Thursday, 9 January 2020

जिल्हानिहाय पालकमंत्री जाहीर

पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर  

   
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतंच राज्यातील मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर केले. या खातेवाटपानंतर सर्वांचे लक्ष जिल्हानिहाय पालकमंत्री कोण होणार याकडे लागले होते. आज (8 जानेवारी) मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळाले आहे. तर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना मुंबई उपनगरचे पालकमंत्रिपद मिळालेले आहे. मात्र या यादीत ठाकरे सरकारमधील सात मंत्र्यांना एकाही जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळालेले  नाही. भाजप-शिवसेनेच्या सरकारमध्ये मुंबईचे पालकमंत्रिपद हे शिवसेनेकडे होते. उद्योगमंत्री सुभाष देसाई हे मुंबईचे पालकमंत्री होते तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात माजी राज्यमंत्री सचिन अहिर हे मुंबईचे पालकमंत्री होते. पण यंदाच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये मुंबईचे पालकमंत्रिपद हे काँग्रेसच्या वाटल्या गेले असून सुभाष देसाई यांना औरंगाबादचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या यादीत राष्ट्रवादीला 12, शिवसेनेला 13 आणि काँग्रेसला 11 जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 30 डिसेंबरला झाला होता. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये 36 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये 26 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांचा समावेश होता. राष्ट्रवादीला 14 (10 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदे), शिवसेनेला 12 (8 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदे), तर काँग्रेसला 10 (8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदे) मंत्रिपदे मिळाली आहेत. आधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत तिन्ही पक्षातील प्रत्येकी दोन मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादीला 16, शिवसेनेला 14 आणि काँग्रेसला 12 अशी मंत्रिपदे आहेत. यानंतर चार दिवसांनी म्हणजेच 5 जानेवारी रोजी खातेवाटप जाहीर झाले. यामध्ये 26 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांना खातेवापट जाहीर करण्यात आले. विशेष म्हणजे या खाते वाटपात दहा राज्यमंत्र्यांकडे एकूण 58 खाती देण्यात आली आहेत.

राष्ट्रवादी (12)

1. पुणे- अजित अनंतराव पवार
2. रायगड – आदिती सुनिल तटकरे
3. नाशिक- छगन चंद्रकांत भुजबळ
4. अहमदनगर- हसन मियालाल मुश्रीफ
5. सातारा- शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील
6. सांगली- जयंत राजाराम पाटील
7. सोलापूर- दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील
8. जालना- राजेश अंकुशराव टोपे
9. परभणी- नवाब मोहम्मद इस्लाम मलिक
10. बीड- धनंजय पंडितराव मुंडे
11. बुलडाणा- डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे
12. गोंदिया- अनिल वसंतराव देशमुख

शिवसेना (13)

1. मुंबई उपनगर- आदित्य उद्धव ठाकरे
2. ठाणे- एकनाथ संभाजी शिंदे
3. रत्नागिरी- अनिल दत्तात्रय परब
4. सिंधुदुर्ग- उदय रविंद्र सामंत
5. पालघर- दादाजी दगडू भुसे
6. धुळे- अब्दुल नबी सत्तार
7. जळगाव- गुलाबराव रघुनाथ पाटील
8. औरंगाबाद- सुभाष राजाराम देसाई
9. वाशिम- शंभुराज शिवाजीराव देसाई
10. यवतमाळ- संजय दुलीचंद राठोड
11. गडचिरोली- एकनाथ संभाजी शिंदे
12. उस्मानाबाद- शंकरराव यशवंतराव गडाख
13. अकोला- ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू

काँग्रेस (11)

1. मुंबई शहर- अस्लम रमजान अली शेख
2. नंदुरबार-  के.सी. पाडवी
3. कोल्हापूर- विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
4. हिंगोली- वर्षा एकनाथ गायकवाड
5. नांदेड- अशोक शंकरराव चव्हाण
6. लातूर- अमित विलासराव देशमुख
7. अमरावती-  यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)
8. नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत
9. वर्धा – सुनील छत्रपाल केदार
10. भंडारा- सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील
11. चंद्रपूर- विजय नामदेवराव वडेट्टीवार

‘या’ मंत्र्यांकडे एकही पालकमंत्रिपद नाही

जितेंद्र आव्हाड – गृहनिर्माण मंत्री
संदीपान भुमरे – रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री
प्राजक्त तनपुरे – राज्यमंत्री
दत्तात्रय भरणे – राज्यमंत्री
राजेंद्र पाटील यड्रावकर – राज्यमंत्री
विश्वजीत कदम – राज्यमंत्री
संजय बनसोडे – राज्यमंत्री
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
====================================
 


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.