Friday, 10 January 2020

निवडणूक निकाल; महानगरपालिका पोटनिवडणूक/जिल्हा परिषद व पंचायत समिती/नगरपरिषद/ नगरपंचायत निवडणूक निकाल

 

मुंबई, नाशिक महापालिका पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवार विजयी

  

मुंबई महापालिकेच्या मानखुर्दमधल्या 141 क्रमांक प्रभागासाठीच्या झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या विठ्ठल लोकरे यांचा विजय झाला आहे. त्यांनी भाजपच्या बाळू पांचाळ यांचा 1385 मतांनी पराभव केला. शिवसेनेने मुंबई महापालिकेच्या पोटनिवडणुकीतही विजयाचा झेंडा फडकवला आहे. त्यामुळे शिवसेनेचं पालिकेतील बळंही वाढलं आहे. मानखुर्द येथील प्रभाक क्रमांक १४१ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने दणदणीत विजय मिळवला आहे. विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करणारे व विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले विठ्ठल लोकरे यांनी पालिका पोटनिवडणुकीत मात्र पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. विठ्ठल लोकरे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे बबलू पांचाळ यांचा १ हजार ३८५ मतांनी पराभव केला. लोकरे यांना ४ हजार ४२७ तर पांचाळ यांना ३ हजार ४२ मते मिळाली. काँग्रेसचे विठ्ठल लोकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याने या प्रभागात पोटनिवडणूक झाली. शिवसेना, भाजप, काँग्रेस, समाजवादी पक्ष या प्रमुख पक्षांसह एकूण १८ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. एकूण १८ हजार ५४ पुरुष आणि १४ हजार ३२ महिला मतदार असे एकूण ३२ हजार ८६ मतदार या प्रभागात असून त्यापैकी १३,४७६ मतदारांनी मतदान केले होते. यामध्ये, ७३४४ पुरुष मतदार आणि ६१३२ महिला मतदारांचा समावेश होता. आज सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होऊन अवघ्या एका तासातच निकाल हाती आला.

नाशिक महापालिकेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे मधुकर जाधव विजयी

नाशिक महापालिकेच्या एका प्रभागासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्याच मधुकर जाधव यांचा विजय झाल्याचे कळते आहे. त्यांनी मनसेच्या दिलीप दातीर यांचा पराभव केला. नाशिकमध्येच प्रभाग 22 मधून महाविकास आघाडीच्या जगदीश पवार यांचा 3388 मतांनी विजय झाला आहे. नाशिक महापालिकेच्या नाशिक रोड विभागातील प्रभाग क्रमांक २२ च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जगदीश पवार यांनी विजय मिळवला. पवार यांनी ४९१३ मते मिळाली तर, भाजपच्या पराभूत उमेदवार विशाखा शिरसाठ यांना १५२५ मते मिळाली. सिडकोतील प्रभाग क्रमांक २८ मधील पोटनिवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकला आहे. शिवसेनेचे मधुकर जाधव २८१२ मतांनी विजयी झाले. जाधव यांना ५८६५ मते मिळाली. तर, मनसेचे दिलीप दातीर यांना ३०५३ मते मिळाली. भाजपाच्या सरोज आहिरे यांनी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीकडून लढविण्यासाठी भाजपा नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता. तर शिवसेनेचे नगरसेवक असलेल्या दिलीप दातीर यांनी मनसेकडून निवडणूक लढविण्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत संगीता शेळके यांचा विजय

