Saturday, 29 September 2018

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर ओढवले होते संकट..

हेलकावणा-या विमानाचे औरंगाबाद मध्ये हार्डलँडिंग


आरोपामुळे राजकीय कारकीर्दीत ओढवलेल्या संकटातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणारे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर हेलकावणा-या विमानामुळे पुन्हा संकट ओढवले होते. जिवावर बेतणा-या प्रसंगाला त्यांना सामोरे जावे लागले. जेट एअरवेजचे मुंबईहून निघालेले विमान उड्डाणानंतर वीस मिनिटांनी अचानक हेलकावे घेऊ लागले. विमान हवेत वेगाने खाली येत असल्याची जाणीव होताच प्रवाशांच्या हृदयाचे ठोके चुकले. काही वेळाने पुन्हा ठरावीक उंची गाठून विमान स्थिरावले आणि दहा मिनिटांच्या या थरारक अनुभवानंतर सर्व प्रवाशांचा जीव कसाबसा भांड्यात पडला. पण हा थरार एवढ्यावरच थांबला नाही. औरंगाबादेत पुन्हा तोच अनुभव सर्व प्रवाशांना आला. धावपट्टीवर उतरताना जोरदार धक्के बसू लागले. यात एका प्रवाशाचे डोके आदळले, काहींना उलट्यांचा त्रास झाला आणि अखेर कसेबसे विमानाचे हार्ड लँडिंग झाले. या विमानात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे देखील प्रवास करत होते. या दुर्घटनेत इतर प्रवाशांसोबत ते देखील बालंबाल बचावले. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप असून तिघांना उलट्या, डॉक्टरला श्वसनाचा त्रास झाल्याची माहिती मिळाली. शुक्रवारी मुंबईहून सायंकाळी ४.४६ वाजता निघालेल्या या विमानातील प्रवासी प्रिया जैस्वाल (रा. टीव्ही सेंटर चौक, हडको) यांनी हा थरारक अनुभव एका वृत्तपत्रात कथन केला आहे. मुंबईतून विमानाने उड्डाण घेतले आणि वीस मिनिटांनंतर अचानक हेलकावे सुरू झाले. प्रवासी घाबरलेले होते. या अवस्थेत खाद्यपदार्थांची पाकिटे देण्यात आली. प्रवाशांनी एक-दोन घास घेतले असतानाच  विमान वेगाने खाली येऊ लागले. एक-दीड मिनिटांनी विमान त्याच अवस्थेत पुन्हा वरती येऊ लागले. हवामान खराब असल्याची सूचना विमानात देण्यात आली. एका प्रवाशाचे डोके यावेळी बॉक्सवर आदळले. या घटनेनंतर तिघांना उलट्या झाल्या. चिकलठाणा विमानतळावर हार्ड लँडिंग झाल्यावर उलट्याचा त्रास झालेल्या तिघांना सिग्मा रुग्णालयात प्रथमोपचार करुन सोडण्यात आले. जेट एअरवेजचे चिकलठाणा विमानतळावरील समन्वयक स्वामिनाथन यांनी मात्र असे काहीही झालेच नसल्याचे म्हंटले असून प्रथमच विमान प्रवास करणाऱ्या काही लोकांना उलट्या होतात. अनवधानाने एखाद्याचे डोके समोरच्या आसनावर आदळूही शकते. परंतु जखम होण्याइतकी दुखापत होत नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) 

राजकीय पक्षांनी लोकशाहीतील बंधने पाळणे आवश्यक - राज्य निवडणुक आयुक्त सहारिया

पंचवार्षिक निवडणुका लोकशाहीचा मुख्य पाया


भारतीय लोकशाही भक्कम करण्याचे कार्य निवडणुकांमुळे होते. त्यामुळे पंचवार्षिक निवडणुका हाच भक्कम लोकशाहीचा पाया आहे, असे प्रतिपादन राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी केले. तसेच स्थानिक नेतृत्व बळकट करून सत्तेचे समान वाटप करण्यासाठी भारतामध्ये त्रिस्तरीय लोकशाही पद्धत स्वीकारण्यात आली आहे असेही त्यांनी नमूद केले. राज्य निवडणूक आयोग, पुणे विभागीय आयुक्त कार्यालय तसेच पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित ‘लोकशाही, निवडणूक व सुशासन’ या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी सहारिया बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, निवृत्त विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर, अ‍ॅड. भास्करराव आव्हाड आदी उपस्थित होते. सहारिया म्हणाले, निवडणुक आयोगासमोर सर्व उमेदवार समान असून सर्वांनी आचारसंहितेचे पालन करणे अनिवार्य आहे. उमेदवारांनी चरित्र पडताळणी, प्रतिज्ञापत्र तसेच निवडणुकांच्या खर्चाचा हिशोब देणे बंधनकारक आहे. १९९२ मध्ये ऐतिहासिक घटनादुरूस्ती करण्यात आली. त्यानंतर स्थानिक स्वराज संस्थांना लोकशाहीमध्ये महत्त्व प्राप्त झाले. आयोगातर्फे घेण्यात येणा-या सर्वच निवडणुका पारदर्शीपणे घेण्याचे प्रयत्न निवडणूक आयोग करत आहे. राजकीय पक्षांनी लोकशाहीतील बंधने पाळणे आवश्यक असून निवडणुक आयोगाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालनही त्यांनी करावे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार केंद्र व राज्य निवडणूक आयोगांना समान अधिकार देण्यात आले आहेत. आचारसंहितेचे उल्लंघन करणा-या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याची तरतूदही घटनेत आहे. घटनादुरूस्तीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त नोव्हेंबर २०१७ पासून निवडणूक आयोगातर्फे नियमितपणे विविध कार्यशाळांचे आयोजित केले जाते. अजूनही अनेक तरूण निवडणूक प्रक्रियेच्या प्रवाहात आले नाहीत. त्यामुळे सर्व मतदारांची नोंदणी करून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणुक आयोग प्रयत्नशील आहे. यात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्यावा. विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देताना त्यांनी मतदार नोंदणी केल्याची खात्री करून घ्यावी, अशीही सूचना सहारिया यांनी यावेळी केली. कार्यशाळेच्या माध्यमातून निघणा-या निष्कर्षांचा लोकशाहीसाठी प्रभावीपणे वापर करण्यात येईल. कार्यशाळेत होणारे विचारमंथन हे चांगल्या समाजासाठी आणि चांगल्या व सशक्त लोकशाहीसाठी उपयोगी ठरेल असा विश्वासही सहारिया यांनी व्यक्त केला.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे

