Friday, 17 January 2020

पोटनिवडणुकीतून भाजपची माघार; राष्ट्रवादीकडून संजय दौंड विधानपरिषदेवर बिनविरोध

धनंजय मुंडेंच्या जागेवर संजय दौंड बिनविरोध आमदार 

राष्ट्रवादीचे नेते सामाजीक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विधानपरिषदेतील रिक्त जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून संजय दौंड यांची बिनविरोध निवड झाली आहे. संख्याबळ नसल्यामुळे भाजपने अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे येत्या 24 जानेवारीची निवडणुक ही फक्त औपचारिकता म्हणून घेतली जाईल. बीड विधानपरिषदेसाठी भाजपकडून राजन तेली यांनी अर्ज दाखल केला होता. पण, संख्याबळ नसल्यामुळे त्यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या संजय दौंड यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. संजय दौंड हे माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे सुपुत्र आहेत. पंडितराव दौंड आणि शरद पवार यांचे जुने संबंध आहेत. मागील अनेक वर्षे संजय दौंड बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम करत आलेले आहेत. संजय दौंड काँग्रेसमध्ये आहेत पण शरद पवार यांनी बीड विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना शब्द दिला होता. त्यामुळे आता त्यांना राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर संधी देण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या विधानपरिषदेतील रिक्त जागेसाठी होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवाहन केल्यामुळे भाजपने आपला अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे बीड विधानपरिषदेवर राष्ट्रवादीच्या तिकीटावर संजय दौंड बिनविरोध निवडून आले आहेत. बीड विधानपरिषदेसाठी भाजपकडून दाखल झालेला राजन तेली यांचा अर्ज मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे संजय दौंड यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या 24 जानेवारीला विधानपरिषदेच्या रिक्त जागेसाठी होणारी पोटनिवडणूक ही केवळ औपचारिकता असेल. संजय दौंड हे माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे सुपुत्र आहेत. पंडितराव दौंड आणि शरद पवार यांचे जुने संबंध आहेत. परळी मतदारसंघात दौंड कुटुंबाचा दबदबा राहिला आहे. 2014 मध्ये चारही पक्ष जेव्हा स्वबळावर लढले होते, तेव्हा संजय दौंड यांनी परळी मतदारसंघातून काँग्रेसकडून तिकीटासाठी फील्डिंग लावली होती. संजय दौंड अनेक वर्ष बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम करत आलेले आहेत. संजय दौंड काँग्रेसमध्ये आहेत पण शरद पवार यांनी बीड विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांना शब्द दिला होता. त्यामुळे आता त्यांना राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर संधी देण्यात येत आहे. धनंजय मुंडे हे बीडमधील परळी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेल्याने बीड विधानपरिषदेची जागा रिक्त झाली आहे. धनंजय मुंडे यांची विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत 7 जुलै 2022 पर्यंत होती.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
====================================
 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.