महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने निवडणूक चिन्ह बदलेले!
व्हायरल झालेली जाहिरात
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला निवडणूक आयोगाने बदली हे दिलेले निवडणूक चिन्ह चौफेर चविष्ट चर्चेमुळे बदलण्यात आले आहे. कारण रत्नगिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निलेश नारायण राणे यांच्या व्हायरल जाहिरातीमध्ये निवडणूक चिन्ह बदली नसून फ्रीज(रेफ्रीजरेटर) हे चिन्ह झळकले आहे. बदली अशुभ व योग्य नसल्याच्या तक्रारी कार्यकर्त्यांनी केल्याने चिन्ह बदलेले असल्याचे सांगण्यात येते.
खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाला निवडणूक आयोगाने यंदाच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीसाठी 'बॅट' हे चिन्ह दिले आहे.ऊसाला दर मिळावा म्हणून शेतकऱ्यांच्या बाजूने वर्षानुवर्षे लढणाऱ्या खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाला निवडणूक आयोगाने यंदाच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीसाठी ‘बॅट’ हे चिन्ह दिले आहे. यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीत खासदार शेट्टी व त्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना बॅट घेऊनच निवडणुकीच्या रणांगणात उतरणार आहेत. गत निवडणुकीत (२०१४) स्वाभिमानी शेतकरी संघटनेला शिट्टी हे चिन्ह मिळाले होते. स्वाभिमानी पक्ष अमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्ष आहे. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने स्वाभिमानी पक्षाला “बॅट” हे चिन्ह अधिकृत केले असून खासदार शेट्टी ‘बॅट’ हे चिन्ह घेऊनच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उतरणार आहेत. ज्या-ज्या ठिकाणी स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार राहतील, त्या ठिकाणी ‘बॅट’ हे चिन्ह घेऊन स्वाभिमानीचे उमेदवार मैदानात उतरणार आहेत. नवीन चिन्ह मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साह निर्माण झाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत राजू शेट्टी कोणत्या प्रकारची बॅटिंग करतात, हे पाहणे महत्वाचे आहे.
खासदार राजू शेट्टी यांची आता बॅटिंग...
राजू शेट्टी ‘बॅट’ घेऊन उतरणार निवडणुकीच्या मैदानातखासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाला निवडणूक आयोगाने यंदाच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीसाठी 'बॅट' हे चिन्ह दिले आहे.ऊसाला दर मिळावा म्हणून शेतकऱ्यांच्या बाजूने वर्षानुवर्षे लढणाऱ्या खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाला निवडणूक आयोगाने यंदाच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीसाठी ‘बॅट’ हे चिन्ह दिले आहे. यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीत खासदार शेट्टी व त्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना बॅट घेऊनच निवडणुकीच्या रणांगणात उतरणार आहेत. गत निवडणुकीत (२०१४) स्वाभिमानी शेतकरी संघटनेला शिट्टी हे चिन्ह मिळाले होते. स्वाभिमानी पक्ष अमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्ष आहे. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने स्वाभिमानी पक्षाला “बॅट” हे चिन्ह अधिकृत केले असून खासदार शेट्टी ‘बॅट’ हे चिन्ह घेऊनच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उतरणार आहेत. ज्या-ज्या ठिकाणी स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार राहतील, त्या ठिकाणी ‘बॅट’ हे चिन्ह घेऊन स्वाभिमानीचे उमेदवार मैदानात उतरणार आहेत. नवीन चिन्ह मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही उत्साह निर्माण झाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत राजू शेट्टी कोणत्या प्रकारची बॅटिंग करतात, हे पाहणे महत्वाचे आहे.
मतदार “बादली”ला पसंती देणार काय?