Friday, 28 September 2018

तारिक अन्वर यांची राष्ट्रवादीला सोडचिट्ठी ; खासदारकीचाही राजीनामा

तारीक अन्वर यांच्या पाठोपाठ महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस मुनाफ हकीम यांनीही दिला सर्व पदांचा राजीनामा



राफेल करारावरील वादामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बाजू घेतल्याने नाराज झालेले पक्षाचे खासदार तारीक अन्वर यांनी आज (शुक्रवार) तडकाफडकी राजीनामा दिला. तारीक अन्वर यांच्या पाठोपाठ महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस मुनाफ हकीम यांनीही दिला सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदाचाही राजीनामा दिला आहे. तारिक अन्वर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. तारीक अन्वर हे बिहारमधील कटिहार येथून लोकसभेवर निवडून गेले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून अन्वर पवार यांच्यासोबत होते. शरद पवारांसह ज्या तिघांची काँग्रेसमधून हकालपट्टी झाली होती, त्यापैकी एक असलेले तारीक अन्वर स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत. अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनरल सेक्रेटरी पदासह लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये जाण्याची तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का आहे.शरद पवार यांनी राफेल लढाऊ विमान खरेदी करारात पंतप्रधान मोदींवर शंका घेता येणार नसल्याचे एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. पवारांच्या या भूमिकेवर नाराज होऊन तारीक अन्वर यांनी राजीनामा दिल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेस राफेलवरुन आक्रमक झाली असून, पक्षाध्यक्ष राहुल गांधी प्रत्येक ठिकाणी मोदी आणि सरकारले घेरत आहे. तारीक अन्वर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरील नेते होते. १९९९ मध्ये सोनिया गांधी विदेशी असल्याच्या मुद्यावरुन शरद पवार, पी.ए. संगमा आणि तारीक अन्वर यांनी त्यांना विरोध केला होता. त्यावेळी या तिन्ही नेत्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. या तिघांनी एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. संगमा यांनी काही वर्षातच राष्ट्रवादीतून काढता पाय घेतला होता आणि स्वतःचा पक्ष स्थापन केला होता. मात्र बिहारमधील कटिहार लोकसभा मतदार संघातून अनेकवेळा संसदेते गेलेले तारीक अन्वर हे शरद पवारांसोबत राहिले होते.राफेल विमानांच्या खरेदीवरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'चोर' असं म्हटलं असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मोदींच्या मदतीसाठी धावून गेले. पंतप्रधानांच्या हेतूबाबत लोकांच्या मनात अजूनही शंका नाही अशी पाठराखण शरद पवारांनी मोदींची केली. विमानाची तांत्रिक माहिती जाहीर करण्याची विरोधकांची मागणीही योग्य नाही असं मतही त्यांनी 'न्यूज18 लोकमत'ला दिलेल्या Exclusive मुलाखतीत व्यक्त केले होते. शरद पवार यांच्या राफेल संदर्भातील विधानावरून राष्ट्रवादीत भूकंप झालेला पाहायला मिळतोय. राफेल प्रकरणावर शरद पवार यांनी व्यक्त केलेलं मत हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. त्यांच्या वक्तव्यावर जास्त बोलणार नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केली होती. तर शरद पवार काय म्हणतात तो त्यांचा प्रश्न आहे. काँग्रेसची भूमिका स्पष्ट असून पक्ष त्यावर ठाम आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही व्यक्त केली. शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची पाठराखण केल्यामुळे राजकीय क्षेत्रातून चर्चेला उधाण आले होते. विरोधक म्हणून शरद पवार यांच्या विधानामुळे काँग्रेस बॅकफूटवर पडली. त्यात भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शरद पवार यांचे आभार मानत राहुल गांधी यांनी शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे असा टोला लगावला होता.शरद पवार यांनी राफेल मुद्यावर केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं मत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गुरूवारी स्पष्ट केले होते. त्यामुळे एकंदरीत चहुबाजूने शरद पवार यांच्या वक्तव्यावर नाराजीचा सूर आळवताना दिसत आहे. याचे आता राजकारणात आणखी पडसाद उमटणार हे निश्चित आहे.

