Saturday, 4 January 2020

विधानपरिषदेच्या 2 रिक्त जागांसाठी 24 व 31 जानेवारीला पोटनिवडणुक

विधानपरिषदेसाठी १३ उमेदवार रिंगणात

विधानपरिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था पोटनिवडणुकीत गुरुवारी नूरमहंमद खान गुलाबखान या अपक्ष उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने १३ उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेचे दुष्यंत सतीश चतुर्वेदी, भाजपचे सुमित रमेश बाजोरिया यांच्यासह अपक्ष म्हणून जावेद परवेज अन्सारी, जगदीश ज्ञानचंद वाधवानी, दीपक माधवराव निलावार, देरकर संजय निळकंठराव, नंदकिशोर राधाकिशन अग्रवाल, प्रशांत प्रभाकर पवार, म. आरिफ अ. रजाक सुरैया, राजू नथुजी दुधे, शेख जावेद शेख मुस्तफा, शंकर मनोहरराव बडे, श्रीकांत उर्फ बाळासाहेब मुनगिनवार असे एकूण १३ उमेदवार रिंगणात आहेत. गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत १४ उमेदवारांनी १७ उमेदवारी अर्ज दाखल होते मात्र अर्जाच्या छाननीत ३ अर्ज बाद झाले असून १४ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. १७ जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार होते यावेळी एका अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला होता. यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेतील पक्षीय बलाबल पुढीलप्रमाणे आहे - भाजप – 147, शिवसेना – 97, काँग्रेस – 92, राष्ट्रवादी काँग्रेस- 51, प्रहार – 18, बसपा – 4,एमआयएम – 8, इतर. असे पक्षीय बलाबल आहे.

यवतमाळ स्थानिक स्वराज संस्थेमधून विधानपरिषद पोटनिवडणूकीसाठी 31 जानेवारीला मतदान


विधानपरिषदेच्या 2 रिक्त जागांसाठी  24 व 31 जानेवारीला मतदान घेण्यात येणार असून या जागांसाठी पोटनिवडणुक केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेली आहे. विधानपरिषदेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे (राष्ट्रवादी) हे आता विधानसभेवर निवडून गेल्याने रिक्त झालेल्या एका जागेसाठी येत्या 24 जानेवारीला निवडणूक होणार आहे. विधानसभा सदस्यांद्वारा ही निवड होणार आहे. या सदस्यत्वाची मुदत 7 जुलै 2022 पर्यंत आहे. या जागेवर निवडून येणाऱ्या सदस्याला अडीच वर्षांचा म्हणजेच 29 महिने कार्यकाल मिळणार आहे. तर विधानपरिषदेच्या यवतमाळ विभाग स्थानिक स्वराज संस्थेमधून निवडून द्यावयाच्या 1 जागेवर 31 जानेवारीला पोटनिवडणुक घेण्यात येणार आहे. यवतमाळ स्थानिक स्वराज संस्थेमधून निवडून आलेले शिवसेनेचे तानाजी सावंत हे विधानसभेवर निवडून आल्याने ही जागाही रिक्त झालेली आहे. त्या जागेचाही निवडणूक कार्यक्रम आज निवडणूक आयोगाने घोषित केला असून येत्या 31 जानेवारी रोजी येथे मतदान होणार आहे. या सदस्यत्वाची मुदत 5 डिसेंबर 2022 पर्यंत आहे. या जागेवर निवडून येणाऱ्या सदस्याला सरासरी तीन वर्षांचा म्हणजेच 35 महिने कार्यकाल मिळणार आहे. विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहता महाराष्ट्र विकास आघाडीचा उमेदवार सहज विजय प्राप्त करू शकतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसल्याने त्यांना सहा महिन्यात कोणत्याही एका सभागृहात निवडून येणे आवश्यक असल्याने ते ही पोटनिवडणूक लढवतील अशी चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळविल्यामुळे विधानपरिषद जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे येत्या २४ जानेवारी रोजी या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले की, मुंडे यांनी गेल्या १० ऑक्टोबर रोजी विधानसभेची निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे त्यांची विधान परिषदेची जागा रिक्त झाली आहे. या जागेवर २४ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. विधान परिषद सदस्य म्हणून मुंडे यांचा कार्यकाळ सात जुलै २०२२ पर्यंत होता. आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार या जागेसाठी पोट निवडणूक घेण्यात येणार असून त्यांची अधिसूचना ७ जानेवारी रोजी काढली जाणार आहे. त्या दिवसापासून निवडणूक प्रक्रिया सुरू होईल असेही सांगण्यात आले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतीम तारीख १४ जानेवारी असणार आहे. तर उमेदवारी अर्जांची छाननी १५ जानेवारीला करण्यात येणार आहे. नाव मागे घेण्याची अंतीम तारीख ही १७ जानेवारी असणार आहे. मतदान २४ जानेवारीला सकाळी नऊ वाजेपासून सायंकाळी ४ वाजेच्या दरम्यान घेण्यात येणार आहे. यानंतर सायंकाळी पाच वाजता मतमोजणी करण्यात येणार आहे. त्या आधारावर निवडणुकीचा निकालही त्याच दिवशी जाहीर करण्यात येणार आहे. विधान परिषदेच्या या निवडणुकीत राज्य विधानसभेचे सदस्य मतदान करणार आहेत. 
असा असणार पोटनिवडणुकीचा कार्यक्रम- राज्यातील यवतमाळ स्थानिक स्वराज्य मतदार संघातून विधानपरिषदेच्या रिक्त जागेसाठी 31 जानेवारी 2020 ला पोटनिवडणूक  घेण्यात  येणार  असून 4 फेब्रुवारीला  मतमोजणी  होणार  आहे. यवतमाळ विधानपरिषदेच्या जागेसाठी 31 जानेवारी 2020 ला मतदान घेण्यात येणार आहे. 7 जानेवारीला निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 14 जानेवारी  असून 15  जानेवारीला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. 17 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. तर 4 फेब्रुवारीला मतमोजणी पार पडून निकाल जाहीर होईल.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
=============================
=======

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.