Friday, 31 May 2019

अमित शहा देशाचे नवे गृहमंत्री; 57 मंत्र्यांना खाते वाटप जाहीर संपूर्ण यादी

निर्मला सीतारमन अर्थमंत्री तर राजनाथ सिंग संरक्षणमंत्री


अमित शाह यांच्याकडे गृह मंत्रालयाची तर निर्मला सीतारमन यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर माजी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या महाविजयानंतर मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी सलग दुसऱ्यांदा शपथ घेतली. त्यात २४ कॅबिनेट मंत्री, ९ स्वतंत्र कारभार सांभाळणारे राज्यमंत्री आणि २४ राज्यमंत्र्यांचा समावेश होता. शुक्रवारी सकाळी खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. डॉ. सुब्रमण्यन जयशंकर यांची परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रमेश पोखरियाल निषांक यांच्याकडे मनुष्यबळ विकास खाते, अर्जुन मुंडा यांच्याकडे आदिवासी कल्याण खाते, स्मृती इराणी यांच्याकडे महिला व बालकल्याण व वस्त्रोद्योग खाते, डॉ हर्षवर्धन यांच्याकडे आरोग्य, विज्ञान तंत्रज्ञान व भूविज्ञान खाती, प्रकाश जावडेकर यांच्याकडे पर्यावरण खाते, पियुष गोयल यांच्याकडे रेल्वे व कॉमर्स व इंडस्ट्री खाते, धर्मेंद्र प्रधान पेट्रोलियम गॅस व पोलाद खाते, मुख्तार अब्बास नक्वी यांच्याकडे अल्पसंख्याक खाते, प्रल्हाद जोशी यांच्याकडे संसदीय कामकाज खाते व महेंद्रनाथ पांडे यांच्याकडे कौशल्य विकास खाते सोपवण्यात आले आहे. नरेंद्र सिंह तोमर यांची कृषी मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली असून स्मृती इराणी यांची महिला आणि बाल विकासमंत्री, नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते आणि परिवहन मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाची धूरा रमेश पोखरियाल यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळ

1. नरेंद्र मोदी    -  पंतप्रधान -पंतप्रधान कार्यालय,कार्मिक मंत्रालय,जनतक्रार आणि पेन्शन मंत्रालय,आण्विक ऊर्जा मंत्रालय,अंतराळ मंत्रालय योजनांशी संबंधित सर्व मुद्दे
 2. राजनाथ सिंग (कॅबिनेट मंत्री)   -   संरक्षण मंत्रालय
 3. अमित शहा (कॅबिनेट मंत्री)    -    गृह मंत्रालय
 4. नितीन गडकरी (कॅबिनेट मंत्री)   -   वाहतूक, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
 5. सदानंद गौडा (कॅबिनेट मंत्री)   -  केमिकल आणि फर्टीलायझर्स
 6. निर्मला सीतारामन (कॅबिनेट मंत्री)   -  वित्त व कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय
 7 रामविलास पासवान   -   ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण
 8. नरेंद्र सिंग तोमर (कॅबिनेट मंत्री)   -   कृषी आणि शेतक-यांचे कल्याण, ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्रालय
 9. रविशंकर प्रसाद (कॅबिनेट)   -   कायदा आणि न्याय, कम्युनिकेशन्स आणि इलेक्ट्रॉनिक आणि माहिती मंत्रालय
 10 हरसिमरत कौर बादल (कॅबिनेट)   -  अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय
 11. एस जयशंकर (कॅबिनेट मंत्री)   -   परराष्ट्र मंत्रालय
 12 रमेश पोखरियाल निशंक (कॅबिनेट)   -   मनुष्यबळ विकास मंत्री
 13 थावर चंद गहलोत (कॅबिनेट)    -   सामाजिक न्याय व सक्षमीकरण
 14. अर्जुन मुंडा (कॅबिनेट मंत्री)   -   आदिवासी विकास मंत्रालय
 15 स्मृती ईराणी (कॅबिनेट)   -   महिला व बाल विकास, वस्त्रोद्योग मंत्रालय
 16 हर्ष वर्धन (कॅबिनेट)   -    आरोग्य व कुटुंब कल्याण, विज्ञान आणि तंत्रज्ञान - भूविज्ञान मंत्रालय
 17. प्रकाश जावडेकर (कॅबिनेट)    -   पर्यावरण, वने आणि हवामान बदल आणि माहिती व प्रसारण
 18 पियुष गोयल (कॅबिनेट)   -   रेल्वे आणि वाणिज्य मंत्रालय
 19. धर्मेंद्र प्रधान (कॅबिनेट)    -   पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि स्टील मंत्रालय
 20, मुख्तार अब्बास नक्वी (कॅबिनेट मंत्री)   -  अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय
 21 प्रल्हाद जोशी (कॅबिनेट)  - संसदीय कामकाज, कोळसा आणि खाण मंत्रालय
 22 महेंद्रसिंग नाथ पांडे (कॅबिनेट) - कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय
 23. अरविंद सावंत (कॅबिनेट) - अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम 
 24 गिरिराज सिंह (कॅबिनेट)  - पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय
 25 गजेंद्र सिंग शेखावत (कॅबिनेट) - जलशक्ती मंत्रालय