राजीनामा देण्याआधी अन्वर यांनी शरद पवार यांच्याशी बोलायला पाहिजे होतं - प्रफुल्ल पटेल

राष्ट्रवादीचे खासदार आणि ज्येष्ठ नेते तारिक अन्वर यांनी दिलेला राजीनामा हे दुदैवी आणि क्लेशदायक आहे. त्यांनी राजीनामा देण्याआधी शरद पवार यांच्याशी बोलले पाहिजे होतं अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे. बातम्यांच्या आधारे त्यांनी राजीनामा द्यायला नको होता. 

.तर शरद पवारांनी स्पष्टीकरण का दिलं नाही – तारिक अन्वरांचा प्रश्न

राफेल विमान व्यवहारप्रकरणी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास होत असेल, तर त्यांनी याबाबत अद्याप स्पष्टीकरण का दिलं नाही, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेले खासदार तारिक अन्वर यांनी केला आहे.

राष्ट्रवादी निर्मिती मधील अकबर.. एन्थोनी यांचा पक्ष त्याग.... (Akbar Anthony)


सोनिया गांधी यांच्या विदेशीच्या मुद्यावरून शरद पवार यांनी १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. लोकसभेचे माजी अध्यक्ष पी ए संगमा आणि तारिक अन्वर हे राष्ट्रीय नेते त्यांच्यासोबत होते. १९९८ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून सर्वाधिक जागा मिळवून देऊनही आपल्याला डावलले गेल्याची भावना, हे त्या बंडामागचे तात्कालिक कारण मानले जाते. पण एवढे मोठे बंड करूनही १९९९ साली झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत शरद पवार यांना आणि त्यांच्या राष्ट्रवादीला काँग्रेसच्याच वळचणीला जावे लागले हा आतापर्यंतचा इतिहास आहे. १९९९, २००४ आणि २००९ या सार्वत्रिक झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी एकमेकांशी पाट लावला आणि निवडणुकाही जिंकल्या.  राष्ट्रवादीने गुजरात, गोवा, केरळ आणखी काही राज्यात राष्ट्रवादीने निवडणूक लढवल्या पण एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतके उमेदवार सोडले तर राष्ट्रवादीच्या हाताशी फारसे काही लागले नाही. राष्ट्रवादीच्या संस्थापकांपैकी असलेले पी ए संगमा आणि तारिक अन्वर हे महाराष्ट्राबाहेरचे राष्ट्रवादीचे नेतृत्व होते. राष्ट्रवादीतून पहिले बाजूला झाले ते पी ए संगमा. त्यांनी नॅशनल पीपल्स पार्टीची स्थापना केली होती. त्यांच्या कन्या अगाथा संगमा काँग्रेसच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री होत्या. आज संस्थापकांपैकी एक असलेले तारिक अन्वरही पक्ष सोडून चालते झाले आहेत. त्यांच्या या बंडालाही कारणीभूत ठरली आहे ती शरद पवार यांची मोदींना दिलेली कथित “क्लीन चिट” आहे. २०१४ साली झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक बंडखोरी झाली ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात. सध्या राष्ट्रवादीचे अवघे चार खासदार आहेत. ते सगळे पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. त्यातही सातारचे खासदार उदयनराजे यांचे वारू कोणत्या दिशेला जाते हे त्यांचे त्यांनाही सांगता येणार नाही. कोल्हापूरचे खासदार मुन्ना महाडिक राष्ट्रवादीत असले तरी त्यांचे चुलत बंधू आमल महाडिक भाजपच्या तिकिटावर आमदार झाले आहेत. सुप्रियाताई सुळे आणि विजयसिंह मोहिते पाटील. हे दोघेही पुणे, सोलापूर आणि सातारा या खास राष्ट्रवादीच्या प्रभावित भागातील आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीला खिंडार पडण्याची जोरदार तयारी भाजपने चालवली आहे. 


कोण आहेत तारिक अन्‍वर?

तारिक अन्‍वर हे राष्‍ट्रवादीतील दिग्‍गज नेत्यांपैकी एक आहेत. राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्‍थापनेपासून ते शरद पवार यांचे सहकारी म्‍हणून कार्यरत होते. १९९९ मध्ये शरद पवार यांच्यासह तारिक अन्‍वर, पी.ए. संगमा यांनी सोनिया गांधी यांच्या विदेशी वंशाचा मुद्दा उपस्‍थित करत काँग्रेसमधून बाहेर पडत राष्‍ट्रवादी काँग्रेसची स्‍थापना केली होती. सध्या बिहारमधील कटिहार लोकसभा मतदार संघातून ते खासदार आहेत.