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला निवडणूक आयोगाकडून “बकेट” हे चिन्ह दिलेले आहे. आगामी लोकसभा निवडणूक महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष या चिन्हावर लढवावी आहे. वर्षभरापूर्वी खासदार नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली होती. त्यानंतर त्यांनी भाजपच्या उमेदवारीवर राज्यसभेत बिनविरोध निवडणूक लढवून खासदार पदी निवड झाली आहे. आता आगामी निवडणुकांना सामोरे जाताना बकेट घेऊन मतदारांपुढे जावे लागणार आहे. राणे यांच्या राजकीय कारकीर्द मधील हे चौथे निवडणूक चिन्ह असणार आहे. प्रारंभी धन्युष्यबाण नंतर पक्षांतर मग हाताचा पंजा आणि राज्यसभेवर कमळ आता आगामी निवडणुकीत बकेट असा राजकीय प्रवास त्यांचा आहे. धन्युष्यबाण, हाताचा पंजा, कमळ या निवडणूक चिन्हाला यश मिळाले तसे “बकेट”ला कितपत यश मिळेल हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. महाराष्ट्रात सध्या सत्ताधारी पक्षाचा सहयोगी मात्र स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाणाऱ्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला निवडणूक आयोगाने “बकेट” ही निशाणी दिली आहे. आगामी निवडणूक महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष या चिन्हावर लढवणार आहे. वर्षभरापूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली होती. त्यानंतर पक्षाने मुंबईसह विविध जिल्ह्यांत कार्यकारिणी जाहीर केली आहे. नुकतेच आमदार नितेश राणे यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करून सोलापूरची कार्यकारिणी जाहीर केली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्वबळावर लढेल आणि आपले खासदार केंद्रात भाजपला पाठिंबा देतील, अशी घोषणा संस्थापक नारायण राणे यांनी केली आहे. रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी माजी खासदार निलेश राणे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. उद्या १ मार्च रोजी कोकणवासीयांचा मेळावा वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. रत्नागिरी -सिंधुदुर्गसह राज्यातील इतर मतदारसंघांत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्वबळावर निवडणूक लढविणार आहे. दरम्यान भाजपच्या मोदींसोबतच आहोत हे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. एनडीएमधील घटक पक्ष आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात माजी खासदार नीलेश राणे यांची उमेदवारी महाराष्ट्र स्वाभिमानतर्फे जाहीर केलेली आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग, सातारा-कोल्हापूर येथील एक, सोलापूरमधील एक जागा आणि औरंगाबाद येथील एक अशा एकूण पाच जागांसाठी निवडणुक लढविणार असल्याचे सांगितले जात आहे.
कोकणातील राजकारणातील प्रभावी नेता-: माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण तातू राणे यांचा राजकीय प्रवास....
जन्म १० एप्रिल १९५२ सुभाष नगर येथील चाळीत राहणारे एक गरीब कुटुंबातील मुलगा ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा राजकीय प्रवास त्यांचा आहे. राजकारणात येण्या अगोदर नारायण राणे यांनी मित्रा सोबत सुभाष नगर येथे मित्रा सोबत चिकन शॉप सुरु केले होते.१९६० साली हर्या नार्या टोळीची दहशत होती या टोळी सोबत रानेचे संबंध आले आणि त्याचे नाव सगळीकडे पोहचले. हर्या नार्या जिंदाबाद या नावाने एक चित्रपट सुध्दा त्या काळात येऊन गेला. याच काळात नारायण राणे यांच्या नावाने खुनाचा गुन्हा देखील घटाला पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा देखील नोंद झाला होता. पोलीस रेकॉर्ड नुसार वयाच्या १४ व्या वर्षी या टोळीचे सदस्य होते. माधव ठाकूर व राणे यांचा वाद या काळात बराच गाजला. वयाच्या २० व्या वर्षी राणे यांचे संबध शिवसेने सोबत आले,चेंबूर येथे शाखा प्रमुख पद राणेंना देण्यात आले. कोपरगावचे नगरसेवक ही त्यांची पहिली निवडणूक व ते यशस्वी झाले व त्यांनतर त्यांनी मागे वळून पहिले नाही. १९९६ शिवसेना भाजप सरकारमधील महाराष्ट्राचे महसूलमंत्री झाले. १९९९ साली मनोहर जोशी मुख्यमंत्री पदावरून पायउतार होताच राणे यांना काही महिन्या करिता मुख्यमंत्र्याची खुर्ची मिळाली. उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख पदाची चर्चा सुरु झाल्यानंतर राणेचे शिवसेनेत खटके उडायला सुरवात झाली. ३ जुलै २००५ ला त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली परंतु शिवसेनेतून जाताना राणे अनेक समर्थक घेऊन कॉंग्रेस मध्ये गेले. कॉंग्रेस मध्ये त्यांना महसूल मंत्री पद देण्यात आले व त्याच कॉंग्रेस मध्ये राणेवर २००८ साली पक्ष विरोधी कार्यवाही केल्याचा ठपका देखील ठेवण्यात आला होता. ८ ऑक्टोबर २००८ साली नारायण राणे यांनी प्रहार नावाचे वृत्तपत्र सुरु केले. २००९ साली त्यांनी परत महाराष्ट्राचे महसूलमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला होता. नारायण राणे यांची दोन मुले नितेश व निलेश हे दोघेही त्यांच्यासोबत राजकीय क्षेत्रात सक्रीय आहेत.नगरसेवक पदापासून ते मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या नारायण राणे यांचा राजकीय प्रवास
1968 - वयाच्या सोळाव्या वर्षी शिवसेनेत प्रवेश
1968 - शिवसेनेच्या चेंबूर येथील शाखेत शाखाप्रमुख म्हणून जबाबदारी
1985 ते 1990- या काळात शिवसेनेचे नगरसेवक त्यानंतर बेस्टचे अध्यक्षपद भूषवले
1990-95 - नारायण राणे पहिल्यांदा विधानसभेवर
1991 - छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यानंतर पक्षातील महत्त्व वाढले
1990-95 - याच काळात विधानपरिषदेचे विरोधपक्ष नेतेपद
1996-99 - युतीची सत्ता आल्यानंतर राज्याच्या महसूल मंत्रीपदी विराजमान
1999 - महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी निवड
2005 - शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्यासोबत मतभेद. मतभेदानंतर 3 जुलै 2005 रोजी शिवसेना सोडली
2005 - शिवसेना सोडल्यानंतर नारायण राणेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश
2005 - शिवसेना सोडल्यावर काँग्रेसतर्फे मालवणमधून विक्रमी मतांनी विजयी
2005 - आघाडी सरकारमध्ये महसूल मंत्रीपदी निवड
2007 - काँग्रेसमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याविरोधात बंड
2008 - पक्षविरोधी टिप्पणीमुळे काँग्रेसमधून निलंबन
2009 - विधानसभेनंतर उद्योग मंत्रीपदावर घसरण
2014 - लोकसभेला पुत्र निलेश राणे यांच्या पराभावनंतर मंत्रीपदाचा राजीनामा
2014 - मुख्यमंत्री पदासाठी झुलवल्याच्या नाराजीतून पुन्हा मंत्रीपदाचा राजीनामा
2014 - विधानसभा निवडणुकीत कणकवली मतदारसंघातून शिवसेनेच्या वैभव नाईक यांच्याकडून राणेंचा पराभव
2015 - वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतही राणेंचा पराभव झाला.