राज्यमंत्री - स्वतंत्र पदभार

 26. संतोष गंगवार (राज्यमंत्री-स्वतंत्र कार्यभार) - श्रम आणि रोजगार मंत्रालय
 27. राव इंद्रजीत सिंग (राज्य-स्वतंत्र कार्यभार ) स्टॅटेक्टीक्स आणि इम्पिमेशन आणि नियोजन मंत्रालय
 28. श्रीपाद नाईक (राज्यमंत्री-आयसी) - आयुष मंत्रालय (स्वतंत्र कार्यभार), संरक्षण मंत्रालय (राज्यमंत्री)
 29. जितेंद्र सिंह - राज्यमंत्री पंतप्रधान कार्यालय, तक्रार निवारण, पेन्शन, अणू ऊर्जा, अंतराळ मंत्रालय  (राज्यमंत्री)
 30 किरण रिजिजू (राज्यमंत्री-स्वतंत्र कार्यभार) - युवक कल्याण आणि क्रीडा (स्वतंत्र कार्यभार), अल्पसंख्याक व्यवहार (राज्यमंत्री)
 31 प्रह्लाद सिंग पटेल - संस्कृती आणि पर्यटन (स्वतंत्र कार्यभार) 
 32 आर. के सिंह  - (राज्यमंत्री) ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा, (स्वतंत्र कार्यभार) कौशल्य विकास आणि उद्योजकता
 33. हरदीप सिंह पुरी (राज्यमंत्री), नागरी विकास आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय (स्वतंत्र कार्यभार), वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय (राज्यमंत्री)
 34. मनसुख मंडाविया - (राज्यमंत्री) जलवाहतूक (स्वतंत्र कार्यभार), रसायन आणि खते (राज्यमंत्री)

राज्यमंत्री 

 35. फग्गन सिंग कुलस्ते (राज्यमंत्री) स्टील मंत्रालय
 36. अश्विनी चौबे (राज्यमंत्री) आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री
 37. व्ही के सिंग (राज्यमंत्री) - रस्ते वाहतूक आणि राज्य महामार्ग मंत्री
 38. कृष्णन पाल, गुज्जर समाजाचे (राज्यमंत्री) - सामाजिक न्याय आणि सशक्तिकरण 
 39. दानवे रावसाहेब दादाराव (राज्यमंत्री) - ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री
 40. जी किशन रेड्डी (राज्यमंत्री) - गृह राज्यमंत्री
 41. पुरुषोत्तम रुपाला (राज्यमंत्री) - कृषी आणि शेतकरी कल्याण राज्य मंत्री
 42 रामदास आठवले (राज्यमंत्री) - सामाजिक न्याय आणि सशक्तिकरण राज्यमंत्री
 43. साध्वी निरंजन ज्योती (राज्यमंत्री) -  ग्रामीण विकास राज्यमंत्री
 44. बाबुल सुप्रियो (राज्यमंत्री) -  पपर्यावरण मंत्रालय, वन आणि हवामान बदल
 45. संजीव कुमार बलियान (राज्य मंत्री) - पशुपालन, दुग्ध आणि मत्स्यपालन राज्य मंत्री
 46 संजय धोत्रे (राज्यमंत्री) - मनुष्यबळ विकास, कम्युनिकेशन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री
 47. अनुराग सिंग ठाकूर (राज्यमंत्री) - वित्त आणि कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालय राज्यमंत्री
 48. सुरेश अंगडी (राज्यमंत्री) - रेल्वे मंत्रालय राज्यमंत्री
 49. नित्यानंद राय (राज्यमंत्री) - गृह राज्यमंत्री
 50. व्ही मुरलीधरन (राज्यमंत्री) - परराष्ट्र मंत्रालय, संसदीय कामकाज राज्यमंत्री
 51. रेणुका सिंग (राज्यमंत्री) - आदिवासी विकास राज्यमंत्री
 52 सोम प्रकाश (राज्यमंत्री) - वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री
 53. रामेश्वर तेली (राज्यमंत्री) - अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री
 54. प्रताप चंद्र सारंगी (राज्यमंत्री) - सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग, पशुपालन, दुग्ध आणि मत्स्यपालन राज्यमंत्री
 55 कैलाश चौधरी (राज्यमंत्री) -  कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री
 56. देबश्री चौधरी (राज्यमंत्री) - महिला आणि बालकल्याण विकास राज्यमंत्री
 57 अर्जुन राम मेघवाल (राज्यमंत्री) - संसदीय कामकाज, अवजड उद्योग आणि सार्वजनिक उद्योग राज्यमंत्री
 58. रतन लाल कटारिया (राज्यमंत्री) - जलशक्ती आणि सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण राज्यमंत्री
======================================