Detailed Profile: Shri Tariq Anwar

Name - Shri Tariq Anwar
Education- B.Sc. Educated at College of Commerce, Patna, Magadh University, Bodh Gaya (Bihar)

Positions Held


1980-84 Member, Seventh Lok Sabha 1985-89 Member, Eighth Lok Sabha Aug. 1987-April 1988 Member, Joint Parliamentary Committee to inquire into Bofors Contract 1996-98 Member, Eleventh Lok Sabha 1998-99 Member, Twelfth Lok Sabha July 2004 Elected to Rajya Sabha Aug. 2004 - May 2009 Member, Committee on Personnel, Public Grievances, Law and Justice Oct. 2004 - May 2009 Member, Consultative Committee for the Ministry of External Affairs Nov. 2004-Sept. 2009 Member, Committee on Rules April 2008 Nominated to the Panel of Vice-Chairmen, Rajya Sabha (re-nominated on 6 August 2010, 1 August 2011, 19 April 2012 and 17 April 2012 ) June 2008 onwards Member, General Purposes Committee Aug 2009 onwards Member, Committee on Home Affairs Member, Committee on Ethics Member, Consultative Committee for the Ministry of Finance Sept. 2009 - July 2010 Member, Business Advisory Committee July 2010 Re-elected to Rajya Sabha Aug. 2010 onwards Member, Anjuman (Court) of Jamia Millia Islamia University Member, Select Committee to the Wakf (Amendment) Bill, 2010 Sept. 2010 onwards Chairman, Committee on Papers Laid on the Table May 2011 - May 2012 Member, Committee on Public Accounts May 2012 onwards Member, Committee on Public Undertakings 28 Oct. 2012 onwards Minister of State in the Ministry of Agriculture and Minister of State in the Ministry of Food Processing Industries

Other Info


His family has been associated with the freedom struggle; started career as a journalist; Founder Editor, Chhatra, a weekly tabloid in Hindi published from Patna, 1972-74; Editor, (i) Yuvak Dhara, first a weekly tabloid and later a fortnightly magazine published from Patna from 1974 and later published from Delhi since 1982 and (ii) Tanzeem Times, a monthly magazine in English published from New Delhi since 1986; Chief Editor, Sadakat Vani, a monthly magazine in Hindi published from Patna since 1988; Editor-in-Chief, Rashtrawadi Sankalp, earlier a fortnightly and now a weekly newspaper in Hindi published earlier from New Delhi since 2001 and now from Mumbai; President, (i) Bihar State Youth Congress (I), 1976-81, (ii) All India Youth Congress (I), 19 September 1982 - 24 April 1985 and (iii) Bihar Pradesh Congress Committee (I), 5 March 1988 - 7 March 1989; Founder General Secretary, Nationalist Congress Party since 23 May 1999; General Secretary, (i) All India Youth Congress (I), 1981-82 and (ii) All India Congress Committee (I), 4 September 1997 and again from June 1998 - 3 February 1999; Joint Secretary, All India Congress Committee (I), 1982; Chairman, (i) Bihar State Small Scale Industries Corporation, 1982-85, (ii) All India Congress Seva Dal (I), 24 September 1985 -1987, (iii) A.I.C.C. (I) Minority Cell, 27 September 1993 -December 1996 and (iv) Dargah Committee Ajmer, 1993-96; Working Chairman, (i) Bihar State 20-Point Implementation Committee, 1 June 1988 - 19 June 1989 and (ii) Bihar State 15-Point Implementation Committee for Welfare of Minorities, 20 June 1989 - November 1990; Political Secretary to President, Indian National Congress, December 1996 - 4 September 1997; Member, (i) Indian Parliamentary Delegation headed by Hon’ble Speaker in the Inter-Parliamentary Conference, Ottawa (Canada), 1985, (ii) Indian Parliamentary delegation in Inter-Parliamentarians Conference, Bulgaria, 1987, (iii) Indian Goodwill Haj delegation to Saudi Arabia, 1988, and (iv) Indian Parliamentary Delegation to participate in the Meeting of Standing Committee on Political Affairs and Ad-hoc Working Group on ICT of the Asian Parliametnary Assembly, Tehran, 2010




Election results

General Election, 2014Katihar
PartyCandidateVotes%±
NCPShah Tariq Anwar4,31,29244.11
BJPNikhil Kumar Choudhary3,16,55232.37
JD(U)Ram Prakash Mahto1,00,76510.30
JMMBaleshwar Marandi33,5933.44
IND.Ashok Kumar Bhagat15,5471.59
NOTANone of the Above3,2870.34
Majority1,14,74011.74
Turnout9,77,83067.60
NCP gain from BJPSwing

General Election, 2009Katihar
PartyCandidateVotes%±
BJPNikhil Kumar Choudhary2,69,83437.23
NCPShah Tariq Anwar2,55,81935.30
LJPAhmad Ashfaque Karim45,7736.32
IND.Himraj Singh42,0265.80
CPI(ML) (L)Mahboob Alam32,0354.42
IND.Mohammad Hamid Mubarak23,8943.30
Majority14,0151.93
Turnout7,24,80256.95
BJP holdSwing


Katihar General Election 2014 Results



CandidatePartyVotes
Tariq AnwarNationalist Congress Party431292
Nikhil Kumar ChoudharyBharatiya Janata Party316552
Dr. Ram Prakash MahtoJanata Dal (United)100765
Baleshwar MarandiJharkhand Mukti Morcha33593
Ashok Ku BhagatIndependent15547
Kanhai MandalIndependent10516
Mahbub AlamCommunist Party of India (Marxist-Leninist) (Liberation)9461
Ashok KumarIndependent9000
Mahammad Hamid MobarakAll India Trinamool Congress8392
Nalini MandalIndependent7969
Md. Tariq AnwarIndependent4514
Suresh RayRashtravadi Janata Party4450
Bibhaker Jha (@) Victor JhaAam Aadmi Party4323
Fulmani HembramBharat Vikas Morcha3096
Shivendra KumarBahujan Samaj Party2685
Satyanarayan BhagatProutist Sarva Samaj2550
Abdur RahmanBharatiya Momin Front2489
Raj Kumar MandalIndependent2141
Mahesh MandalBahujan Mukti Party1980
Sanjay SinghIndependent1675
Md. Iqbal AhmadSamajwadi Janata Party (Rashtriya)1553
None of the AboveNone of the Above3287


List of winner/current and runner up MPs Katihar Parliamentary Constituency.

