Friday, 24 January 2020

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांसह राज्य निवडणूक आयोगाकडून लोकशाही पंधरवडा

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांसह राज्य निवडणूक आयोगाकडून लोकशाही पंधरवडा

आपल्या देशामध्ये २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून प्रति वर्षी साजरा करण्यात येतो. भारत निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० या दिवशी झाल्याने हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. २५ जानेवारी २०११ रोजी पहिला राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. ज्याप्रमाणे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन, १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. यामागे त्या त्या दिवशी त्या त्या घटनेची आठवण जागृत राहावी व त्याची प्रेरणा घ्यावी असा हेतू असतो. त्याप्रमाणे मतदारांमध्ये जागृती निर्माण व्हावी हा मतदार दिन साजरा करण्यामागे मुख्य हेतू आहे. देशाच्या हितासाठी व विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे. मतदार हा राजा आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी निवडणूकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे. हे या राष्ट्रीय मतदार दिवसाने अधोरेखित केलेले आहे. नवीन मतदारांमध्ये जागृतीसाठी हा दिवस साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने जिल्हयात विविध स्पर्धा, जनजागृतीचे कार्यक्रम ही शालेय, महाविद्यालयीन पातळीवर आयोजित केलेले आहेत. गांव, तालुका व जिल्हास्तरावरही भारत निवडणूक आयोगाच्याह निद्देशानुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब) संस्थेने देखील या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे.

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मंत्रालयात प्रतिज्ञा 

'राष्ट्रीय मतदार दिना'निमित्त लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची प्रतिज्ञा घेण्याचा कार्यक्रम मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आज संपन्न झाला. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी उपस्थितांना प्रतिज्ञा दिली. प्रारंभी अतिरक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी माहिती दिली की, भारत निवडणूक आयोगाने 'सक्षम लोकशाहीसाठी निवडणूक साक्षरता' ही यावर्षीच्या राष्ट्रीय मतदार दिनाची संकल्पना निश्चित केली आहे. मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरु असून, दिनांक 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकानुसार वयाची 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवा वर्गाने आपली नोंदणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. मतदार दिनाची प्रतिज्ञा घेण्याच्या कार्यक्रमप्रसंगी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजी जोंधळे, सहमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शरद दळवी, आबासाहेब कवळे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्य निवडणूक आयोगाच्या पुढाकारातून २६ जानेवारीपासून लोकशाही पंधरवडा

'लोकशाही, निवडणुका व सुशासन' याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत साजरा करण्यात येणाऱ्या लोकशाही पंधरवड्यानिमित्त राज्यभरात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी  दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या पुढाकाराने 2018 पासून लोकशाही पंधरवड्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. यंदाचे हे तिसरे वर्ष आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने देशाच्या विकास प्रक्रियेमधील स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्त्व, स्थान आणि भूमिका; तसेच त्यांच्या निवडणुकांचे महत्त्व अधोरेखित करणे आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात आणि वेळेवर पार पाडण्यासाठीच राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली आहे; परंतु राज्य निवडणूक आयोग आणि भारत निवडणूक आयोग यांच्या कार्यकक्षेतील फरक आणि अधिकारांबाबत सर्व संबंधित घटकांमध्ये जनजागृती होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी हा उपक्रम निश्चितच फलदायी ठरु शकतो. भारत निवडणूक आयोगातर्फे 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित 28 फेब्रुवारी 2020 ते 27 मार्च 2020 या कालावधीत मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण करण्यात येणार आहे. या संधीचा लाभ घेऊन अधिकाधिक पात्र नागरिकांनी मतदार म्हणून नाव नोंदणी करावी, यासाठी लोकशाही पंधरवड्यानिमित्त जनजागृती करता येईल. त्याचबरोबर लोकशाही पंधरवड्यानिमित्त लोकशाही व सुशासन याबाबत जनजागृती करणे, पंचायतराज संदर्भातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करणे, राज्य निवडणूक आयोगाचे विविध उपक्रम सर्व संबंधित घटकांपर्यंत पोहचविणे, विविध स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून लोकशाही बळकटीकरणाचा संदेश सर्वदूर पोहचविणे, महिला मतदारांच्या नोंदणीबाबत विशेष मोहीम राबविणे इत्यादी स्वरूपाचे उपक्रम या पंधरवड्यानिमित्त राबविण्याबाबतचे निर्देश सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासनास देण्यात आले आहेत, असेही श्री. मदान यांनी सांगितले.

POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
====================================
 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.