2017 - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. एनडीए मध्ये घटक पक्ष म्हणून सामील.
2018 - भाजपच्या उमेदवारीवर राज्यसभेवर निवड
नितेश नारायण राणे -
नितेश नारायण राणे यांनी २०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये कणकवली मतदारसंघामधून निवडणूक लढवली व २५,००० हून अधिकच्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. इ.स. २०१० मध्ये चिंटू शेख याने नितेश राणेंनी त्याच्यावर गोळीबार केल्याचा आरोप केला होता, याप्रकरणी पोलीस चौकशी होऊन नंतर राणेंना क्लीन चीट देण्यात आली होती. इ.स. २०१३ मध्ये चिंटू शेखने नितेश राणेंविरोधात विक्रोळी मेट्रोपॉलिटन कोर्टात दाखल केलेली याचिका बिनशर्त मागे घेतली. इ.स. २०१३-१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या गुजरात विकासाच्या मॉडेलवर टीका करत नितेश राणेंनी गुजराती लोकांबद्दल ट्विटरवर प्रतिक्रिया नोंदवल्यामुळे वाद निर्माण झाला होता. मांसाहारी असल्याच्या कारणावरून मराठी माणसाला फ्लॅट न विकणार्या गुजराती बांधकाम व्यावसायिकांविरोधात त्यांनी भूमिका घेतली. नितेश राणे यांचा विवाह ऋतुजा शिंदे यांच्याशी २८ नोवेंबर इ.स. २०१० रोजी मुंबई येथे झाला. महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रीय असलेल्या नितेश राणेंना व्यंगचित्रांची आवड असून ते स्वतः व्यंगचित्रकार आहेत. नितेश राणे यांचे भाऊ निलेश नारायण राणे हे माजी लोकसभा सदस्य आहेत.नितेश राणे यांचा जन्म २३ जानेवारी इ.स. १९८२ रोजी जन्म झाला. त्यांचे एमबीए पर्यंतचे शिक्षण लंडन मध्ये झाले असून २००५ साली नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर वडिलांना राजकारणात साथ देण्याच्या उद्देशाने नितेश राणे भारतात आले होते.
डॉ. निलेश नारायण राणे -
निलेश राणे यांचा जन्म: १७ मार्च १९८१ रोजीचा आहे. सध्या काँग्रेस पक्षामधील नेते व माजी लोकसभा सदस्य आहेत. ते पंधराव्या लोकसभेमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडून आले होते. परंतु २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये राणे शिवसेनेच्या विनायक राउत यांच्याकडून पराभूत झाले होते. निलेश राणे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आहेत. निलेश राणे यांचेच भाऊ नितेश नारायण राणे विद्यमान महाराष्ट्र विधानसभा सदस्य आहेत.
'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' म्हणून राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी केली आहे. 'महाराष्ट्र स्वाभिमान या पक्षाचा नोंदणीकृत पत्ता - २०२ संत निवास, १४ वा लिंक रोड, राजकुमार ज्वेलर्सच्यावर, खार (प), ४०००५२ असा आहे. या पत्यावर यापूर्वी प्रवीण प्रताप राणे यांच्या नावे अनेक कंपन्या रजिस्टर आहेत. अनेक कंपन्यामध्ये संचालक म्हणून कार्यरत असलेले प्रवीण प्रताप राणे हे PURE FOODS & BEVARAGES PRIVATE LIMITED या कंपनीत नारायण राणे यांचे भागीदार संचालक आहेत. तर एकूण ५८ कंपन्यामध्ये राणे कुटुंबीय एकमेकांना भागीदार आहेत.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
================================================पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1500/-रु.मध्ये
CLICK HERE -
https://imojo.in/1gdby2================================================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/coopebook================================================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
https://imojo.in/prabindiaEBook================================================