Monday 6 January 2020

यंदा राज्यसभेच्या 73 जागांसाठी निवडणूक

यंदा राज्यसभेच्या 73 जागांसाठी निवडणूक

यंदा म्हणजे सन 2020 च्या वर्षात राज्यसभेच्या एकूण 73 जागा रिक्त होणार आहेत. यंदा एकूण 69 सदस्य निवृत्त होत असून चार जागा आधिच रिक्त आहेत. जे सदस्य निवृत्त होणार आहेत त्यात भाजपचे 18 आणि कॉंग्रेसच्या 17 जणांचा समावेश आहे. राज्यसभेत स्वबळावर बहुमत प्राप्त करण्याचा प्रयत्न भाजपकडून सातत्याने होत असला तरी या प्रयत्नांत त्यांना यंदाही यश मिळण्याची शक्‍यता नाही. कारण सन 2018 आणि 2019 या वर्षात भाजपने काही राज्यांमधील आपली सत्ता गमावली आहे. कॉंग्रेसच्या जागांमध्ये मात्र यंदाच्या वर्षात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्‍यता आहे कारण त्यांनी काही राज्ये स्वबळावर जिंकली असून काही राज्यांमध्ये त्यांनी मित्र पक्षांबरोबर सरकार स्थापन केले आहे. यंदा जे प्रमुख सदस्य निवृत्त होत आहेत त्यात प्रामुख्याने रामदास आठवले आणि हरदीपसिंग पुरी या दोन केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. त्याखेरीज शरद पवार, दिग्विजयसिंह, विजय गोयल हे प्रमुख सदस्यही यंदा निवृत्त होत आहेत. राज्यसभेचे सभागृह 250 सदस्यांचे असून त्यात भाजपचे सध्या 83 आणि कॉंग्रसचे 45 सदस्य आहेत. भाजपची टॅली यंदा काही प्रमाणात कमी होणार असली तरी यंदा भाजपला उत्तरप्रदेशातून मोठी रसद मिळणार आहे कारण त्या राज्यातून राज्यसभेवर दहा नवीन सदस्य निवडून द्यावे लागणार आहेत. उत्तरप्रदेश विधानसभेत भाजपचे संख्याबळ जादा असल्याने त्यांना तेथे ही निवडणूक सोपी आहे. मात्र राजस्तान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड मध्ये कॉंग्रेसला भाजप पेक्षा अधिक अनुकल स्थिती आहे. यंदा महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागा रिक्त होत आहेत. तामिळनाडुतून सहा, पश्‍चिम बंगाल आणि बिहार मधून प्रत्येकी पाच जागा रिक्त होणार आहेत. आंध्र, गुजरात, कर्नाटक, आणि ओडिशातून प्रत्येकी चार जागा रिकाम्या होणार आहेत.  या वर्षाच्या अखेरीस राज्यसभेत 69 सदस्यांचा कार्यकाळ संपेल. ज्यांचे सदस्यत्व संपेल, त्यापैकी 18 सदस्य भाजपचे (भारतीय जनता पार्टी) आणि 17 कॉंग्रेसचे आहेत. त्याचबरोबर चार जागा आधीच रिक्त आहेत. यावर्षी राज्यसभेच्या 73 जागांवर निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत भाजप राज्यसभेत कसे असेल हे जाणून घेणे मनोरंजक आहे. वृत्तानुसार वर्ष 2020 मध्येच यूपीच्या 10 जागा रिक्त असतील. राज्यात भाजपचे सरकार आहे, त्यामुळे बहुतेक जागा त्यांच्या खात्यात जातील. समाजवादी पक्ष येथे सर्वात मोठा पराभूत होईल. भाजपासाठीही परिस्थिती फारशी चांगली ठरणार नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांचा राज्यसभा निवडणुकीवर स्पष्ट परिणाम होईल. कारण राज्यांमधील अंकगणित यावेळी भाजपच्या विरोधात जात आहे. आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे की, भाजपा आपल्या सदस्यांची संख्या वाढवू शकणार नाही आणि यामुळे राज्यसभेत बहुमतापासून दूर राहील. त्याचबरोबर राज्यसभेत कॉंग्रेससाठी परिस्थिती अधिक चांगली होईल कारण या वेळी त्यांचे सदस्य आणि त्यांचे सहयोगी संख्या वाढेल. वरवर पाहता, 2018 आणि 2019 मध्ये काही राज्यांमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे, अशा परिस्थितीत त्याचा थेट परिणाम राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीच्या निकालावर होईल. दुसरीकडे 245 सदस्यांच्या राज्यसभेत कॉंग्रेस व त्याच्या मित्रपक्षांची स्थिती सुधारेल. राज्यसभेत सध्या भाजपाचे 8 आणि कॉंग्रेसचे 46 सदस्य आहेत. या समीकरणानुसार, राज्यसभेत भाजपाची ताकद 83 च्या आसपास राहील आणि सभागृहात बहुमताची आशा याक्षणी पूर्ण होणार नाही. राज्यसभेतील अनेक दिग्गजांचा कार्यकाळ यंदा संपत आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री हरदीप पुरी, रामदास आठवले, दिल्ली भाजप नेते विजय गोयल यांचा समावेश आहे. कॉंग्रेसचे दिग्विजय सिंह आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा कार्यकाळही यंदा संपत आहे. राज्यसभेतील एकूण सभासदांची संख्या 250 आहे, त्यापैकी 12 सभासदांना राष्ट्रपतीपदी नेमण्यात आले आहे. तर 238 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी सदस्य निवडले आहेत. राज्यसभेचा सदस्य विधानसभेच्या निवडक आमदारांद्वारे निवडला जातो. प्रत्येक राज्यातील प्रतिनिधींची संख्या तेथील लोकसंख्येवर अवलंबून असते. उत्तर प्रदेशमधील राज्यसभेत एकूण 34 सदस्य आहेत. मणिपूर, मिझोरम, सिक्किम, त्रिपुरा इ. प्रत्येक छोट्या राज्यांतून फक्त एकच सभासद येतो. लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 154 नुसार राज्यसभेच्या सदस्याची मुदत 6 वर्षे असते. त्याचवेळी, दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्य सेवानिवृत्त होतात. उत्तर प्रदेशमध्ये एकूण 403 आमदार असून येथून राज्यसभेचे 10 सदस्य निवडले जाणार आहेत. सदस्यांना किती आमदार हवे आहेत हे ठरवण्यासाठी एकूण आमदारांच्या (10 जागा) 1 जोडून हे विभागले गेले आहे. ते 403/11 म्हणजेच 36.66 आहे. त्यानंतर त्यात 1 जोडली गेली म्हणजे जवळपास, 37 म्हणजेच यूपीतील कोणत्याही सदस्याला राज्यसभेवर जाण्यासाठी किमान 37 मतांची आवश्यकता असते. राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह असून इकडे खासदारांची निवड थेट जनता करत नसून लोकांनी विधानसभेवर निवडून दिलेले आमदार करतात. प्रत्येक राज्याला जागांची संख्या ठरवून दिलेली असते. त्या जागांसाठी कोणता खासदार निवडायचा, यासाठी त्या राज्याच्या आमदारांची मतं घेतली जातात. कोणत्या राज्याचे किती खासदार राज्यसभेवर निवडून जाणार हे त्या राज्याच्या लोकसंख्येवरुन ठरवलं जातं. त्यामुळे राज्यसभेत उत्तरप्रदेश राज्यातून सर्वांत जास्त खासदार निवडून येतात आणि त्यानंतर महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यांचा क्रमांक लागतो. एखाद्या राज्याच्या राज्यसभेच्या जागेवर निवडून येण्यासाठी त्या राज्याचा रहिवासी असण्याची अट नसते.