मनेका गांधी, राज्यवर्धनसह ३६ मंत्र्यांना स्थान नाही; आणखी २३ जणांना मंत्रिपद मिळू शकते

नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह ५७ मंत्र्यांनीदेखील शपथ घेतली. यात २४ कॅबिनेट, ९ स्वतंत्र प्रभारासह राज्यमंत्री, तर २४ राज्यमंत्री आहेत. नियमानुसार मंत्रिमंडळात आणखी २३ जणांना मंत्रिपद मिळू शकते. मागील सरकारमधील ३६ मंत्र्यांना या वेळी स्थान मिळालेले नाही. यात अरुण जेटली, सुषमा स्वराज, उमा भारती, मनेका गांधी, महेश शर्मा, जेपी नड्डा, राज्यवर्धनसिंह राठोड, अनुप्रिया पटेल, सत्यपाल सिंह, मनोज सिन्हा, अनंतकुमार हेगडे यांचा समावेश आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी आणि सदानंद गौडा हे मोदींनंतरचे सर्वात ज्येष्ठ मंत्री आहेत. सर्वाधिक ९ मंत्री उत्तर प्रदेशचे आहेत. मागील वेळी या राज्यातून १३ मंत्री होते. स्वबळावर बहुमत मिळालेल्या भाजपने आपले घटक पक्ष शिवसेना, अकाली दल, लोजप आणि रिपाइं यांना प्रत्येकी एक मंत्रिपद दिले आहे. बिहारमध्ये जदयूच्या सोबतीने ४० पैकी ३९ जागा मिळवूनही जदयूला एकही मंत्रिपद नाही. जदयूचे प्रमुख नितीशकुमार यांनी सरकारमध्ये राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान ६ महिलांचा समावेश असून या मध्ये निर्मला सीतारमण, हरसिमरतकौर बादल, स्मृती इराणी, साध्वी निरंजन ज्योती, रेणुका सिंह आणि देबश्री चौधरी आहेत. मागच्या वेळी ७ महिला मंत्री होत्या. मात्र अद्याप २३ पदे रिक्त आहेत. मुख्तार अब्बास नक्वी एकमेव मुस्लिम मंत्री. मागच्या वेळी ३ होते. हेपतुल्ला, एम.जे. अकबर आणि नक्वी. २४ राज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. ज्या ६ राज्यांत यंदा व पुढील वर्षी निवडणुका तेथील १६ जणांना मंत्रीपदाची संधी देण्यात आलेली आहे. यंदा ऑक्टोबर -नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या तीन राज्यांत विधानसभा निवडणूक आहे. या राज्यांतून ९ मंत्री झाले आहेत. पुढील वर्षी बिहार, दिल्ली आणि पुद्दुचेरी येथे निवडणुका आहेत. या तीन राज्यांतून ७ मंत्री झाले आहेत. यात ६ जण बिहारचे आहेत. ११ मंत्री राज्यसभेतून घेण्यात आले आहेत यामध्ये ६ कॅबिनेट मंत्री व ५ राज्यमंत्री आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी प. बंगालमधून भाजपला १८ जागा मिळाल्या आहेत. तेथून २ मंत्री झाले. बाबूल सुप्रियो आणि देबश्री चौधरी. मागच्या वेळीही प. बंगालचे २ मंत्री होते. ओडिशात भाजपला प्रथमच ८ जागा मिळाल्या आहेत. तेथून प्रतापचंद सारंगींना मंत्रिपद मिळाले आहे. मागील वेळी एक मंत्री होता. ३२७ जागा असलेल्या १३ राज्यांतून एनडीएने २९६ जागा जिंकल्या, तेथून ४६ मंत्री; प्रत्येकी ८ मंत्री यूपी व महाराष्ट्राचे उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, बिहार, झारखंड, महाराष्ट्र, दिल्ली आणि कर्नाटकातून एकूण ३२७ जागांपैकी एनडीएने २९६ जागा जिंकल्या आहेत. त्या राज्यांतून ४६ मंत्री झाले आहेत. सर्वाधिक ८ मंत्री महाराष्ट्र, उत्तर प्रदेशमधील आहेत. निर्मला सीतारामण या देशातील पहिल्या पूर्णवेळ महिला केंद्रीय अर्थमंत्री ठरल्या आहेत. यापूर्वी १९७०-७१मध्ये इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान असताना अर्थ खातं त्यांच्याकडे ठेवलं होतं. मात्र सीतारामण या खऱ्या अर्थाने पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत. यापूर्वीही त्यांनी पहिल्या पूर्णवेळ महिला संरक्षणमंत्री म्हणून काम पाहिले आहे. 