The table below represents the names of all the winning and runner up MPs of Katihar parliamentary constituency of all the years from the starting until now .The current sitting member of parliament of the Katihar constituency is Shri Tariq Anwar of Nationalist Congress Party. 
YearPC No.PC NameCategoryWinnerGenderPartyVoteRunner UpGenderPartyVote
201411KatiharGenTariq AnwarMNationalist Congress Party431292Nikhil Kumar ChoudharyMBJP316552
200911KatiharGENChoudhary,Shri Nikhil KumarMBJP269834Harish ChoudharMNCP255819
200425KatiharGENNikhil Kumar ChoudharyMBJP288922Shah Tariq AnwarMNCP286357
199925KatiharGENNikhil Kumar ChoudharyMBJP280911Tariq AnwarMNCP144059
199825KatiharGENTariq AnawarMINC337360Nikhil Kumar ChoudharyMBJP316923
199625KatiharGENTariq AnwarMINC267927Nikhil Kumar ChoudharyMBJP179641
199124KatiharGENMd. Yunus SalimMJD174430Tarique AnwerMINC150808
198925KatiharGENYuvarjMJD338782Tarique AnwarMINC235604
198425KatiharGENTariq AnwarMINC229883JuvrajMJNP183940
198025KatiharGENShah Tarique AnwarMINC(I)138099YuvrajMJNP99943
197725KatiharGENYuvrajMBLD215074Shah Mohammad Tarique (Anwar)MINC85285
197123KatiharGENGyaneshwar Prasad YadavMBJS96422Sita Ram KeshriMINC83533
196723KatiharGENS. KeshariMINC58776P. GuptaMPSP57803
196223KatiharGENPriya GuptaFPSP82531Bhola Nath BiswasMINC64994
1958By PollsKatiharGENB. BiswasMINC57290JuvrajMPSP32952
195719KatiharGENAwadhesh Kumar SinghMINC78289Safiqul HaqueMIND24283

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) pune

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे


Thursday, 27 September 2018

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांचा प्रस्थापितांना धक्का

ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांचा प्रस्थापितांना धक्का

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी प्रस्थापितांना धक्का देत, नवख्यांना संधी देणे पसंत केले. ५९ पैकी सुमारे ४० ग्रामपंचायतींमध्ये सत्ताधाऱ्यांना नाकारण्यात आले. सर्वाधिक ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात बाजी मारली. इंदापुरातील १४ पैकी नऊ, दौंड व आंबेगाव तालुक्‍यातील प्रत्येकी पाचपैकी चार आणि शिरूर तालुक्‍यातील सहापैकी तीन ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्याचा दावा पक्षाच्या वतीने करण्यात आला. दरम्यान, काँग्रेसने इंदापूर तालुक्‍यातील पाच आणि पुरंदर तालुक्‍यातील एक ग्रामपंचायत ताब्यात घेतली आहे. भाजपने मावळ तालुक्‍यातील तीन आणि शिरूर तालुक्‍यातील तीन; तर शिवसेनेने पुरंदर तालुक्‍यातील दोन ग्रामपंचायतींवर निर्विवाद वर्चस्व स्थापित केले आहे. खेडमधील नऊ ग्रामपंचायतींमध्ये मतदारांनी संमिश्र कौल दिला आहे. जिल्ह्यातील ५९ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशीच १२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ४७ ग्रामपंचायतींसाठी २६ सप्टेंबर रोजी मतदान झाले होते. 

