तळेगाव दाभाडे नगर परिषदेत भाजपचे बहुमत संपुष्टात!
तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या प्रभाग क्र. एक ब मध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकीच्या राजकारणाला शेवटच्या टप्प्यात नाट्यपूर्ण कलाटणी मिळाली. भाजपचे युवा कार्यकर्ते निखिल भगत व स्वप्नीता भगत यांनी आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस आघाडी प्रणित जनसेवा विकास समिती आणि शहर सुधारणा व विकास समिती पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. भगत यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. भाजपचे नगरसेवक व आमदार सुनील शेळके यांचे चुलतबंधू संदीप शेळके यांनी राजीनामा दिल्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करायचा आज शेवटचा दिवस होता. स्वतःच्या घरातील तसेच पक्षातील इच्छुक उमेदवारांची समजूत घालून आमदार शेळके यांनी त्यांना थांबण्याची विनंती केली. आमदार शेळके व किशोर आवारे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या उमेदवाराचा पक्ष प्रवेश घडवून त्याला ऐनवेळी उमेदवारी दिल्याने भाजपची गोची झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आमदार सुनील शेळके तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे तसेच किशोर आवारे, गणेश खांडगे, गणेश काकडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष यादवेंद्र खळदे आदींच्या प्रयत्नांतून निखिल भगत यांची जनसेवा विकास समिती आणि शहर सुधारणा व विकास समितीची उमेदवारी निश्चित झाली. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आमदार शेळके व उपस्थित नेत्यांनी निखिल भगत यांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर बबनराव भेगडे, बापूसाहेब भेगडे, किशोर आवारे, गणेश खांडगे, गणेश काकडे, यादवेंद्र खळदे, चंद्रभान खळदे, सुलोचनाताई आवारे, रवींद्र आवारे, संतोष भेगडे, उल्हास भगत, संदीप गराडे, संदीप शेळके, अनिकेत भेगडे, आशिष खांडगे आदींचेही त्यांनी विशेष आभार मानले. नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजप व जनसेवा विकास आघाडी यांची युती होती, मात्र राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणानुसार तळेगाव नगर परिषदेत जनसेवा विकास समिती आणि शहर सुृधारणा व विकास समिती एकत्र आली आहे. त्यामुळे नगर परिषदेतील भाजपचे बहुमत संपुष्टात आले आहे. नगर परिषदेतील सत्ता टिकवण्यासाठी भाजपला ही पोटनिवडणूक जिंकणे गरजेचे होते, मात्र उमेदवार देता न आल्याने ती संधी भाजपने गमावल्याचे दिसून येत आहे.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================
पुस्तक घर पोहोच मिळावा!
मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये
CLICK HERE -
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा!
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.
ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा-
====================================
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.