Saturday 4 January 2020

स्थानिक राजकीय वर्चस्वासाठीच राजीनामा नाट्य

स्थानिक राजकीय वर्चस्वासाठीच राजीनामा नाट्य

शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र यामागे औरंगाबाद जिल्ह्यातील राजकारण असल्याचे मानले जात आहे. सिल्लोड तालुक्यात आमदार अब्दुल सत्तार यांचे एकहाती वर्चस्व आहे. जिल्हा परिषदेचे सर्वाधिक सदस्य, पंचायत समिती, नगरपालिका सत्तार यांच्या ताब्यात आहेत. औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सत्तार यांनी काँग्रेससोबत जाण्याऐवजी वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला. विधानसभा निवडणुकीत सत्तार विरुद्ध सर्व शिवसेना वगळता राजकीय पक्ष असे चित्र होते. सत्तारांनीच बाजी मारली. जिल्ह्यातील काँग्रेसलाही सत्तारांनी चांगलाच धक्का दिला. सत्तारांचे वर्चस्व अजून वाढू नये, यासाठी काँग्रेसने जंग जंग पछाडून यावेळी जिल्हा परिषदेत व्यूहरचना केली. पण राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी हा चक्रव्यूह भेदत काँग्रेसला अडचणीत आणले आहे. अध्यक्षपदासाठी सत्तार समर्थक सदस्यांसह शिवसेनेच्या विद्यमान अध्यक्ष व भाजपला सोबत घेऊन महाविकास आघाडीसमोरच आव्हान उभे केले. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील राजकारणात वर्चस्व टिकवण्यासाठी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा देणारे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर शिवसेनेचे नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. 'अब्दुल सत्तार गद्दार आहेत. त्यांना शिवसेनेतून हाकलून लावा. 'मातोश्री'ची पायरी चढू देऊ नका,' अशी विनंती त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सत्तार यांनी वेगळी भूमिका घेतल्याने मी शिवसेनेचा नेते म्हणून त्यांना समजावण्यासाठी गेलो होतो. मात्र, ते आमच्यासमोर शिवसेनेबद्दल वेडेवाकडे बोलले. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपला समसमान मते पडल्याने तिथे चिठ्ठी द्वारे महाविकास आघाडीच्या मीना शेळके यांची निवड झाली. मात्र, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे एल. जी. गायकवाड विजयी झाले. त्यामुळे चंद्रकांत खैरे संतप्त झाले आहेत. अब्दुल सत्तार यांच्या दगाबाजीमुळे उपाध्यक्षपदी भाजपचा विजय झाला, असा आरोप माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
===========================

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या मीना शेळके

औरंगाबाद जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सुद्धा महाविकास आघाडीच्या हाती गेली आहे. येथे काँग्रेसच्या उमेदवाराला अध्यक्षपद तर भाजपच्या उमेदवाराला उपाध्यक्ष पद मिळाले आहे. काँग्रेसकडून अध्यक्ष पदासाठी मीना शेळके यांनी तर शिवनेसेच्या वतीने उपाध्यक्ष पदासाठी शुभांगी काजवे यांची उमेदवारी दाखल करण्यात आली होती. परंतु, काजे यांना उपाध्यक्ष पद मिळवता आले नाही. महाविकास आघाडीच्या मीना शेळके एक मताने विजयी या अवघ्या एका मताने विजयी झाल्या आहेत. दोन्ही उमेदवरांना सम-समान 30-30 मते पडली होती. यानंतर एक मताची सोडत झाली आणि शेळके यांना विजयी घोषित करण्यात आले. तर दुसरीकडे भाजपचे उमेदवार लहानू गायकवाड यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून निवडल्याची घोषणा करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेसचा अध्यक्ष नको, शिवसेनेचाच हवा, असा आग्रह सेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी धरला. मात्र, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे यांनी त्यास विरोध केला. मातोश्रीवरून निरोप आल्याने काँग्रेसचाच अध्यक्ष झाला पाहिजे, अशी खैरे-दानवे यांनी स्पष्ट केले. त्यावर सत्तार यांनी थेट भाजपशी हातमिळवणी केली आणि शिवसेनेची बाजी एका रात्रीतून पलटवली. सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव सर्कलच्या शिवसेना सदस्या मोनाली राठोड यांनी अध्यक्षपदाच्या उमेदवार (भाजप पुरस्कृत) अॅड. देवयानी डोणगावकर आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार मीना शेळके या दोघींना मतदान करते वेळी हात वर केल्यामुळे तांत्रिक पेच निर्माण होऊन गोंधळ उडाला. परिणामी डोणगावकर या अध्यक्ष होता हाेता राहिल्या. शुक्रवारी स्थगित झालेली निवडणूक शनिवारी दुपारी घेण्यात येणार असल्याची माहिती पीठासन अधिकारी भानुदास पालवे यांनी दिली होती. औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदांसाठी शुक्रवारी सकाळी 10 वाजता अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली. 2.35 ते 2.40 अर्ज मागे घेण्यासाठी वेळ देण्यात आला होता. त्यानंतर अध्यक्षपदाच्या मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला. हात उंचावून मतदान करावयाचे होते. अध्यक्षपदासाठी डोणगावकर आणि शेळके तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या शुभांगी काजे, भाजपचे लहानू गायकवाड तर काँग्रेसकडून किशोर बलांडे हे निवडणूक रिंगणात होते. अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या मीनाताई शेळके व भाजपाच्या उमेदवार देवयानी डोणगावकर यांना ३०-३० अशी समान मते पडली होती. यानंतर चिठ्ठी काढण्यात आल्यावर काँग्रेसच्या मीनाताई शेळके यांची अध्यक्षपदी निवड झाली. तर उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत अशीच स्थिती अपेक्षित होती, मात्र महाविकासाघाडीची दोन मतं फुटली त्यामुळे भाजपाला ३२ व शिवसेनेच्या उमेदवाराला २८ मते मिळाली. यामुळे शिवसेनेला धक्का देत भाजपाचा उपाध्यक्ष झाला. औरंगाबाद जिल्हा परिषदेत सर्वाधिक २३ सदस्य भाजपकडे आहेत. तर, शिवसेना-१८, काँग्रेस-१६, राष्ट्रवादी -३, मनसे १, डेमोक्राटीक १ असे पक्षीय बलाबल आहे. मागीलवेळी शिवसेनेने भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसची मदत घेत अध्यक्षपद मिळवले होते.
POLITICAL RESEARCH & ANALYSIS BUREAU (PRAB) PUNE
पॉलिटीकल रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसेस ब्युरो (प्राब)
==========================================================================================================

पुस्तक घर पोहोच मिळावा!

 मतदारसंघ निहाय सद्यस्थिती जाणून घ्या फक्त 1000/-रु.मध्ये

[?] CLICK HERE - 

https://imojo.in/1gdby2
==============================
महाराष्ट्र सहकारी संस्था सुधारित अधिनियम व परिपत्रकांसह 
फक्त-250/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
"सहकारी संस्था निवडणूक नियम व प्रक्रिया"
Online E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/coopebook
=============================
फक्त-200/- रुपयांमध्ये E-Book मिळावा! 
निवडणूक पूर्वतयारी व आचारसंहिता
Online 200/- रुपये भरा आणि E-Book Download करा.

[?]  ई-पुस्तक प्राप्त करण्यासाठी लिंकवर क्लिक करा- 

https://imojo.in/prabindiaEBook
====================================

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.