श्री मंगलमूर्ती पॅनेलने १७ पैकी १६ जागा; सरपंचपदापदी सर्जेराव खेडकर


रांजणगाव गणपती (ता.शिरूर) येथील पाचुंदकर कुटुंबियांची गेली १० वर्षाची ग्रांमपंचायतीची सत्ता असलेली मक्तेदारी मतदारांनी संपुष्टात आणली असून ग्रांमपंचायतीमध्ये श्री मंगलमूर्ती पॅनेलने १७ पैकी १६ जागा निवडून आले आहेत.श्री मंगलमूर्ती पॅनेलचे उमेदवार सर्जेराव बबन खेडकर यांनी महागणपती पॅनेलचे उमेदवार दत्तात्रय आनंदराव पाचुंदकर यांचा पराभव करून सरपंचपदी विराजमान होण्याचा मान मिळविला आहे. सहा प्रभागात १७ जागांसाठी झालेल्या सदस्यांच्या निडणुकीत सत्ताधारी महागणपती पॅनेलला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले. ग्रांमपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत दोन्ही पॅनेलमध्ये चुरशीची निवडणूक झाली. ५५८६ मतदानापैकी ४८९२ इतके एकूण मतदान झाले. सरपंचपदासाठी सर्जेराव खेडकर यांना २४४१ मते आणि दत्तात्रय पाचुंदकर यांना २४२५ मते मिळाली. १७ मतांनी श्री खेडकर विजयी झाले आहेत.रांजणगाव गणपती येथील जिल्हा परिषदेच्या सदस्या स्वाती पाचुंदकर यांचे पती दत्तात्रेय पाचुंदकर यांना सरपंचपदावर पराभव स्वीकारावा लागला आहे.तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखर पाचुंदकर यांची मातोश्री लक्ष्मीबाई पाचुंदकर यांनाही या निवडणुकीत सदस्य पदासाठी हार पत्करावी लागली आहे.जिल्हा राष्ट्रवादी युवक काॅग्रेसचे माजी अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांच्या पॅनेलला मोठी हार पत्करावी लागली.यामध्ये फक्त अर्चना पाचुंदकर यांना विजय मिळाला आहे. येथील सरपंचपदाची जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) असल्याने कुणबी फॅक्टरला मतदारांनी साफ नाकारल्याची चर्चा गावात आहे. तसेच गेली १० वर्षे सत्ता उपभोगलेल्या सत्ताधाऱयांनी गावाचा विकास केलेला मतदारांना महत्वाचा वाटला नसून परिवर्तन करण्याच्या उद्देशाने सत्ताधाऱयांना धक्का दिला आहे.येथील ग्रांमपंचायत निवडणुकीत दोन्ही पॅनेलकडून मोठी आर्थिक उलाढाल झाली असली तरी सत्ताधाऱयांच्या विरोधी मतदारांनी अनपेक्षित लाट निर्माण करून विरोधकांच्या हाती निर्विवाद सत्ता दिली आहे. मंगलमूर्ती पॅनेलचे नेतृत्व पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रभाकर पाचुंदकर, माजी आदर्श सरपंच भिमाजीराव खेडकर, माजी जिल्हा परिषद सदस्या कविता खेडकर आदींनी केले.

प्रभागानुसार प्रथम विजयी व पराभूत उमेदवार व त्यांना मिळालेली मते :

प्रभाग एक - (दोन जागा) हिराबाई पंढरीनाथ खेडकर (३९३,विजयी), निता नितीन खेडकर (३४५ पराभूत)/आनंदा तुकाराम खेडकर (४२५ विजयी),निलेश सुरेश खेडकर (३१८ पराभूत).
प्रभाग दोन -(तीन जागा) विलास बाळासाहेब अडसूळ (५५२ विजयी),हिराबाई नारायण शेलार (४४३ पराभूत)/अजय तुकाराम गलांडे ( ६०२ विजयी), मोहन आत्माराम शेळके (४२६ पराभूत), निलम श्रीकांत पाचुंदकर (६६२ विजयी),लक्ष्मीबाई राजाराम पाचुंदकर (३६१ पराभूत).
प्रभाग तीन- (तीन जागा) धनंजय विठ्ठल पवार (५१२ विजयी ),गणेश भगवंत लांडे (३०३ पराभूत)/ मिनाक्षी दिलीप लांडे (३४० विजयी),सुजाता पंडीत लांडे (४१८ पराभूत), सरेखा प्रकाश लांडे (४७९ विजयी),शोभा रमेश शेळके (३९४ पराभूत).
प्रभाग चार - (तीन जागा) स्वाती भानुदास शेळके ( २७४ विजयी),वैशाली प्रकाश शेळके (२३९ पराभूत)/ बाबासो धोंडिबा लांडे (२५८ विजयी),नवनाथ विलास लांडे (२५४ पराभूत).सुप्रीया योगेश लांडे (२६९ विजयी),शोभा सूर्यकांत लांडे (२४४ पराभूत).
प्रभाग क्रमांक पाच - (तीन जागा) रंभा माणिक फंड (४३८ विजयी),रंजना महादू फंड (४२९ पराभूत)/ राहूल अनिल पवार ( ४७२ विजयी), अनिल बाळासो दुंडे (४०२ पराभूत), अनिता सुदाम कुटे (४९० विजयी),शुभांगी योगेश पाचुंदकर (३७६ पराभूत).
प्रभाग क्रमांक सहा- (जागा तीन) संपत गणपत खेडकर (५१२ विजयी),रामदास परशुराम खेडकर (३७७ पराभूत)/आकाश संजय बत्ते (५५१ विजयी),बबन आनंदराव बत्ते (३३३ पराभूत), अर्चना संदिप पाचुंदकर (४४९ विजयी),अलका संभाजी गदादे (४४० पराभूत).


आंबळे येथे सोमनाथ बेंद्रे सरपंच

आंबळे ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रणीत जनसेवा ग्रामविकास पॅनेलने बहुमत मिळविले. सरपंचपदी याच पॅनेलचे सोमनाथ बेंद्रे हे 105 मतांनी निवडून आले. महेश बेंद्रे यांना पराभवाचा धक्का बसला.राष्ट्रवादी प्रणीत जनसेवा व भाजप पुरस्कृत भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलमध्ये चुरशीची लढत झाली. यात जनसेवा पॅनेलने सरपंचपदासह सहा; तर भैरवनाथ पॅनेलने तीन जागा मिळविल्या. महेश बेंद्रे व सोमनाथ बेंद्रे यांच्यात सरपंचपदासाठी चुरस होती. यात 994 मते मिळवून सोमनाथ बेंद्रे विजयी झाले. महेश बेंद्रे यांना 889 मते मिळाली. प्रभाग एक मध्ये राजेंद्र झेंडे (380 मते), सुनीता जाधव (377 मते) व जयश्री बेंद्रे (423 मते) हे जनसेवा पॅनेलचे उमेदवार विजयी झाले. भैरवनाथ पॅनेलच्या मारूती झेंडे (287 मते), शीतल जाधव (290 मते) व अश्‍विनी बेंद्रे (238 मते) यांचा त्यांनी पराभव केला. प्रभाग दोन मध्ये भैरवनाथ पॅनेलचे शरद निंबाळकर (352 मते), रंजना बेंद्रे (314 मते) व प्रज्ञा श्रीकृष्ण सिन्नरकर (322 मते) यांनी जनसेवा पॅनेलच्या पवन बेंद्रे (255 मते), उषा बेंद्रे (292 मते) व मालन सिन्नरकर (277 मते) यांचा पराभव केला. प्रभाग तीनमध्ये भैरवनाथ पॅनेलच्या मयुर बेंद्रे (304 मते), राहुल धुमाळ (312 मते) व माया बेंद्रे (263 मते) यांना पराभव पत्करावा लागला. तेथे जनसेवा पॅनेलचे प्रदीप ठोंबरे (319 मते), अनिल नरवडे (314 मते) व पूनम बेंद्रे (360 मते) हे विजयी झाले.