महाराष्ट्राला केंद्रीय मंत्रिमंडळात २०१४ मध्ये ११ मंत्रिपदे मिळाली होती 

नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्राला केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे स्थान देत ११ मंत्रिपदे दिली होती. यात पीयूष गोयल, नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, गोपीनाथ मुंडे, अनंत गिते, हंसराज अहिर, सुभाष भामरे आणि रावसाहेब दानवे यांच्यासोबत शिवसेनेत असलेल्या सुरेश प्रभू यांना भाजपत घेत त्यांनाही मंत्रिपद देण्यात आले होते. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी रामदास आठवले यांची राज्यसभेवर वर्णी लावून त्यांनाही राज्यमंत्रिपद देण्यात आले होते.मागील वेळी धुळ्याचे खासदार सुभाष भामरे यांना संरक्षण राज्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी जबाबदारी दिली होती. परंतु मतदारसंघात व केंद्रातही त्यांनी विशेष काम केले नसल्याने त्यांना या वेळी नरेंद्र मोदी यांनी मंत्रिपदापासून दूर ठेवल्याचे दिसून येत आहे. दरम्यान २००९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी महाराष्ट्राला सात मंत्रिपदे दिली होती. त्यातील राजीव शुक्ला आणि तारिक अन्वर हे महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर गेले होते. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, प्रफुल्ल पटेल आणि प्रतीक पाटील (राज्यमंत्री) यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले होते.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================



Cabinet Ministers

1. Shri Raj Nath Singh Minister of Defence.
2. Shri Amit Shah Minister of Home Affairs.
3. Shri Nitin Jairam Gadkari Minister   of   Road   Transport   and   Highways; and
Minister     of     Micro,     Small     and     Medium Enterprises.
4. Shri D.V. Sadananda Gowda Minister of Chemicals and Fertilizers.
5. Smt. Nirmala Sitharaman Minister of Finance; and Minister of Corporate Affairs.
6. Shri Ramvilas Paswan Minister    of    Consumer    Affairs,    Food    and Public Distribution.
7. Shri Narendra Singh Tomar Minister of Agriculture and Farmers Welfare; Minister of Rural Development; and
Minister of Panchayati Raj.
8. Shri Ravi Shankar Prasad Minister of Law and Justice; Minister of Communications; and
Minister    of    Electronics    and    Information Technology.
9. Smt. Harsimrat Kaur Badal Minister of Food Processing Industries.
10. Shri Thaawar Chand Gehlot Minister of Social Justice and Empowerment.
11. Dr. Subrahmanyam Jaishankar Minister of External Affairs.
12. Shri Ramesh Pokhriyal ‘Nishank’ Minister of Human Resource Development.
13. Shri Arjun Munda Minister of Tribal Affairs.
14. Smt. Smriti Zubin Irani Minister  of  Women  and  Child  Development; and Minister of Textiles.
15. Dr. Harsh Vardhan Minister of Health and Family Welfare; Minister of Science and Technology; and Minister of Earth Sciences.
16. Shri Prakash Javadekar Minister  of  Environment,  Forest  and  Climate Change; and
Minister of Information and Broadcasting.
17. Shri Piyush Goyal Minister of Railways; and
Minister of Commerce and Industry.
18. Shri Dharmendra Pradhan Minister of Petroleum and Natural Gas; and Minister of Steel.
19. Shri Mukhtar Abbas Naqvi Minister of Minority Affairs.
20. Shri Pralhad Joshi Minister of Parliamentary Affairs; Minister of Coal; and
Minister of Mines.
21. Dr. Mahendra Nath Pandey Minister       of       Skill       Development       and Entrepreneurship.
22. Shri Arvind Ganpat Sawant Minister    of    Heavy    Industries    and    Public Enterprise.
23. Shri Giriraj Singh Minister  of  Animal  Husbandry,  Dairying  and Fisheries.
24. Shri Gajendra Singh Shekhawat Minister of Jal Shakti.