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 7 ब साठी झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत संगीता शेळके यांचा विजय झाला आहे. त्यांनी भाजपच्या कृष्णा म्हासळकर यांचा पराभव केला आहे. संगीता शेळके यांना 1452 मते मिळाली तर म्हासळकर यांना 657 मिळाली होती. भाजपमधून राष्ट्रवादीत दाखल झालेले आमदार सुनील शेळके यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता. त्याच पदासाठी तळेगावात पोटनिवडणूक लागली होती. यावेळी आमदार सुनील शेळके यांच्या काकी संगीता शेळके नशीब आजमावत होत्या. अपक्ष उभ्या राहिलेल्या संगीता शेळकेंना महाविकासआघाडीने पाठिंबा दर्शवला होता. संगीता यांनी भाजपच्या कृष्णा म्हाळसकर यांचा 795 मतांनी पराभव केला. संगीता शेळके यांना 1 हजार 452 मते मिळाली, तर कृष्णा म्हाळसकर यांना 657 मते पडली. म्हाळसकर हे भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे समर्थक आहेत. विधानसभा निवडणुकीत बाळा भेगडेंचा पराभव करुन सुनील शेळकेंनी भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला होता. याची पुनरावृत्ती तळेगाव नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीतही झाली. काँग्रेस-राष्ट्रवादी प्रणित तळेगाव जनसेवा विकास समिती तसेच शहर सुधारणा व विकास समिती पुरस्कृत अपक्ष उमेदवार संगीता शेळके यांना एकूण 1,452 तर भाजपचे उमेदवार कृष्णा मारुती म्हाळस्कर यांना 657 मतांवर समाधान मानावे लागले. विधानसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर सुनील शेळके यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणूक झाली. विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी बाळा भेगडे यांनी पूर्ण ताकद पणाला लावली होती. पण या विजयामुळे सुनील शेळके यांनी त्यांची प्रभागावरील पकडही भक्कम असल्याचे दाखवून दिले. तळेगाव नगर परिषदेत 26 पैकी 14 जागा जिंकून भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले होते. सुनील शेळके यांच्या पाठोपाठ त्यांचे चुलतबंधू संदीप शेळके यांनी देखील भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे भाजपचे संख्याबळ घटून 12 झाले. सभागृहातील बहुमत टिकविण्यासाठी भाजपला पोटनिवडणुकीतील विजय महत्त्वाचा होता, मात्र पोटनिवडणुकीत भाजपने जागा गमावल्यानंतर विरोधकांचे पारडे जड झाले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत तळेगाव जनसेवा विकास समिती तसेच शहर सुधारणा व विकास समितीचे संख्याबळ 13 झाले आहे.तळेगाव नगरपरिषदेत भाजपच्या नगराध्यक्षा असल्या तरी सभागृहात विरोधकांचे बहुमत झाल्याने भाजपची पुढील वाटचाल खडतर बनली आहे. संदीप शेळके यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेसाठी सहा फेब्रुवारीला होणार आहे. ही पोटनिवडणूक जिंकली तरच भाजपला सभागृहात कामचलाऊ बहुमत मिळू शकणार आहे, मात्र त्या पोटनिवडणुकीतही भाजपला आस्मान दाखवून बहुमत अधिक बळकट करण्याची व्यूहरचना तळेगाव जनसेवा विकास समिती तसेच शहर सुधारणा व विकास समिती यांनी आखल्याचे समजते. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता पुढील पोटनिवडणुकीकडे लागले आहे.

राज्यातील नगरपरिषद/नगरपंचायतीच्या रिक्त 12 सदस्य पदांसाठी पोटनिवडणूक; 6 फेब्रुवारीला मतदान


तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रभाग क्रमांक 1 ब ची पोटनिवडणूक

राज्यातील नगरपरिषद/नगरपंचायतीच्या रिक्त 12 सदस्य पदांसाठी पोटनिवडणूक 6 फेब्रुवारीला होणार आहे. यामध्ये तळेगाव दाभाडे नगर परिषद प्रभाग क्रमांक 1 ब ची पोटनिवडणूक दि. 6 फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी परिपत्रकाव्दारे जाहीर केली आहे. नगरसेवक संदीप बाळासाहेब शेळके यांनी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा जिल्हाधिकारी यांचेकडे दिला होता. राजीनामा मंजूर झाल्याने हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीच्या कामकाजासाठी उपविभागीय अधिकारी, मावळ, मुळशी,उपविभाग पुणे संदेश शिर्के हे निवडणूक निर्णय अधिकारी तर सहाय्यक म्हणून तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांची नेमणूक करण्यात आली आहे.
निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
* नामनिर्देशन अर्ज भरणे- सोमवार (दि. 13) ते शुक्रवार (दि. 17) जानेवारी पर्यत. नगरपरिषद कार्यालय सकाळी 11 ते 3 वाजेपर्यत,
* नामनिर्देशन अर्ज छाननी- शनिवार (दि.18) जानेवारी सकाळी 11 वाजल्यापासून
* नामनिर्देशन अर्ज माघारी घेण्याची तारीख गुरुवार (दि.23) जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यत,
* मतदान- गुरुवार (दि. 6) फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 वा. ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यत
* मतमोजणी – शुक्रवार (दि. 7) फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता.
तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयामध्ये होईल.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
====================================
 



No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.