शिरूर तालुक्यामध्ये ४ ग्रामपंचायतींत सत्ताबदल

शिरूर तालुक्यातील ६ ग्रामपंचायतींच्या लागलेल्या निकालात ४ ग्रामपंचायतींमध्ये सत्ताबदल झाला आहे. शिरूरसह आंबेगाव तालुक्याचे लक्ष लागलेल्या रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीमध्ये गेल्या १० वर्षांची शेखर पाचुंदकर व मानसिंग पाचुंदकर यांच्या नेतृत्वाखालील सत्ता उलथवून टाकण्यात विरोधकांना यश मिळाले.तालुक्यातील रांजणगावसह करडे, आंबळे, चव्हाणवाडी, ढोक सांगवी तसेच कळवंतवाडी या ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतमोजणी झाली. यात रांजणगाव, करडे, आंबळे व कळवंतवाडी या ग्रामपंचायतींमध्ये सत्ताबदल झाला. यामध्ये रांजणगाव ग्रामपंचायतीकडे सर्वांचेच विशेष लक्ष लागले होते. या ग्रामपंचायतीवर माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर व शिरूर आंबेगाव मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांच्या नेतृत्वाखाली सत्ता होती.पाचुंदकर यांच्या पॅनलच्या सरपंचपदाचे उमेदवार दत्तात्रय पाचुंदकर यांचा विरोधी पॅनलचे उमेदवार सर्जेराव खेडकर यांनी अवघ्या १६ मतांनी पराभव केला. सतरा सदस्यांपैकी विरोधकांना १६, तर पाचुंदकरांच्या पॅनलला एकमेव जागेवर समाधान मानावे लागले. ढोक सांगवी ग्रामपंचायतीमध्ये मल्हारी मलगुंडे यांनी आपल्या नेतृत्वाखालील सत्ता अबाधित राखण्यात यश मिळविले. त्यांच्या पॅनलच्या सरपंचपदाच्या उमेदवार शोभा शेलार यांनी विरोधी पॅनलच्या प्रियांका जगताप यांचा पराभव केला. तीन जागांसाठी झालेल्या मतदानात तिन्ही जागा मलगुंडेंच्या पॅनलला मिळाल्या.

इंदापुरात दोन्ही काँग्रेसचा वर्चस्वाचा दावा

इंदापूर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक लागली होती. त्यातील १ ग्रामपंचायती बिनविरोध झाली. उर्वरित १३ ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल आज स्पष्ट झाला. इंदापूर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणूक लागली होती. त्यातील १ ग्रामपंचायती बिनविरोध झाली. उर्वरित १३ ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल आज स्पष्ट झाला. निकाल स्पष्ट झाल्यानंतर कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाने आमच्या पक्षाचे जास्त सरपंच विजयी झाल्याचे दावे केले आहेत. राष्ट्रवादी पक्षाने १० ग्रामपंचायतींध्ये तर काँग्रेसने ६ ग्रामपंचायतीवर दावा केला आहे.राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष महारूद्र पाटील यांनी निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘जनतेने राष्ट्रवादी कॉग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे. पक्षाच्या विचाराचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यात शेळगांव ,अगोती नंबर १ , अगोती नंबर २, वडापुरी ,तरटगाव ,बोराटवाडी, कालठण नंबर २ ,गोखळी, पंधारवाडी, खोरोची या गावात विजयी झाले आहेत. ’दुसरीकडे कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. कृष्णाजी यादव यांनीही इंदापूरात कॉग्रेसच्या ग्रामपंचायत संख्येत वाढ झाल्याचे सांगितले आहे. यादव यांनी सांगितले की,‘ काँग्रेस पक्षाने ५ ग्रामपंचायतींवर निर्विवादपणे विजय मिळविला आहे. तर तरटगाव ग्रामपंचायत बिनविरोध होऊन तेथे सर्वपक्षीय सत्ता आली आहे. निवडणूकीत काँग्रेस पक्षाकडील ग्रामपंचायतींच्या संख्येत वाढ झाली असून काँग्रेसकडील एकुण ग्रामपंचायत सदस्य संख्येतही सुमारे ३१ ने वाढ झाली आहे. कांदलगाव, कालठण नं.१, खोरोची, उद्धट , पवारवाडी या ग्रामपंचायती कॉग्रेस पक्षाने मोठ्या फरकाने निर्विवाद जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला एक ग्रामपंचायत गमवावी लागली आहे. तर काँग्रेसने एक जादा ग्रामपंचायत ताब्यात घेतली आहे. काँग्रेस पक्षाचा जनाधार वाढला असल्याचे दिसून येत आहे.निवडणूक झालेल्या १३ ग्रामपंचायतींपैंकी कांदलगाव, कालठण नं.१, कालठण नं.२, बोराटवाडी, खोरोची, गोखळी, शेळगाव, वडापुरी, पवारवाडी या ९ ग्रामपंचायती यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडे होत्या. तर अगोती नं.-१,अगोती नं.२ , पंधारवाडी, उध्दट या ४ ग्रामपंचायती काँग्रेस पक्षाकडे होत्या.
शेळगांव ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्र हे कर्मयोगी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आहे. कारखान्याचा कामगार, संचालक वर्ग मोठ्या प्रमाणात मतदार आहे. सरपंच पदासाठी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्यांना उमेदवारी देवूनही व अगोती नंबर २ या गावात चाळीस वर्षांपासून कॉग्रेस पक्षाची म्हणजेच कर्मयोगी शंकरराव पाटील कारखानाचे माजी संचालक बलभीम काळे व विद्यमान संचालक सुभाष काळे यांची सत्ता होती. तरीदेखील हर्षवर्धन पाटलांचा सरपंच विजयी होऊ शकला नाही हा कॉग्रेसला मोठा धक्का आहे. तर कांदलगाव ग्रामपंचायतीमध्ये गेली चाळीस वर्षे कॉग्रेसच्या माजी जिल्हा परिषद सदस्या ऋतुजा पाटील यांची सत्ता होती. मागील निवडणूकीत राष्ट्रवादीच्या युवकांनी सत्तांतर घडवले होते. यंदा पुन्हा ही ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यातून खेचून घेण्यात कांग्रेसला यश मिळाले आहे.