============================

Members  of the Union Council of Ministers:-

1. Shri Shripad Yesso Naik Minister  of  State  (Independent  Charge)  of the     Ministry     of     Ayurveda,     Yoga     and Naturopathy,         Unani,         Siddha         and Homoeopathy (AYUSH); and
Minister of State in the Ministry of Defence.
2. Dr. Jitendra Singh Minister  of  State  (Independent  Charge)  of the    Ministry    of    Development    of    North Eastern Region;
Minister   of   State   in   the   Prime   Minister’s Office;
Minister    of    State    in    the    Ministry    of Personnel, Public Grievances and Pensions; Minister   of   State   in   the   Department   of Atomic Energy; and
Minister   of   State   in   the   Department   of Space.
3. Shri Kiren Rijiju Minister  of  State  (Independent  Charge)  of the   Ministry   of   Youth   Affairs   and   Sports; and
Minister  of  State  in  the  Ministry  of  Minority Affairs.
4. Shri Prahalad Singh Patel Minister  of  State  (Independent  Charge)  of the Ministry of Culture; and
Minister  of  State  (Independent  Charge)  of the Ministry of Tourism.
5. Shri Raj Kumar Singh Minister  of  State  (Independent  Charge)  of the Ministry of Power;
Minister  of  State  (Independent  Charge)  of the  Ministry  of  New  and  Renewable  Energy; and
Minister   of   State   in   the   Ministry   of   Skill Development and Entrepreneurship.
6. Shri Hardeep Singh Puri Minister  of  State  (Independent  Charge)  of the Ministry of Housing and Urban Affairs; Minister  of  State  (Independent  Charge)  of the Ministry of Civil Aviation; and
Minister    of    State    in    the    Ministry    of Commerce and Industry.
7. Shri Mansukh L. Mandaviya Minister  of  State  (Independent  Charge)  of the Ministry of Shipping; and
Minister    of    State    in    the    Ministry    of Chemicals and Fertilizers.
8. Shri Arjun Ram Meghwal Minister     of     State     in     the     Ministry     of Parliamentary Affairs; and
Minister  of  State  in  the  Ministry  of  Heavy Industries and Public Enterprises.
9. General (Retd.) V. K. Singh Minister   of   State   in   the   Ministry   of   Road Transport and Highways.
10. Shri Krishan Pal Minister  of  State  in  the  Ministry  of  Social Justice and Empowerment.
11. Shri Danve Raosaheb Dadarao Minister of State in the Ministry of Consumer Affairs, Food and Public Distribution.
12. Shri G. Kishan Reddy Minister  of  State  in  the  Ministry  of  Home Affairs.
13. Shri Parshottam Rupala Minister     of     State     in     the     Ministry     of Agriculture and Farmers Welfare.
14. Shri Ramdas Athawale Minister  of  State  in  the  Ministry  of  Social Justice and Empowerment.
15. Sadhvi Niranjan Jyoti Minister   of   State   in   the   Ministry   of   Rural Development.
16. Shri Babul Supriyo Minister     of     State     in     the     Ministry     of Environment, Forest and Climate Change.
17. Shri Sanjeev Kumar Balyan Minister  of  State  in  the  Ministry  of  Animal Husbandry, Dairying and Fisheries.
18. Shri Dhotre Sanjay Shamrao Minister  of  State  in  the  Ministry  of  Human Resource Development;
Minister     of     State     in     the     Ministry     of Communications; and
Minister     of     State     in     the     Ministry     of Electronics and Information Technology.
19. Shri Anurag Singh Thakur Minister  of  State  in  the  Ministry  of  Finance; and
Minister of State in the Ministry of Corporate Affairs.
20. Shri Angadi Suresh Channabasappa Minister of State in the Ministry of Railways.
21. Shri Nityanand Rai Minister  of  State  in  the  Ministry  of  Home Affairs.
22. Shri Rattan Lal Kataria Minister   of   State   in   the   Ministry   of   Jal Shakti;  and  Minister  of  State  in  the  Ministry of Social Justice and Empowerment.
23. Shri V. Muraleedharan Minister  of  State  in  the  Ministry  of  External Affairs;  and  Minister  of  State  in  the  Ministry of Parliamentary Affairs.
24. Smt. Renuka Singh Saruta Minister  of  State  in  the  Ministry  of  Tribal Affairs.
25. Shri Som Parkash Minister     of     State     in     the     Ministry     of Commerce and Industry.
26. Shri Rameswar Teli Minister   of   State   in   the   Ministry   of   Food Processing Industries.
27. Shri Pratap Chandra Sarangi Minister  of  State  in  the  Ministry  of  Micro, Small  and  Medium  Enterprises;  and  Minister of State in the Ministry of Animal Husbandry, Dairying and Fisheries.
28. Shri Kailash Choudhary Minister     of     State     in     the     Ministry     of Agriculture and Farmers Welfare.
29. Sushri Debasree Chaudhuri Minister  of  State  in  the  Ministry  of  Women and Child Development.

