नागपूरसह धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि पालघर या सहा जिल्हा परिषदांचे निकाल
नागपूरसह धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि पालघर या सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या मतमोजणीला आज (बुधवार) १० वाजता सुरुवात झाली होती.. पालघर, नागपूर, धुळे, नंदुरबार, अकोला आणि वाशिम या सहा जिल्हा परिषदांसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सर्वच जिल्हा परिषदांमध्ये आजी-माजी मंत्र्यांसह सर्वपक्षीय दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यात धुळे जिल्हा परिषद सोडली तर इतर पाच जिल्हा परिषदेत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. सर्वात जास्त धक्का हा नागपुरात बसला आहे. नाशिम, पालघर, वाशिम आणि नंदूरबार येथे महाविकास आघाडीचे सत्ता आली आहे. तर अकोल्यात वंचित बहुजन आघाडीने सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. त्यामुळे भाजपने सहा पैकी एकाच जिल्हा परिषदेवर आपला झेंडा रोवण्यात यश आले आहे. पहिल्या टप्प्यात केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांना मोठा धक्का बसला आहे. गडकरींचे मूळ गाव धापेवाडा येथून काँग्रेसचे उमेदवार काँग्रेसचे महेंद्र डोंगरे विजयी झाले आहेत. धुळे जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकला आहे. एकूण ५६ जागांपैकी ४३ जागांचे निकाल लागले असून यातील ३१ जागा भाजपने जिंकल्या आहेत. तर काँग्रेसने ५, शिवसेनेने ३, राष्ट्रवादी २ आणि इतर २ जागांवर विजय मिळवला आहे. धुळ्यात ३७ जागा जिंकण्याचा दावा भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनी केला आहे. राज्यात सर्वात मोठा विजय असल्याचे महाजन यांनी म्हटले आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या ५४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत १३ जागांवर विजेत्या उमेदवाराच्या मताधिक्यापेक्षा नोटा मते (वरीलपैकी कुणी नाही) अधिक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या सर्व ठिकाणी विजयात नोटा मतांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे. जिल्ह्यात तलवाडा विक्रमगड येथे सर्वात अटीतटीची लढत होऊन शिवसेनेच्या भारती कामडी (२,७४१) या अवघ्या सात मतांनी निवडून आल्या. अनुसूचित जमाती स्त्रियांकरिता राखीव मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस (२७३४), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (२३४४) आणि भारतीय जनता पार्टी (२४५१) उमेदवारांमध्ये चौरंगी व अटीतटीची लढत झाली. या गटामध्ये दोन अपक्ष उमेदवारांनीही पाचशेहून अधिक मते घेतली असून नोटाला ३४० मते पडल्याचे दिसले. या गटामध्ये शिवसेनेचा उमेदवार अवघ्या सात मताने विजय झाला. याच पद्धतीने धामणगाव, नंडोरे-देवखोप, चंद्रपाडा, खोडाळा, शिगावखुताड, तारापूर-अबीटघर, सरावली (डहाणू), न्याहाळे बुद्रुक, जामशेत, वणई व सूत्रकार येथे विजयी उमेदवार ठरवण्यास नोटा मते निर्णायक ठरली. जिल्ह्यामध्ये तीन ठिकाणी १०० पेक्षा कमी मताधिक्याने उमेदवार विजयी झाले असून इतर पाच ठिकाणी विजयी उमेदवारांचे मताधिक्य शंभर ते दोनशे मतांच्या मध्ये होते.
नागपूर जिल्हा परिषदेचा निकाल (2020)
नागपूर एकूण जागा ५८ पैकी ५७
भाजप - १४
शिवसेना - १
काँग्रेस - ३१
राष्ट्रवादी - १०
इतर - २
वाशिम जिल्हा परिषदेचा निकाल (2020)
वाशिम एकूण जागा ५२ पैकी ५२
भाजप - ७
शिवसेना - ७
काँग्रेस - ९
राष्ट्रवादी -१०
इतर - १९
अकोला जिल्हा परिषदेचा निकाल (2020)
अकोला एकूण जागा ५३ पैकी ५०
भाजप - ७
शिवसेना -११
काँग्रेस - ४
राष्ट्रवादी - ३
वंचित - २१
इतर - ४
धुळे जिल्हा परिषदेचा निकाल (2020)
धुळे एकूण जागा ५६ पैकी ५६
भाजप - ३९
शिवसेना - ४
काँग्रेस - ७
राष्ट्रवादी - ३
इतर - ३
नंदूरबार जिल्हा परिषदेचा निकाल (2020)
नंदूरबार एकूण जागा ५६ पैकी ५६
भाजप - २३
शिवसेना - ७
काँग्रेस - २३
राष्ट्रवादी - ३
इतर - ०
पालघर जिल्हा परिषदेचा निकाल (2020)
पालघर एकूण जागा ५७ पैकी ५७
भाजप - १०
शिवसेना - १८
काँग्रेस - १
राष्ट्रवादी - १५
इतर - १३
==========================
* नागपूर जिल्हा परिषद-राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील मेंटपाजरा मधून विजयी
* केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे मूळ गाव धापेवाडा येथून काँग्रेसचे महेंद्र डोंगरे विजयी
* माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राहत्या कोराडी जिल्हापरिषद सर्कलमधून कॉंग्रेसचे उमेदवार नाना कंभाले विजयी
* नंदुरबार जिल्हा परिषद- मंत्री के. सी. पाडवींच्या पत्नी हेमलता पाडवी पराभूत
पालघर, नागपूर, धुळे, नंदुरबार, अकोला आणि वाशिम या सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. पालघर जिल्हा परिषदेच्या 57 जागांसाठी 229 उमेदवार रिंगणात होते. नागपूर जिल्हा परिषदेच्या 58 गटांसाठी 270 उमेदवार रिंगणात होते. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या 56 गटांसाठी 225 उमेदवार रिंगणात होते. वाशिम जिल्हा परिषदेच्या 52 जागा, तर सहा पंचायत समितीच्या 104 जागांसाठी मतदान झाले होते. अकोला जिल्हा परिषदेसाठी 277 तर पंचायत समितीसाठी 492 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. जिल्हा परिषदेच्या 51 गटांसाठी 216 उमेदवार, तर 110 गणांसाठी 397 उमेदवार रिंगणात होते.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये
CLICK HERE -
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
====================================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.