडकवासला विधानसभा मतदारसंघातील प्रमुख 4 भागामध्ये मतदारसंख्या व मतदान केंद्र वाढ तुलनात्मकदृष्ट्या पाहिल्यास विभाग अ (धनकवडी, बिबवेवाडी, कात्रज) मध्ये २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत ९३ मतदान केंद्र होती त्यामध्ये वाढ होऊन आता आगामी निवडणुकीसाठी या विभागानुसार एकूण १११ मतदान केंद्रांची संख्या झाली आहे. या विभागात एकूण १८ ने केंद्र संख्येत वाढ झालेली आहे.
विभाग ब (वडगाव बु., धायरी, नांदेड, नऱ्हे, किरकटवाडी, वडगाव खुर्द) मध्ये २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत १०० मतदान केंद्र होती त्यामध्ये वाढ होऊन आता आगामी निवडणुकीसाठी या विभागानुसार १२२ मतदान केंद्रांची संख्या झाली आहे. या विभागात एकूण २२ ने केंद्र संख्येत वाढ झालेली आहे.
विभाग क ( वारजे, शिवणे, कोंढवे धावडे) मध्ये २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत ७० मतदान केंद्र होती त्यामध्ये वाढ होऊन आता आगामी निवडणुकीसाठी या विभागानुसार ९१ मतदान केंद्रांची संख्या झाली आहे. या विभागात एकूण २१ ने केंद्र संख्येत वाढ झालेली आहे.
विभाग ड (बावधन खुर्द) मध्ये २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत ७ मतदान केंद्र होती त्यामध्ये वाढ होऊन आता आगामी निवडणुकीसाठी या विभागानुसार १३ मतदान केंद्रांची संख्या झाली आहे. या विभागात एकूण ६ ने केंद्र संख्येत वाढ झालेली आहे.
तुलनात्मकदृष्ट्या धनकवडी, बिबवेवाडी, कात्रज या विभागापेक्षा वडगाव बु., धायरी, वारजे, शिवणे, बावधन खुर्द या भागातील संख्येत जास्त वाढ झालेली असल्याचे दिसून येते.
अधिक तपशीलवार माहितीसाठी संपर्क-
Mr.Chandrakant Bhujbal - 9422323533
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.