Monday, 27 May 2019

सुनील तटकरे यांच्या नामसाधर्म्य उमेदवारांमुळे राष्ट्रवादीच्या मताधिक्यात घट; राजू शेट्टी यांनाही फटका

सुनील तटकरे यांच्या नामसाधर्म्य असलेल्या २ उमेदवारांमुळे राष्ट्रवादीच्या मताधिक्यात १३,८७८ मतांनी घट


रायगड लोकसभा मतदारसंघात एकूण ३९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते २ जणांचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरविण्यात आले यामध्ये शिवसेनेचे नेते अनंत गीते यांच्या नामसाधर्म्य असलेले अनंत पद्मा गीते यांचा अर्ज बाद झालेल्यांमध्ये समावेश आहे. ८ उमेदवारांनी माघार घेतल्याने 16 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या नामसाधर्म्य असलेले २ उमेदवार या निवडणुकीत होते. रायगडमध्ये मागील २०१४ लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांचा अवघ्या २ हजार ११० मतांनी पराभव झाला होता आणि तोही तटकरेंमुळेच, कारण त्यांच्या विरोधात नामसाधर्म्य असलेले उमेदवार सुनील श्याम तटकरे यांना तब्बल ९ हजार ८४९ मते मिळाली होती. हा पराभव सुनील तटकरे यांच्या जिव्हारी लागला होता. यंदाच्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत देखील सुनील तटकरे यांच्या विरोधात १ नव्हे तर २ नामसाधर्म्य असलेले उमेदवार देण्यात आले ते म्हणजे सुनील पांडुरंग तटकरे ज्यांना ४ हजार १२६ मते  आणि सुनील सखाराम तटकरे ९ हजार ७५२ मते यंदाच्या निवडणुकीत मिळाली ज्यामुळे राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांचे मताधिक्य १३ हजार ८७८ मतांनी कमी झाले आहे. नाहीतर ३१ हजार मतांचा सुनील तटकरेंचे मताधिक्य १३ हजार मतांनी वाढले असते. यावेळी विरोधकांचा तटकरे विरुद्ध तटकरे फॉर्म्युला यंदा फेल झाल्याचे दिसून आले.

रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार/पक्ष व त्यांना मिळालेले मतदान 

NO
Candidate
Party
Total Votes
% of Votes
1
Tatkare Sunil Dattatray
NCP
486968
47.49
2
Anant Geete
Shivsena
455530
44.42
3
Suman Bhaskar Koli
Vanchit 
23196
2.26
4
Subhash Janardan Patil
Ind
12265
1.2
5
NOTA
NOTA
11490
1.12
6
Sunil Sakharam Tatkare
Ind
9752
0.95
7
Milind B. Salvi
BSP
6356
0.62
8
Avinash Vasant Patil
Ind
4689
0.46
9
Sunil Pandurang Tatkare
Ind
4126
0.4
10
Gajendra Parshuram Turbadkar
Kranti Sena
2192
0.21
11
Sandip Pandurang Parte
B. Maha P.
1482
0.14
12
Yogesh Kadam
Ind
1476
0.14
13
Nathuram Hate
B. Mukti P.
1441
0.14
14
Ghag Sanjay Arjun
Ind
1417
0.14
15
Munafar Jainubhidin Choudhary
Ind
1215
0.12
16
Madhukar Mahadev Khamkar
Ind
1049
0.1
17
Prakash Sakharam Kalke
BKP
823
0.08

Total
1025467

तटकरे नामसाधर्म्य एकूण मते
13878
मताधिक्य
31438
मताधिक्यातील फरक
17560
नोटा
11490
वंचित मतदान
23196

============================================
राजू शेट्टी यांच्या नामसाधर्म्य उमेदवाराला रघुनाथ पाटीलांच्या दुप्पटीने मते


हातकणंगले लोकसभा मतदारसंघात एकूण 2३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते ३ जणांचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरविण्यात आले. ३ उमेदवारांनी माघार घेतल्याने 17 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यामध्ये स्वभिमानीचे उमेदवार राजू शेट्टी यांच्या नामसाधर्म्य असलेला एक उमेदवार या निवडणुकीत होते. त्यांना बहुजन महा पार्टीने उमेदवारी दिलेली होती त्यांना 8103 एवढी मते मिळाली आहेत तर शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांना मतदारांचा अल्प प्रतिसाद मिळाला असून त्यांना केवळ 2820 मते प्राप्त झालेली आहेत या मतदारसंघात कोणताही लायक उमेदवार नसल्याने नोटाला 7108 मतदारांनी मतदान दिले आहे. नामसाधर्म्य असलेल्या राजू शेट्टी यांचे आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडणूक रिंगणात नसते तर स्वाभिमान संघटनेचे राजू शेट्टी यांनी 35483 मतांनी शिवसेनेवर मात केली असती मात्र मतविभाजनाचा फटका त्यांना चांगलाच बसला आहे. मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने मुस्लीम उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्याने सरकारविरोधी मतदान त्याच्याकडे आकर्षित झाल्याने 123419 मतदान झाले. याचा सर्वाधिक फटका राजू शेट्टी यांना बसला आहे. 

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार/पक्ष व त्यांना मिळालेले मतदान

NO
Candidate
Party
 Votes
% of Votes
1
Dhairyasheel Sambhajirao Mane
Shivsena
585776
46.78
2
Raju Anna Shetti
Swabhimani
489737
39.11
3
Aslam Badshahaji Sayyad
VBA
123419
9.86
4
Sangramsinh Jaysingrao Gaikwad
Ind
8695
0.69
5
Raju Mujikrao Shetty
BMP
8103
0.65
6
NOTA
NOTA
7108
0.57
7
Vijay Bhagwan Chougule
Ind
5974
0.48
8
Ajay Prakash Kurane
BSP
4156
0.33
9
Mahadev Jagannath Jagadale
Ind
3587
0.29
10
Anandrao Vasantrao Sarnaik
Ind
3316
0.26
11
Patil Raghunath Ramchandra
Ind
2820
0.23
12
Aitawade Vidyasagar Devappa
Ind
1991
0.16
13
Prof. Dr. Prashant Gangawane
BRSP
1744
0.14
14
Kamble Vishwas Ananda
Ind
1408
0.11
15
Kishor Rajaram Panhalkar
Ind
1184
0.09
16
Madan Vajir Sardar
BMP
1181
0.09
17
Dr. Nitin Udal Bhat
Ind
1011
0.08
18
Sanjay Ghanshyam Agrawal
Ind
1001
0.08

Total
1252211

राजू शेट्टी नामसाधर्म्य एकूण मते
8103
मताधिक्य
96039
नोटा
7108
वंचित मतदान
123419

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)

================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
================================================