बोराटवाडीत काँग्रेसचा पराभव

बोराटवाडी (ता. इंदापूर) ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत जय भवानी ग्रामविकास पॅनलने निर्विवाद विजय मिळविला. सरपंचपदासह सर्वच्या सर्व म्हणजे नऊ जागांवर ग्रामविकास पॅनलने विजय मिळवला. पॅनलच्या दत्तू यशवंत सवासे यांची सरपंचपदी निवड झाली. त्यांनी तुकाराम अनंत इंगवले यांचा २०६ मतांनी पराभव केला. सरपंचपदासाठी एकूण तीन उमेदवार रिंगणात होते. दत्तू सवासे यांना एकूण ७२४ मते मिळाली, तर तुकाराम अनंता इंगवले यांना ५१८ मते मिळाली. तिसरे उमेदवार समीर धर्मराज बर्गे यांना तेरा मते मिळाली. जय भवानी ग्रामविकास पॅनलचे विजयी उमेदवार : प्रभाग १) हनुमंत पांडुरंग माने, रमेश शिवाजी बोराडे, पुष्पा शहाजी जाधव, प्रभाग २) अभिजित विठ्ठल फडतरे, मनीषा तुकाराम हेगडकर, शिवबा नवनाथ बोराडे, प्रभाग ३) धोंडीराम लक्ष्मण खाडे, वैशाली साहेबराव सवासे, पूनम धनाजी फडतरे.

देऊळगावराजे ग्रामपंचायतीवर थोरात गटाचे वर्चस्व

दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या देऊळगावराजे ग्रामपंचायत निवडणुकीत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात गटाचे वर्चस्व राहिले आहे.  दरम्यान सिद्धेश्वर ग्रामविकास पॅनलचे नेतृत्व माजी सरपंच अमित गिरमकर यांनी केले होते. सिद्धेश्वर पॅनलला ८ जागा तर भैरवनाथ पॅलन आणि शिवछत्रपती भैरवनाथ पॅनल यांना प्रत्येकी १ जागेवर समाधान मानावे लागले. ११ सदस्य संख्या असलेल्या या ठिकाणी वार्ड क्र. १ मध्ये एका जागेसाठी एकही उमेदवारी अर्ज न आल्याने एक जागा रिक्त राहिली तर १० जागांसाठी तीन पॅनल मधील व एक अपक्ष असे ३0 उमेदवार रिंगणात होते. यामधे सरपंच पदासाठी व सदस्य पदासाठी सर्वाधिक आठ जागांवर सिद्धेश्वर ग्रामविकास पनलचे उमेदवार विजयी झाले, सरपंचपदासाठी सर्वाधिक ९९६ मते स्वाती अमित गिरमकर यांना मिळाली.वार्डनिहाय विजयी उमेदवार व कंसात मिळालेली मते : वार्ड क्रमांक १ : जयश्री महादेव सूर्यवंशी (२५८), वार्ड क्रमांक २ : नारायण महादेव गिरमकर(२६१), शुभांगी दादासाहेब गिरमकर (३२०), पंकज देवीदास बुहार्डे (३४०), वार्ड क्रमांक ३ : दयाराम श्रावण पोळ (२५२), सुलोचना शिवाजी तावरे (१५९), चतुराबाई आप्पासाहेब खेडकर (२६३), वार्ड क्रमांक ४ : बाबू नारायण पासलकर(२८९), सोनाली दिपक पासलकर (२९५), वृषाली महादेव औताड़े (२८७), हे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) 

पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब) पुणे