राज्यसभेच्या 5 जागा रिक्त होणार; या जागांवर होणार निवडणुका

राज्यसभेच्या 5 खासदारांचा कार्यकाल 2020 मध्ये संपुष्टात येणार असून त्यांच्या जागांवर नूतन वर्षात निवडणुका होणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि राष्ट्रवादीचे खासदार मजीद मेमन यांचा कार्यकाल मुदत संपत आहे. तसेच भाजपचे सहयोगी सदस्य संजय काकडे व भाजपचे खासदार अमर साबळे यांच्यासह आरपीआयचे नेते व मंत्री रामदास आठवले यांचा देखील कार्यकाल 2 एप्रिल 2020 मध्ये संपुष्टात येणार आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्रातून 13 सदस्य राज्यसभेत प्रतिनिधित्व करीत आहेत. यामध्ये भाजप-5, राष्ट्रवादी-2, कॉंग्रेस-2, आरपीआय-1, अपक्ष-1, राष्ट्रपती नियुक्त मध्ये भाजप-1 व कॉंग्रेस-1 असे पक्षीय बलाबल आहे. राज्यातील 13 सदस्यांपैकी प्रत्येकी 5 जणांचे 2020 आणि 2022 तर उर्वरित 3 सदस्यांचा कार्यकाल 2024 मध्ये संपुष्टात येणार आहे. 

29 विधानपरिषदेच्या जागांवर 2020 या नूतन वर्षात निवडणुका होणार

2020 या नूतन वर्षात 29 विधानपरिषदेच्या जागांवर निवडणुका होणार आहेत यामध्ये राज्यपालांद्वारे नामनियुक्त असलेल्या 12 जागांचा समावेश आहे. सद्यस्थितीत 2 राज्यपालांद्वारे नामनियुक्त जागा रिक्त असून येत्या 2020 या नूतन वर्षात 10 जागा रिक्त होत असल्याने या 12 जागांचा समावेश आहे. तर उर्वरित जागांचा कार्यकाल संपुष्टात येणार आहे अशा विधानसभा सदस्यांद्वारा निवडल्या जाणाऱ्या 8 जागा रिक्त होणार आहेत. तर अमरावती पदवीधर-1, औरंगाबाद पदवीधर-1, नागपूर पदवीधर-1, पुणे विभाग शिक्षक-1 यांचा कार्यकाल संपुष्टात येणार असल्याने रिक्त होणार असून विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे विधानपरिषदेचे 7 सदस्य पद रिक्त झालेल्या आहेत. बाॅम्बे सायमल्टेनियस मेंबरशिप अॅक्ट १९५७ अन्वये दुसऱ्या सभागृहाचा सदस्य होताच पहिल्या सभागृहाचे सदस्यत्व आपोआप रद्द होते. त्यामुळे विधानसभेत निवडून आलेल्या आमदारांचे परिषदेचे सदस्यत्व रद्द होते. महाराष्ट्राच्या विधानपरीषदेत 78 सदस्य आहेत. महाराष्ट्र विधिमंडळात 289 आमदार विधानसभेचे आहेत तर 78 सदस्य संख्या ही विधानपरिषदेची आहे. सध्या 11 नोव्हेंबर 2019 च्या विधानपरिषदेच्या संखेप्रमाणे पक्षीय बलाबल भाजप 22, शिवसेना 12, राष्ट्रवादी काँग्रेस 14, काँग्रेस 13, लोकभारती पक्ष 1, शेकाप 1, पीपल्स रिपबिलकन पार्टी 1, रासप 1, अपक्ष 6, रिक्त 7, असे आहे. 
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
====================================


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.